आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ज्या प्रकारे मृत्यू झाला ते अत्यंत खेदकारक आहे. तो धक्कादायक म्हणावा लागेल. त्यांचे व्यक्तीमत्व, तज्ज्ञता असूनही साधेपणाने जगण्याची वृत्ती आणि माणूसकी मात्र कायमच स्मरणात राहील.
September 19, 2017
भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांचा जन्म २९ डिसेंबर १९४९ रोजी झाला. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजीवर यष्टिरक्षण करताना त्यांना हेल्मेट वापरण्याची कधी गरजच भासली नाही. किरमाणी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २७५ सामन्यांत ३६७ झेल व ११२ यष्टिचीत अशी कामगिरी नोंदविली. त्यांच्या नावावर एक कसोटी बळीही आहे.
फारूख इंजिनियर यांच्यानंतर किरमाणी यांनी भारतीय संघात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली. १९७६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणार्यान किरमाणी यांनी भारताच्या बड्या स्पिनर्सच्या गोलंदाजीवर कठीण प्रसंगी नेटाने यष्टिरक्षण केले. आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत त्यांची मैदानावरील ऊर्जा आणि मैदानावरील वावर विलक्षणीय असे. खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊनही त्यांनी दोन कसोटी शतके झळकावली.
१९८१-८२ मधील भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या सलग तीन कसोटींमध्ये किरमाणी यांनी एकही बाय दिला नव्हता. १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये टनब्रिज वेल्स येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत किरमाणी यांनी कपिल देवसह नाबाद १२६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. त्यावेळी बलाढ्य समजल्या जाणार्याी वेस्ट इंडीजविरुद्धच्या सहाव्या कसोटीत किरमाणी यांनी सुनील गावसकर यांच्यासह नवव्या विकेटसाठी रचलेली नाबाद १४३ धावांची भागीदारीही खास ठरली होती. त्यावेळी गावसकर यांनी नाबाद २३६ धावा केल्या होत्या. तेव्हा एखाद्या भारतीयाने विंडीजविरुद्ध केलेली ती सर्वोच्च खेळी ठरली होती.
ऑक्टोाबर १९८३ मध्ये नागपूर येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. औपचारिक ठरलेल्या पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात किरमाणी यांनी हातातले ग्लोव्हज काढत गोलंदाजी केली. पाकिस्तानचा सलामीवीर अझीम हाफीज याचा त्रिफळा उडवून गोलंदाजीतील "बळी'ही मिळविला. भारतीय सरकारतर्फे सय्यद किरमाणी यांना १९८२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ते कर्नाटकचे उपकर्णधार होते, तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2018
शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी गीतलेखनाचा प्रस्ताव त्याने शैलेंद्र यांच्या समोर ठेवला; शैलेंद्र यांनी तो नाकारला. नंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. शैलेंद्रचे दोनाचे चार हात झाले.
संसाराचा गाडा नीट हाकण्यासाठी पैशांची वानवा जाणवू लागली. एकेदिवशी त्याने सरळ आरके स्टुडिओ गाठला. आरके कॅम्पमध्ये तेव्हा ‘बरसात’चे काम सुरू होते. राज कपूरने या अनोख्या शैलीच्या गीतकाराला ‘बरसात’च्या गीतलेखनाची संधी दिली. शैलेंद्रने ‘बरसात मे हमसे मिले तुम...’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ ही दोन गाणी लिहिली. तेव्हा पासून राज कपूर यांच्या सर्व चित्रपटात मा.शैलेंद्र यांनी गाणी लिहिली. शैलेंद्रच्या गाण्याने ‘आरके’ला एक नवी ओळख दिली. केवळ राज कपूरचा गीतकार ही ओळख पुसणारा म्हणून ‘गाइड’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘गाइड’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माइलस्टोन. यात शैलेंद्र यांच्या गाण्यांचा वाटा निश्चितच सर्वात मोठा.
‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘मोसे छल किये जा’, ‘वहाँ कौन है तेरा’ असे गानमोती या ‘गाइड’च्या माळेत शैलेंद्रने गुंफले आहेत. ‘काँटो से खीच के ए आँचल’ हा त्यातील मुकुटमणी ठरावा. १९५८ मध्ये 'ये मेरा दीवानापन है...' (फ़िल्म- यहूदी) च्या साठी १९५९ मध्ये 'सब कुछ सीखा हमने...' (फ़िल्म- अनाडी) १९६८ साली 'मै गाऊं तुम सो जाओ...' (फ़िल्म- ब्रह्मचारी) सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून मा.शैलेंद्र फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाला होता. आवारा हूँ, रमैया वस्ता वैया, दिल के झरोखे में तुझको बिठा कर,मुड मुड के ना देख मुड मुड के,पिया तोसे नैना लागे रे,दिल की नज़र से, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खतम, अशी अनेक संस्मरणीय गाणी मा.शैलेंद्र यांनी दिली.
गुलजार हे गीतकार बनण्यात शैलेंद्र यांचं मोठं योगदान होते. गुलजार साहेबांनीच म्हटल्या प्रमाणे, "शैलेंद्र चित्रपट सृष्टीने दिलेले सर्वात थोर गीतकार होते. शंकर जय किशन , सचिन देव बर्मन, देव आनंद , पंडित रविशंकर, बिमल रॉय यांच्या बरोबर त्यांनी अजरामर राहील इतकं अद्वितीय काम केलं आहे. "खूप कमी लोकानां माहित असेल की राज कपूर यांनी अभिनय केलेला 'तीसरी कसम' 'हा चित्रपट या शैलेंद्र निर्मित होता. पण हा चित्रपट चालला नाही. मा.शैलेंद्र १४ डिसेंबर १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शैलेंद्र यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=A6LEw97vXR4
https://www.youtube.com/watch?v=hu9tojGQ2BY
August 31, 2017
भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांचा जन्म २६ जानेवारी १९२० रोजी झाला.
रायजी यांनी १९४० च्या दशतकात ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७७ धावा केल्या होत्या. त्यात ६८ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. त्यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
आयुष्याच्या खेळपट्टीवर नाबाद शतक नावावर लावणारे ते केवळ दुसरेच भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याआधी डी.बी. देवधर यांनी वयाची शंभरी पूर्ण केलेली होती.
वसंत रायजी हे क्रिकेटपटू बनले याचे श्रेय त्यांचे वडील नायसदराय रायजी यांचे. एम.एम. रायजी अँड सन्स ही त्यांची चार्टर्ड अकाऊन्टसीची फर्म होती तरी त्यांनी वसंत व त्यांचे बंधू मदन यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले मात्र केवळ हौस म्हणूनच त्यांनी क्रिकेट खेळावे, त्याला आपला व्यवसाय बनवू नये, आपल्या फर्ममध्ये त्यांनी मदत करावी अशी त्यांची इच्छा होती.
त्यांच्या आई जयश्री या गांधीवादी विचाराच्या. मिठाच्या सत्याग्रहासह स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. दोन वेळा तुरुंगवासही सोसला. मात्र मुलांना त्यांनी याची माहिती होऊ न देता त्यांचे लक्ष त्यांनी शिक्षण आणि खेळावरच राहू दिले.
रायजी यांनी १९३३ मध्ये मुंबई जिमखाना मैदानावर पहिला कसोटी सामना पाहिला तेंव्हा ते फक्त १३ वर्षांचे होते. त्या सामन्यात लाला अमरनाथ यांनी ११८ धावांची शतकी खेळी केली होती या खेळीने त्यांचे क्रिकेटकडे आकर्षण वाढवले. विशीत असतांना रायजी यांना दोन रणजी सामन्यांसाठी मुंबईच्या संघात संधी मिळाली पण चांगली कामगिरी न झाल्याने त्यांनी संघातील स्थान गमावले. त्यावेळी मुंबईच्या क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा होती. त्यामुळे संघातील स्थान गमावल्याचे आपल्याला फारसे वैषम्य नाही असे ते सांगतात. विजय मर्चंट व एल.पी. जय यांच्यासोबत मैत्रीच्या आठवणीही ते सांगतात.
पुढे त्यांना बडौदा संघाकडूनही खेळायचे निमंत्रण आले. त्यांचे आजोबा बडोदा संस्थानचे दिवाण होते आणि वसंत यांचा जन्म बडोद्याचा असल्याचे समजले तेंव्हा बडोदा क्रिकेटच्या आयोजकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि वसंत रायजी यांनी बडोद्यासाठी पहिल्याच डावात ६८ आणि ५३ धावांच्या खेळी केल्या.
दरम्यान त्यांचे चार्टर्ड आकाउन्टन्सीच्या शिक्षणासाठी इंग्लंडलाही जाणे झाले. तिथे इंडियन जिमखानासाठी सलामी फलंदाज म्हणून ते बरेच सामने खेळले. पण मुंबईच्या तुलनेत तेथील क्रिकेट फारसे दर्जेदार नव्हते.
वसंत यांच्या क्रिकेट वेडाबद्दल पन्ना सांगतात की, क्रिकेट हेच त्यांचे आयुष्य होते. त्यांच्या श्वासाश्वासात क्रिकेट होते. प्रत्येक विकेंडला ते क्रिकेट क्लब आॕफ इंडियामध्ये जायचे आणि मित्रांसोबत क्रिकेटवर भरपूर गप्पा व्हायच्या. थिओ ब्रागान्झा यांच्या खेळांशी संबंधीत पुस्तकांच्या दुकानालाही ते नियमीत भेट द्यायचे. एकावेळी वसंत यांच्या संग्रहात तिनशेपेक्षा अधिक क्रिकेटशी संबंधीत पुस्तके होती. मात्र कामाकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. कामाच्या वेळी काम आणि खेळाच्या वेळी खेळ हे त्यांचे तत्व होते असे पन्ना सांगतात.
वसंत यांचे बंधू मदन हेसुध्दा उपयुक्त अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मदनसह आनंदजी डोसा व उदय मर्चंट या मित्रांसोबत त्यांनी १९३६ मध्ये जॉली क्रिकेटर्स क्लबची स्थापना केली. १९५१ मध्ये या क्लबने कांगा लीग जिंकली. १९५६ मध्ये एका सामन्यात क्रिकेट क्लब आॕफ इंडियासाठी फलंदाजी करतांना त्यांनी ड्राईव्हचा एक फटका एवढ्या ताकदीने मारला की, समोरच्या यष्टींचे तुकडेच पडले होते. या आठवणीत रमताना हसत हसत वसंत सांगतात की यष्टी कशी तुटली ते मला कळलीच नाही पण आठवणीसाठी ती माझ्याकडे देण्याची विनंती आयोजकांना केली होती. अजुनही त्यांच्या घरातील शोकेसमध्ये ती यष्टी ठेवण्यात आली आहे.
सी. के. नायडू व सर डॉन ब्रॕडमन हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू. सर डॉन यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारसुध्दा होता आणि ती पत्रे त्यांनी आॕस्ट्रेलिया स्थित आपल्या मुलीकडे दिली आहेत. ब्रॕडमन यांना त्यांनी आॕटोग्राफ मागितला होता आणि त्याला त्यांनी प्रतिसादही दिला. त्यातून त्यांची मैत्री झाली. आपल्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत ते सर डॉन यांना पाठवत असतात.
क्रिकेट खेळणे थांबविल्यावर वसंत रायजी यांनी या खेळाचे इतिहासतज्ज्ञ म्हणूनही भूमिका बजावली. रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द फार मोठी नव्हती पण त्यांना लेखनाची प्रचंड आवड होती. ती आवड सचोटीने जोपासत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली होती. त्यात सी. के. नायडू यांच्या चरित्राचाही समावेश आहे. २०१० मध्ये आलेले ‘क्रिकेट मेमाॕयर्स’ हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते.
वसंत रायजी यांचे १३ जून २०२० रोजी निधन झाले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 26, 2022
अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय़ लेखनाला सुरुवात केली.
सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि ‘दळवी, हे बंद करा!’ नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. ‘सभ्य गृहस्थ हो!’ हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळय़ा टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. तुम्ही तो नाद सोडा!’ या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली!
मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले. काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. मा.जयवंत दळवी नाटककार, कथा, कादंबरी लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते पण 'ठणठणपाळ' या नावाने ललितमध्ये जे सदर लिहिले तसे यश आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. एकदा बॉम्बे बुक डेपोमध्ये स्वाक्षरी सप्ताहात ठणठणपाळ स्वाक्षरी देण्यासाठी येणार म्हणून वाचकांनी मोठी गर्दी केली. ठणठणपाळच्या मोठ्या कटआऊट शेजारी जयवंत दळवी बसले होते. उपस्थितांची मागणी अशी होती की आम्हाला ठणठणपाळ कोण आहे ते कळू द्या. शेवटी जयवंत दळवींना आपला मुखवटा दूर करावा लागला. असे भाग्य फार थोड्या लेखकांना मिळते.
जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे. मात्र दळवी आत्मचरित्र लिहिण्याच्या पूर्ण विरोधात होते. स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची लेखकाची कल्पना असते. पण पृष्ठभागावर येणा-या आठवणी म्हणजे आत्मचरित्र नसून अंतरंग खरवडत जाऊन उमटणे हे कठीण कर्म म्हणजे आत्मचरित्र! मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, आशा वासना – ज्यांचा सभ्य संस्कृतीत उच्चारही करता येत नाही ते लिहिणे म्हणजे खरे आत्मचरित्र! मात्र आत्मसमर्थनासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात-ती एकांगी असतात आणि स्वत:च स्वत:ला दिलेली प्रशस्तिपत्रे असतात असे दळवींचे मत होते. मा. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-प्रहार / विकिपीडिया
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा
उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)
September 16, 2017
तेजस्वी पाटील… नावाप्रमाणेच तेजस्वी चेहरा… तरल भावछटा अभिनेत्रीबरोबरच ती अभ्यासू कलाकार आहे….
भगवानदादा यांच्या आयुष्यावर चितारलेला ’एक अलबेला’ हा सिनेमा मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी एक माईलस्टोन ठरला. सिनेमात भगवानदादांच्या मध्यवर्ती भूमिकेत मंगेश देसाई झळकला. तर याच सिनेमात लक्षवेधी भूमिका ठरली ती भगवानदादांच्या पत्नीची. एरवी मॉडर्न गर्ल म्हणून मराठी इंडस्ट्रीत वावरणारी तेजस्वी पाटील हि चक्क सोज्वळ, घरंदाज, साध्या वेषात भगवानदादांच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाली. आपल्या कसदार अभिनयानं तेजस्वीनं या वेगळ्या भूमिकेचं सोन केलं.
लग्नानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या काही मोजक्या यशस्वी कलावती आहेत. तेजस्वी पाटील ही यापैकी एक. स्वदीप पाटील या व्यावसायिक तरुणाशी तेजस्वीचं लग्न झालं आणि लग्नानंतर व्यवसयिक कलाकार म्हणून तेजस्वीने ओळख निर्माण करावी अशी स्वदीपची इच्छा होती. तेजस्वीचं कलाकार होण्याचं स्वप्न स्वदीपच्या मदतशीर स्वभावामुळेच शक्य झाल्याचं तेजस्वी सांगते. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली मी आणि तेजस्वी फोटोशूटसाठी तिच्या अंधेरीच्या घरी भेटलो होतो. त्यावेळी ती सांगत होती. यावेळी तेजस्वीचा एमबीएपर्यंतचं शिक्षण तर यापुढे एचआरमध्ये तिने केलेलं स्पेशलायझेशन या सगळ्यावर आम्ही गप्पा मारत होतो. सणानिमित्ताने तेजस्वीचं फोटोशूट आम्ही करत होतो. हे करताकरता तेजस्वी तिच्या आवडीनिवडी, तिचा सिनेइंडस्ट्रीतला प्रवास आणि त्यातल्या गमतीजमाती सांगत होती. या गप्पांमुळे तेजस्वी रिलॅक्स झाली होती. तिच्यावर शूटचं टेन्शन अजिबात जाणवत नव्हतं आणि म्हणूनच शूटच्या दरम्यान बोलक्या तेजस्वीचे हसरे, प्रसन्न फोटो मला टिपता आले.
२०१३-१४ साली तेजस्वी ’प्राजक्ता’ या तिच्या ’मी मराठी’ चॅनलवरील प्रमुख भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तर यानंतर झी टीव्हीवरील ’भाग्यविधाता’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. यानंतरचा तेजस्वीचा प्रवास मला आमच्यातल्या संभाषणामुळे वेळोवेळी समजत होता. २०१३ साली पुन्हा आम्ही एका शूटच्या निमित्ताने एकत्र काम केलं. मराठी सणवार बेतलेलं हे शूट होतं. हा मराठमोळा साज लक्षात घेऊन तेजस्वीचा लूक काय असेल यावर माझी टीम काम करत होती. सगळ्यात आधी तिचा लूक ठरला. त्यानंतर कॉस्च्युम मग मेकअप आणि हेअर आणि सगळ्यात शेवटी त्यावरचे दागिने आणि इतर बाबी ठरवण्यात आल्या. या लूकला तेजस्वीचीही पसंती मिळाली आणि शूटचा दिवस ठरला.
नेहमीच ठरलेला मराठमोळा लूक न निवडता यावेळी तेजस्वीसाठी मॉडर्न लूक निवडण्यात आला होता. या मॉडर्न लूकमध्ये तेजस्वीचा चेहरा अधिक खुलून दिसत होता. तेजस्वीचं स्मितहास्य, डोळ्यांतली चमक आणि प्रसन्न चेहऱयामुळे हे शूट यशस्वीपणे पार पडलं. याच शूटनंतर तेजस्वीचे वेस्टर्न आऊटफिटमध्ये एक फोटोशूट करण्यात आलं. शॉर्ट वन पीसमध्ये तेजस्वीचं ग्लॅमर शूट करण्यात आलं. यावेळी तेजस्वीच्या चेहऱयावर थोडीशी भीती दिसत होती. एरवी मॉडर्न कपडय़ांत सहज वावरणारी तेजस्वी यावेळी थोडी शांत शांत दिसली. आम्ही काही फोटो काढले; परंतु हवे तसे फोटो मिळत नव्हते. थोडावेळ थांबून तेजस्वीशी बोलून मग पुन्हा हे फोटोशूट करण्यात आलं. तेजस्वी आता थोडी खुललेली दिसली आणि मग बिनधास्त तेजस्वीचे हटके फोटो मला यावेळी टिपता आले.
या शूटनंतर पुन्हा मला तेजस्वीचं फोटोशूट करण्याची संधी मिळाली. व्यावसायिक फोटोशूटची संधी जितकी हवीहवीशी वाटते तितकीच त्याची जबाबदारीही जास्त असते. शूटचा दिवस ठरला आम्ही स्टुडिओ १०९ मध्ये भेटलो. तेजस्वीच्या शूटच्या आधी ‘झाला भोबाटा’ या गाजलेल्या मराठी सिनेमातील मोनालिसा बागलाच फोटोशूट मला करायचं होत. हे शूट थोडं लांबलं आणि तेजस्वीच्या शूटला आम्हाला उशीर झाला. तेजस्वी मेकअप रूममध्ये शांत बसली होती. एखाद्या कलाकाराचं शूट ठरलेल्या वेळेत सुरू व्हावं म्हणून माझी टीम शूटच्या किमान तासभर आधी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असते आणि शूट वेळेतच सुरू झालं पाहिजे असा माझा नेहमीच आग्रह असतो; परंतु त्यादिवशी तेजस्वीच्या शूटला उशीर झाला. तेजस्वीने नेहमीप्रमाणेच त्यादिवशीही शूटसाठी मदतशीर होती. साधारणपणे अर्धा तास हे शूट उशिरा सुरू झालं. स्टुडिओत तेजस्वीचं शूट सुरू झालं आणि तिच्या चेहऱयावर एक वेगळंच तेज यावेळी मला पाहायला मिळालं. संयमी स्वभावाच्या तेजस्वीचं हेच रहस्य तिच्या सिनेमातल्या कामातही बघायला मिळतं. उगीच मिळतील ते सिनेमे, वरवरची कामं तेजस्वी टाळते. संयमानं चांगल्या कामाची वाट बघते आणि मिळालेल्या संधीच ‘सोनं’ करण्यासाठी अपार मेहनत घ्यायची तयारी दाखवते हेच तेजस्वीच्या यशाचं गमक असावं.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
February 16, 2019
इक्बाल दरबार यांनी यूके, यूएई, सिंगापूर, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स इत्यादी ठिकाणी नौशाद कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ओ.पी नय्यर, आरडी बर्मन, श्रीकांत ठाकरे यांच्या सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व नामांकित संगीत दिग्दर्शकांच्या समवेत त्यांच्या मैफिलीच्या वेळी साथ दिली आहे. इक्बाल दरबार हे पुणे आकाशवाणी वरील ‘ए’ ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी पुणे आकाशवाणी वरील मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी संगीत आणि शीर्षक ट्रॅक दिले आहेत.
March 31, 2022
डॉ. मोहन आगाशे हे अभिनेत्यांच्या वनश्रीतला वटवृक्ष, मराठी रंगभूमीवरचे भीष्म पितामह, काटकोन त्रिकोणातला ९० अंशाचा कोन म्हणून ओळखले जातात.
July 23, 2017
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले.
"समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ.सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता.
अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
गालात हासून, ओठात बोलून...
हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
रांगत रांगत, हअम डौलात...
गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
झेप झेपावून, तोल सावरून...
नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
माझ्या जीवाचं, सुख दाटलं...
January 7, 2019
मनोहर श्याम जोशी हे हिंदी भाषेचे प्रख्यात पत्रकार, लेखक आणि पटकथाकार!
मनोहर श्याम जोशी यांना ‘भारतीय दूरदर्शनच्या सोप ओपेराचे जनक’ म्हटलं जातं कारण ‘हम लोग’ आणि ‘बुनियाद’ या दूरदर्शनवरच्या पहिल्या महामालिका त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून उतरल्या होत्या. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९३३ रोजी अजमेर येथे झाला.
भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’,‘काकाजी कहीन’,‘हमराही’,‘जमीन आसमान’,‘गाथा’यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांची ‘कसप’ ही कादंबरी तर हिंदी भाषेतल्या सर्वोत्तम प्रेमकथांमध्ये अग्रेसर मानली जाते. मनोहर श्याम जोशी यांच्या 'क्याप' कादंबरी करता २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी हे राम, अप्पू राजा, पापा कहते है आणि भ्रष्टाचार यांसारख्या सिनेमांसाठी पटकथा-संवादही लिहिले आहेत.
मनोहर श्याम जोशी यांचे ३० मार्च २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti