(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर

    आज १४ ऑक्टोबर
    आज साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांची पुण्यतिथी
    जन्म. २४ ऑगस्ट १८७२

    ज्या काळात 'धर्म सम्राट', 'कार्य सम्राट' अशा उपाधी कुणाला सर्रास देण्याची पद्धत मराठी समाजात नव्हती, त्या काळात जनता ज्यांना आदराने 'साहित्य सम्राट' अशा शब्दांत गौरवत होती, ते म्हणजे मा.नरसिंह चिंतामण केळकर. त्यांचे वडील मिरज संस्थानात कारकून, फौजदार,मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मिरजेच्या सरकारी शाळेत व माध्यमिक शिख्षण पुण्याच्या सरकारी शाळेत झाले. १८८७ साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले. डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला. सरकारी कारकुनी नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते लोकमान्य टिळकांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७ सालापासून संपादक झाले. १९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे तात्यासाहेबांच्या हातात्त आली. १९१८ मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली पुणे (मध्य) भागातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदे मंडळाचे सदस्य झाले. ते केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त सुद्धा होते. केळकर १९२१ मध्ये बडोदे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे व १९०६ मधील नाशिकच्या दुसऱ्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तात्यासाहेबांचे जीवन बहुरंगी, बहुढंगी होते. ते कुशाग्र पंडित होते पण त्यामुळे त्यांचे बोलणे-वागणे-लिहिणे बोजड झाले नाही. त्यामुळेच ते 'हास्य विनोद मिमांसा' हा ललित संग्रह, 'तोतयाचे बंड', 'वीर विडंबन' अशी नाटके लिहू शकले. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्या्, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. मा.न.चिं.केळकर यांचे १४ आक्टोबर १९४७ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. मा.न.चिं.केळकर यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 14, 2016


  • समाजसेविका ताराबाई मोडक

    शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. १९४६ ते १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते.

      April 19, 2021


  • लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

    अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय़ लेखनाला सुरुवात केली.

    सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि ‘दळवी, हे बंद करा!’ नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. ‘सभ्य गृहस्थ हो!’ हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळय़ा टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. तुम्ही तो नाद सोडा!’ या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली!

    मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले. काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. मा.जयवंत दळवी नाटककार, कथा, कादंबरी लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते पण 'ठणठणपाळ' या नावाने ललितमध्ये जे सदर लिहिले तसे यश आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. एकदा बॉम्बे बुक डेपोमध्ये स्वाक्षरी सप्ताहात ठणठणपाळ स्वाक्षरी देण्यासाठी येणार म्हणून वाचकांनी मोठी गर्दी केली. ठणठणपाळच्या मोठ्या कटआऊट शेजारी जयवंत दळवी बसले होते. उपस्थितांची मागणी अशी होती की आम्हाला ठणठणपाळ कोण आहे ते कळू द्या. शेवटी जयवंत दळवींना आपला मुखवटा दूर करावा लागला. असे भाग्य फार थोड्या लेखकांना मिळते.

    जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे. मात्र दळवी आत्मचरित्र लिहिण्याच्या पूर्ण विरोधात होते. स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची लेखकाची कल्पना असते. पण पृष्ठभागावर येणा-या आठवणी म्हणजे आत्मचरित्र नसून अंतरंग खरवडत जाऊन उमटणे हे कठीण कर्म म्हणजे आत्मचरित्र! मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, आशा वासना – ज्यांचा सभ्य संस्कृतीत उच्चारही करता येत नाही ते लिहिणे म्हणजे खरे आत्मचरित्र! मात्र आत्मसमर्थनासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात-ती एकांगी असतात आणि स्वत:च स्वत:ला दिलेली प्रशस्तिपत्रे असतात असे दळवींचे मत होते. मा. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-प्रहार / विकिपीडिया

    जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा
    उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
    जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
    चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)

      September 16, 2017


  • भार्गवराम आचरेकर

    अत्यंत बिकट परिस्थितीतही धीरोदात्तपणा न सोडणारे, निगर्वी, सरळ, प्रेमळ अंत:करणाचे मा.भार्गवराम आचरेकर यांना नाट्य व्यवसायातील चारुदत्त असे संबोधिले जात असे.त्यांचा जन्म १० जुलै १९१० रोजी झाला. स्थानिक शाळेच्या मदतीसाठी केलेल्या शारदा नाटकाच्या प्रयोगात त्यांनी वल्लरीचे काम इतके अप्रतिम केले की त्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यावेळी ललितकलादर्शचा मुक्काम मालवणला होता. बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. त्यांनी भार्गवरामांचे गाणे ऐकले आणि आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. ललितकलादर्शन मधील १९२५ ते १९३७ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य जीवनाची चढती कमान होती. ललितकलादर्शच्या बापूसाहेब पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली मा.भार्गवराम आचरेकर यांना विविध भूमिका करण्याचे भाग्य लाभले. ‘कुंजविहारी’ नाटकातील ‘कृष्ण’ ही भार्गवरामांची पहिली व्यावसायिक भूमिका. यानंतर ‘वधूपरीक्षा’, ‘शारदा’, ‘पुण्यप्रभाव’ इत्यादी अनेक नाटकांत ते भूमिका करू लागले. बापूसाहेब पेंढारकर आजारी पडल्यानंतर त्यांनी ‘मानापमाना’तील धैर्यधर, आणि ‘शिक्काकट्यार’ मधील ‘शाहू’ या अवघड संगीत भूमिका भार्गवरामांवरच सोपविल्या. ‘ललितकलादर्श’ मंडळीत पणशीकर बुवा, विष्णुपंत पागनीस, कागलकरबुवा, वझेबुवा आणि शिवरामबुवा वझे यांची तालीम मिळाल्याने त्यांची गायकी कसदार आणि दर्जेदार झाली होती. बापूसाहेबांनी भार्गवरामांच्या अभिनयाकडेही बारीक लक्ष पुरविले आणि म्हणूनच ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील फटकळ पण सरळ स्वभावाच्या बिजलीची तडफदार तेजस्वी भूमिका भार्गवरामांनी अप्रतिम साकार केली. जणू त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच वरेरकरांनी ती भूमिका लिहिली होती. अभिनय, गायन आणि रूप यांचा त्रिवेणी संगम या तडफदार भूमिकेत झाला होता. बिजली म्हणजे भार्गवराम आणि भार्गवराम म्हणजे बिजली असे समीकरण त्याकाळी झाले होते. पुढे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील भानुशंकरांच्या भूमिकेमुळे नव्या पिढीला भार्गवरामांचा नाट्याभिनय व गायनाची करामत ऐकण्याची संधी मिळाली. भार्गवराम नुसते नटच नव्हते तर चांगले ख्याल गायकही होते. साध्या आणि अनवट रागातील चीजांचे बरेच मोठे भांडार त्यांच्यापाशी होते. अशा या प्रसन्न वृत्तीच्या, निकोप प्रकृतीच्या, धार्मिक श्रद्धेच्या, नम्र स्वभावाच्या आणि निर्व्यसनी, निष्कलंक चारित्र्याच्या गुणशाली कलाकाराला नाट्य परिषदेने ‘बालगंधर्व पदक’ देऊन गौरविले होते. भार्गवराम आचरेकर यांचे २७ मार्च १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 28, 2017


  • जेष्ठ संगीतकार गुलाम मोहम्मद

    बीकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या मा.गुलाम मोहम्मद यांचे वडील जनाब नबी बक्श हे तबलावादक होते. त्यामुळे गुलाम मोहम्मद यांना संगीताचे जनुक रक्तातूनच आलेले होते. राजस्थानी लोकसंगीताचा त्यांनी आपल्या चित्रपट संगीतात पुरेपूर वापर करून घेतला. ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना त्यांनी लोकप्रिय बनवले. अर्थात कोणत्या प्रकारच्या गाण्यात आवाजाला जास्त उठाव द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या गाण्यात वाद्यांचा वापर करून गाणे उठावदार करायचे याचे अचूक कसब त्यांना साधत असे. जसा अगदी आगगाडीच्या शिट्टीचा वापर त्यांनी पाकीजा मध्ये कल्पकतेने वापर करून घेतला होता. “चलते चलते” या गाण्याच्या शेवटी, किंवा “मौसम है आशिकाना” गाण्याच्या आधीचा पक्षांचा तो किलबिलाट रेकॉर्ड करण्यासाठी तब्बल एकवीस दिवस त्यांना रोज सकाळी त्या ठिकाणी सगळा लवाजमा घेऊन आवाज रेकॉर्ड करण्यासाठी जावे लागले. तेव्हा कुठे त्यांना मनासारखा तो किलबिलाट रेकॉर्ड करता आला.

    ते नौशाद यांच्याकडे अनेक वर्षे सहाय्यक म्हणून काम करत होते. नौशाद साहेबांच्या सुरवातीच्या काळातील म्हणजे रतन, मेला, दर्द, दास्तान, दिल्लगी, बाबुल, दीदार, या चित्रपटांच्या संगीतावर मा.गुलाम मोहम्मद यांची छाप स्पष्ट दिसून येते. अर्थात नौशाद साहेबांनी त्यांना स्वतंत्र काम करायची परवानगी दिली होती इतकीच काय ती जमेची बाजू. गुलाम मोहम्मद यांनी स्वतंत्रपणे जवळपास पस्तीस हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी त्या पैकी मिर्जा गालिब आणि पाकीझा हे चित्रपट खूप गाजले. पाकीझा चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला. एक अजरामर संगीत कलाकृती ठरली. अर्थात ती तयार होण्यासाठी ही तब्बल चौदा वर्षे लागली. त्याची अनेक वेगवेगळी कारणे होती पण या चित्रपटासाठी संगीत दिलेले मा.गुलाम मोहम्मद यांना आपल्या हयातीत हा चित्रपट पूर्ण झालेला पाहण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांच्या निधनानंतर नौशादसाहेबांनी या चित्रपटाची उर्वरित गाणी आणि पार्श्वसंगीत तयार केले. या चित्रपटाने आणखी एक विक्रम असा केला की मूळ चित्रपट साडेतीन तासांपेक्षा अधिक लांब आणि तेवीस गाणी त्यात होती. पुढे चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी बारा गाणी कट करावी लागली तरी या कापलेल्या गाण्यांची HMV कंपनीने एक वेगळी रेकॉर्ड बनविली. या चित्रपटासाठी गुलाम मोहम्मद यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले पण पारितोषिक नाही मिळाले. पण मिर्जा गालिब च्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. प्रचंड गुणवत्ता आणि जीव ओतून घेतलेल्या मेहनतीला यशाने दरवेळी दिलेल्या हुलकावणीचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल. पाकिजाचे चित्रपटाचे वास्तविक संगीत मा.गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्व संगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी मा.गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता.

    गुलाम मोहम्मद यांचे निधन १७ मार्च १९६८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेली काही गाणी.
    ये दुनिया है यहां प्यार करना किसको आता है.
    किस्मत बनानेवाले जरा सामने तो आ.
    अखियां मिलाके जरा बात करो जी
    जिंदगी देनेवाले सून
    मोहब्बत की धून
    चल दिया कारवां
    शिकायत क्या करू दोनो तरफ गमका फसाना है.
    आपसे प्यार हुआ जाता है.
    दिल गमसे जल रहा है जले पर धुआँ न हो.
    चलते चलते
    मौसम है आशिकाना

    गुलाम मोहम्मद व लता मंगेशकर भाग १ ते ३
    https://youtu.be/4ECx3z4I4JI

    https://youtu.be/QRtbmXkIr-I

    https://youtu.be/maQGsGB_3v4

    मिर्झा गालीब मधील गाणी.
    https://youtu.be/_BJcfx8EiDY

      March 21, 2017


  • क्रांतिसिंह नाना पाटील

    क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव) येथे झाला.

    ‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार व पारतंत्र्यात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते नाना पाटील हे ‘येडे मच्छिंद्र’ येथेच व्हर्नाक्युलर फायनल ही त्या काळी असणारी मराठी सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हा त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव होता नंतर ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले.

    नोकरी सांभाळत त्यांनी गावोगावी सभा घेऊन समविचारी तरुणांच्या संघटना बांधल्या. ते आपले भाषण रोजच्या व्यवहारातील दाखले, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी शैली, विनोदाची पेरणी यांच्या आधारावर प्रभावी करत. त्यामुळे ते साहजिकच लोकप्रिय वक्ते झाले. त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्याचवेळी ( १९३० मध्ये) म.गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चालवलेल्या असहकाराच्या चळवळीने त्यांना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आणले. त्यांनी असहकाराच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक कॉंग्रेस कमिटीमध्येही कार्यकर्ते म्हणून त्यांची निवड केली गेली. ‘छोड़ो भारत’ या कॉंग्रेसच्या घोषणेनंतर देशभर उठाव झाला. इतर कालखंडांतील चळवळीपेक्षा अगदी वेगळ्या लढ्याचा, तंत्राचा, पुढारीपणाचा आणि विचारांचा आविष्कार त्यावेळी झाला होता. त्याच क्रांतिकारक आविष्काराचे नवीन प्रतीक म्हणजे – पत्रीसरकार!

    समांतर सरकार सातारा, सांगली, वाळवे या भागात शेतकरी गढ्यांमध्ये उभे राहिले (तशाच प्रकारचा पण जरासा निराळा प्रकार बंगालच्या मिदनापूर भागात उभा झाला होता). त्याचे प्रतीक होते नाना पाटील. म्हणून ते ‘क्रांतिसिंह’ नाना पाटील असे ख्यातनाम झाले. स्वातंत्र्यचळवळीच्या नवीन प्रकाराची व प्रतीकाची अशी काही अपूर्व चिन्हे होती, की त्याने महाराष्ट्र मनाची चांगलीच पकड घेतली होती. पहिले म्हणजे सत्याग्रह, अहिंसा वगैरेंची गांधीवादी बंधने पत्री सरकारने गुंडाळून बाजूला ठेवली होती. दुसरे, त्यांनी स्वत:ला ‘सरकार’ म्हणून जाहीर केले आणि ‘मावळ’ प्रांतातील गढ्यांतून ब्रिटिश राजवट संपली असा अंमल बसवला.

    तिसरे, स्वत:ला ‘सरकार’ म्हणून घोषित केल्यावर आपली स्वतंत्र अशी हत्यारी सेना असावी लागते, म्हणून पत्रीसरकारने अशी ‘हत्यारबंदी’ उभी केली. भाले-बरच्या, लाठी-काठीपासून ते बंदुकीपर्यंत. चौथे, ‘सरकार’ चालवायला पैसा लागतो. त्यासाठी इंग्रजांचे खजिने लुटले(उदाहरणार्थ, धुळ्याचा दरोडा) आणि पाचवे म्हणजे या ‘सरकार’चा मुख्य पाया शेतकरी हा झाला होता. त्यामुळे शेतकरी विमोचनाचे काही प्रश्न ताबडतोब सोडवण्यात आले. सावकारी व मोठ्या जमीनधारकांची गुंडगिरी नष्ट केली गेली होती. त्यांना साहाय्य करणार्या गावगुंडांचा नि:पात केला गेला होता. त्यांना शिक्षा देण्यात आल्या होत्या. शिक्षेचा एक प्रकार ‘पत्री मारणे’ हा होता. अनेकांना गोळ्या घालून देहदंडही करावा लागला होता. त्यामुळेच या ‘सरकार-सत्ते’ला खरा लढाऊ, विश्वासू ‘मास बेस’ लाभला होता. तेथूनच नानांना ‘क्रांतिसिंह’ हे बिरुद्ध चिकटले.

    क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या घरादाराकडे पाठ फिरवली ती १९३० साली, तीही कायमची. त्यांची पत्नी तारुण्यात निधन पावली. त्यांनी पुन्हा लग्न न करता देशाचा संसार हा आपला संसार मानला.

    नाना पाटील १९४२ च्या क्रांतीपू्र्वी एकूण आठ वेळा तुरुंगात गेले होते. पण १९४२ च्या ८ ऑगस्टच्या ‘करेंगे या मरेंगे’ या महात्मा गांधीच्या आदेशानंतर नाना पाटील व त्यांच्या सहकार्यांानी ‘आता पोलिसांच्या ताब्यात जायचे नाही’ असे ठरवले. महात्मा गांधी यांनीच ‘करेंगे या मरेंगे’ या आदेशानंतर सांगितले होते, की जर राष्ट्रीय नेते तुरुंगात गेले तर प्रत्येक भारतीयाने स्वत:स स्वतंत्र समजून आपल्या स्वत:च्या बुद्धीला पटेल त्यानुसार इंग्रजांना घालवून देण्याची चळवळ उभारावी. त्याप्रमाणे नाना पाटील यांनी १९४४ मध्ये त्यांची व महात्मा गांधींची पाचगणीस भेट झाली तेव्हा त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले.

    त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्या्ने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.’ . प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

    या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

    नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.

    १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.

    नाना पाटील यांच्या या ‘प्रतिसरकार’चे लष्करी व पोलिसी अंग म्हणजे ‘तुफान सेना’ हे होते. जर्मनीच्या हिटलरची ‘storm troopers’ व नेताजी सुभाषचंद्र यांची ‘आझाद हिंद सेना’ हे लष्करी संघटनांचे आदर्श समोर ठेवून नाना पाटील व त्यांचे सहकारी जी.डी. लाड, अप्पासाहेब लाड, नागनाथ नायकवडी, राजुताई पाटील इत्यादींनी ‘तुफान सेने’ची निर्मिती (१९४३-४४) केली. जी.डी. लाड हे ‘तुफान सेने’चे फिल्ड मार्शल होते. ‘तुफान सेने’च्या सैनिकांपुढे त्या काळच्या अनेक नामवंतांची व्याख्याने व बौद्धिके होत असत. अच्युतराव पटवर्धन व साने गुरुजी यांचेही मार्गदर्शन ‘तुफान सैनिकां’ना झालेले आहे अशी आठवण भाई भगवानराव पाटील यांनी सांगितली आहे.

    नाना पाटील भूमिगत अवस्थेत ज्या ज्या मंडळींकडे आश्रयाला असत तेव्हा ते त्यांना सांगत, की ‘माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर मला लगेच पुरून टाका. फक्त सुरेशबाबूंस सांगा. (म्हणजे नाथाजी लाड. ते क्रांतिसिंहांचे चिटणीस होते. तसेच १९४२च्या लढ्यातील भूमिगत नेतेही होते. त्यांचे भूमिगत अवस्थेतले टोपणनाव) चळवळीतील इतर कोणासही ते कळता कामा नये. चळवळ जिंवत राहिली पाहिजे.’
    मुंबईचे प्रख्यात असे बंड म्हणजे आपल्या आरमाराचे.

    नाविकांच्या संपाचे, फेब्रुवारी १९४६ मधील; त्या दिवशी मुंबईच्या कम्युनिस्ट पक्षाने सार्वत्रिक संपाची हाक दिली. त्या वेळेस मुंबईतही क्रांतिसिंह यांच्या ‘पत्रीसरकारची’ झाक येऊन गेल्याची आठवण कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी सांगितलेली आहे. ‘पत्रीसरकार’च्याच विरुद्ध कॉंग्रेस सत्तेने संपूर्ण सत्तांतर व्हायच्या अगोदरच पत्री मारून हुकूम काढला, की हत्यारे ताबडतोब सरकारजवळ द्या, नाहीतर सरकारी फौज पाठवू. एवढ्यावरच न थांबता काहींना बेरड, दरोडेखोर, खूनी ठरवून फाशी देण्यात आले. असे डांगे यांनी १२ डिसेंबर १९७६ च्या साप्ताहिक ‘युगांतर’मध्ये लिहिले आहे.

    पुढे, नाना पाटील व त्यांच्या मित्रांनी ‘शेतकरी कामगार पक्षाचे’ स्वरूप घेतले. नंतर ते कम्युनिस्ट पक्षातही दाखल झाले. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथ अण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
    नाना पाटील सातारा व बीड या मतदारसंघातून अनुक्रमे १९५७ व १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकींतून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्त्व केले. दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहाला मदत केली.

    नाना पाटील सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा चळवळींमध्ये अखेरपर्यंत कार्यरत राहिले. नाना पाटील यांचे ६ डिसेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 3, 2021


  • स्मिता पाटील – भारतीय चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी

    वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटील जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते.

