(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आलम आरा – पहिला भारतीय बोलपट

    अमेरिकेत बोलपटांची निर्मिती सुरू होऊन तीन-चार वर्षे नाही झाली तोच भारतात पहिला बोलपट निर्माण केला गेला. आलम आरा या पहिला भारतीय बोलपटाने १९३१ च्या मार्चमध्ये करण्याचा मान मिळवला. १४ मार्च १९३१ रोजी 'आलम आरा' मुंबईच्या 'मॅजेस्टिक' सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले होते. जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केले.

    सांगितले जाते, ब्लॅक मार्केटिंग भारतीय सिनेमाच्या पहिल्या बोलपटापासून सुरु झाली. या चित्रपटाचे निर्माते अर्देशीर एम्‌ इराणी हे होते. त्यात झुबेदा व मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका बरोबर, जिल्लो, सुशीला आणि पृथ्वीराज कपूर यांनी भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाची कहाणी जोसेफ डेव्हिड यांनी लिहिली होती, तसेच याचे दिग्दर्शन अर्देशिर ईराणीने लिहिली होती. १२४ मिनीटांचा हा सिनेमाला इम्पीरिअल मूव्हीटोन नावाची प्रॉडक्शन कंपनीने निर्मित केला होता.

    या पहिल्या बोलपट सिनेमातून संगीताला उत्तम स्थान मिळाले. 'आलम आरा'मध्ये सात गाणी होती आणि याच सिनेमाचे 'दे दे खुदा के नाम पे' भारतीय सिनेमाचे पहिले गाणे मानले जाते. हे गाणे वजीर मोहम्मद खानने गायले होते. 'बदला दिलवाएगा या रब..., 'रूठा है आसमान...', 'तेरी कातिल निगाहों ने मारा...', 'दे दिल को आराम...', 'भर भर के जाम पिला जा...', और 'दरस बिना मारे है...' सिनेमाची ही इतर गाणी होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 17, 2017


  • भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन

    डॉ. झाकीर हुसेन अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ते भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले.

      October 15, 2023


  • लेखिका, निवेदिका, गायिका शुभांगी मुळे

    शुभांगी यांनी रेडिओ स्टेशन वर तसेच टेलिव्हिजन वाहिन्यांसाठीही काम केले आहे. गेल्या त्या काही वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अशोक पत्कीची संगीत कार्यशाळा घेत असतात. शिवाय शुभांगी यांनी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली काही नवीन गाणीही गायली आहेत.

      June 16, 2022


  • अभिनेत्री हेमल इंगळे

    जन्म.२ मार्च १९९६ कोल्हापूर येथे. हेमल इंगळेने सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

      April 27, 2024


  • ख्यातनाम उर्दू शायर आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित शहरयार

    उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. अशा वातावरणात शहरयार यांना शायरीची गोडी कशी लागली याचे अनेकांना आश्चर्य वाटते. त्यांचे शिक्षण बुलंदशहर आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठात झाले. अंजुमन तरक्की ए उर्दू या संस्थेत त्यांनी कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ते अलिगड मुस्लीम विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेच ते उर्दूचे विभागप्रमुख म्हणून सेवा निवृत्त झाले. जेव्हा उर्दू साहित्यात नवतेची आणि आधुनिकतेची लाट आली होती, त्याच काळात शहरयार यांनी उर्दू साहित्यलेखनात प्रवेश केला. त्यांचे अनेक समकालीन काळाच्या ओघात बाजूला पडले, पण शहरयार यांनी नव्या पिढीलाही आपल्या शायरीची भुरळ घातली. उमराव जान या चित्रपटासाठी त्यांनी लिहीलेल्या ‘दिल चीज क्या है आप मेरी...’, ‘यह क्या जगह है दोस्तो’, ‘इन आँखो की मस्ती में’ या गझला आजरामर ठरल्या. त्यांनी बॉलीवूडमध्ये गमन, अंजुमन यासह अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्या अभिजात दर्जामुळे चित्रपट गीतेही चिरस्मरणीय ठरली. ख्वाब का दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८७ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे इस्मे आजम, सातवाँ दर आणि हिज्र के मौसम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शहरयार यांचे निधन १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 13, 2017


  • दक्षिणेतील देव अशी ओळख असलेले रजनीकांत

    दक्षिणेतील देव' अशी ओळख असलेले रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे झाला. रजनीकांत यांचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत. रजनीकांत यांचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. टॉलीवुडचे सुपरस्टार रजनीकांत यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी-कडेपठार हे आहे. सधारण ८०-९० वर्षांपुर्वी गायकवाड परिवार रोजगाराच्या शोधार्थ दाक्षिणात्य राज्यात गेले व तिथेच स्थायिक झाले.

    सुरवातीच्या २०-३० वर्षांमध्ये त्यांचा गावाकडे संपर्क होता पण कालांतराने तो तुटला, 'अपूर्व रागंगल' या तामिळ सिनेमाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी रजनीकांत बंगळूरमध्ये एस.टी. कंडक्टर म्हणून काम करत होते.

    रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील नुकतीच आपल्या करिअरची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केली आहेत.

    रजनीकांत अभिनयाबरोबरच आपल्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंट्साठी ओळखले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रजनीकांत यांचे चाहते आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतल्या या सुपरस्टारने 'अंधा कानून' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण साऊथ इंडस्ट्रीप्रमाणे हिंदी सिनेमात रजनी यांचा पाहिजे तसा करिष्मा चाललाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यानी आपले लक्ष्य दाक्षिणात्य सिनेमांवर केंद्रीत केले. तीन वर्षांपूर्वी आलेल्या 'शिवाजी, द बॉस' आणि 'रोबोट' या दोन्ही सिनेमांतून हिंदी चाहत्यांनीही रजनीकांतला डोक्यावर घेतले. आणि ते केवळ साऊथचेच नाही तर संपूर्ण भारताचे सुपरस्टार असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

    २००७ साली रिलीज झालेल्या 'शिवाजी' या सिनेमासाठी रजनी यांना तब्बल २६ कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले होते. आशियात जॅकी चॅननंतर एवढे मोठे मानधन मिळवणारे रजनीकांत एकमेव आहेत. खास गोष्ट म्हणजे हा सिनेमा इंग्लड आणि साऊथ आफ्रिकेत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणाऱ्या टॉप १० सिनेमांपैकी एक होता.

    रजनीकांत यांना दाक्षिणात्य राज्यात अगदी देवासमान मानतात कारण त्यांची ‘समाजसेवा’ आहे. ते त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या एकूण ४० % एवढी रक्कम समाजसेवेसाठी वापरतात शिवाजी या चित्रपटासाठी त्यांनी रक्कम घेतली होते त्यातील ८ कोटी त्यांनी चॅरीटी संस्थांना दिले. आणि महत्त्वाचे म्हणजे ते एकाही उत्पादनाची जाहिरात करत नाहीत त्यामागे त्यांचा उद्देश एकच कि लोकांना चुकीचा संदेश जाऊ नये. आज मितीला रजनीकांत हे भारतातील सर्वात महागडे सुपरस्टार आहेत. एम.जी.रामचंद्रन नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.ते गेल्या तीन हून अधिक दशकांपासून तमिळ चित्रपट सष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.

    तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट, प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.

    जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. रजनीकांत यांना आजवर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. लता रंगाचारी यांच्या बरोबर रजनीकांत यांचा विवाह झाला आहे. लता रंगाचारी या तामिळ असून चेन्नईत त्यांचा जन्म झाला. लता यांनी चेन्नईतून इंग्रजी साहित्यात मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. चेन्नईतील वुमन कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेज मॅगझिनसाठी लता यांनी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. हीच रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट होती. त्यानंतर १९८१ मध्ये तिरुपती येथे त्यांनी लग्न केले.

    लता ८० च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे. याशिवाय त्या 'द आश्रम' या शाळेच्या संचालिका आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सौंदर्या आणि ऐश्वर्या ही त्यांची नावे आहेत. ऐश्वर्या हिचे लग्न दाक्षिणात्य अभिनेता धनूषसोबत झाले आहे. तर सौंदर्याचे लग्न व्यावसायिक असलेल्या अश्विन रामकुमारसोबत झाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 1, 2019


  • आगीशी खेळणारा तंत्रज्ञ : डॉ. कुलभूषण जोशी

    कुलभूषणचे सध्याचे कार्यक्षेत्र कोळसा, विविध ज्वलनशील वायू आणि इंधन यांचा निर्मिती क्षेत्रात वापर करतानाचे कारखान्याचे नियोजन आणि आराखडा तयार करणे आहे. आगीशी खेळू नकोस हा मराठमोळा सल्ला धुडकावून एक मराठी ठाणेकर तरूण खरोखरच प्रत्यक्ष आगीशी खेळून जागतिक पातळीवर ठाणे शहराचे नाव मोठे करीत आहे ही आपल्या सर्वांनाच अभिमानाची गोष्ट आहे.

      October 11, 2018


  • तांबड्या माती’तील साधा माणूस भालजी पेंढारकर

    भालजींनी काही काळ पुण्यातील केसरी वृत्तपत्रात नोकरी केली. ते नाटकाकडे वळले व जवळ जवळ सहा नाटके त्यांनी लिहिली तसंच नाटकात कामही केले. याच दरम्यान भालजींनी कोल्हापूर येथील महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी काम सुरू केले. त्यांचा जन्म २ मे १८९८ रोजी झाला. एका चित्रपटासाठी त्यांनी लेखनही केले; पण दुर्दैवाने तो चित्रपट पडद्यावर आला नाही. तेथून ते बाहेर पडले. तोरणे आणि पै यांच्यासोबत त्यांनी “पृथ्वीवल्लभ’ चित्रपटाची योजना आखली. याचे पटकथालेखन आणि रंगभूषा व अभिनयही केला. हा चित्रपट लोकप्रिय झाला आणि बाबांना पटकथा लेखनाचे काम वाढले. पण भालजीना दिग्दर्शक व्हायचे होते.

    श्याबमसुंदर, महारथी कर्ण, कालियामर्दन, सावित्री, नेताजी पालकर, जयभवानी, पावनखिंड यांसारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट भालजीनी दिले. १९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील ‘जयप्रभा’ स्टुडिओ जाळला गेला. चित्रपटांची संपूर्ण आघाडी सांभाळणारे भालजी पेंढारकर यांची वाटचाल अगदी सहजसोपी अशी झाली नाही. नव्याने तयार केलेला ‘मीठभाकर’ , ‘मेरे लाल’ हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले.पण भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून ‘जयप्रभा’ स परत उभे केले. जिद्दीतून ‘मीठभाकर’ व ‘मेरे लाल’ ची पुनर्निर्मिती केली व मीठ भाकरने चांगला व्यवसाय देखील केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस वेग मिळवून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतून लाचारी विरुद्ध शाद्बिक आसूड संवादातून ओढले. ‘शिवकाळ’ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

    भालजीं पेंढारकारांचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी संस्था होती. या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांने त्यांना सन्मानीत करण्यात आलं यामध्ये ‘तांबडी माती’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद या विभागात राष्ट्रीय पारितोषिक, चित्रभूषणजीवन गौरव, ग.दि.मा. पुरस्कार, तसंच १९९१ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा व सर्वोच्च अश्या दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. कलेची साधना अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम निभावली आणि “साधा माणूस” ही स्वत:ची ओळख नेहमी जपली. भालजी पेंढारकर यांचे उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’.
    भालजी पेंढारकर यांचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 2, 2017


  • भूशास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकर

    सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिघम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.

      November 18, 2021


  • मजरुह सुलतानपुरी

    भारतीय चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील आघाडीचे प्रमुख गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म १ आक्टोबर १९१९ रोजी झाला.
    आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्यात हसन यांची शायरी ऐकली. त्या वेळी ते ‘शहाजहान’ चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले... ‘गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल... ये न जाना... हाये हाये ये जालिम जमाना.’ ‘शहाजहान’चे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्यान आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, ‘जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे...’ तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्या कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्याळ शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा समर्पक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढ्या त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या ‘शायराना’ स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. ‘शहाजहान’मध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी ‘आरपार’च्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ‘कभी आर कभी पार लागा तीर ए नजर...’ असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर ‘बाबूजी धीरे चलना...’मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. ‘सीआयडी’मध्ये याचा प्रत्यय आला. ‘लेके पहला पहला प्यार...’ अशी प्रेमाची ग्वाही असो, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना...’मधली सूचकता असो, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया...’मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. ‘चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार...’, ‘राही मनवा दुख की चिंता...’ या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ‘ओ मेरे सोना...’, ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा...’(तीसरी मंजिल), ‘पिया तू अब तो आजा...’, ‘चढती जवानी...’, ‘कितना प्यारा वादा...’, ‘दिलबर दिल से प्यारे...’, ‘गोरिया कहां तेरा देस रे...’(कांरवा), ‘चुरा लिया है...’, ‘लेकर हम दीवाना दिल...’, ‘आपके कमरे मे...’, ‘मेरीसोनी...’(यादों की बारात), ‘क्या हुआ तेरा वादा...’, ‘बचना ए हसीनों...’, ‘चांद मेरा दिल...’, ‘ए लडका हाय अल्ला...’ (हम किसीसे कम नहीं), ‘निसुल्ताना रे...’, ‘तुम बिन जाऊं कहां...’(प्यार का मौसम), ‘होगा तुम से प्यारा कौन...’, ‘पूछो ना यार क्या हुआ...’(जमाने को दिखाना है) ही या कॉम्बिनेशनची कामगिरी. आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांच्या संगीताने नटलेली मजरुह यांची अनेक गाणी गाजली. अष्टपैलुत्व हे त्यांच्या लेखणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चित्रपटातील सिच्युएशननुसार गीतलेखन करण्यात मजरुह यांचा हातखंडा. ‘तेरे मेरे मिलन की रैना...’(अभिमान)मधला भाव वेगळा, तर ‘जाइए आप कहां जायेंगे...’(मेरे सनम)मधला लडिवाळ गोडवा पुन:पुन्हा ऐकावासा वाटणारा. ‘रात अकेली है...’(ज्वेल थीफ)मधले आव्हान कानाला सुखावणारे, तर ‘रहे ना रहे हम...’(ममता)मधले औदासीन्य विचार करायला लावणारे. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात कम्युनिस्ट चळवळीत भाग घेणाऱ्या मजरुह यांनी एकदा पंडित नेहरूंबद्दल अनुदारात्मक काव्य केले. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. कोणताही भाव असो, कोणताही रस असो; तो भाव, रस आपल्या लेखणीने समृद्ध करण्याचे कसब मजरुह सुलतानपुरी यांच्या कडे होते. मा.मजरुह सुलतानपुरी हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारा पहिला गीतकार! मा.मजरुह सुलतानपुरी यांचे २४ मे २००० रोजी निधन झाले. आपल्या समुहातर्फे मा.मजरुह सुलतानपुरी यांना आदरांजली.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 1, 2017