(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते

    कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. त्यांच्या कवितांची शैली ही अतिशय बांधेसूद आणि मधुर आहे. दीर्घकविता हे कवी ‘बीं’च्या लेखन शैलीचे वैशिष्ठ्य. त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध झाल्यामुळे सर्वोपरीचीत आहे.

    त्यांनी पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्हा‘डात चिखलदरा येथे १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही म्हणून चिंताग्रस्त अश्या प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका. १९११ साली ‘बी’ हे अभिनव नाव धारण करून त्यांनी “टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।” ही ‘वेडगाणे‘ नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता ‘मासिक मनोरंजनात’त प्रसिद्ध केली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक आणि तात्त्विक अशी ही कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण.

    परंतू ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः कवी बी मात्र यमक जुळविल्याशिवाय रहात नाहीत. पण हे सारे साधताना कवितेचे सौंदर्य देखील त्यांनी ढळू दिले नाही. १९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. १९३४ साली त्यांचा “फुलांची ओंजळ” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. 'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. मा.कवी बी यांचे निधन ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ प्रियांका / स्वानंद

      August 31, 2017


  • नाट्य निर्माता संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव

    लातूर येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०११ या काळात झालेल्या ४ थ्या राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष राहिले होते.

      June 15, 2022


  • थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले

    शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. “बेबंदशाही,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्र मैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर “मनोहर”, “वांग्मयशोभा” यांसारख्या मासिकांमधून व “शालापत्रक” या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. “ प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले “अमृतमंथन”.

    शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी अमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले. मा.शांताराम आठवले यांना प्रभातमध्ये गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 'अमृतमंथन' नंतर “संत तुकाराम”,“कुंकू”,“गोपालकृष्ण”,“माझा मुलगा”,“संत ज्ञानेश्वर”,“शेजारी”,“संत सखू”,“दहा वाजता” आणि “रामशास्त्री” या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. काव्य, भाषेचा गोडवा, साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान “मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी” असे आहे. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, “भरतभेट”,“आपले घर” अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली यामध्ये भाग्यरेखा”,“बेलभंडार”,“झंझावात”, “वहिनीच्या बांगडया”, “शेवग्याच्या शेंगा”,“आई मला क्षमा कर”,“पडदा”,“सुभद्राहरण”,“वावटळ” या चित्रपटांचा समावेश आहे.

    शांताराम आठवले यांनी “शांतिचिया घरा”,“बकुळफुले”,“वनातली वाट”,“कुंडलीनी जगदंबा”,“सुखाची लिपी”,“ओंकार रहस्य” आणि “प्रभातकाल” या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली.याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीते यासारखे वाङ्मय देखील लोकप्रिय ठरले आहेत. मा.शांताराम आठवले २ मे १९७५ रोजी यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ janasampark.com

    शांताराम आठवले यांची अधिक माहिती वेब साईट http://www.shantaramathavale.com

      January 24, 2018


  • गायनॅक डॉ. मीना नेरूरकर

    डॉ. मीना नेरूरकर या जितक्या नृत्यात, लिखाणात तरबेज आहेत तितक्याच त्या अभिनयातही निपुण आहेत. ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदी तर ‘स्लीपवॉक विथ मी’ आणि ‘मिस्टर रवी अँड मिस्टर हाईड’ या हॉलीवूडपटात अमेरिकेतील टीव्ही मालिका ‘One life to Live’ यात व इतर मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सख्खे शेजारी’ यांसारख्या नाटकातही त्यांनी कामे केली आहेत.

      June 21, 2022


  • निर्माते, दिग्दर्शक कमलाकर तोरणे

    भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘हिरवा चुडा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

      November 12, 2021


  • मराठमोळा मोहक चेहरा – स्पृहा जोशी

    स्पृहा जितकी परखड आहे तितकीच मदत करणारीसुद्धा! एका व्यावसायिक शूटच्या वेळी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन स्पृहाला चक्क दहा वेगवेगळे पेहराव करावे लागले होते, ते तिने कोणतीही तक्रार न करता केले. हिंदुस्थानी सणांवर हे शूट बेतलं होतं. वेगवेगळे हिंदुस्थानी सण आणि एकच चेहरा अशी थीम होती. कल्पना सुरेख असली तरीही ती तडीस नेणं हे तसं कठीण होतं. आपल्या चेहऱयावर एकाच दिवशी दहा प्रयोग होणार होते. त्यातून आपली वेगळी प्रतिमा जगासमोर येणार होती. या सर्वांचा अभ्यास करूनच स्पृहाने या शूटला होकार दिला असावा.

      December 19, 2018


  • बॉलिवूडचे संगीतकार मदनमोहन

    भिन्न प्रकृतीची गाणी अगदी लीलया देणं हा मदनमोहन यांचा स्वभाव होता. एका सिनेमातच नव्हेतर एकाच गाण्याच्या प्रत्येक कडव्यात ते कित्येकदा वेगवेगळ्या रागदारीचे, वेगवेगळ्या मूडचे प्रयोग करीत असत.

      July 16, 2017


  • उदय सबनीस

    मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस यांचा जन्म ८ डिसेंबर १९५९ रोजी झाला.

    मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस यांनी “रंजन युवा मंच” ह्या संस्थेतून स्वत:च्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील कलासरगम या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा होता. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता.

    १९८८ साली त्यांचं पहिलं नाटक “सूर्याची पिल्ले” रंगभूमीवर आले. २५ नाटकं, ५० मालिका, ३० सिनेमे, व ५ हिंदी सिनेमे तसेच इंग्रजी व फ्रेंच सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी आपला अभिनय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. "बैंजो" आणि "अकीरा" या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

    उदय सबनीस यांनी कार्टून नेटवर्क, डिजनी, डिस्कव्हरी, हिस्टरी या चॅनेल्सवर व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 1, 2019


  • दिग्दर्शक अभिनेते सतीश पुळेकर

    सतीश पुळेकर मुख्यतः त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५० रोजी झाला. १९७६ मध्ये सतीश पुळेकर यांची चांगुणा’ नाटकातून कारकिर्दीला सुरवात झाली. यात सतीश पुळेकर आणि रोहिणी हट्टंगडीनं काम केलं होतं आणि या नाटकाला राज्यस्तरीय स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. ‘आविष्कार’ या संस्थेकडून हे नाटक रंगमंचावर आलं होतं. या नाटकाचे दिग्दर्शक होते जयदेव हट्टंगडी. त्या नंतर सतीश पुळेकर यांनी अनेक नाटकांमध्ये काम केली. सख्खे शेजारी, पुरुष, कुणी तरी आहे तिथे, करार, प्रकरण दुसरे, दुर्गाबाई जरा जपून व चल थोडे एन्जॉय करू ही त्यांच्या कारकिर्दीतील ठळक नाटके आहेत. प्रकरण दुसरे या नाटकासाठी सतीश पुळेकर यांना नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

    १९९२-९३ साली आलेल्या ‘करार’ या नाटकात सतीश पुळेकर यांची दुहेरी भूमिका होती. आणि त्या भूमिकेसाठी सगळेच पुरस्कार मिळाले. ‘करार’ हे नाटक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. त्यांची ‘येडा’ ‘अभिमन्यू’ हि नाटके खूप चालली. ‘हॅपी बर्थ डे’ हे नाटकही खूप सुंदर सादर केलं गेले.
    ‘येडा’ चित्रपटाने सतीश पुळेकर यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी दादासाहेब फाळके यांच्या नातवाने सुरू केलेल्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ हा चित्रपट पण खूप गाजला. ‘युथ’ आणि ‘पोलिस लाइन’ या चित्रपटात काम केले आहे.

    सह्याद्री वाहिनीवरच्या ‘लाइफ मेंबर’ व ‘चिरंजीव’ या त्यांच्या दोन मालिका खूप गाजल्या होत्या. चित्रपटांमध्ये "सांगाती", "काय राव तुम्ही" , "आभरण", "चार्ली", "येडा", "आम्ही चमकते तारे", "श्री पार्टनर", "गोळा बेरीज", "फक्त लढ म्हणा", "आरम्भ", "आटापिटा", "वैकेशन", "मी मन आणि ध्रुव", "बे दुने साढ़े चार", "विश्वास", "सार कस शांत शांत", "हळद रुसली कुंकु हसली", "अत्याचार" प्रमुख आहे. सतीश पुळेकर त्यांच्या अभिनयासाठी ते प्रसिद्द आहेतच सोबत ते अतिशय चांगले कार्टूनिस्ट आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 6, 2017


  • ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के

    अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटामधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्कें यांच्या कारकीर्दीला गती मिळाली. ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘घनचक्कर’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘शेम टू शेम’, ‘अबोली’, ‘रात्र आरंभ’, ‘मराठा बटालियन’, ‘व्हेंटिलेटर’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. ‘तिरंगा’, ‘वंश’, ‘जुडवा’, ‘खुदा गवाह’, ‘जय किशन’, ‘जीत’, ‘काला साम्राज्य’, ‘इश्क’, ‘भाई’, ‘टारझन द वंडर कार’ हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट.

      April 30, 2022