‘नयन तुझे जादूगार’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मानापमान’ अशा विविध संगीत नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.
मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकीआणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाट्यशास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली त्यांनी ’यशवंतराव होळकर’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाटय़शास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली आलेल्या ‘यशवंतराव होळकर’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नयन तुझे जादूगार’, ‘घनश्यान नयनी आला’, ‘बावनखणी’, ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकांबरोबरच ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत विद्याहरण’, ‘रामराज्य वियोग’, ‘संगीत शारदा’ अशा संगीत नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. नाटकातील अभिनयाबरोबरच संगीत प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभलेले पिळगांवकर आजही नाट्यसंगीताचे धडे देण्यासाठी कुठेही जाण्यास तयार असतात.
संगीत रंगभूमीचा जिताजागता संदर्भकोश असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. १९६४ साली त्यांनी 'मुंबई मराठी साहित्य संघा'च्या 'यशवंतराव होळकर' या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतरचे त्यांचे महत्त्वाचे नाटक म्हणजे 'वासवदत्ता'. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या 'नयन तुझे जादूगार' आणि'घनश्याम नयनी आला' या दोन्ही संगीत नाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका केल्या 'नयन तुझे जादूगार' मधील 'उडुनी जा पाखरा' हे त्यांचे पद अतिशय लोकप्रिय झाले होते. 'साहित्य संघा'च्याच 'धाडिला राम तिने का वनी' या नाटकात त्यांनी भरताची भूमिका अप्रतिमपणे साकारली होती. त्यातील 'कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला' हे पद ते सुरेख सादर करीत.
'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानापमान', 'शारदा', 'स्वयंवर', 'विद्याहरण', 'कान्होपात्रा' या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. 'सौभद्रा'त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. 'मानापमाना'त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. 'कान्होपात्रा'त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या. त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणजे ते विचारपूर्वक अर्थानुरूप गाणे पेश करत. गाण्यातील भाव उठावदार करत. 'कान्होपात्रा'तील 'जोहार मायबाप' या गाजलेल्या पदाच्या चालीत त्यांनी किंचित बदल करून त्यातील भाव ठळक केले होते. त्यांनी पं. के. डी. जावकर यांच्याकडे प्रथम संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचा सहवास त्यांना लाभला.
अभिषेकीबुवांना ते तंबोऱ्यावर साथ करीत. पं. गोविंदराव अग्नी हेही त्यांचे संगीतातले गुरू होते. अभिनयाचे पाठ मात्र त्यांनी दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या कडून घेतले. मामा वरेरकरांचे 'हाच मुलाचा बाप', विद्याधर गोखले यांचे 'बावनखणी' अशा वेगळ्या प्रकृतीच्या नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. परंतु रंगभूमीवरच्या अशा प्रत्यक्ष कामगिरीबरोबरच त्यांनी या रंगभूमीच्या प्रसाराचे काम अनेक प्रकारे केले. वृत्तपत्रांतून त्यांनी या रंगभूमीविषयी लेखन केले. 'सौभद्र' आणि 'कान्होपात्रा' या नाटकांच्या संकलित आवृत्त्या तयार केल्या. 'साहित्य संघ' आणि 'विद्याधर गोखले प्रतिष्ठान' या संस्थांतर्फे नाट्यसंगीत शिक्षणाचे मोलाचे काम त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 2, 2017
बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले.
September 5, 2021
अलेक्झांडर मेलविले आणि एलिझा सायमंड्स बेल हे त्यांचे आई वडील. त्यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी स्कॉटलंडच्या एडीनबर्गमध्ये येथे झाला. अगदी लहान असल्यापासूनच ग्रॅहम बेलनी विविध प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प हा गव्हापासून त्याचा भुसा वेगळा करण्यासंदर्भातील होता. पण त्यांना आवाजाबाबत विशेष प्रेम होते. तोंडातून बाहेर पडणारा आणि कानाला ऐकू येणारा आवाज याबाबत बेल यांना प्रचंड आकर्षण होते. वडीलांनी दिलेल्या प्रेरणेतून त्यांनी भाऊ मेलविले याच्यासह टॉकिंग मशीन तयार करण्याचा प्रयत्नही केला होता. यात त्यांना यश आले आणि नाही आले असेही म्हणता येईल. कारण हा प्रोजेक्ट मागे पडला. पण त्यानंतर बेल यांनी जो शोध लावला त्या जोरावर आज संपूर्ण जगाने कुठल्या कुठे मजल मारली आहे. हा शोध म्हणजे टेलिफोनचा. हेही एक टॉकिंग मशीनच म्हणायला हवे ना.
वयाच्या ११ व्या वर्षी अलेक्झांडर बेल यांनी ग्रॅहम हे नाव धारण केले. तेव्हा ते बनले अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांचीही पहिली नावे अलेक्झांडर अशीच होती. त्यामुळे या नावाचा कंटाळा आल्याने त्यांनी हे नाव निवडले होते. त्यांच्या वडिलांच्या एका विद्यार्थ्याचे नाव अलेक्झांडर ग्रॅहम असे होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावात ग्रॅहम अॅड केले. बेल हे रिंगशी संबंधित असल्याने त्यांनी ते तसेच ठेवले असेल. पण काहीही असले तरी त्यांच्या कुटुंबासाठी मात्र कायम अॅलेस किंवा अॅलेक हेच त्यांचे नाव होते.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ग्रॅहम बेल यांनी एका मुलांच्या निवासी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या वडिलांनी व्हिजिबल स्पीच ही पद्धत तयार केली होती.
एखादा शब्द तयार होण्यासाठी आवाज कसे तयार होतात त्यासाठी ओठांच्या हालचाली कशा होतात, याचा त्यात समावेश होता. हीच पद्धत बेल यांनी कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी आणि त्यांचे उच्चार अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरली. त्यांनी स्वतःच्या काही पद्धतीही तयार केल्या. त्यांच्या आईला कमी ऐकू येत होते. त्यामुळे ते लहानपणीपासूनच आईशी वेगळ्या प्रकारे बोलायचे. कर्णबधीर मुलांना शिकवण्यात त्यांनी अगदी प्रावीण्य मिळवले होते.
ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनच्या शोधासाठी अनेक वर्षे संशोधन केले. त्या जोरावर त्यांनी १४ फेब्रुवारी १८७६ रोजी पेटंटसाठी अर्ज दिला. त्याच दिवशी एलिशा ग्रे यांच्यासाठी काम करणाऱ्या एका वकिलानेही अशाच संशोधनासाठी अर्ज सादर केला. बेल यांनी वडिलांना लिहिलेल्या पत्रानुसार कोणीतरी आपल्या सारखाच शोध लावत असल्याचा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अर्ज केला होता. त्यामुळे काही तासांच्या फरकामुळे बेल यांना या शोधाचे क्रेडीट मिळू शकले. मार्च १८७६ मध्ये बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले. त्यांनी सासरे गार्डीनर ग्रीन हबर्ड यांच्या मदतीने बेल टेलिफोन कंपनीची सुरुवात केली. त्यात गुंतवणूकदारांमध्ये बेल यांचे स्पर्धक एलिशा ग्रे यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादही झाला होता.
बेल यांनी फोटोफोनचा शोधही लावला. त्यात प्रकाशाला आवाजामध्ये परावर्तीत करण्यात येत होते.
बेल यांच्यामते त्यांच्या महत्त्वाच्या शोधापैकी हा एक होता. त्यांना मिळालेल्या गिफ्टचा वापरही ते शोध लावण्यासाठी करायचे. आपल्या समस्या सोडवताना ते नवीन शोधाची निर्मिती करायचे. स्वतःच्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर त्यांनी मेटल व्हॅक्क्यूम जॅकेट तयार केले. त्यामुळे श्वासोछ्च्वासाला मदत होत होती. याच कल्पनेतून पुढे पोलिओच्या रुग्णांच्या उपचारात कामी येणारे उपकरण तयार केले गेले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्यावर १८८१ मध्ये हल्ला झाला त्यावेळी ग्रॅहम बेल यांची मदत घेण्यात आली होती. शरिरात गोळी कुठे आहे हे शोधण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेट मशिन वापरले होते. गारफिल्ड यांना वाचवण्यात यश आले नाही. मात्र याच मशीनमध्ये सुधारणा करून सध्याच्या मेटल डिटेक्टरचा शोध लावण्यात आला होता.
ग्रॅहम बेल यांनी १८९० मध्ये पंतंगांच्या मदतीने काही प्रयोग सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी काही खास इमारती खरेदी केल्या होत्या. अनेक प्रयोग केल्यानतंर बऱ्याच संशोधनानंतर बेल यांनी टेट्राहेड्रोन तंत्रावर आधारित एक खास पतंगाचे डिझाइन तयार केले होते.
१९०७ मध्ये त्यांनी एरियल एक्सप्रिमेंट असोसीएशनची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी काही फ्लाइंग मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यातील सर्वात यशस्वी ठरले ते सिल्व्हर डार्ट. हेच सिल्व्हर डार्ट पुढे कॅनडामध्ये पॉवर्ड फ्लाइटमध्ये वापरले गेले.
अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचे २ ऑगस्ट १९२२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 2, 2021
"कल हो ना हो '," कुछ कुछ होता है' यश जोहर,या ब्लॉकबस्टर चित्रपटचे निर्माते म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. त्याच्या चित्रपटात भव्य सेट्स आणि विदेशी ठिकाणी शुटींग केलेले चित्रपट ही त्याची खासियत होती. १९७७ साली यश जोहर यांनी त्यांच्या स्वत:च्या नावाने धर्म प्रॉडक्शन ही कंपनी सुरू केली. १९८० ते १९९० मध्ये त्यांनी अग्निपथ, सारखे चित्रपट दिले.
