(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नामवंत हिंदी लेखक व पत्रकार धर्मवीर भारती

    धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला. १९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली.

    अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या ‘धर्मयुद्ध’ मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९८७ पर्यंत ‘धर्मयुग’चे ते संपादक होते. डॉ. धर्मवीर भारतींना आधुनिक हिंदी साहित्याचे अध्वर्यू मानले जाते. त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या कथांचे हिंदी अनुवादही केले. त्यांचा ‘कनुप्रिया’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील एक नवा टप्पा मानला जातो.

    ‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ या त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट झाले. सुमारे ५० वर्षे हिंदी साहित्य आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजविणा-या धर्मवीर भारतींची ‘अंधा युग’ ही कलाकृती अजरामर ठरली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक साहित्य पुरस्कार दिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. धर्मवीर भारती यांचे ४ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३.
    संदर्भ.इंटरनेट

    ‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ चित्रपट
    https://youtu.be/adP9erjnDQo
    https://youtu.be/JS00ybwPZtw

      September 4, 2017


  • पटकथाकार, लेखक अण्णासाहेब देऊळगावकर

    विजय कोंडके यांच्या ‘माहेरच्या साडी’ने तर अनेक बाबतीत विक्रम केला होता. अण्णांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथा-संवादांनी संपूर्ण महाराष्ट्राला रडवले. या चित्रपटाच्या हृदयस्पर्शी संवादांनी घराघरातल्या स्त्रियांच्याच नव्हे, तर पुरुषांच्याही काळजाला हात घातला होता.

      June 3, 2022


  • ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी

    ‘हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है’ या शोलेतल्या संवादाने व आपल्या अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी झाला. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2018


  • प्रख्यात गीतकार, आघाडीच्या बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे

    डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.

      June 28, 2022


  • कर्मयोगी बी. व्ही. परमेश्वर राव

    आत्म निर्भर हा शब्द कोव्हीड साथीने आपल्यात रुजवला.पण ही संकल्पना ४०वर्षांपूर्वीच यांनी विशाखापट्टणम जिल्ह्यातील ५०हून अधिक खेडी आत्मनिर्भर करुन ही कल्पना वास्तवात येऊ शकते याचा भक्कम पुरावा दिला होता. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते.

      June 9, 2022


  • सतारवादक अरविंद रघुनाथ मयेकर

    विविध वाद्यांचा उपयोग कोणत्या क्षणी, कसा करावा, त्यांच्या मर्यादा काय, याची पूर्ण जाण असलेले आणि शिवाय वेगवेगळे प्रयोग करून बघण्याची कल्पकता बाळगणारे आणखीन एक पडद्यामागील कलाकार..... अरविंद मयेकर. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९३७ रोजी झाला. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा। या गाण्याच्या सुरुवातीची सतार ही मयेकरांनी वाजवलेली आहे.
    अरविंद मयेकर हे दत्ता डावजेकर यांची कन्या असलेल्या ज्येष्ठ गायिका डॉ.अपर्णा मयेकर यांचे पती. त्यांनी सतारीचे शिक्षण अब्दुल हलीम जाफर खाँ, पंडित रविशंकर आणि हेब्बार मास्तर यांच्याकडे दिग्गजांकडे घेतले. अरविंदजींनी सतारीवर नवनवीन प्रयोग केले आहेत.

    एस डी बर्मन, पंचम, खय्याम, कल्याणजी-आनंदजी, एन दत्ता, जतिन-ललित, अनु मलिक, राम कदम, बाबूजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर, बाळ पळसूळे अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत अरविंद मयेकर यांनी काम केले आहे. त्रिदेव चित्रपटातील ओये ओये, तिरछी टोपीवाले या गाण्यातील इलेक्ट्रिक गिटार असो वा १९४२ अ लवस्टोरी चित्रपटातील एक लड़की को देखा तो ऐसा लगा मधील एकतारा, शालिमारचे रबाब या अफ़ग़ानी वाद्यामध्ये इंग्लिश बॅकग्राउंड असो वा ओ हंसीनि या गाण्यात संतूरच्या पद्धतीने वाजविलेले हार्प हे वाद्य असो, अरविंदजींनी केलेली कमाल अतुलनीयच आहे. सुरेल बाल कला केंद्र या मंगेशकरांच्या ऑर्केस्ट्रात लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बाळ पार्टे यांसारख्या दिग्गजांसोबत वाद्यें वाजविली आहेत. अरविंद मयेकर यांनी नटसम्राट, लेकुरे उदंड झाली, मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, गुंतता हृदय हे अशा सुप्रसिद्ध नाटकांचे बॅकग्राउंड संगीत दिले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ प्रफुल्ल गायकवाड

      January 18, 2018


  • अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी

    मराठीत मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्या बालरंगभूमीवरून आल्या आहेत. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. स्पृहा जोशी ही त्यातीलच एक अभिनेत्री आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून नाटक आणि मालिकांमध्ये कामे करत आहे. बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण केले. स्पृहा जोशी हिला मानाचा समजला जाणारा बालश्री पुरस्कार २००३ साली मिळाली होता. अनेक एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘चिरायू’ या लघुपटातही स्पृहाने काम केले होते. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.

    प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा झी मराठी वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ व ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ इत्यादी मालिकांमध्ये चमकली. उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. याव्यतिरीक्त तिने पैसा पैसा, लॉस्ट अॅाण्ड फाउड, बायस्कोप ‘मोरया’, ‘मायबाप’, आणि 'पेईंग घोस्ट' या चित्रपटांमध्येही काम केले आहे. भक्ती बर्वे, स्मिता पाटील, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रसिका जोशी, मुक्ता बर्वे यांच्यासारखं काम आपल्यालाही करता यावं अशी स्पृहाची इच्छा आहे. एक अभिनेत्री आणि कवयित्री असण्यासोबतच स्पृहा जोशीला आता एक नवी ओळख मिळत आहे. स्पृहा आता एक गीतकारही झाली आहे. स्पृहाने काही सिनेमांसाठी गीतलेखन सुद्धा केलं आहे. त्यामुळे ती एक गीतकार म्हणूनही लोकप्रिय होत आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 8, 2017


  • मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे

    मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. रामदास फुटाणे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कविता, वात्रटिका, चित्रपटाचे लेखन, निर्माते, दिग्दर्शनाबरोबरच त्यांचा राजकीय क्षेत्रातील आमदारकीपर्यंतचा प्रवास मोठा आहे.

    रामदास फुटाणे हे मूळचे नगर जिह्यातील जामखेडचे. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९४३ रोजी झाला. १९६१ ते १९७३ या काळात कला विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी १२ वर्षे नोकरी केली. त्याचवेळी त्यांचा ‘कटपीस’ हा हिंदी कवितांचा संग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर ‘सफेद टोपी, लाल बत्ती’, ‘चांगभलं’ हे मराठी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १९९७ साली त्यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या कवितासंग्रहाने वेगळीच कलाटणी त्यांच्या आयुष्याला मिळाली. या कवितांचे जाहीर कार्यक्रम सादर होऊ लागले तशी रसिकांची दादही त्याला मिळत गेली. पुढे फोडणी, कॉकटेल हे मराठी ककितासंग्रह प्रसिध्द झाले. त्यांनी साहित्य, कला, राजकीय क्षेत्रात मुक्त संचार केला. रामदास फुटाणे यांची निरीक्षणशक्ती आणि सर्वांमध्ये मिसळून वेगळेपण शोधण्याची कलाच त्यांना भाष्यकवितांसाठी उपयोगी पडत गेली. पाना- फुलांच्या कवितांपेक्षा त्यांनी राजकीय प्रसंग, वातावरणातील कविता सादर करणे पसंद केले. त्यातूनच त्यांचा एक रसिकवर्ग निर्माण झाला. फुटाणे नेहमी सांगतात, वात्रटिका हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा शब्द. वात्रटिका या खऱया तर भाष्य कविता आहेत. त्या सोप्या आणि चटकन भिडतात. चार ओळींची वात्रटिका लिहिणे हे सोपे नाही. त्यासाठी ४० ओळी लिहाव्या लागतात, त्यातून चार ओळी तयार होतात. कोणतीही घटना सोप्या पध्दतीने आणि शक्यतो व्यक्तीचे नाव न घेता ही भाष्यकविता मांडली जाते. ग्रामीण भागातील आणि नवकवींना काव्यसंमेलनात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नानांचे योगदान मोठे आहे. आज अनेक कवी त्यातूनच तयार झाले. साहित्यातील त्यांची ही घोडदौड सुरू असतानाच त्यांचे एकीकडे चित्रपटाचे लेखन सुरू होते. त्यांनी १९७५ साली निर्मिती केलेला ‘सामना’ चित्रपट प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाचे गारूड रसिकांच्या मनावर आहे. त्याचबरोबर सर्कसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांच्या सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार आणि १९७५ साली बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी याची निवड झाली. नंतर सर्वसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली. सर्वसाक्षी चित्रपटाची बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सकासाठी निवड झाली होती. सुर्वंता चित्रपटाला उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५ चा राज्य पुरस्कार आणि १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार मिळाला होता. रामदास फुटाणे यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. ‘फोडणी’ला या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार, गोवा कला अकादमीचा वाक्यहोत्र पुरस्कार मिळाला आहे. रामदास फुटाणे यांना प्रसिध्द कलावंत दादा कोंडके, निळू फुले, भालजी पेंढारकर, विजय तेंडुलकर यांचा सहवास लाभला. प्रत्येकामध्ये असलेले वेगळेपण जवळून अनुभवता आले. भाष्य कविता कशी सुचते हे सांगताना फुटाणे म्हणतात, मी खूप निरीक्षण करतो, सर्व पक्षातील व्यक्तींशी माझी मैत्री आहे. राजकीय व्यक्ती नीट माहिती हवी, महाराष्ट्रातील प्रवाह तुम्हाला माहिती असले पाहिजे. ट ट आणि प प लिहून चालत नाही. भाष्यकवितांमध्ये आशय महत्त्वाचा असतो. विसंगती नेमकी शोधता आली तर उत्तम भाष्यकविता तयार होते. हिंदी कविता ऐकूनच आपण भाष्यकवितांकडे वळालो. कीर्तन ऐकणे, ग्रंथालयात खूप वेळ देणे आणि तर्कशुध्दीने विचार करणे यामुळेच कवितांचा प्रवास करू शकलो असे रामदास फुटाणे सांगतात. रामदास फुटाणे यांच्या कोपरखळया मारणाऱया वात्रटिकां इतक्याच त्यांच्या कविता हृदयाला भिडतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=pZl6pi9dKFc

    "सामना‘ चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo
    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM

      April 14, 2017


  • बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी

    २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. त्यांच्या समालोचना ऐवजी क्रिकेटच्या अज्ञानावरुन व समालोचना दरम्यानच्या तिच्या वेषभूशेमुळे त्या जास्त चर्चिली गेली. मंदिरा काही क्रिकेट एक्सपर्ट नाही. तिला क्रिकेटमधलं काहीही न कळणं हाच तर यूएसपी होता! चारू शर्मासह मंदिरा बेदी सूत्रसंचालक म्हणून दाखल झाल्यावर सुरुवातीला जुन्या जाणत्यांनी नाकं मुरडली होती. पण नंतर प्रत्यक्ष मॅचपेक्षा एक्स्ट्रॉ इनिंगचा टीआरपी वाढू लागला.

      April 15, 2022


  • मराठीतले विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे

    मराठीतले विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचा जन्म १९४५ रोजी झाला. बँकेत नोकरी करणाऱ्या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या जेम्स गुन यांच्या ‘द रोड टू सायन्स फिक्शन’च्या १९८९ च्या आवृत्तीसाठी निवडली गेली.

    आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान कथालेखक होत. ते सोबत साप्ताहिकामध्येच लक्ष्मणझुला नावाचे सदर लिहीत. कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पार्श्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. कथा लिहिण्यासाठी आवश्यक ते पुरेसे ज्ञान जवळ नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे.

    त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पणी करत असत. या टिप्पणीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढे. वैज्ञानिक कथांव्यतिरिक्त त्यांनी चरित्रे आणि ललित कथा-कादंबऱ्याही लिहिल्या. लक्ष्मण लोंढे यांचे ६ ऑगस्ट, २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 6, 2021