      December 13, 2020


  • प्रेरणा

    अशा अनेक व्यक्ती आहेत की, अगदी सामान्य स्थित असून, अतिशय कष्ट  व प्रयत्न करून स्वतःचा उत्कर्ष केला. अशा व्यक्ती प्रसिद्ध पराङगमुख असतात. अशाच व्यक्तीची गाथा लिहिली आहे, वाचून प्रेरणा मिळेल याची खात्री आहे.

      July 11, 2019


  • भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे

    राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत.

      March 9, 2022


  • सौ सावित्रीबाई खानोलकर – परमवीर चक्राचे ‘स्वीस कनेक्शन’

    आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, परमवीर चक्र हा भारतातला सर्वात मोठा सैनिकी शौर्यपुरस्कार आहे - अगदी ब्रिटनच्या 'व्हिक्टोरिया क्रॉस' अथवा अमेरिकेच्या 'मेडल ऑफ ऑनर' च्या बरोबरीचा - जो सैनिकांना युद्धातील अतुलनीय शौर्याबद्दल दिला जातो. १९४७ पासून २१ वीरांना परमवीर चक्र मिळालेले असून त्यापैकी १४ जणांना ते मरणोत्तर मिळाले आहे. परमवीर चक्र पदक ३.४९ सेंटीमीटर व्यासाचे ब्राँझचे पदक असून त्यावर भारतीय राजमुद्रा आणि चार बाजूंना इंद्राचे अस्त्र वज्र चार दिशांना आहे.

    पण आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे की ह्या परमवीर चक्राच्या पदकाचे डिझाईन कोणी केले होते? ह्या पदकाचे डिझाईन केले होते सौ सावित्रीबाई खानोलकरांनी १९४७ मध्ये!

    सौ सावित्रीबाई खानोलकर?!? कधीच ऐकलेले नाहीये हे नाव - कोण होत्या त्या? आणि असल्या मराठमोळ्या 'खानोलकर' नावाच्या बाईचे कसले आलेय 'स्वीस कनेक्शन' ?

    paramveer-chakraह्या सौ सावित्रीबाई खानोलकर पूर्वाश्रमीच्या ईव्ही मॅदे दे मॅरॉस. जन्म २० जुलै १९१३ - स्वित्झर्लंडमधील न्यूशातेलमधला. त्यांचं बालपण जिनेव्हात गेलं. वयाच्या १६ व्या वर्षी - १९२९ मध्ये - त्यांची भेट विक्रम खानोलकारांशी झाली. हे विक्रम खानोलकर तेव्हा ब्रिटनमधील सॅन्डहर्स्ट येथे रॉयल मिलिटरी अकॅडेमी मध्ये सैनिकी शिक्षणासाठी आलेले होते आणि सुट्टीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये फिरायला आले होते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता ईव्ही विक्रम खानोलकरांना शोधत शोधत मुंबईत आल्या आणि हे जोडपे १९३२ मध्ये विवाहबद्ध झाले. हिंदू धर्माबद्दल त्यांना आकर्षण होतेच. लग्नानंतर त्यांनी धर्मांतर करून 'सावित्री' हे नाव घेतले आणि अश्या प्रकारे 'ईव्ही मॅदे दे मॅरॉस' च्या 'सौ सावित्रीबाई खानोलकर' बनल्या.

    सैन्यात त्यांचे पती वरिष्ठ पदावर होतेच. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हाचे मेजर जनरल हिरालाल अटल ह्यांनी सौ सावित्रीबाईंवर सैनिकांसाठी सर्वोच्च शौर्य पदक डिझाईन करायची जबाबदारी सोपवली आणि सौ सावित्रीबाईंनी ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली. हे आहे आपल्या परमवीर चक्राचे 'स्वीस कनेक्शन'!

    योगायोगाने पहिले परमवीरचक्र सौ सावित्रीबाईंच्या मोठ्या मुलीच्या दिराला - मेजर सोमनाथ शर्मा यांना - काश्मीर युद्धातील शौर्याबद्दल नोव्हेंबर १९४७ मध्ये मरणोत्तर मिळाले.

    सौजन्य - संकेत कुलकर्णी (लंडन)

    फोटो: सौ सावित्रीबाई खानोलकर आणि मेजर जनरल विक्रम खानोलकर, परम वीर चक्र, पहिल्या परमवीरचक्राचे (मरणोत्तर) मानकरी मेजर सोमनाथ शर्मा

      August 8, 2016