यश जोहर यांचे २६ जुन २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 6, 2017
लातूर येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०११ या काळात झालेल्या ४ थ्या राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष राहिले होते.
June 15, 2022
त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.
March 15, 2022
रंगभूमी असो किंवा समांतर सिनेमा, टीव्ही, बॉलिवूड, हॉलिवूडचा पडदा; भूमिका दहा मिनिटांची असो किंवा नायकाची; ती अजरामर करण्याची ताकद ओम पुरी यांच्याकडे होती. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाना मधील अंबाला येथे झाला. चेहरा देखणा नव्हता, पण दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज, या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. विशेष म्हणजे, या झंझावाती प्रवासाची सुरुवात १९७६ मध्ये एका मराठी सिनेमापासून - 'घाशीराम कोतवाल'पासून झाली होती. या सिनेमात घाशीरामची मध्यवर्ती भूमिका साकारल्यानंतर, अगदी गेल्या वर्षीपर्यंत त्यांची घोडदौड सुरू होती.
पंजाबमधील पटियाला येथून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले होते. नंतर १९७६ मध्ये त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एका स्टुडिओमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी 'मजमा' या खासगी नाट्यमंडळाची स्थापना केली. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या आक्रोश चित्रपटातून पुरी यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.
'घाशीराम कोतवाल' या मराठी चित्रपटातील घाशीराम, 'आक्रोश'मधील लहान्या भिकू, 'अर्धसत्य'मधील अनंत वेलणकर, 'घायल'मधील एसीपी जॉय डिसोझा, 'नरसिंह'मधील सूरज नारायण सिंह बापजी, 'माचिस'मधील सनातन, 'चाची ४२०'मधील बनवारीलाल, 'हेराफेरी'मधील खडकसिंग, 'रंग दे बसंती'मधील अमानुल्ला खान, 'दबंग'मधील पोलीस इन्स्पेक्टर या सगळ्या बहुरंगी-बहुढंगी, नायकी-खलनायकी-विनोदी भूमिका अत्यंत ताकदीनं साकारणारे ओम पुरी यांनी 'आरोहण' आणि 'अर्धसत्य'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल १९९० मध्ये त्यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलं होते. फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. ब्रिटिश सिनेसृष्टीतील कसदार कामगिरीबद्दल त्यांना मानद 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' ही पदवीही प्रदान करण्यात आली होती. ब्रिटिश विनोदी चित्रपट 'ईस्ट इज ईस्ट'मधील भूमिकेसाठी त्यांना बाफ्टा पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. रिचर्ड अॅटनबरो यांच्या गांधीमध्ये ओम पुरी हे पाहुणे कलाकार होते. सन ऑफ फॅनेटिक, सिटी ऑफ जॉय, वुल्फ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांचंही प्रचंड कौतुक झालं होते.
ओम पुरी यांच्या विनोदी अभिनेत्याचं दर्शन घडलं होतं ते, काक्काजी कहीं आणि मिस्टर योगी या टीव्ही मालिकांमधून. त्यानंतर गोविंद निहलानी यांच्या 'तमस'मधील भूमिकेनं त्यांना दिग्गजांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. दूरदर्शनवरील 'भारत एक खोज' या कार्यक्रमातील त्यांचा आवाज आजही अनेकांच्या कानात तसाच कायम आहे. 'द जंगल बुक' या चित्रपटातील 'बघीरा'ला ओम पुरी यांनीच आवाज दिला होता. ओम पुरी यांचे निधन ६ जानेवारी २०१७ झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
November 2, 2017
स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखकनी तू विमला’, ‘पद्ममनाथा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली. सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-thinkmaharashtara
सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराया गं माझा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखकनी तू विमला’
‘पद्ममनाथा नारायणा’
January 18, 2018
रत्नागिरीतील प्रसिद्ध संगीतकार आंनद उर्फ सुनिल शामराव प्रभूदेसाई यांनी संगीतातील एम.ए. पदवी प्राप्त केली होती. त्यांना संगीत तज्ज्ञ डॉ. भारती वैशंपायन व अरूण तसचे मुंबईतील डॉ. अशोक रानडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. याचबरोबर नाट्यसंगीत अभिनयाबाबत जयमाला शिलेदार-पुणे यांच्याकडून त्यांना धडे मिळाले होते.
July 25, 2019
रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच जनसंघाची पताका फडकावणारी राम कृष्णाची जोडी होती ती आणीबाणीमध्ये फुटली (कृष्णराव भेगडे व रामभाऊ म्हाळगी ) कृष्णराव भेगडे कॉंग्रेस मध्ये गेले परंतु रामभाऊ अखेर पर्यंत जनसंघ– जनता पक्ष व शेवटी भाजपात राहिले त्यांचे साधी राहणीमान व नवीन उप्रकमाची शैली यामुळे ते राजकारणात आघाडीवर राहिले.
March 15, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti