(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रयोगशील शेतकरी राजेंद्र पवार

    प्रयोगशील शेतकरी राजेंद्र पवार यांनी बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जागितक पातळीवरील प्रयोगशील शेती बारामतीत केली आहे. कृषी, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात नवनव्या संकल्पना त्यांनी राबविलेल्या आजपर्यंत दिसून आल्या आहेत. राजकारणात नसले तरी त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे.

      January 14, 2024


  • बॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे

    पद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ८०च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती.

      November 1, 2019


  • दिग्दर्शक मृणाल सेन

    मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आंतरराष्ट्रीय जगतात त्यांच्या चित्रपटांची दखल घेण्यात आली.

      December 30, 2021


  • भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

    दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी झाला. १५ एप्रिल १९११ रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपट निर्मिति विषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. १ फेब्रुवारी १९१२ रोजी ते इंग्लंफडला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्या् फिल्मची मागणी नोंदवून १ एप्रिल १९१२ रोजी ते भारतात परत आले. सर्व सामग्री १९१२ च्या मे अखेर हाती आल्यावर त्यांनी कुटुंबियांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले. भांडवलासाठी पत्नीुचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले. लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र सहा महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला. राजा हरिश्चंद्रानंतर फाळक्यांनी मोहिनी भस्मासूर या चित्रपटाची निर्मिती केली व तो १९१४ च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटासोबत पिठाचे पंजे हा एक विनोदी लघुपटही ते दाखवीत. पुढे सत्यवान सावित्री नावाचा आणखी एक चित्रपट तयार करून प्रदर्शित केला. आपला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट ३ एप्रिल १९१७ रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच लंकादहन हा चित्रपटही त्याच वेळी तयार करून तोही प्रदर्शित केला. हा चित्रपट भारतभर लोकप्रिय झाला. महानंदा सारख्या दर्जेदार अशा एकूण ३८ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. १९१८ ते १९३४ या १६ वर्षांच्या काळात हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण ९७ चित्रपट काढले. त्यांत फाळकेदिग्दर्शित ४० चित्रपट होते. तसेच गंधर्वाचा स्वप्नन विहार, खंडाळा घाट, विंचवाचा दंश, विचित्र शिल्प, खोड मोडली, वचनभंग इ. लघुपटही फाळक्यांनी दिग्दर्शित केले. दादासाहेब फाळके दिग्दर्शित सेतुबंधन हा हिंदुस्थान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो. दादासाहेब फाळके यांचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      February 16, 2022


  • अभिनेते मामा पेंडसे

    राक्षसी महत्वाकांक्षा ‘ ह्या नाटकासाठी गोव्यात मुद्दाम दत्तोबा भोसले यांना आणले. ते केशवराव भोसले यांचे बंधू होते. त्यावेळी ‘ कंदन ‘ ची भूमिका मामांना आयत्या वेळी करावी लागली. मामांचे काम पाहून दत्तोबा भोसले इतके खूष झाले की त्यांनी मामांना आनंदाने खांद्यावर घेऊन रंगपटात नेले .

      September 12, 2021


  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया-सुळे

    निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवारी देणार नाही. मध्येच शरद पवार म्हणाले, ‘पण भाजपाचं काय?’ बाळासाहेब म्हणाले, ‘कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे,’ असा शब्द बाळासाहेबांनी दिला. सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या.

      June 30, 2022


  • पहिल्या सिंथेसायझरची गोष्ट

    पहिल्या सिंथेसायझरची गोष्ट सांगताना केरसी लॉर्ड , दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत असत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आलाला. या विचार येताक्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले ते दत्ता डावजेकरांचे. कारण संगीत आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान व त्यावर हुकमत असणारे डीडी एकटेच होते. त्यावेळी डीडी गिरगावात तर केरसी लॉर्ड गँट रोडला राहत. मग केरसींनी डीडींना गाठले. काय काय इलेक्ट्रॉनिक सामग्री लागेल , याची दोघांनी यादीच केली. डीडींनी ऑपेरा हाऊसच्या माकेर्टमधून सारी सामग्री आणली.

    डीडी कामाला लागले आणि सहाव्याच दिवशी भारतातल्या पहिल्या देशी सिंथेसायझरचा जन्म झाला. ही आगळी जन्मकथा सांगून केरसी म्हणाले की डीडींनी बनविलेला सिंथेसायझर घेऊन आम्ही ' पंचमदां ' कडे गेलो. तो सिंथेसायझर पाहून आरडी खूषच झाले. तो डीडींनी बनवला आहे , म्हटल्यावर तर त्यांनी आदराने मस्तक झुकवले. तेव्हा हे अफलातून वाद्य बनवण्यासाठी डीडींनी केवळ पाचशे रुपये खर्च केला. डीडींचा स्पर्श झालेल्या या वाद्याचा वापर नंतर त्यांनी निदान तीनशे गीतांच्या संगीतात तरी केला. आता तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची प्रचंड मांदियाळी तयार झाली आहे. त्यांचे आकार , त्यांची कार्यक्षमता आणि सर्वच प्रकारच्या संगीतात अशा वाद्यांचा होणारा वापर हे सारे आमूलाग्र बदलून गेले आहे. तरी एका महान संगीतकाराने तयार केलेले हे पहिलेवहिले वाद्य म्हणजे चित्रपटसंगीताच्या इतिहासातले पिंपळपान आहे. डीडींनी तयार केलेला हा ३६ वर्षांपूवीचा सिंथेसायझर केरसी लॉर्ड यांच्या संग्रहात मोलाच्या जागी होता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 22, 2017


  • अभिनेते सूर्यकांत

    मराठी चित्रपट सृष्टीतील सूर्यकांत यांनी अनेक चित्रपटातून शिवाजी राजांची अजरामर भूमिका साकारली यांच्या भूमिकेतून प्रेरणा घेऊन दक्षिणेत एन टी रामाराव ,शिवाजी गणेशन ,करुणानिधी यांनी तेथील भाषेत राजांची भूमिका साकारली या भूमिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळवून दक्षिणेकडील स्टार नेते बनले . पण दुर्दैवची बाब आहे की ज्यांनी ही शिवरायची भूमिका अजरामर केली .ते सुर्यकांत मांढरे आजच्या पिढीला अज्ञात आहेत .ज्यांच्या अभिनयातून आणि त्यांच्या शरीराच्या ठेवणीतून संपूर्ण महाराष्ट्राला आपले आराध्य शिवप्रभू पाहता आले, आजही अनेक बऱ्याच ठिकाणी शिवरायांचे तैल चित्र हे सुर्यकांत यांच्या रूंपात रंगवलेले पहावयास मिळते, कारण त्यांच्या अभिनयामुळेच त्यांनी शिवराय अगदी हुबेहूब जिवंत केले आणि १९०० शतकात आपल्याला प्रत्यक्ष शिवप्रभू अनुभवता आले.

      July 21, 2021


  • माई मंगेशकर

    माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.

      June 16, 2022


  • गायक-अभिनेते गणपतराव बोडस

    संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या.

      July 2, 2017