विधानसभा निवडणूक असो वा लोकसभा निवडणूक, आपल्या देशात अनेक अशिक्षित आणि स्वतःला सुशिक्षित म्हणविणारे स्त्री-पुरुष आपल्या मतदान हक्काविषयी अत्यंत बेफिकीर आणि बेजबाबदार असतात. मतदानासाठी दिलेल्या सार्वजनिक सुट्टीचा उपयोग मतदानाला न जाता बाहेरगावी मौजमजा करण्यासाठी जाण्यात केला जातो.
December 15, 2023
मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ मध्ये ब्रम्हचारी चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची चर्चा त्याकाळी रंगली नसती तरच नवल. स्वीमसूटमधील दृश्यामुळे मीनाक्षी यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांनी कालांतराने चित्रपटात भूमिका स्वीकारल्या. आचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं.
June 3, 2022
अनंत प्रियोळकर यांचे शिक्षण गोवा, धारवाड आणि सांगली येथे झाले.सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे ह्यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र ह्या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले.
September 21, 2023
जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला.
मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. १९३४ मध्ये सागर फिल्म कंपनीच्या शहर का जादू या चित्रपटात नायक म्हणून पहिले काम केले.
मोतीलाल यांचे गाजलेले चित्रपट 'शादी', आई-'परदेसी', ,'अरमान', 'ससुराल', 'मूर्ति', 'देवदास', जागते रहो व अछूत कन्या. मोतीलाल यांचे जागते रहो मधील गाणे 'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे त्या काळी खूपच गाजले होते. मोतीलाल यांचे १७ जून १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे
https://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk
https://www.youtube.com/watch?v=y5JcBpFMkKw
November 5, 2019
सुप्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या असलेल्या रंजना देशमुख यांनी लहानपणीच कलाक्षेत्रात पदार्पण केले.
१९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. ‘अरे संसार संसार’ आणि ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजना देशमुखला राज्यसरकारचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रंजना देशमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’. रंजना देशमुख यांनी ‘फक्त एकदाच’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केले.
मराठी १९८७ मध्ये ‘झुंजार’च्या चित्रीकरणासाठी तेव्हाच्या बंगलोरला जाताना मोटार अपघातात त्या कायमच्या अपंग झाल्या. पायच निकामी झाल्याने त्यांची चित्रपट कारकीर्दच अकस्मात संपुष्टात आली.
रंजना यांचे ३ मार्च २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
March 4, 2017
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली. मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही. कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही 'बनवाबनवी'सह अनेक चित्रपट केले. त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या' मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला.
वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले. मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदीत चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली.
मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या गंभीर नाटकातील भूमिकेने कलक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱयाच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे १६ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 9, 2017
शुजीमुरा यांना हायस्कूल मध्ये असल्यापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली.१९२० मध्ये, त्यांनी आपले लक्ष वैज्ञानिक संशोधक बनण्यावर केंद्रित केले आणि होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी सुरुवातीला रेशीम कीटकांच्या पोषणावर संशोधन सुरू केले, परंतु १९२२ मध्ये त्यांची जीवनसत्त्व संशोधक उमेटारो सुझुकी यांच्यासह टोकियो इम्पीरियल विद्यापीठात बदली झाली. इथे मिशिओने ग्रीनच्या बायोकेमिस्ट्रीवर संशोधन केले. दोन वर्षांनंतर, त्यांनी आणि त्यांचे सहकारी सितारो मिउरा यांच्या सह ग्रीन टी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याचा शोध लावला, ज्यामुळे उत्तर अमेरिकेत ग्रीन टीची निर्यात वाढली.
June 1, 2022
आज ३० नोव्हेंबर.. आज मराठीतील नामवंत लघुकथालेखक वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे यांची पुण्यतिथी.
बापूसाहेब चोरघडे यांचा जन्म १६ जुलै १९१४ रोजी झाला. बापूसाहेब चोरघडे यांची पहिली लघुकथा कथा 'अम्मा' १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले. ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता. एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याच सुमाराला स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. अनेक तरुणांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, त्यात चोरघडेही होते. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा सहवास घडला. विचारांना नवी दिशा मिळाली. आचारांत बदल घडला. तेव्हापासून घेतलेलें खादीचें व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलें. वामन चोरघडे हे नेहमी खादीचा कुडता, पायजमा अशा स्वत: धुतलेल्या स्वच्छ पांढर्याव-शुभ्र वेषातच असत. वामनरावांना व्यायामाची आवड होती. एखाद्या पहेलवानासारखी त्यांची शरीरयष्टी होती. स्पष्ट व शुद्ध उच्चार, वाचनामुळे समृद्ध झालेली भाषा, अभ्यासामुळे आलेली विचारांची श्रीमंती आणि प्रचंड आत्मविश्वास यामुळे चोरघडे एक वक्ते म्हणूनही त्यांच्या काळी गाजले. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलें त्यावेळी त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली आणि गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वर्ध्याच्या गोविंदराम सकसेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले. त्याकाळी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात रामकृष्ण पाटील होते. वामन चोरघड्यांवर त्यांनी मानद अन्नपुरवठा अधिकारी म्हणून जबाबदारी टाकली. त्यांनी ती उत्तम प्रकारे निभावली. पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. मा.वामन चोरघडे यांचे ३० नोव्हेंबर १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
December 1, 2016
भोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एम.बी.बी.एस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरु आहे.
September 25, 2019
१९२५ साली त्यांचा ‘ भाषाशास्त्रज्ञ व मराठी भाषा ‘ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक आणि संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘ संस्कृत नाटक व नाटककार ‘ या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. कृ . पा. कुलकर्णी हे मराठी भाषेमधील व्यूत्पत्ती शास्त्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे मराठीमधील अग्रगण्य समीक्षक म्हणूनही ओळखले जातात.
June 23, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti