डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.
December 28, 2018
विजय मांजरेकरांनी कसोटीत पदार्पण केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे नव्हते. ही उणीव त्यांनी भरून काढली.
September 26, 2021
कमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे. कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केले असले तरी त्यांची खरी ओळख होती ती टाईम्स समूहातील प्रकाशनांसाठी तसेच नाटक, सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेल्या कला दिग्दर्शन व सुलेखनामुळे!
June 22, 2021
सुरुवातीच्या काळातील त्यांच्या ध्वनिमुद्रिकांतील गायनाच्या शेवटी त्यांची ‘सुंदराबाई ऑफ पूना’ अशी उद्घोषणा असे. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांची संख्या सुमारे ७५ (१५० गीते) आहे. या ध्वनिमुद्रिकांच्या विलक्षण खप व लोकप्रियतेमुळे एच.एम.व्ही.ने त्यांना विशेष सुवर्णपदक देऊन गौरविले होते. ‘एरी माँ मोरा मन हर लीनो’ (भीमपलास), ‘अत मन भाये’ (कामोद), ‘तू सांई सब का दाता’ (दुर्गा), ‘कुंजबन में सखी’ (यमन) या ख्यालांच्या ध्वनिमुद्रिका; ‘तुम्ही माझे सावकार’, ‘कठीण बडोद्याची चाकरी’, ‘खूण बाळपणात’, ‘सखे नयन कुरंग’, ‘ऐकुनी दर्द आले डोळ्याला पाणी’, ‘कुठवर पाहू वाट’ अशा खास लावण्या त्यांनी ध्वनिमुद्रिकांसाठी गायल्या. ‘भोळे ते नेत्र खुळे’, ‘देवा मी बाळ तुझे’, ‘तुझ्याविण गोपगोपींना’ अशी भावगीते त्या स्वत: चाली लावून गायल्या.
June 3, 2022
शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!
त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, मा.कुमारजींप्रमाणेच मा.पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. मा.पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता. संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे. कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.
तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य.
कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा! थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे. सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 11, 2017
‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले. ’कुर्यात् सदा टिंगलम्’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक. मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आजपर्यंत २५० चित्रपटात काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
July 12, 2021
संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स हे भारतीय चित्रपट संगीतातील एका गुणी कलाकाराचं नाव. इनॉक डॅनियल्स यांचा जन्म १६ एप्रिल १९३३ रोजी पुणे येथे झाला. वयाच्या नव्वदाव्या वर्षा नंतर देखील ते त्याच तडफेने अकॉर्डियन वाजवतात.
शंकर-जयकिशन, राम कदम, सी. रामचंद्र यांच्यासारख्या अनेक संगीतकारांसोबत इनॉक यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या संगीत संयोजनानाने आणि वादनाने सर्व संगीतकारांना मोहून टाकलं. अप्रतिम गाणी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. पाश्चात्य शास्त्रीय संगीतावर त्यांची कमालीची पकड आहे .
पंचहौद मिशनच्या चर्चसमोर असलेल्या ख्रिस्ती जमातीसाठी बांधलेल्या चाळीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील बेंजो, मोठा भाऊ व्हायोलिन तर दुसरा भाऊ क्लॅरियोनेट वाजवत होते. या सुरिल्या परिवारामध्ये इनॉक यांचा ‘बालपणीचा काळ सुरांचा’ गेला. इनॉक यांच्या वादनाची सुरुवात ड्रमसेटवर झाली. नियतीच्या मर्जीनुसार इनॉक यांच्या नशिबी अॅ्कॉर्डियन होते, पण उपलब्ध असलेल्या वाद्यांत ते नव्हते. त्यांचे वडील ख्रिश्चन बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक होते. चर्च संबंधित असलेल्या युरोपियन फादर यांना वाटले की, हॉस्टेलमधील मुलांना एखादे तरी वाद्य यावे, संगीताची ओळख व्हावी, सुरांची माहिती व्हावी. या उद्देशाने त्यांनी विविध प्रकारची वाद्ये युरोपातून मागवली आणि ती इनॉकला सुवर्णसंधी वाटली; कारण फक्त पाहण्यासाठीही दुर्मिळ असणारी ट्रंपेट- ट्रॉम्बोनसारखी वाद्ये त्याला उपलब्ध झाली. सदर फादर मुलांना आवडेल ते वाद्य शिकवत असत. छोटा इनॉक त्याकडे आसुसून पाहात असे.
युरोपातून एक रेव्हरंड फादर स्लेड पुण्याच्या पंचहौद मिशनमध्ये आले होते. त्यांची मराठी शिकण्याची इच्छा होती. त्यांची आणि इनॉकची चांगली गट्टी जमली. इनॉक यांचे शिक्षण मराठीतूनच झाल्याने त्याच्याकडे मराठीचे ज्ञान होते- आजही ते अस्खलित मराठीतच बोलते- पण इंग्रजी मात्र त्या वेळी चांगले नव्हते. मोडक्यातेडक्या इंग्रजी-मराठीत त्यांचा संवाद चाले. त्यांचा आग्रह होता ‘तुम्ही इंग्रजी बोलू नका. मी मराठीत बोलताना ज्या चुका होतील त्या दाखवा व दुरुस्त करा.’ यामुळे त्यांची चांगली दोस्ती झाली. त्यांना वाटले की, या मुलाला थोडेफार वाजवायला शिकवले पाहिजे. ते उत्कृष्ट पियानोवादक होते. चर्चमध्ये रविवार प्रार्थनेसाठी ऑर्गन असतेच. ऑर्गन व पियानोच्या स्वरपट्टय़ा एकच असतात. रेव्हरंड स्लेडच्या मार्गदर्शनाखाली इनॉकची शिकवणी सुरू झाली. एका वर्षांतच ते ऑर्गन मोठय़ा सफाईने वाजवू लागले. घरीच ऑर्गन असल्याने शिकलेल्या पाठाची उजळणी वेळ मिळेल तेव्हा ते करीत असे. चर्चमधील क्वायर्स, हीम्स आदी प्रार्थना वाजवू लागले.
संगीतातील गायन, हार्मनी, मेलडी हे प्रकार चर्चमध्ये वारंवार वाजवले जातात. प्रख्यात पाश्चात्त्य संगीतकार बिथोवेन, बाख, मोझार्ट यांच्या रचनांचा त्यामध्ये समावेश होते. त्यांचे थोरले बंधू रेल्वेमध्ये नोकरी करीत होते. कानपूर येथे बदली झाली तेव्हा एक अँग्लो-इंडियन परिवार भारत सोडून ऑस्ट्रेलियाला चालले होते. त्यांच्याकडून त्यांचा पियानो स्वस्तात मिळाल्याने आपल्या धाकटय़ा भावासाठी ते रेल्वेने पुण्यास पाठवला. घरचेच वाद्य मिळाल्याने इनॉक चोवीस तास रियाज करून कुशल वादक बनला.
इनॉकने पियानो अॅवकॉर्डियनवर वाजवलेले पहिले गाणे ‘आह’ चित्रपटातील ‘सुनते थे नाम हम..’ होते. खूप धमाल आली. इनॉकला पियानो अॅ कॉर्डियन खूपच आवडले. (ओरिजनल ‘पतिता’, ‘आह’, ‘दाग’ या चित्रपटांतील अॅइकॉर्डियनचे सूर मात्र व्ही. बलसारा याने हार्मोनियमवर काढले होते ही माहिती अनेक संगीतप्रेमींना मनोरंजक वाटेल) दिल्लीमध्ये झालेल्या कॉलेज यूथ फेस्टिवलमध्ये इनॉकच्या वादनाने खूपच प्रसिद्धी मिळवली व वाडिया कॉलेजला पहिले बक्षीस मिळाले. त्यांची ओळख व्हॅन शिप्ले या प्रख्यात हवाईयन गिटारवादकाशी झाली व एक चांगला सुरेल ग्रुप तयार झाला. त्यांचे संयुक्त वादन श्रवणीय होत असे. शिप्ले मेलडी वाजवत असे तर इनॉक हार्मनीने गाणे सुशोभित करीत असे. साथीला स्पॅनिश गिटार व दोन रिदमिस्टही होते. कॉलेजमधून संगीताकडे वाटचाल चालू झाली व अर्थार्जनही सुरू झाले. त्यांच्या कार्यक्रमात लोकप्रिय हिंदी गाणी व ‘कम सप्टेंबर’, ‘लाराज थीम फॉर अ फ्यू मोअर डॉलर’ यांसारखी इंग्रजी गाणीही असत.
आता इनॉकचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण अपरिहार्य होते. पुण्याच्या नवयुग स्टुडियोमध्ये चित्रपट चित्रीकरणाबरोबरच गाण्यांचेही ध्वनिमुद्रण होत असे. सुधीर फडके, वसंत पवार, पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर इनॉकचा परिचय झाला. पु. ल. देशपांडे हे आपल्या ‘गुळाचा गणपती’चे चित्रीकरण व ध्वनिमुद्रण करीत होते. त्यांना अॅ्कॉडयन खूप आवडत होते, कारण पेटीवादनात ते प्रवीण होते. त्यांनी अॅीकॉर्डियन ऐवजी पियानो वाजविण्याची सूचना केली. खरे तर पियानोमध्येच इनॉक प्रवीण होता. त्यांचे पहिले चित्रपटवादन पियानोनेच झाले. राम कदम वसंत पवारचे साहाय्यक होते, पुणे आकाशवाणीवर क्लॅरियोनेट वादक म्हणून कामाला होते. त्यांना इनॉकचे वादन आवडत असे. त्यांनी स्वतंत्र काम मिळाल्यावर इनॉकला संगीत संयोजक नेमण्याचा शब्द दिला. राम कदम यांच्या सर्व चित्रपटांना इनॉकनेच संयोजन केले. वादन हेच अंतिम ध्येय ठेवणाऱ्या इनॉकचे मुंबईला प्रयाण आता अपरिहार्य होते.
१९६०-६१ ला इनॉक यांनी मराठी चित्रपटात वादन व संगीत संयोजनाला प्रारंभ केला. मुंबईत आल्यावर त्याला पहिला हिंदी संगीतात ब्रेक बिपिन-बाबुल यांच्या संगीत संयोजनाने मिळाला आणि ते लोकप्रिय झाला. त्याने संगीतकारांचे लक्ष वेधले. संगीताची प्रचंड आवड असलेल्या श्रोत्यांना अरेंजमेंट तथा संगीत संयोजनाबद्दल कुतूहल नसल्याने संगीत संयोजक यांची योग्य दखल घेतली गेली नाही. संगीतकारांच्या असामान्य प्रतिभेला सुचलेल्या चालींचे सोने संयोजकांनी केले, अगदी तेडीस तेड काम करून गाण्याला भरजरी रूप दिले व त्यांचे सौंदर्य नटवले, खुलवले.
संगीतकार खय्याम यांनी स्वरबद्ध केलेल्या कैफी आजमी यांच्या ‘शगुफ्ता’ अल्बमला इनॉक संयोजक होते. एका गाण्याचे संयोजन इनॉक यांनी इतके अप्रतिम केले की, कलाकार, वादक व ध्वनिमुद्रक सर्वाना ते आवडले. त्यांनी मनापासून दाद दिली.. ध्वनिमुद्रणाच्या वेळी खय्याम नव्हते. त्यांना जेव्हा ती रचना ऐकविली तेव्हा त्यांनी लागलीच इनॉकला रात्रीच फोन केला. ते म्हणाले, ‘डॉन! गाना बहुत अच्छा हुवा है, लेकिन उसमें पोएट्री छूट गयी है। हमें उसकी अरेंजमेंट बदलनी चाहिए, और कल फिर से रेकॉर्ड करेंगे। वैसी ते तुम्हारी अरेंजमेंट गाने से भी बढिम्या हो गई है।..’ त्यानुसार इनॉकने अॅकरेजमेंट बदलून गाणे ध्वनिमुद्रित केले. राम कदम स्वत: वादक असल्याने त्यांच्याबरोबर काम करणे इनॉक यांना सोपे जाई. त्यांची चतुरस्र प्रतिभा रामभाऊ जाणत असल्याने त्याच्या कामात ढवळाढवळ करीत नसत. त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळे. रामभाऊंचा झपाटाही विलक्षण होता. एकेका दिवशी पाच-सहा रचना ते ध्वनिमुद्रित करत. मुंबईच्या स्टुडिओत ध्वनिमुद्रण होत असल्याने पंडित विधाते या तालवादकाला व इतरही कोरस कलावंतांना पुण्यावरून मुंबईला आणीत. मैलाचा दगड असलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.. त्यामागची कहाणी सांगण्यासारखी आहे. गीतकार, संगीतकार व इनॉक यांच्या अलौकिक मेहनतीची कल्पना येते. शांतारामबापूंचा चिकित्सक स्वभाव, रामभाऊंची अथक कार्यशैली. सी. रामचंद्र यांच्या कडे इनॉक यांनी खूप काम केले. शंकर-जयकिशनकडे अॅीकॉर्डियनसाठी गुडी सिरवाई, धीरजकुमार, सुमित मिश्रा यांसारखे वादक असल्याने इनॉक यांनी त्यांच्याकडे मोजकेच काम केले. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे इनॉक यांच्या अॅजकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. त्यांची सुरुवात कशी झाली याचा योगायोगही विलक्षण आहे. १९५५ ते ५७ मध्ये इनॉकने व्हॅन शिप्लेबरोबर आफ्रिकेचे अनेक दौरे केले.. तेथील संगीतप्रेमींना त्या दोघांचे वादन खूपच पसंत होते.. त्या वेळी तलत मेहमूद व सी. एच. आत्मा यांचेही कार्यक्रम होत. जानेवारी १९५७ ला भारतात परतताना इनॉक व शिप्ले भेटले. त्यांची लोकप्रियता आत्मानेही अनुभवली होती. भारतात आल्यावर सी. एच. आत्माने एचएमव्हीचे जनरल मॅनेजर चढ्ढांना इनॉकच्या वादनाच्या तबकडय़ा काढण्याची सूचना केली.. एचएमव्हीने त्यानंतर इनॉकच्या खूप गाण्यांच्या तबकडय़ा काढल्या. त्यांचा अभूतपूर्व खप रसिकांमध्ये झाला. इनॉक संयोजक म्हणून अपरिचित असलेल्या गानरसिकांना अॅणकॉर्डियन वादक इनॉकला मात्र आजही खूप जण ओळखतात. त्याच्या रेकॉर्ड्सही संग्रही आहेत. त्यांची रेकॉर्ड झालेली पहिली धून ‘सोलवा साल’मधील ‘है अपना दिल ते आवारा’ आहे. कानसेनांच्या दुनियेत रेडिओ सिलोनचे नाव अग्रगण्य आहे. त्यावर गोपाल शर्मा, विजयकिशोर दुबे नंतर आले. त्यांनी लोकप्रिय झालेल्या कितीतरी कार्यक्रमांची संकल्पना आखली. त्यामध्येच ‘साज और आवाज’ हा कार्यक्रम आहे.. होता वैशिष्टय़ संगीतकार गायक/वादकांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांनी गायलेली/ वाजवलेली/ संगीत दिलेली गाणी पूर्ण वेळ ऐकवली जातात. १६ एप्रिलला सिलोनने पूर्णवेळ इनॉक यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षांच्या वाढदिवशी रेडिओ सिलोनने इनॉकचे वाद्यसंगीत ऐकवले व त्याचा फोन नंबर दिला. तलत महमूद, व्हॅन शिप्ले व इनॉकचे संयुक्त दौरे आफ्रिकेला झाले. अॅंकॉर्डियनमध्ये ‘गोरे गोरे, ओ बाके छोरे’ वाजवणाऱ्या रेगोला व शंकर-जयकिशनकडे वाजवणाऱ्या गुड्डी सिरवाईला ते गुरुस्थानी मानते.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ विलासदत्त राऊत
इनॉक डॅनियल्स यांची वेबसाईट
http://www.enochdaniels.com/about/
इनॉक डॅनियल्स यांचे वादन
https://www.youtube.com/watch?v=b57Ke-2Is0E
https://www.youtube.com/watch?v=mnZM8ANG2Kc
April 17, 2017
१९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले.
October 19, 2021
आशीर्वाद, घर एक मंदिर, कुटुंब अशा अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटातून शमा देशपांडे यांनी नाव मिळवलं होतं.
May 26, 2022
मराठी संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले.
संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे "मधुवंती व्हायोलिन विद्यालया"चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते, तसेच परीक्षकही होते. संगीत क्षेत्रात सुमारे ४५ वर्षे कार्यरत असलेल्या पंडितांनी ध्वनिफीती, चित्रपट, नाटक, संगीतिका, संगीत नाटक यांसाठी संगीत दिले.
संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे मा.प्रभाकर पंडित नावाजले गेले. याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या "देवाचिये द्वारी'या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा "डबल प्लॅटिनम डिस्क'चा बहुमान मिळवला होता.
मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले. रंग ओलेत्या फुलांचे, मन हा मोगरा, अभंग प्रभात, वृंदावनी वेणु, छंद हा विठ्ठलाचा, भक्तिप्रकाश, झुकझुक गाडी, देव दयानिधी अशा अनेक ध्वनिफितींची उदाहरणे सांगता येतील.
"सुगम संगीताचे सौंदर्य' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते. प्रभाकर पंडित यांचे निधन २८ डिसेंबर २००६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
September 30, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti