बॉलिवूडमध्ये दिग्गज तारकांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांची कमी नाही. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शबाना आजमी आणि दीप्ती नवल पासून या काळातील काजोल, माधुरी दीक्षित, करिना कपूर, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ आणि प्रियंका चोपडा अश सर्व स्टार नायिकांसोबत चित्रपट बनविले आहेत.
दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा पहिला चित्रपट ‘दामुल’ होता. यात दीप्ती नवलने मुख्य भूमिका साकारली होती. शबाना आजमी यांनी त्यांच्या ‘मृत्युदंड’ मध्ये काम केले होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला माधुरीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटाच्या यादीत ठेवले जाते.
कमर्शियल चित्रपटाच्या दिग्गज नायिकांसोबत काम करणारे प्रकाश झा यांनी आपल्या चित्रपटांपासून आर्ट फिल्म मेकरची प्रतिमा तोडण्यात यश मिळविले. ‘दामुल’मुळे त्यांची तशी ओळख बनली होती. या प्रतिमेला तोडण्यात प्रकाश झा यांना अजय देवगण सोबतच्या ‘दिल क्या करे’ने मोठे योगदान दिले. चित्रपट बॉक्स ऑफीस वर जास्त चालला नव्हता, मात्र प्रकाश झा यांचे नाते या चित्रपटामुळे कमर्शियल चित्रपटासोबत जोडले गेले. अजय देवगण सोबत त्यांनी या चित्रपटानंतर ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’मध्येही काम केले. अपहरणमध्ये बिपाशा बसू होती. जिने बिहारी मुलीचा रोल केला होता. बिपाशा नंतर ‘राजनीति’ मध्ये प्रकाश झा ने कॅटरिना कैफ, ‘आरक्षण’ मध्ये दीपिका पदुकोण आणि ‘सत्याग्रह’मध्ये करिना कपूर सोबत काम केले.
प्रकाश झा यांचे गेल्या काही वर्षांतले चित्रपट म्हणजे भारतीय समाजाचे जळजळीत, धगधगीत वास्तवाचे चित्रण करणारे चित्रपट आहेत. अनेक चित्रपटात एकसंध पटकथा, कथानकातील नाटय़ टिकवून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
प्रकाश झा यांचे चित्रपट समकालीन प्रश्नांवर असतात. "दामुल', "गंगाजल', "अपहरण', "राजनीती' या चित्रपटांनी झा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केलेले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून अजय देवगण, अर्जुन रामपाल यांच्यासारख्या कलाकारांकडून आपल्याला हवा तो विषय काढून घेण्याची ताकद असलेल्या प्रकाश झा यांच्यासारख्या मुरब्बी दिग्दर्शकाला अभिनय करणे अवघड नाही. प्रकाश झा यांनी आपल्याच ‘आरक्षण’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती.
प्रकाश झा यांचा आणि अलंक्रिता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेला "लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा हिंदी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, चित्रपटात काही अश्लिल संवाद आणि दृश्ये असून तो समाजातील काही विशिष्ट घटकांसाठी संवेदनशील असल्याचे म्हणत कालच बोर्डाने चित्रपटाला परवानगी नाकारली आहे.
प्रकाश झा यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा...
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 27, 2017
चिमाजी अप्पाना वसईचा वीर म्हणून पण ओळखले जाते. हे पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापन केली.
September 15, 2019
हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले. मा.भालबा केळकर यांचे ६ नोव्हेंबर १९८७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 6, 2017
घोषाल कुटुंब फाळणीनंतर पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झालं. हे एक हुशार कुटुंब. श्रेयाचे वडील बिश्वजीत घोषाल मुखोपाध्याय हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. बंगालमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोघे उत्साहाने सहभागी व्हायचे. या अशा कार्यक्रमांमध्ये श्रेयाची आई गाणं म्हणायच्या. चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिचा जन्म १२ मार्च १९८४ रोजी झाला. या गाण्यांचा सराव करताना बाल श्रेया आईचं गाणं ऐकून तेच गाणं आपल्या बोबड्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करायची. इथेच श्रेयाच्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. तिची आई हाच तिचा पहिला गुरु. चार वर्षांची असताना श्रेयाने आईला हार्मोनियमवर साथ करायला सुरुवात केली. अशा रितीने श्रेयाचं संगीत शिक्षण अगदी लहान वयातच सुरु झालं. संगीत तर तिच्या रक्तातच होतं पण योग्य वेळी योग्य गुरु तिला लाभले आणि तिच्या अंगभूत कलेला चांगली चालना मिळाली. एकीकडे एक बाल गायिका घडत असताना तिने तिच्या शालेय शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. अगदी लहान वयापासून व्यासपीठावर गाणी म्हणत म्हणत गाण्यांच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत घेत श्रेयाने सारेगम या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेमुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं. संजय लीला भन्साळी देवदास सिनेमा बनवत होते. इस्माईल दरबार यांनी गाण्यांच्या गायिकाही नक्की केल्या होत्या. ऐश्वर्याच्या गाण्यांसाठी मा.लताबाईंचं नाव नक्की झालं होतं. बैरी पिया हे गाणं, त्या गाण्यातले चढ उतार फक्त दिदीच म्हणू शकतात आणि ऐश्वर्याची गाणी ही देखील टिपीकल दिदींचीच गाणी असल्याने लताबाईंची निवड नक्की होती. १९९९ साली श्रेया घोषाल सारेगम या स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. असंच एकदा सारेगम बघत असताना श्रेयाचा आवाज संजय भन्साळीच्या आईने ऐकला आणि तिने लगेच आपल्या मुलाला बोलावलं आणि तिचा आवाज ऐकायला सांगितला. आणि इथेच त्याला पारोचा आवाज मिळाला. तिच्या आवाजातला निरागसपणा त्याला फार आवडला आणि पारोसाठी असाच निरागस आवाज हवा म्हणत त्याने पारोसाठी श्रेयाला घेण्याचं नक्की केलं. सारेगमची महाअंतिम फेरी श्रेया जिंकली. परिक्षक म्हणून भारतीय संगीतातली दिग्गज मंडळी होती. श्रेया घोषालने सगळ्यांची मनं जिंकली. त्या परिक्षकांमध्ये एक होते संगीतकार मा.कल्याणजी. मुंबईतले तिचे पहिले गुरु कल्याणजीच. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण गुजराथ मधील कोट्यातील मा.महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले. मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले. श्रेयाने सा रे ग म ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने देवदास या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार व आर. डी बर्मन पुरस्कार मिळाले. त्यांनी तिच्या आवाजात देवदास हिंदी चित्रपटांसाठीचं पहिलं 'बैरी पिया' हे गाणं ध्वनिमुद्रित केलं. देवदासच्या गाण्यांसाठी कुठलाही सराव तिने केला नाही कारण स्टुडिओतही ती अभ्यासच करायची. तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व सात दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रेयाची मराठी गाणी
https://www.youtube.com/shared?ci=vlRQDsSbk50
https://www.youtube.com/shared?ci=awbXe_lwtI8
https://www.youtube.com/shared?ci=AVYU6MSAlQI
March 12, 2017
उज्वल निकम यांच्या कडे भारतातील हाय प्रोफाईल केसेस असतात. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा असलेले उज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहेत. उज्वल निकम यांच्या सभोवताल ४७ शस्त्रधारी कमांडो नेहमी असतात.
March 30, 2022
त्याने राजकीय प्रहसनं लिहिली, विनोदी नाटकं लिहिली आणि काही संगीतिकाही लिहिल्या. नील सायमन वगळता इतर कोणत्याही विनोदी अमेरिकन नाटककाराला त्याच्याइतकी लोकप्रियता लाभली नव्हती. दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा तो लेखक-दिग्दर्शक होता. त्याने बहुतेक वेळा सहकाऱ्यांच्या साथीने तब्बल ४५ नाटकं लिहिली आणि बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरली. त्याच्या नाटकांमधल्या योगदानाबद्दल त्याला दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. दी मॅन हू केम टू डिनर, यू कान्ट टेक इट विथ यू, मेरीली वुई रोल अलाँग, दी बटर अँड एग मॅन, डल्सी, स्टेज डोअर, ऑफ दी आय सिंग, दी कोकोनट्स, डिनर ॲट एट, असं त्याचं लेखन तुफान लोकप्रिय झालं होतं.
June 2, 2022
अनंत प्रियोळकर यांचे शिक्षण गोवा, धारवाड आणि सांगली येथे झाले.सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे ह्यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र ह्या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले.
September 21, 2023
हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शापित गंधर्व’ मानले गेलेल्या गुरुदत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी झाला. गुरुदत्तचा सिनेमा हा अनेकांच्या आवडीचा विषय. लोकांनी त्याला शोमन, डिरेक्टर ऑफ मिलेनिअम अशा काही पदव्या दिल्या नाहीत. पण हिंदी सिनेमाच्या संवेदनशील रसिकांचा तो जिव्हाळ्याचा विषय. मग तो त्यांचा सिनेमा असो वा त्याचं वैयक्तिक आयुष्य. सिनेमा या माध्यमावरील पकड, संगीताची जाण आणि नव्या प्रवाहात सामावून जाण्याची सहजता यामुळेच मा.गुरुदत्त कालातीत ठरले.
त्यांचे बालपणीचे नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण होते. वसंत कुमार शिवशंकर पदुकोण यांच्यावर बंगाली संस्कृतीचा इतकी मोठी छाप होती, की त्यांनी बालपणीचे नाव बदलून गुरुदत्त ठेवले.
गुरुदत्त हे सिनेसृष्टीत १९४४ पासून १९६४ पर्यंत सक्रिय होते. यादरम्यान त्यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले. त्यामधील काहींमध्ये त्यांनी अभिनयसुध्दा केला. एका सर्वेनुसार, त्यांना सिनेसृष्टीच्या १० वर्षांच्या इतिहासात उत्कृष्ट दिग्दर्शकसुध्दा मानले गेले आहे. टाइम मासिकानुसार त्यांनी दिग्दर्शित केलेला 'प्यासा' सिनेमा जगातील १०० उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. असे म्हटले जाते, की गुरुदत्त कधीच संतुष्ट नव्हते. कितीही चांगला सिनेमा तयार झाला किंवा ते प्रसिध्द झाले तरी आणखी जास्त असायला हवी अशी इच्छा असायची. क्रिएटीव्हीची त्यांची तहान कधीच कमी झाली नाही.
गुरुदत्त यांच्या आयुष्यातील अनेक क्षण आहेत, ज्याविषयी अनेकजण अज्ञात आहेत. गुरुदत्त यांचे सर्वात पहिले गीता यांच्यावर प्रेम झाले, दोघांचे लग्नदेखील झाले. त्यानंतर त्यांना वहीदा रहमान आवडायला लागल्या. दोघींवर एकाचवेळी प्रेम करण्याच्या प्रयत्नात दोघीही त्यांच्यापासून दूर होत गेल्या. गीता यांच्यासोबत लग्न केल्यानंतर गुरुदत्त यांचे सिनेमे हिट होऊ लागले होते. मात्र गीता यांच्या करिअरचा आलेख घसरला होता. यादरम्यान गुरुदत्त यांच्या आयुष्यात वहीदा रहमान आल्या. वहीदा यांना स्टार करण्याची जबाबदारी गुरुदत्त यांनी घेतली. अभिनेत्री होता होता कधी वहीदा आणि गुरुदत्त यांना एकमेकांवर प्रेम झाले हे त्यांनासुध्दा माहित नाही. दोघांनी कधीच हे नाते स्वीकारले नाही. मात्र त्यांच्या या नात्याने गीता नाराज झाल्या होत्या. गुरुदत्त यांना ना गीता यांना सोडण्याची इच्छा होती ना वहीदाला. कदाचित या सर्वातून सुटका करण्यासाठी त्यांनी आत्महत्या केली.
खरं तर देव आनंदच्या आणि त्याच्या मैत्रीबाबत लोकांना माहिती आहे. दोघांनी बोलताना एकमेकांना शब्द दिला होता. गुरुदत्त म्हणाले, की जर ते निर्माते झाले तर देवानंद यांना हीरो म्हणून घेतील. देवानंद यांनी सांगितले होते, की जर ते निर्माता झाले तर सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांच्याकडूनच करून घेतील. देवानंद यांनी आपला शब्द पाळला. निर्माता बनताच 'बाजी' सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांच्याकडे दिले. मात्र गुरुदत्त यांनी आपला शब्द अर्धवट पाळला. गुरुदत्त यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या 'सीआयडी' सिनेमात देवानंद हीरो होते, मात्र सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांनी सहायक दिग्दर्शक राज खोसला यांच्याकडून करून घेतले. नंतर गुरुदत्त यांनी 'जाल' सिनेमात देवानंद यांना डायरेक्ट केले होते. पण बलराज साहनीशी त्याच्या मैत्रीचा उल्लेख फार कमी ऐकायला मिळतो.
बलराज साहनी आणि गुरुदत्त यांची दोस्ती एवढी होती की त्याच्या पहिल्या सिनेमाची कथाही बलराज साहनीने लिहिली होती. नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या ' गुरुदत्त : अ लाइफ इन सिनेमा ' या पुस्तकात, गुरुदत्तचं एक माणूस म्हणून असलेलं वागणं आणि त्याचे चित्रपट याचा विचार त्यात केला आहे. केवळ सिनेमाचे पोस्टर्स रंगवणारे त्याचे काका एवढीच काय ती गुरुदत्तची सिनेमाशी ओळख होती. पण जणू काय त्याच्या रक्तातच सिनेमा होता , अशी कामगिरी त्यानं करून दाखवली. अगदी पहिल्या सिनेमापासून त्याचं सिनेतंत्र काही और आहे , हे लक्षात आलं. प्रवाहाविरोधात जाताना लोकांना काय आवडतं , याचा विचार करणाऱ्या गुरुदत्तची ओळख या पुस्तकाच्या निमित्ताने होते. गुरुदत्त यांचे १० ऑक्टोबर १९६४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
October 10, 2017
पंडित उल्हासस कशाळकर यांचे शिक्षण M.A.(L.L MUSIC). त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी येथे झाला. पंडित उल्हास कशाळकर यांची ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत आहे. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिल नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. नागेश कशाळकर हे उल्हास लहान असताना त्यांना ग्रामोफोनवर वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्या भीमपलास, यमन, शुद्ध कल्याण या रागांच्या बंदिशी एकवत असत. त्यााचे संस्कार उल्हास कशाळकर यांच्यावर होत असत. त्यांच्या वडिलांनी वेगवेगळ्या नावाजलेल्या गायकांच्या गाण्यांशी उल्हास कशाळकर यांची ओळख करून दिली. सोबत त्या पैकी कुणाकडून कोणता गुण आत्मासात करावा याचे स्वाातंत्र्यही दिले.
उल्हास कशाळकर यांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताच्या अभ्यासास सुरुवात केली. उल्हास कशाळकर यांना 'बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धे'त भरघोस यश मिळाले. त्यामुळे त्यांचे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. हा मुलगा नाट्यसंगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करेल असे भाकित अनेकांनी वर्तवले. कशाळकर यांना भारत सरकारची शिष्यवृत्तील मिळाल्यानंतर त्यांची राम मराठे यांच्यावकडे आग्रा घराण्याचची तालिम सुरू झाली. राम मराठे हे उत्तम ख्ययाल गायक होते. कशाळकर यांनी त्यांच्याकडे विशेष करून ख्यााल गायकीचे धडे घेतले. त्यानंतर त्यांनी गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळवली.
जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे. उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी १९८३ ते १९९० च्या दरम्यान काम केले. त्यांनी १९९३ मध्ये कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत आचार्यपद स्वीकारले. ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांची ग्वाल्हेर घराण्याासोबत आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकूमत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत ही महाराष्ट्राला अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी राम देशपांडे, ओंकार दादरकर व शशांक मकतेदार असे शिष्य घडवले आहेत. कशाळकर यांना २०१० साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मािनित करण्यात आले.
उल्हास कशाळकर यांना पाच भाऊ असून सगळे गायक आहेत. त्याापैकी अरूण हे आग्रा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आहेत, तर विकास हे संगीततज्ञ आहेत. उल्हास कशाळकरांच्या पत्नी संजीवनी कोलकाता आकाशवाणीत असिस्टंट स्टेशन डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. संमिहन कशाळकर हा मुलगा. तो वडिलांकडेच गाणे शिकत असून कोलकात्याला एस.आर.ए.मध्ये शिष्यतवृत्ती धारक आहे. उल्हास कशाळकर यांना अखिल भारतीय पातळीवरील ‘क्रिटिक असोसिएशन’च्या मानाच्या पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार २००८ साली प्राप्त झाला होता. त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून, ते ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात २००८ मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. या वर्षीचा भारत सरकारतर्फे संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना मिळाला.
उल्हाास कशाळकर यांची वेबसाईट www.ulhaskashalkar.com
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट / मकरंद वैशंपायन
January 15, 2018
कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई.
April 27, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti