(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी कथक नर्तकी रोहिणी भाटे

    रोहिणी भाटे यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनेक शिष्यांना गुरु रोहिणीताईंच्या अखंड मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.

      April 16, 2019


  • विनोदी बॉलिवूड कलाकार मोहम्मद उमर अली मुक्री

    मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे आणी त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.' वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.

    शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ' असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.

    कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिओच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवाजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.

    अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा' चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम और श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता.

    स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसले. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला.

    विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.

    सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बॉम्बे टू गोवा'पासून ते थेट `शराबी'पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. `तय्यब अली प्यार का दुश्मन' हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या.

    चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.

    त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मा.मुक्री यांचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ समीर परांजपे

      January 5, 2018


  • गणितानंद’ दत्तात्रेय कापरेकर

    दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर हे श्रीनिवास रामानुजन् यांच्यानंतरचे जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ. ते मराठी आहेत याचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. त्यांचे नाव प्रख्यात गणितज्ञ म्हणून ‘द वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मैथेमेटिशियन’ या स्वीडनहून प्रकाशित झालेल्या ग्रंथात समाविष्ट झालेले आहे.

      October 8, 2017


  • मराठीतील दर्जेदार नाटकांचे लेखक वसंत कानेटकर

    महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे वसंत कानेटकर. वसंत कानेटकर यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. त्यांचा जन्म २० मार्च १९२२ रोजी झाला.इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. मा.वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला. नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला. ३० वर्षांच्या काळात त्यांनी सुमारे चाळीस नाटकं आणि काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत घातल्या. प्रेक्षकांची आवडनिवड जाणणारा एक प्रयोगशील नाटककार म्हणून ते लोकप्रिय होते.
    वेड्याचं घर उन्हात हे त्यांचे पहिले नाटक म्हणजे मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. त्यानंतर देवांचं मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली, मत्स्यगंधा, हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतयं, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचयं इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. १९८८ मध्ये ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. वसंत कानेटकर यांचे ३१ जानेवारी २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      March 21, 2017


  • कवी गंगाधर महांबरे

    गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. पुढे ते पुण्यास राहू लागले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ यांच्या पाक्षिकात त्यांच्या बालकथा, कविता आणि अन्य लेख प्रसिद्ध व्हायचे. पुढे ही लेखनाची आवड वाढत गेली. त्यांनी पुण्याला गेल्यावर वृत्तपत्रव्यवसायास सुरुवात केली. पुढे भावगीतकार व चित्रपटगीतकार म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.

    उत्कट भावकाव्यात गणना होणारी त्यांची अनेक गीते आहेत. महांबरे यांनी ‘कंठातच रुतल्या ताना’ निळा सावळा नाथ, बोलून प्रेमबोल, ‘संधीकाली या अशा’ ‘नयनात तुझ्या सखि सावन का?’ अशा कित्येक सुंदर उत्कट भावकविता लिहिल्या. उत्तम भावगीतरचनांप्रमाणेच त्यानी सुरेख चित्रदर्शी भावरम्य चित्रपट गीते लिहिली. त्यामुळे त्यांची चित्रपटगीतकार म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. त्यांची चित्रपट गीते असलेले मराठी चित्रपट म्हणजे ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘सौभाग्यकांक्षिणी’ ‘एकटी’, ‘प्रीत तुझी माझी’ इत्यादी आहेत. गंगाधर महांबरे यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतात ‘तूच खरा आधार’, ‘जादुगारा तुला मी’, ‘देवाघरच्या फुला’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’, ‘हळदीकुंकवाला हळदीकुंकवाला बाई सुवासिनी झाल्या दंग’ इत्यादी गीते गाजत आहेत.

    त्यांची कित्येक गीते आशा भोसले, लता मंगेशकर, सुधीर फडके इत्यादी नामवंत गायक- गायिकांनी गाऊन महांबरे यांच्या गीतरचनांना योग्य तो न्याय दिलेला आहे. सुप्रसिद्ध नाटककार व बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक मालवणचे नामवंत साहित्यिक भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचा जीवनपट चितारणारे ‘एक अविस्मरणीय मामा’ हा छोटासा चरित्रग्रंथ महांबरे यांनी लिहिला आहे. याशिवाय ‘चार्ली चॅप्लीन’,‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मॉरिशस’, ‘मराठी गझल’ इत्यादी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारतीय आकाशवाणीचे एक मान्यवर गीतकार म्हणून त्यांचे आकाशवाणीसाठी योगदान आहे.

    चित्रपट रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनीमुद्रिका, संगीत मैफल, कॅस्टेस् आणि आता सी. डी. इत्यादी माध्यमांनी कवी मा.गंगाधर महांबरे यांच्या गीतांचा अनुरुप उपयोग करून घेतला आहे. ‘रसिका तुझ्याच साठी’ या त्यांच्या गीताची ध्वनिमुद्रिका एका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती. नवी दिल्ली येथील नॅशनल प्रोडक्टिव्हिटी कौन्सिलने त्यांना १९८३ साली पोएट ऑफ दि इयर हा सन्मान दिलेला असून गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने सन्माननीय फेलोशिप दिली होती. केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे अन्य पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. मा.गंगाधर महांबरे यांचे २३ डिसेंबर २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 26, 2017


  • अलबेला’ फेम मास्टर भगवान

    डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली.

      August 2, 2017


  • जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय

    पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

      February 11, 2022


  • मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे

    मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा जन्म ३ जुलै १९२५ रोजी झाला. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या. खरे तर सुनीताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटक आणि चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या.

    ‘वंदे मातरम्’ या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली. ‘बटाटय़ाची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’ या पुलंच्या प्रयोगातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. असे असूनही कलावंत म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नव्हती. नंतर या दोघांनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा. सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्यांचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरू केले तेव्हा सुनीताबाईंची खऱ्या अर्थाने सर्वसामान्य रसिकांना ओळख झाली. कविता हा त्यांचा जीव की प्राण होता. मराठीतील अनेक कवींच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. या काव्यप्रेमातूनच जाहीर काव्यवाचनाचा हा कार्यक्रम साकारला होता.

    १९९० मध्ये ‘आहे मनोहर तरी’ हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्याने साहित्य वर्तुळात तसेच पुलंच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. लेखिका म्हणून हे त्यांचे पहिले पुस्तक तडाखेबंद खपले व गुजराथी आणि इंग्रजीत अनुवादित झाले तरी त्याला पुलंसारख्या दिग्गज लेखकाच्या नावाचेच वलय होते. त्यानंतर मात्र ‘मण्यांची माळ’, ‘मनातलं अवकाश’ आणि ‘सोयरे सकळ’ या त्यांच्या पुस्तकांनी त्यांची साहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.. ‘प्रिय जी. ए.’ हे त्यांचे प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक.

    त्यांचे अत्यंत आवडते लेखक असलेल्या जी. ए. कुलकर्णीना त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा हा संग्रह म्हणजे मराठी साहित्यातील एक अत्यंत वेगळे असे दालन ठरले आहे. पुलंच्या ठायी असलेल्या कलंदर वृत्तीला गोंजारत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या सुनीताबाईंनी त्यांच्या दातृत्वासही सामाजिक जोड दिली. सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वातच सामाजिक सहवेदना असलेला एक कलावंत दडला होता. त्यामुळे लोकांची दु:खे एका कलावंताच्या नजरेने टिपल्यामुळेच त्यांच्या पुढाकाराने पु. ल. देशपांडे फाऊंडेशनची संकल्पना पुढे आली आणि विविध क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या अनेक संस्थांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या मिळू शकल्या.

    अनिल अवचट यांचे मुक्तांगण, पाल्र्याचा लोकमान्य सेवा संघ, मराठी विज्ञान परिषद, ग्रामायन यासारख्या अनेक संस्थांना पुल - सुनीताबाईंनी अक्षरश: लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. त्या प्रत्येकवेळी त्याची वाच्यता होणार नाही, याची खबरदारीही त्यांनी घेतली. त्यासाठी या दाम्पत्याने साधी राहणी पसंत केली. सुनीता देशपांडे यांचे ७ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      July 3, 2018


  • मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

    दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना मा.दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं ती भूमिका करीत. हजेरी मास्तर असलेल्या दत्ताजींना १९३७ सालच्या ‘कुंकू’मध्ये नायिका शांता आपटे हिला लग्नासाठी दाखवण्यात येणार्या् एका तरुण मुलाचे काम देण्यात आले. नायिका शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेर्याासमोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणार्या् अनंत माने यांनी केलं. कॅमेर्याहसमोरून घाबरून पळणार्याे याच दत्ताजींनी पुढे ‘माणूस’मधील ‘कशाला उद्याची बात’ या गाण्यातल्या सारंगीयाचं व ‘संत ज्ञानेश्वार’ या चित्रपटातील सोपानदेवाचं काम अगदी निर्भयपणे केलं होतं. ‘संत ज्ञानेश्वरर’च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक राजा नेने यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली. ‘प्रभात’मध्ये असल्यापासून दत्ताजींनी राजा नेने यांची धरलेली संगत ‘प्रभात’ सोडल्यावरही सुटली नव्हती. राजा नेने यांनी ‘प्रभात’बाहेरच्या दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांचे सहाय्यक म्हणून दत्ताजींनी काम केले होते. १९४७च्या ‘शादी से पहले’ या चित्रपटापर्यंत ते राजा नेने यांचे सहाय्यक होते. ‘मायाबाजार’ पासून दत्ता धर्माधिकांरींची दिग्दर्शक म्हणून ओळख झाली. त्यांनी स्वत:ची ‘आल्हाद चित्र’ नावाची चित्रपट काढणारी संस्था स्थापन केली. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील यांच्या ‘गाठीभेठी’ या कथेवरून ‘आल्हाद’चा पहिला चित्रपट ‘बाळा जो जो रे’ निघाला. आशा भोसलेंच्या आवाजातलं ‘बाळा जो जो रे’ हे अंगाईगीत महाराष्ट्रातल्या घराघरात गेलं. ‘आल्हाद’चा पुढचा ‘स्त्री जन्माही तुझी कहाणी’ हाही चित्रपट खूप गाजला. त्याच्या यशामुळे हिंदीतील प्रसिद्ध निर्माते सरदार चंदूलाल शहा यांनी त्यांच्या ‘रणजित मूव्हीज’तर्फे औरत तेरी कहानी (भारतभूषण- निरूपा रॉय) हा चित्रपट काढला. आधीचे दोन्ही चित्रपट बाहेरच्या निर्मात्यांनी हिंदीत काढल्यामुळे यावेळचा म्हणजे पुढचा तिसरा चित्रपट ‘आल्हाद’ने मराठी व हिंदी दोन्ही भाषात काढायचं ठरवलं. चित्रपटाचे नाव होते - ‘चिमणी पाखरं’ (हिंदीत-नन्हे मुन्ने) याही चित्रपटाने रौप्यमहोत्सव केला. १९५२ सालचा हा काळ म्हणजे ‘आल्हाद चित्र’चा ऐश्वार्याचा काळ होता. सर्वांचं भलं चिंतणार्या् धर्माधिकारींची नियत अतिशय चांगली होती. चित्रपटसृष्टीत शोधून सापडणार नाही असा प्रामाणिकपणाचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. वेगळ्या विषयावरचा म्हणजे बहिर्याड-मुक्या मुलीच्या भावस्पर्शी कथेवरचा ‘अबोली’ हा सुंदर चित्रपट अपयशी ठरला. खादीचा पांढराशुभ्र शर्ट, पायजमा व टोपी घालणारे पुढार्याटसारख्या पोषाखातले धर्माधिकारी चित्रपटसृष्टीतले वाटत नसत. चेहर्याावर कायम हास्य असणार्याे धर्माधिकारींचे सर्वांशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असत. मा.दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- मधू पोतदार

      December 30, 2016


  • दिग्दर्शक गजेंद्र अहिरे

    आपल्या कलाकृतीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेणारे कलावंत फार थोडे असतात. सामाजिक विषय समर्थपणे पडद्यावर जिवंत करणारे नवीन पिढीतील दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे त्यापैकी एक. आपल्याला काय सांगायचंय, ते कसं मांडायचं आहे याचा पक्का आराखडा गजेंद्र अहिरे यांच्या डोक्यात असतो.

      February 16, 2022