इतर विविध वर्गवारींचे मराठी व्हिडिओज
https://www.youtube.com/watch?v=QpALI5OM9i4
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
June 10, 2021
कधीकधी एखाद्या वाईट माणसाच्या, समाजाच्या, देशाच्या चुकिची शिक्षा त्याच्या कुटुंबाला, इतर समाजांना, इतर देशांना भोगावी लागते हेच आज जग कोरोना नामक विषाणूचे जे दुष्परिणाम भोगत आहे त्यावरून दिसून येते.
June 11, 2021
पंडित वसंतराव देशपांडे यांच्य आवाजातील `कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील हे अजरामर पद.
June 14, 2021
दिनांक 6 डिसेंबर …. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.
May 19, 2026
महाराष्ट्राची क्रांतिज्योत बंगालन हाती धरली. राजा राममोहनांपासून बंगालात जनजागृतीचे वारे वाहत होते. त्या वार्याला अचूक दिशा दिली स्वामी विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंदाची विदेशी शिष्या भगिनी निवेदिताच्या प्रेरणेनं बंगालात क्रांतिदलाची सुरूवात झाली. आणि ‘तरुण बंगाल’ बलिदानासाठी सिद्ध झाला, तेव्हा त्याचं नेतृत्व करायला पुढे आले अरविंद घोष. त्यांच्यासह खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी अशा बंगाली क्रांतिकारकांची कहाणी पाहूया या भागात.
February 13, 2026
सहावी सातवीच्या वर्गात असताना वर्गात हा विलक्षण् प्रसंग घडला आणि गदिमांकडून पहिली कविता लिहिली गेली. पण ती कविता सुद्धा त्यांची सामाजिक जाणीव दाखवणारी होती.
November 11, 2021
जेव्हा मनाची तार जुळते तेव्हा बाकी गोष्टी गौण ठरतात. ज्याचा आपण राग राग केला, मनातून तिरस्कार केला, अकल्पितपणे एक दिवस त्याची खरी ओळख पटली… आणि मग सगळे जगच पालटून गेलं. पती-पत्नी मधल्या तरल भावनांची रागान रागाची रागा अनुरागा ची ओळख करून देणारे हे हळुवार गीत.
May 25, 2022
अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि वांची अय्यर कर्झन वायलीच्या वधाचे सूत्रधार होते स्वातंत्र्यवीर सावरकर! सावरकरांमागे रीतसर सरकारी ससेमिरा चालू झाला. सावरकरांच्या मोठ्या बंधूना क्षुल्लक कारणास्तव काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानं क्रांतिकारक चिडीला आले. त्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा काटा काढण्याचं ठरवलं. कामगिरी पत्करली एका कोवळ्या मुलानं- अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं.
February 13, 2026
1857 च्या चक्रीवादळानंतर सारं कसं वरकरणी शांत शांत होतं. पण त्या काळातही क्रांतीच्या ठिणग्या इतस्ततः उडतच होत्या. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके, पंजाबात रामसिंग कूका, मणिपुरात टिकेन्दजीत सिंग, बिहारात विरसा मुंडा कीती नावं सांगावीत? याच वीरांपैकी ‘आद्य क्रांतिकारक’ वासुदेव बळवंत फडके आणि ‘भारतीय असंतोषचे जनक’ लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध या भागात घेत आहोत.
February 13, 2026
प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्यावर सुंदर अशी झालेली काव्य रचना
June 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti