(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभिनेते टॉम ऑल्टर

    टॉम ऑल्टर यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

      August 7, 2021


  • हरित क्रांतीचे जनक एमएस. स्वामीनाथन

    भारतीय गरीब शेतकऱ्याच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे झाला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. भारतासारख्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे.

    एम. एस. स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव मन्कोम्बू सांबशिवम स्वामीनाथन होते. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. वडिलांच्या विचारांचा स्वामीनाथांवर पगडा होता. स्वामीनाथन अवघ्या दहा वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. मात्र, पितृविरहाचे दुःख बाजूला ठेवत स्वामीनाथन यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. सुरुवातीला वडिलांप्रमाणे स्वामीनाथनसुद्धा डॉक्टरी शिक्षणाकडे वळले, पण त्यावेळी बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे स्वामीनाथन यांना दुःख झाले. सुरुवातीपासूनच शेती क्षेत्राची आवड असलेल्या सांबशिवम स्वामीनाथन यांनी डॉक्टरी शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर ते शेतकी विषयाकडे वळले.

    १९४४ मध्ये त्रावणकोर विद्यापीठातून ते बी.एससी पदवीधारक झाले. त्यानंतर १९४७ मध्ये कोईंबतूर कृषी महाविद्यालयातून त्यांनी कृषी विषयात बी.एससीची पदवी मिळवली. १९४९ मध्ये स्वामीनाथन यांनी दिल्लीच्या इंडियन ग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमधून विशेष प्रावीण्यासह पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर स्वामीनाथन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले. मात्र, त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला.

    १९५२ मध्ये स्वामीनाथन यांनी केंब्रिजच्या अॅीग्रीकल्चर स्कूलमधून पीएचडी मिळवली. यावेळी त्यांचा संशोधनाचा विषय बटाटा होता. पदवी मिळवल्यानंतर स्वामीनाथन यांनी शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मद्रासच्या कृषी महाविद्यालयात (आताच्या तामिळनाडू कृषी विद्यापीठात) प्रवेश घेतला. येथे त्यांनी कृषी विषयातील पदवी संपादित केली. कृषी क्षेत्रातील अभ्यासाकडे वळण्याविषयी स्वामीनाथन यांनी एक आठवण सांगितली आहे. १९४३ मध्ये केरळ विद्यापीठाचा विद्यार्थी असताना बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळी प्रत्येकजण देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देत होता. बंगालमधील दुष्काळातून प्रेरणा घेत देशातील शेतकर्यांसाठी कार्य करण्याचा विचार करत त्यांनी कृषी क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. अभ्यासात हुशार असलेल्या स्वामीनाथन यांनी अभ्यासासोबतच खूप कष्ट उपसले.

    १९४९ ते ५० या कालावधीत त्यांनी नेदरलँड्स विद्यापीठात अनुवंशशास्त्र विभागाचे युनेस्कोचे फेलो म्हणून काम केले. त्यानंतर १९५२ ते ५३ या कालावधीत त्यांनी अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अनुवंशशास्त्र विभागात संशोधन सहकारी म्हणून काम केले, पण स्वामीनाथन यांना त्यांच्या संशोधन कार्यात मदत होईल, अशा कामाची गरज होती. अशातच आंतरराष्ट्रीय संस्थेत तांदळावर संशोधन करण्याची संधी त्यांना मिळाली. या ठिकाणी त्यांनी तांदळाच्या जपानी आणि भारतीय जातींवर संशोधन केले. त्यानंतर १९६५ मध्ये कोशा येथील एका संस्थेत त्यांना नोकरी मिळाली. येथे त्यांना गव्हाच्या संशोधन कार्याची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर तांदळावरही त्यांचे संशोधन चालूच होते. दरम्यानच्या काळात स्वामीनाथन आणि त्यांच्या सहकार्यां ना त्यावेळी भारतात आलेल्या डॉ. व्होरलॉग यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. व्होरलॉग यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करत डॉ. स्वामीनाथन यांनी गव्हावर संशोधन करत गव्हाचे उत्पन्न वाढविणाऱ्या बियाणांचा शोध लावला. त्यांच्या यशाची माहिती मिळताच १९७१ मध्ये डॉ. व्होरलॉग पुन्हा भारतात आले.

    १९६५ ते ७१ या काळात डॉ. स्वामीनाथन पुसा संस्थेचे संचालक होते. या काळात गव्हावर उत्कृष्ट संशोधन करण्यात आले. या कालावधीत त्यांनी अनेक लेख लिहिले. ज्यामुळे डॉ. स्वामीनाथन आणि पुसा संस्थेची जगाला ओळख झाली. स्वामीनाथन यांनी संशोधन करून निर्माण केलेली गव्हाचे बियाणे उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली येथील शेतकर्यांयना वाटण्यात आली. परिणामी त्या वर्षी भारतात गव्हाचे भरघोस उत्पादन निघाले. भारतीय गरीब शेतकर्यांआच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. हरित क्रांतीनंतर देशात यंत्रांचा वापर करून शेती करण्याचे प्रमाण वाढले.

    ट्रॅक्टर, हार्वेस्टर्स, थ्रेशर्स, डिझेल इंजिन, इलेक्ट्रॉनिक मोटर्स, पम्पिंग सेटच्या मागणीत वाढ झाली. त्याचबरोबर रासायनिक खतं, किटकनाशके यांची सुद्धा मागणी वाढली. यामुळं देशातील औद्योगिक उत्पादन वाढीलाही चालना मिळाली आणि मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळाला. देशातील शेतकर्यांवची दुरवस्था घालवण्यासाठी १८ नोव्हेंबर २००४ मध्ये आयोगाची स्थापना करण्यात आली. डॉ. एम.एस. स्वामीनाथन हे या आयोगाचे अध्यक्ष होते. २००६ पर्यंत या आयोगाद्वारे एकूण ६ अहवाल सादर करण्यात आले आहेत. या अहवालात आयोगाने शेतकर्यां च्या हालाखीची कारणे व त्यावर उपाय सुचविण्यात आले आहेत.

    डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये १९७१ मध्ये सामुदायिक नेतृत्वासाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. तसेच १९६७ मध्ये पद्मश्री, १९७२ मध्ये पद्मभूषण आणि १९८९ मध्ये पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन डॉ. स्वामीनाथन यांना सन्मानित करण्यात आले होते. देशभरातल्या विद्यापीठांच्या २२ डॉक्टरेट मिळणारे डॉ. स्वामीनाथन बहुधा एकमेव संशोधक असावेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021


  • गीतकार आणि शायर शकील बदायूँनी

    ‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत.

    त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक. नुसते समीक्षक नव्हे, तर ‘नातगो’ शायर. (‘नात’ म्हणजे हजरत महंमद यांचे प्रशंसागीत.ते लिहिणारा कवी). वडिलांनी या ‘नन्ना मुन्ना राही’ शकीलला अरबी, फार्सी, ऊदरू, हिंदी सगळ्या भाषा शिकण्यासाठी मौलवी अब्दुल गफार, मौलवी अब्दुल रहमान, बाबू रामचंद्र या त्यावेळच्या ज्ञानवंतांना पाचारण केले होते. त्यातूनच पुढे शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते.

    शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले.

    शकील अहमदचे नाव भारतात चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणार्याा उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे सलग तीन वर्षे (१९६१ ते ६३) फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मा.शकील बदायूँनी यांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शकील बदायूँनी यांची काही गाणी.

    https://www.youtube.com/watch?v=vAF6-xX5-MA

    https://www.youtube.com/watch?v=IQsJt6-8S7w

    https://www.youtube.com/watch?v=q3k_pI8MSbM

      April 20, 2017


  • मे.पुं रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे

    मे.पुं रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. मे.पुं रेगे हे व्यवसायाने 'तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्वविाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो.

    भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते. त्यांनी महाराष्ट्राला कुठलाही नवीन विचार दिला नाही, विचार कसा करावा याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही; पण त्यांनी गंभीर लेखनासोबत ‘विश्वकोश’, ‘नवभारत’ यांचे प्रत्यक्ष काम करून आपल्या चिंतनशील प्रकृतीला क्रियाशीलतेचीही जोड द्यायची असते, या विसाव्या शतकातील ज्ञानपरंपरेचा वारसा सक्षमपणे चालवला.

    मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्वेस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले.

    त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठय़पुस्तकांचेही लेखन केले. ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’, ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘स्वातंत्र्य आणि न्याय’, ‘िहदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे. रेगे यांचे ‘मर्मभेद’ हे संपादित पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. मे.पुं रेगे यांचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 24, 2019


  • सुप्रसिध्द अभिनेता सुनील दत्त

    सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. त्यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी झाला. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकसारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास चार दशकांपर्यंत त्यांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचे व्यक्तीमत्वसुध्दा तशाच पात्रांनी प्रभावित राहिले. फाळणीच्या दरम्यान त्यांचे कुटुंबिय भारतात आले होते. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सोबतच नोकरीसुध्दा केली.

    सुनील यांनी रेडिओ सीलोनमध्ये हिंदी उद्घोषकच्या रुपात काम केले. त्यांनी 'रेल्वे प्लॅटफॉर्म'पासून फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. 'मदर इंडिया' सिनेमाने त्यांच्या करिअरला एक नवीन वळण दिले आहे. सुनील दत्त भारतीय सिनेसृष्टीत अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या सिनेमाची पन्नास ते साठ दशकांमध्ये छाप प्रेक्षकांवर राहिलेली आहे. 'मदर इंडिया'च्या यशानंतर 'साधना', 'सुजाता', 'मुझे जीने दो', 'खानदान', 'पडोसन'सारख्या यशस्वी सिनेमांनी भारतीय प्रेक्षकांमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून त्यांना ओळख निर्माण केली. सुनील दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकथा एखाद्या फिल्मी लव्ह-स्टोरीप्रमाणे आहे. 'मदर इंडिया' सिनेमात सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. एक दिवशी शुटिंगदरम्यान त्यांच्या सेटवर आग लागली. सेटवर लागलेल्या आगीत नर्गिस अडकल्या. ते पाहून सुनील दत्त यांनी आपला जीव धोक्यात टाकून आगीत उडी मारली. या घटनेने सुनील आणि नर्गिस यांना जवळ आणले. त्यानंतर एकमेकांना भेटण्याचे सत्र सुरू झाले आणि दोघे लग्नगाठीत अडकले.

    बी. आर. चोप्रासोबत 'गुमराह', 'वक्त', 'हमराज' सारख्या सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या आयुष्यातील 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात पहिल्यांदा त्यांनी मुलगा संजय दत्तसह काम केले होते. त्यापूर्वी 'क्षत्रिय' आणि 'राकी' सिनेमातसुध्दा दोघांनी एकत्र काम केले परंतु सिनेमातील एकाही दृश्यात ते एकत्र दिसले नाहीत.

    सुनील दत्त यांचे २५ मे २००५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      June 6, 2017


  • व्यंगचित्रकार, चित्रपट समिक्षक श्रीकांत ठाकरे

    श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; मा.श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते,ठाकरे कुटुंबीय म्हणजे कलेच्या प्रांगणात रममाण असणारे, सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेतलेले आणि सृजनशील; अर्थात हे संस्कार प्रबोधनकार मा.ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक आपत्यांवर केले.

    संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे व्हॉयोलीन वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली.

    ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांना मराठी गाण्यांची संधी श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मिळाली. मा.श्रीकांत ठाकरे संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत यामध्ये “अगं पोरी सवाल दर्याला तुफान”, “नको आरती की नको पुष्पमाला”, “तुझे रुप सखे गुलजार”, “प्रभू तू दयाळू”, “शोधीसी मानवा राऊळी मंदिरी” सारखी अवीट भक्ती, भाव आणि कोळी गीतांचा समावेश, मराठी संगीत विश्वात मा.श्रीकांत ठाकरे आणि मा.मोहम्मद रफी ही संगीत-गायक जोडगोळी म्हणजे “कानसेनांसाठी” पर्वणीच आहेत; तसंच “गझल” हा गाण्यांचा प्रकार मा.श्रीकांत ठाकरे यांच्या मुळे मराठीत रुजला. उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, शोभा गुर्टू, पुष्पा पागधरे सारख्या गायकांनी मा.श्रीकांत ठाकरे यांच्या संगीताची सुरेलता वाढवली; “शूरा मी वंदिले”, “सवाई हवालदार”, “महानदीच्या तीरावर” सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील श्रीकांत ठाकरे यांनी केली.

    संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले.

    श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीत्वाचे पैलू आणि चरित्र पट “जसे घडले तसे” या आत्मचरित्राच्या माध्यमातून वाचक आणि रसिकांना वाचायला मिळाला. श्रीकांत ठाकरे यांचे १० डिसेंबर २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / सागर मालाडकर

      June 27, 2017


  • मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे

    आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच. नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे (भरतनाटय़म्, कथ्थक) धडे घेतले. आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत. आईचे मामा अभिनेते प्रकाश इनामदार यांचे वडील आप्पासाहेब इनामदार हे यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही. शांताराम, बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. त्यांच्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय होता. पेंढारकर त्यांच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का? असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर नृत्य करायचे होते. आई-वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून आशा काळे यांनी काम केले. स्वत: बाबुराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते.

    त्यावेळी त्या १४ वर्षांच्या होत्या. त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले. त्यांची नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत. याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक त्यांनी केले आणि या नाटकाने त्यांना ‘ताई’ अशी ओळख मिळाली.

    आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने ‘कलावैभव’, ‘अभिजात’, ‘नाटय़संपदा’, ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे. ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘वर्षांव’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके. ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५, ‘गुंतता हृदय हे’ चे ८७५ प्रयोग त्यांनी केले. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या व्ही. शांताराम, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.

    ‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणतात, दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला. त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता. पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले. दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले. तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते. तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा, ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा. श, स, ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले. या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात, पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला.

    नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणतात, बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते.

    चित्रपट आणि नाटकांधील सोशीक, सहनशील मुलगी, सून, आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली. या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का? यावर त्या म्हणाल्या, हो तसा प्रयत्न केला. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’, ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले. माझे कौतुक झाले. या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरश: जगले. त्या जिवंत केल्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते. आई, ताई, मुलगी, सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पुढे फोटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे चिरंजीव माधव नाईक यांच्याबरोबर आशा काळे यांचा विवाह झाला. माधव नाईक हे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. आशा काळे या सामाजिक कार्य आवडीने करत असतात. त्या अनेक वृद्धाश्रम, मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळा येथे जातात. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटतात. आशा काळे ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    माहेरची माणसे चित्रपट.
    https://www.youtube.com/watch?v=VqdxHNHxRDA
    संसार चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=pbKOK2XH-R8

      November 23, 2018


  • गोमंतकीय कोकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित

    पंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.

      April 6, 2022


  • माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेल्लाई नारायणा ऊर्फ टी एन शेषन

    ९० च्या दशकात त्यांचे निवडणूक आयोगामध्ये इतके वजन होते की ‘भारतीय राजकारणी फक्त दोन गोष्टींना घाबरतात. एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे टी.एन शेषन’ असं त्यांच्या बाबतीत म्हंटल जायचं !

      December 15, 2021


  • जेष्ठ बॉलिवूड, व बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन

    मुनमुन सेन यांचे खरे नाव श्रीमती देव वर्मा आहे. त्यांचा जन्म २८ मार्च १९४८ रोजी कोलकाता येथे झाला.शिलाँग येथील लॉरेंटो स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुनमुन यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली, तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांची कन्या. तर मुनमुन यांच्या मुली रिया सेन आणि रायमा सेन या देखील बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. मा. मुनमुन सेन यांनी आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९८४ मध्ये रिलीज झालेला 'अंदर बाहर' हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी 'मुसाफिर', 'मुहब्बत की कसम', 'जाल', 'शीशा', 'प्यार की जीत', 'माशुका', 'वो फिर आएगी', '100 डेज', 'वक्त के बादशाह', 'जख्मी रूह', 'कुछ तो है', 'अपना देश पराए लोग', 'पत्थर के इंसान', 'बेलगाम' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले. मा.मुनमुन सेन आपल्या काळातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असत. काही सिनेमांमध्ये त्या बिकिनीत झळकल्या आहेत. काही सिनेमांमध्ये त्यांनी बोल्ड सीन्सही दिले आहेत. मुनमुन यांनी आता सिनेसृष्टीला रामराम ठोकला असून त्या सध्या राजकारणात सक्रिय आहेत. मा.मुनमुन सेन या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदार संघातल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुक लढवली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 28, 2017