नलिनी जयवंत यांचे शिक्षण प्रार्थना समाजाच्या राममोहन शाळेत झाले. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला. लहान पणी नलिनी जयवंत यांचा डान्स हे राममोहन शाळेच्या वार्षकि स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे आकर्षण असे. नामांकित लोक तो पाहायला येत. तिच्या या डान्सला भाळूनच वीरेन्द्र देसाईंनी केवळ चौदा वर्षांच्या नलिनीला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. नलिनी आणि विजया जयवंत (मेहता) विद्यार्थी भवनमध्ये राहात होत्या. "राधिका' या १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दिला सुरुवात करणाऱ्या नलिनी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कसदार अभिनयामुळे त्यांना अशोक कुमार, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करता आले. दिलीपकुमार, नर्गीस यांच्यासोबत "अनोखा प्यार'मध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने चित्रपट रसिकांची वाहवा मिळविली होती.
नलिनी यांनी निर्देशक वीरेन्द्र देसाई यांच्या बरोबर १९४० मध्ये विवाह केला. हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत यांनी १९४१ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या नंतर नलिनी जयवंत यांच्या कारकिर्दीला ‘अनोखा प्यार’ (१९४८) चित्रपटापासून वेग आला. १९६५ सालचा ‘बॉम्बे रेस’ हा प्रमुख भूमिका असलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. मा.अशोककुमार यांच्या सोबत केलेले "समाधी', "सरगम", "मिस्टर एक्सल', "काफिला', "मुकद्दर' हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. देवानंदसोबत केलेल्या "कालापानी' या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. बहन ,जलपरी, शिकस्त, जादू, महबूबा, राजकन्या, रेल्वे प्लॅटफॉर्म, सलोनी, बॉम्बे रेसकोर्स या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यावेळच्या हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीच्या नायिकामध्ये त्यांची गणना होत होती. फिल्मफेअरनेच १९५० मध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात त्याकाळात हिंदी सिनेसृष्टीत असलेल्या सर्वात सुंदर नायिकेचा मान दिला होता. १९८३ मध्ये ‘नास्तिक’ चित्रपटात अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत त्यांचे रूपेरी पडद्यावर अखेरचे दर्शन झाले.
नलिनी जयवंत यांचे निधन २० डिसेंबर २०१० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 20, 2017
मुकुंद संगोराम यांनी मुकुल शिवपुत्र यांच्या वर लिहिलेला लेख
March 27, 2017
गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं १८ वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला.
February 9, 2022
बासरी म्हटले की प्रथम पं. हरिप्रसाद चौरासिया हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. बांबूपासून बनविलेली बासरी हे वाद्य साधे वाटत असले तरी ते पंडित चौरसियांच्या हाती आल्यावर ते रसिकांना खिळवून ठेवणारे वाद्य बनते. या साधनेमुळे पंडित चौरसिया यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे.
July 1, 2017
त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबऱ्या लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले आणि चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाशी स्पर्धा असताना, त्याला सर्वोत्कृष्ट कथेसाठी ऑस्कर एवॉर्ड मिळाला.
January 31, 2022
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म १२ मार्च १९११ रोजी गोव्यातील पेडणे (पणजी) येथे झाला.
गोमंतकाचे भाग्यविधाते दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री व एक उद्योगपती. भाऊसाहेब बांदोडकर हे लोकशाही प्रणालीची तत्त्वे मानणारे नेते होते. त्यामुळेच त्यांनी अजूनही गोमंतकीयांच्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे. ते गोव्यातील उद्योगपती होते (मँगेनिझ खान मालक) अत्यंत दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती.
भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म गोव्यातील पेडणे (पणजी) येथे सामान्य घराण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच आई-वडील वारले. प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे. पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही शालेय जीवनातच त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केल्या. जुजबी शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यावसाय वाढविला व पुढे खाणमालक म्हणून नावलौकिक व विपुल धन मिळविले. त्यांचा विवाह सुशिलाबाई लक्ष्मण पेडणेकर या एका व्यापाऱ्या च्या मुलीशी झाला. त्यांचे सासरचे नाव सुनंदा. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाने बांदोडकरांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले. तरुणपणी रॉयवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता. त्यातूनच तरूणवर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनास चालना मिळाली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेऊन अनेक भूमिगतांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले आणि खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केला; ग्रामीण भागात मराठी शाळा चालाव्यात म्हणून मदत केली. त्यामुळे त्यांना १९५६ साली तीन महिने तुरूंगवास भोगावा लागला.
११ डिसेंबर १९६२ रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केले. तेव्हा बांदोडकरांनी स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. गोवा महाष्ट्रात विलीन करावा, या माताचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव करून १९६३ च्या डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३० पैकी १४ जागा मिळविल्या. तीन अपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमत सिद्ध करून मंत्रिमंडळाची मागणी केली आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन केले. बांदोडकरांनी निवडणूक लढविली नव्हती; पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन व समाजकल्याण ही खाती होती. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, हे होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनतेचे मत वळविण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतीविषयक सुधारणा आणि समाजकल्याण हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले. केंद्राने गोव्याच्या बाबतीत जनमताचा कौल घेण्याचे ठरविले.
कौल निःपक्षपाती वातावरणात पार पाडावा, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोव्यात सहा महिने राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. या दरम्यान बांदोडकरांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून खोड्यापाड्यांतून दौरे काढून प्रचार केला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवावा, की महाराष्ट्रात विलीन करावा, या प्रश्नांवर ३ जानेवारी १९६७ रोजी सार्वमत घेण्यात आले. सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला. गोव्याचे महाराष्ट्राशी मीलन व्हावे हे त्यांचे स्वप्न सार्वमतातील पराभवामुळे भंगले असले तरी त्यांनी हार न मानता निवडणूक जिंकून महाराष्ट्राशी गोव्याचे सांस्कृतिक संबंध वाढवून बळकट तर केलेच पण मराठी ही गोव्याची राजभाषा करणारा ठराव असेंब्लीत संमत करून घेतला.
त्यानंतरच्या एप्रिल १९६७ च्या निवडणुकीत बांदोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे बहुमताने निवडून आले व गोव्याचे दुसऱ्यांभदा मुख्यमंत्री झाले. बांदोडकरांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत गोव्यात अनेक सुधारणा केल्या. गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून त्यांनी अनेक योजना व कार्यक्रम राबविले; शेती व मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले; गोव्यातील उद्योजकांना चालना दिली; ग्रामिण शिक्षणाबरोबर त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले; तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला; साहित्य-कला आदींना उत्तेजन देण्यासाठी गोव्यात कला अकादमीची स्थापना केली; अनेक शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.
गोवा प्रवाशांचे आकर्षण ठरावे म्हणून अनेक योजना त्यांनी कार्यवाहीत आणल्या. कोणत्याही विधायक सामाजिक कार्याला सढळ हाताने मदत करण्यात ते अग्रेसर होते. थोर दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. गोरगरिबांचे प्रश्न ते जातीने लक्ष घालून सोडवीत. क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांना शशिकला, उषा, क्रांती व ज्योती ह्या चार मुली असून सिद्धार्थ बांदोडकर हा मुलगा होता. सिद्धार्थचे तरुणवयात निधन झाले. लीना चंदावरकरचा पहिला नवरा सिद्धार्थ बांदोडकर होता. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी शशिकला काकोडकर ह्या गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या आधी बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात त्या एक सदस्य होत्या.
गोव्याची कला अकादमी ही पु. ल. देशपांडे आणि दामू केंकरे यांच्या संकल्पनेतून व त्या काळातील मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुढाकारामुळे उभी राहिली. आधी ती नाट्य अकादमी होती व नंतर ती कला अकादमी झाली.
भाऊसाहेब बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट १९७३ निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 12, 2022
साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. जेमिनी गणेशन यांची मुलगी अभिनेत्री रेखा.१९५७ साली त्यांनी 'मिस मेरी' या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते.
त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यांनी 'देवता', 'राज तिलक', 'नजराना' या सिनेमांमध्ये अभिनय केला. जेमिनी गणेशन यांचे २२ मार्च, २००५ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 17, 2018
आपल्या सरल, सुस्पष्ट, सुमधुर निवेदन शैलीतून, सलग 41 वर्षे चालणाऱ्या गीतमालेतून भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमी श्रोत्यांना एका सुरेल सूत्रात बांधून ठेवणारे सदाबहार आवाजाचे रेडिओसाथी अमीन सयानी 21 डिसेंबर या दिवशी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही कार्यमग्न असणाऱ्या अमीन सयानींच्या कार्याची, जीवनाची झलक, श्रोत्यांच्या शुभेच्छांसह...
"भाईयों और बहनों‘ अशी अकृत्रिम स्वरात साद घालत, "अगले बुध की शाम फिर मिलेंगे‘ असा वादा करत "अगले पायदान‘पर असणारं गाणं कोणतं असा सवाल करत अमीन सयानी आपल्याला भेटत राहिले. आणि आपण चित्रपट संगीताच्या सोनेरी कालखंडात मुक्तपणे विहार करीत राहिलो. दूरदर्शन तर दूरच, पण त्याचा अभाव जाणवू न देणारं श्रवण आणि संवाद इतका उत्कट होता की ध्वनिलहरींनी मनाचं अवकाशही भरून राहिलं. संवादक, निवेदक, सूत्रधार अमीन सयानी आपल्या बालपणीचे जणू सवंगडी, दर बुधवारी भेटणारे मित्र आता ऐंशी वर्षांचे होत आहेत यावर विश्वा्स ठेवणं कठीण गेलं. आवडती "बिनाका गीतमाला‘ 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू होऊन आज साठीची झाली हेही खरं वाटेना.
गीतमालेची जन्मकथा सांगताना ते म्हणतात, ""साल 1952. एका तरुण ब्रॉडकास्टरला सांगण्यात आलं होतं की, एक प्रायोगिक तत्त्वावर गीतमालेचा कार्यक्रम लिहावा, सादर करावा, श्रोत्यांना उत्तरंही द्यावी, त्याचं मानधन रुपये पंचवीस प्रत्येक आठवड्याचे मिळतील.‘‘ तो तरुण ब्रॉडकास्टर मीच होतो... कार्यक्रम तयार केला. बुधवार 3 डिसेंबर 1952 रोजी रेडिओ सिलोनवरून रात्री 8 ते 8.30 या वेळात प्रसारित झाला आणि थेट श्रोत्यांच्या हृदयात पोचला. पहिल्याच आठवड्यात श्रोत्यांची 9000 पत्रं आली, नंतर 15000 आणि आकडा वाढतच गेला...‘ रेडिओ सिलोनचा ट्रान्समीटर अत्यंत प्रभावशाली असल्याने त्याचं प्रसारण दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आफ्रिका येथे सर्वदूर स्पष्ट ऐकू येई. कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी वाढली की, 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता एप्रिल 1994 रोजी झाली. 41 वर्ष गीतमाला चालली. हा एक विश्वाविक्रमच होता.
रेडिओ सिलोनच्या प्रभावी ट्रान्समीटर इतकाच प्रभावी, आकर्षक निवेदन शैलीचा, विशीचा युवा निवेदक एक इतिहास घडवीत होता. चित्रपट संगीताचं सुवर्णयुग तर उगवलं होतंच. नवे चित्रपट, तारे, तारकाही अवतरत होते. अमीन सयानी एका प्रभावी, परिणामकारक संवादशैलीतून अवघ्या भारतातल्या तरुणाईला बोलावीत होते, त्यांच्याशी साध्या, सरल हिंदीतून बात करीत होते. कोणताही भारतीय एकात्मता साधण्याचा तो राष्ट्रीय सरकारी कार्यक्रम नव्हता की हिंदी भाषेची प्रसारसभा नव्हती. आपलं उत्पादन विकणाऱ्या कंपनीसाठी तो एक व्यावसायिक कार्यक्रम होता, पण त्यात अमीन सयानींनी असे प्राण ओतले की एक पिढी हिंदी बोलू लागली, नव्हे हिंदी फार सोपी भाषा आहे. हे त्यातून भारतात कुठेही संचार शक्यल आहे, हे समजलं. या सोप्या भाषेचं श्रेय ते आपले वडील बंधू-गुरू व निवेदक हमीद सयानींना आणि म. गांधींच्या अनुयायी असलेल्या आपल्या मातोश्री कुलसुम सयानी यांना देतात.
आई-वडिलांची दोन्ही घराण्यांची पार्श्विभूमी डॉक्टधर, समाज सेवकांची. 21 डिसेंबर 1932 रोजी कच्छी खोजा मुस्लिम घरात जन्मलेल्या अमीन सयानींचे वडील डॉक्टभर, आईचे वडील डॉ. रजबअली पटेल, महात्मा गांधींचे निकटवर्ती, मौलाना अबुल कलाम आझादांचे मित्र. दोन्ही कुटुंबं पुरोगामी विचारांची, शिक्षणाला महत्त्व देणारी. महात्माजींच्या आदेशानुसार कुलसुम सयानींनी प्रौढ शिक्षणाचं कार्य हाती घेतलेलं. 40 वर्षांपासून त्या "रहबर‘ (पथदर्शक) हे पाक्षिक चालवीत. हिंदी, ऊर्दू आणि गुजराती भाषा व लिपीतून. वयाच्या तेराव्या वर्षांपासून आईला मदत करणाऱ्या अमीन सयानींना उर्दू, गुजराती, हिंदीचा चांगला परिचय घडला.
भारतातल्या साध्या माणसासाठी संभाषणाची भाषा, कशी असावी ते नकळत उमगलं. न्यू एरा हायस्कूलमध्ये गुजराती माध्यमातून, तर ग्वाल्हेरच्या सिंदिया हायस्कूलमध्ये इंग्रजीतून शिक्षण झालं. सेन्ट झेव्हियर्समध्ये छोटी नाटकं, एकांकिका लिहून करण्याचा छंद जडला. घरातलं वातावरण स्वातंत्रसैनिक, विचारवंत यांचा राबता असल्याने अतिशय मोकळं, सेक्युदलर. संस्कृत, अरेबिकची खास शिकवणी होती. आजूबाजूला मराठी गोतावळा. विजया मेहता, दामू केंकरे यांची प्रायोगिक नाटकं पाहायला जायचा उत्साह असे.
संभाषणाच्या ओघात अमीन सयानी बिनचूकपणे गणपतीची आरती, संस्कृत सुभाषितंही आठवतात. वयाच्या सातव्या वर्षीच रेडिओच्या इंग्रजी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या छोट्या भावाला-अमीनला मोठ्या हमीदनं कानमंत्र दिला. "समोर असणाऱ्या व्यक्तीशी बोलशील तसा मायक्रोफोनमधून बोलत जा.‘
सही म्हणजे बिनचूक, सत्य म्हणजे खरं, फसवाफसवी नको, स्पष्ट- संदिग्ध नको, सरल- समजेल असं, सभ्य- अश्लीजलता, उद्धटपणा, उथळपणा नको, सुंदर म्हणजे आकर्षक अशी सहासूत्रं अमीन सयानींनी पाळली आणि त्याला सहृदयतेची, प्रेमाची जोड दिली. निवेदन एका उंचीवर नेऊन ठेवलं.
बालगोविंद श्रीवास्तव यांनी रेडिओ सिलोनच्या "फुलवारी‘ या नवोदितांच्या कार्यक्रमासाठी निवेदन करायला बोलावलं. तेव्हा कॉलेज झाल्यानंतर एलएलबी करून वकील होण्याचं घरच्यांचं स्वप्न तसंच राहिलं खरं, पण एक उमदा, हरहुन्नरी निवेदक रेडिओत दाखल झाला आणि त्यानं इतिहास घडवला.
52 व्या वर्षीच्या 3 डिसेंबरपासून सुरू झालेल्या गीतमालेनं संगीतप्रेमी सिनेप्रेमी रसिकांच्या भावजीवनात एक रोमहर्षक पर्व सुरू केलं. त्यात खूप बदल झाले. 54 व्या वर्षापासून अर्ध्या तासाचा कार्यक्रम एक तासाचा करण्यात आला. खास लोकाग्रहास्तव! गीता दत्तनी "आसमान‘ या चित्रपटात गायलेल्या गाण्याची धून बिनाकाची सिग्नेचर ट्यून होती. ओ.पी. नय्यरच्या या संगीताची धून लोकांच्या हृदयात जाऊन बसलेली होती. ती 70 व्या वर्षांपर्यंत वाजत असे.
प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन गाण्याचा पसंतीक्रम अमीन सयानींनी लोकांवर, रसिकांवर सोपवला. देशभरात नियमित गाणी ऐकणारे श्रोतासंघ तयार झाले ते अमीन सयानींमुळे. श्रोते आणि चित्रपट निर्माते आणि रेकॉर्ड विक्रेते याच्या संयुक्त पसंतीनं निर्णय झाल्यामुळे संपूर्ण लोकशाही तत्त्वाचा आधार असलेला गीतमाला हा कार्यक्रम चांगलाच बहरला.
गीतमालाचे अभ्यासक जयपूरचे अनिल भार्गव म्हणतात. ""41 वर्षांच्या प्रसारणात एकूण 2081 कार्यक्रमांत केवळ 80-85 कार्यक्रम काही कारणास्तव घडू शकले नाहीत. खुद्द अमीन सयानी काही अपरिहार्य कारणास्तव केवळ फक्त 30 वेळा हजर राहू शकले नाहीत.‘‘
थोडं मागे वळून पाहिलं तर ज्या वेळी अमीन सयानींचा चिरपरिचित स्वर ऐकू आला नाही त्या वेळी श्रोत्यांच्या मनातही काही चुकल्यासारखे झाले होते, हे आठवते.
अमीन सयानींचे अनेक रेडिओ प्रोग्रॅम्स गाजले.
"सॅरिडॉन के साथी‘, "एस. कुमार्स का फिल्मी मुकद्दमा‘, "मराठा दरबार की महकती बातें "जोहर के जबाब‘ इत्यादी; पण खुद्द अमीन सयानी म्हणतात, ""मी कॉलेजात मुलींशी बोलत असे, मिसळत असे; पण तेवढंच. माझी खरी "स्वीटहार्ट म्हणजे गीतमाला. मी हा कार्यक्रम समरसून करीत असे. यावर माझं नितांत प्रेम आहे.‘‘
अमीन सयानी त्यांना कामात मदत करणाऱ्या "इव्हज वीकली‘ची टॉप मॉडेल असलेल्या देखण्या काश्मियरी रमा मट्टूच्या खरोखरीच प्रेमात पडले. 58 व्या वर्षी विवाहबद्ध झालेल्या अमीन सयानींचं रमाबरोबरचं सहजीवन सुरेल, समाधानी ठरलं.
2002 साली रमाच्या निधनानंतर एकाकी झालेल्या अमीन सयानींचे काम अखंडपणे सुरू आहेच. त्याचा मुलगा राजील त्यांना कामात मदत करतो.
"फिल्म फेस्टिव्हल‘, "सौंदर्य स्पर्धा‘, "फॅशन शो‘ किंवा महत्त्वाचे प्रतिष्ठित कार्यक्रम अमीन सयानींनी शैलीदारपणे सादर केलेत. पसंतीच्या टॉप गाण्यात आपल्या गाण्यांचा समावेश नाही म्हणून नाराज झालेल्या काहींनी त्यांच्यावर आरोप केले; पण पारदर्शकता आणि निर्दोष कार्यप्रणालीमुळे अमीन सयानी आजही टिकून आहेत. "बिनाका‘ "सिबाका‘ अशी नावं बदलली, बुधवार बदलला, निवेदकही बदलले; पण गीतमाला आणि अमीन सयानी मात्र अजूनही लोकप्रियता टिकून आहेत.
चित्रपटाचं आणि चित्रपट संगीताचं सुवर्णयुग ही त्यांची "मर्मबंधातली ठेव‘. अभिनेते, अभिनेत्री, गीतकार, संगीतकार यांच्या दिलखुलास मुलाखतींचं ध्वनिमुद्रण हा त्यांचा लाडका विषय. नर्मविनोदाची पखरण, स्पष्टता, खेळकरपणा यांचा सुंदर मिलाफ असलेल्या त्यांच्या मुलाखती केवळ श्रवणीय, बालकलाकार, रेडिओ, टीव्हीची सम्राज्ञी असलेल्या तबस्सूमची ओळख "मेरी छोटी और मोटी बहन‘ अशी कौतुकानं करून देतील. अशोककुमारना त्यांच्या पहिल्यावहिल्या "शॉट‘बदल विचारतील. लतीदीदींना त्यांच्या आशाताईंशी असलेल्या व्यावसायिक स्पर्धेबद्दल प्रश्नि विचारतील तर किशोरकुमारची फिरकी घेतील; पण संयमाचं सूत्र कधीच सुटत नाही.
रेडिओ सिलोनचं "श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‘ झालं. एकेकाळचा "पॉवरफुल‘ ट्रान्समीटर क्षीण, दुर्बल झाला. पण त्यांच्या सुस्पष्ट आवाजात ऐकू येणारा पत्ता "सेसिल कोर्ट, लॅन्सडाऊन रोड, मुंबई‘ मात्र तोच आहे. पहिल्यापासून असणारा रेकॉर्डिस्ट जॉन नियमित येतो. अमीन सयानी नेहमीप्रमाणे येतात. गीतमालेचा विषय निघाला की खुलतात.
भाषा बिघडली, परस्परांतला भाईचारा, गोडवा हरवला म्हणून व्यथित होतात. रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेची आठवण त्यांना होते-where the mind is without fear... त्यावर "मन जहॉं न डरे, सर जहॉं न झुके ऐसा हो देश हमारा‘ अशा ओळी सुचतात.
त्यांचं आवडतं गीत ही आठवतं "मन रे, तू काहे ना धीर धरे‘ पलीकडेच गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेलचा परिसर गजबजलेला असतो, समुद्राची गाज येते.
अमीन सयानी मात्र कामात बुडून जातात. गीतमालाची सावली गडदही असते अन् फार सुमधुरही.
सुलभा तेरणीकर
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
अजीत हे हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या पिढीतील प्रसिद्ध खलनायक अभिनेता होते. त्यांचे खरे नाव हामिद अली खान असे होते.
आज २२ आक्टोबर. प्रसिद्ध बॉलिवूड खलनायक अभिनेता अजीत यांची पुण्यतिथी. अजित यांचा जन्म २७ जानेवारी १९२२ रोजी झाला.
अजीत यांनी जंजीर सिनेमात सेठ धरम दयाल तेजा हे पात्र साकारले होते. अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. 'जंजीर'नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली. खरं तर त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांची एन्ट्री ही हीरोच्या रुपात झाली होती.
अजित यांचे अनेक डॉयलॉग प्रसिध्द आहेत.
मोना डार्लिंग, सारा शहर मुझे 'लायन' के नामसे जनता है, वाटस युवर प्रॉब्लम?, आई लास्ट मई ग्लासेस, स्मार्ट बॉय , हव वैरी इंटरेस्टिंग...
लिली डोंट बी सिली, मोना लूटलो सोना,
अजित यांचा कालीचरण मधील डायलॉग तर खूप गाजला होता.,तो म्हणजे "मै तुम्हे लिक्वीड ऑक्सीडजनमे रखुंगा. लिक्वीड तुम्हे जीने नही देगा, ऑक्सीतजन तुम्हे मरने नही देगा‘.
अजीत यांचे २२ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 22, 2016
भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रं, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालिदासांचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यावरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्युलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोउद्गार काढले आहेत. कालिदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्याचा प्रबंध, चिंतामणी हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
May 31, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti