(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले

    अण्णासाहेब हि कंपनी सुरु करण्यासाठी तयार झाले मात्र त्यापूर्वी त्यांनी १९१० ते १९१२ पर्यंत या इन्शुरन्स व्यवसायांवरील पुस्तके अमेरिकेतून मागवून त्यांचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांचे मित्र वामनराव गोवईकर यांनी त्या काळी पंचवीस हजार रुपयांचे रोखे कंपनीस दिले. त्या बळावर कंपनी मुंबईस रजिस्टर झाली आणि मगच १९१३ सातारा शहरात ‘वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी’ची (विलिको) अस्तित्वात आली.

      June 4, 2022


  • संगीतकार चित्रगुप्त

    अर्थशास्त्र आणि जर्नालिझम मध्ये एम.ए केलेले व पाटण्यात करीत असलेली प्राध्यापकी सोडुन मुंबईला संगीताला वाहून घेण्यासाठी चित्रगुप्त यांचे पुर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.

    काही काळ एस. एन. त्रिपाठी यांचे सहाय्यक म्हणून काम केले. चित्रगुप्त यांनी आपली सांगितिक वाटचाल ब्रम्हचारी या नावानं सुरु केली होती. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. एव्हीएम ह्य़ा साऊथच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत देऊन लता, रफी, आशा, तलत, मुकेश व मन्नाडे इ. गायकांकडून सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमा मिळाले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट त्यांना मिळाला नाही. अस्सल हिंदुस्थानी संगीताची बैठक असलेलं चित्रगुप्त यांचं संगीत लोकप्रिय झालं खरं, पण ते ‘ए’ ग्रेडचे संगीतकार बाकी कधीच होऊ शकले नाहीत. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या गाण्यावर अतिशय खूश होते. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत. अगदी भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर नायिका कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी ह्य़ा होत्या. खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. ८२८ गाणी दिली. त्यातील लता मंगेशकर (२४८), महंमद रफी (२६०), आशा भोसले (२३२) यांच्याकडून गाऊन घेतली. त्यांनी एकूण ६९ चित्रपटाना संगीत दिले. मा.चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून अतिशय सुंदर गाणी लिहून घेतली. चित्रपटांना संगीत देताना शास्त्रीय संगीतापासुन पाश्चीमात्य संगीता पर्यन्त सगळ्याचा वापर केला. भारतीय वाद्यांचा प्रभावी वापर ही त्या काळातल्या सगळ्याच संगीतकारांची खासियत चित्रगुप्त यांच्या रचनांमध्येही दिसून येत असे. ठेक्याची गाणी हे संगीतकार चित्रगुप्त यांच्या संगीताचं एक प्रमुख वैशिष्ट्य. रोमँटीक युगलगीते ही खासीयत होती. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व ह्य़ा कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली. तलत मेहमुदसारख्या गायकाकडुन आशाजींच्या बरोबर गायलेले "दो दिल धडक रहे है और आवाज एक है" असो वा मुकेश आणि लतादिदींनी गायलेले "देखो मौसम क्या बहार है" अथवा "तुमने हसी ही हसी में क्यू दिल चुराया जवाब दो" हे लतादिदीनी महेंद्र कपुर सोबत गायले गीत असो या युगलगीतात रोमँटीझम दिसतो. मालकंस रागातल्या ‘अखियन संग अखियां लागे आज’ या रचनेत चित्रगुप्त संगीतकार म्हणून जान ओतली होती. ‘पतंग’ मधलं ‘रंग दिल की धडकन भी लाती तो होगी’ असंच मजा आणून गेले. ‘एक रात’ मधलं मारुबिहाग रागावर आधारित ‘पायलवाली देखना’ मा.चित्रगुप्त यांच्या अशा एका पेक्षा एक रचनांनी रसिकांना वेडे केले होते. हिंदीत काम करीत असतानाच त्यांनी भोजपुरी सिनेमांनासुद्धा संगीत दिले. तीथे त्यांचा रूबाब राजासारखा होता. त्याच प्रमाणे काही पंजाबी आणि गुजराथी सिनेमांबरोबर A.V.M.ने तमीळमधे डब केलेल्या चित्रपटांनासुध्दा संगीत दिले. चित्रगुप्त यांची मुले आनंद-मिलिंद हे सुद्धा नावाजलेले संगीतकार आहेत. चित्रगुप्त यांचे १४ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 14, 2019


  • चित्रपट निर्माते गुलशन कुमार

    लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. त्यांचा जन्म ५ मे १९५१ रोजी झाला. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला. ते २३ वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.

    गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रिज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला.

    देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते. ७० च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले. ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.

    फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या कमाईचा एक हिस्सा सामाजिक कामासाठी देण्यास सुरुवात केली. वैष्णोदेवीचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भंडारा सुरु केला होता. आजही तो भंडारा अविरत सुरु आहे. या भंडाऱ्याच्या माध्यमातून भक्तांना मोफत भोजन दिले जाते गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवीची अनेक गाणी गायली आहेत. गुलशन कुमार यांचे १२ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      August 12, 2017


  • प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर

    शाळेत असताना त्यांना क्रिकेटची खूप आवड होती तशी नाटकांचीपण आवड होती. ते उत्तम लेग स्पिनर होते , उत्तम फलंदाजही होते. कॉलजमध्ये गेल्यावर त्यांना वाटले कॉलजमध्येपण क्रिकेट खेळता येईल. परंतु त्यावेळी त्यांना नाटकांच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्यात त्यांना बक्षीस मिळाले. त्याच्या मते त्यांच्या आयुष्यात हाच एक टर्नीग पॉईंट ठरला की ते क्रिकेटकडून अभिनयाकडे वळले. डिग्री मिळण्याच्या आधीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांनी सुमारे १५० एकांकिकांमधून काम केले ५० च्या वर नाटके केली.

      July 14, 2021


  • विद्रोही कवी तुळसी परब

    ‘हिल्लोळ’, ‘धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता’, ‘कुबडा नार्सिसस’आणि ‘हृद’ हे त्यांचे चार कविता संग्रह आहेत.

      July 5, 2022


  • श्री विद्या प्रकाशनचे दामोदर दिनकर कुलकर्णी

    १९६८ मध्ये श्री विद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. ‘वाळवंटातील चंद्रकोर’ हे त्यांचे पहिले प्रकाशन. ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके प्रकाशित केली.

      October 23, 2021


  • संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

    अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला.

      October 7, 2017


  • उद्योगपती संजीव गोएंका

    संजीव हे इंडियन सुपर लीगमधील एटीके फुटबॉल क्लबचे मालक आहे. २००९-२०१० मध्ये त्यांची ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. याशिवाय ते IIT खरगपूरचे अध्यक्ष देखील आहेत. २००१ मध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष होते. सर्वात तरूण वयात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती.

      January 29, 2022


  • भाजप’चे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे

    कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४ थे अध्यक्ष तसंच या पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. कुशाभाऊ ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १९४२ पासून निगडित होते.

      January 22, 2019


  • हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा

    १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

      April 15, 2019