फ्रेड शुले ह्या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आहेत. तो म्हणाला होता, ‘माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक दोनचे व्यक्तिमत्त्व आहे. पहिला क्रमांक महात्मा गांधींचा आहे.’
May 28, 2022
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म १२ मार्च १९११ रोजी गोव्यातील पेडणे (पणजी) येथे झाला.
गोमंतकाचे भाग्यविधाते दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री व एक उद्योगपती. भाऊसाहेब बांदोडकर हे लोकशाही प्रणालीची तत्त्वे मानणारे नेते होते. त्यामुळेच त्यांनी अजूनही गोमंतकीयांच्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे. ते गोव्यातील उद्योगपती होते (मँगेनिझ खान मालक) अत्यंत दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती.
भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म गोव्यातील पेडणे (पणजी) येथे सामान्य घराण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच आई-वडील वारले. प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे. पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही शालेय जीवनातच त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केल्या. जुजबी शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यावसाय वाढविला व पुढे खाणमालक म्हणून नावलौकिक व विपुल धन मिळविले. त्यांचा विवाह सुशिलाबाई लक्ष्मण पेडणेकर या एका व्यापाऱ्या च्या मुलीशी झाला. त्यांचे सासरचे नाव सुनंदा. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाने बांदोडकरांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले. तरुणपणी रॉयवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता. त्यातूनच तरूणवर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनास चालना मिळाली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेऊन अनेक भूमिगतांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले आणि खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केला; ग्रामीण भागात मराठी शाळा चालाव्यात म्हणून मदत केली. त्यामुळे त्यांना १९५६ साली तीन महिने तुरूंगवास भोगावा लागला.
११ डिसेंबर १९६२ रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केले. तेव्हा बांदोडकरांनी स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. गोवा महाष्ट्रात विलीन करावा, या माताचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव करून १९६३ च्या डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३० पैकी १४ जागा मिळविल्या. तीन अपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमत सिद्ध करून मंत्रिमंडळाची मागणी केली आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन केले. बांदोडकरांनी निवडणूक लढविली नव्हती; पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन व समाजकल्याण ही खाती होती. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, हे होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनतेचे मत वळविण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतीविषयक सुधारणा आणि समाजकल्याण हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले. केंद्राने गोव्याच्या बाबतीत जनमताचा कौल घेण्याचे ठरविले.
कौल निःपक्षपाती वातावरणात पार पाडावा, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोव्यात सहा महिने राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. या दरम्यान बांदोडकरांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून खोड्यापाड्यांतून दौरे काढून प्रचार केला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवावा, की महाराष्ट्रात विलीन करावा, या प्रश्नांवर ३ जानेवारी १९६७ रोजी सार्वमत घेण्यात आले. सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला. गोव्याचे महाराष्ट्राशी मीलन व्हावे हे त्यांचे स्वप्न सार्वमतातील पराभवामुळे भंगले असले तरी त्यांनी हार न मानता निवडणूक जिंकून महाराष्ट्राशी गोव्याचे सांस्कृतिक संबंध वाढवून बळकट तर केलेच पण मराठी ही गोव्याची राजभाषा करणारा ठराव असेंब्लीत संमत करून घेतला.
त्यानंतरच्या एप्रिल १९६७ च्या निवडणुकीत बांदोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे बहुमताने निवडून आले व गोव्याचे दुसऱ्यांभदा मुख्यमंत्री झाले. बांदोडकरांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत गोव्यात अनेक सुधारणा केल्या. गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून त्यांनी अनेक योजना व कार्यक्रम राबविले; शेती व मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले; गोव्यातील उद्योजकांना चालना दिली; ग्रामिण शिक्षणाबरोबर त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले; तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला; साहित्य-कला आदींना उत्तेजन देण्यासाठी गोव्यात कला अकादमीची स्थापना केली; अनेक शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.
गोवा प्रवाशांचे आकर्षण ठरावे म्हणून अनेक योजना त्यांनी कार्यवाहीत आणल्या. कोणत्याही विधायक सामाजिक कार्याला सढळ हाताने मदत करण्यात ते अग्रेसर होते. थोर दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. गोरगरिबांचे प्रश्न ते जातीने लक्ष घालून सोडवीत. क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांना शशिकला, उषा, क्रांती व ज्योती ह्या चार मुली असून सिद्धार्थ बांदोडकर हा मुलगा होता. सिद्धार्थचे तरुणवयात निधन झाले. लीना चंदावरकरचा पहिला नवरा सिद्धार्थ बांदोडकर होता. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी शशिकला काकोडकर ह्या गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या आधी बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात त्या एक सदस्य होत्या.
गोव्याची कला अकादमी ही पु. ल. देशपांडे आणि दामू केंकरे यांच्या संकल्पनेतून व त्या काळातील मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुढाकारामुळे उभी राहिली. आधी ती नाट्य अकादमी होती व नंतर ती कला अकादमी झाली.
भाऊसाहेब बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट १९७३ निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 12, 2022
धूल का फुल (१९५९), वक्त (१९६५), नया दौर (१९५७), कानून (१९५८), हमराज (१९६७), इन्साफ का तराजू (१९८०) आणि निकाह (१९८२) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मा.बी. आर.चोपडा यांनी दिले आहेत. बी. आर. चोपडा यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. भारतीय चित्रपटातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने १९९८ साली बी. आर. चोपडा यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्याआधी त्यांना १९६० साली कानून चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर आणि १९९८ साली फिल्मफेअर जीवनव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मोठ्या पडद्यावरील यशानंतर बी. आर. यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवून "महाभारत' महामालिका तयार करून ती दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहोचविली होती. या मालिकेनेही लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.
बी. आर.चोपडा यांचे ५ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 22, 2017
शॉन कॉनेरीची गणना ‘ए’ ग्रेड आर्टिस्टमध्ये होत असे. शॉन कॉनेरीनं जेम्स बाँड ००७ या चित्रपट मालिकेतील सात चित्रपट केले. नंतर तो कंटाळला. तीन वर्षांपर्यंत त्यानं एकही भूमिका स्वीकारली नाही.
October 31, 2021
मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
१९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ मध्ये 'रत्नाकर' , १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. आचार्य अत्रे हे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
आचार्य अत्रे यांचे १३ जून १९६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
June 13, 2017
आशाताईंच्या गाण्याबद्दल आपण सगळेच जाणतो.
त्या उत्तम जेवण सुध्दा बनवतात. आशा भोसले यांनी दहा वर्षांपूर्वी “आशाज रेस्टॉरंट प्रा.लिमिटेड” या नावाने हॉटेल व्यवसायाची मुर्हूतमेढ रोवली व आशाज् हे खास भारतीय पदार्थांचे हे रेस्टॉरंट त्यांनी दुबईत सुरू केले.
त्यानंतर आबूधाबी, कतार,कुवेत, बहारीन, इजिप्त, ब्रिटन या देशांतही या कंपनीच्या शाखा काढण्यात आल्या.
विशेष म्हणजे आशाताईंनी स्वतःच्या खास रेसिपीज या हॉटेलांतून उपलब्ध करून दिल्या आहेत. जगभरात भारतीय पदार्थांची खासियत कळावी यासाठी आपण या उद्योगात उतरल्याचे त्या म्हणतात.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
September 9, 2016
मोगुबाई कुर्डीकर या किशोरी अमोणकर यांचा मातोश्री. त्यांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी झाला.अत्रौली (जयपूर) घराण्याचे अत्यंत कठीण गायकीची महाराष्ट्रातील अनेक अभ्यास केला गेला आहे, पण ही परंपरा सर्वात चागल्या गायीका म्हणुन मान गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांना जातो. विदुषी मोगुबाई कुर्डीकर त्या वेळच्या परंपरेच्या मानाने उदारमतवादी होत्या. दुसऱ्या घराण्याचे गाणे शिकवण्यासाठी त्यांनी ताईंना अन्य गुरुजनांकडे जाण्याचे उत्तेजन दिले. जरी केसरबाई यांच्या प्रति मोगुबाई कुर्डीकर ची सांगीतिक स्पर्धा होती, तरीही मोगुबाई कुर्डीकर नी किशोरीताईंना केसरबाईंकडे शिकायला पाठवले. दुर्दैवाने काही कारणामुळे हे शिक्षण झाले नाही. ताईंना अन्यहि काही गुरु होते. मोहनराव पालेकरांची ताईंना काही वर्षे तालीम होती.त्याच्या शिष्य, शिष्या पैकी पद्मा तळवलकर, कमल तांबे , वामनराव देशपांडे, सुहासिनी मुळगावकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड, व मा.किशोरी अमोणकर हे आहेत. विदुषी मोगुबाई कुर्डीकर या रागांचे भाव प्रकट करणार्या स्वर व राग वैशिष्ट्यांचे विशेष महत्त्व लहानपणी किशोरीताईंना वारंवार समजावून सांगत असत. जयपूर घराण्याची गायकी ही आकारयुक्त असते. आकाराच्या स्वरूपात स्वरांचे अत्युच्च स्वरूप प्रकट होत असते. स्वरांच्या बिंदूचे किरण किंवा प्रकटणारी आभा किती गहन व खोल जाते, जयपूर घराण्यात शिकवताना रागांची नावे सांगितली जात नाहीत. मा.मोगुबाई कुर्डीकर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा.मोगुबाई कुर्डीकर यांचे १० फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 17, 2017
शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.
December 17, 2021
आपल्या करीयरची सुरुवात त्यांनी १९७० साली ‘नटसम्राट’ या नाटकाने केली.‘नवरा माझा नवसाचा’ मधील भूमिकेमुळे सुनील तावडे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘दुहेरी’ या मालिकेत काही काळ ते नर्सच्या रुपात दिसले होते. ‘माझा होशील ना’ ही सध्या त्यांची मालिका गाजत आहे. ‘नटसम्राट’,’बॅरिस्टर’ तरुण तुर्क म्हातारे अर्क,लग्नाची गोष्ट, एकदा पहावे करून, लेकुरे उदंड झाली ही त्यांची काही नाटके होत.
June 14, 2022
उत्तम गळा , दमदार आवाज , बळकट कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी आणि गुरुकडे केलेला रियाज ह्यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली. त्यांनतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले . त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा त्यांनीच संगीत देऊन स्वतःच्याच आवाजात गाणी गायली.
June 23, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti