(User Level: User is not logged in.)

मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी

    विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी

    विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी, गीतिका वर्दे कुरेशी, शिखर नाद कुरेशी, फैजान हुसेन शेख, अफ्शा शेख
    पद्मश्री उस्ताद अल्लारखॉं साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींचा जागर करत आहेत..

      June 26, 2021


  • डेझर्ट मॅरेथॉन ग्रँड स्लॅम विजेते अतुल पत्की – भाग २

    डेझर्ट मॅरेथॉन ग्रँड स्लॅम विजेते अतुल पत्की – भाग २


    भाग दुसरा


    तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉन माहितीय का? नाही?
    मग तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅमही माहिती नसेल.
    हा एक भन्नाट खेळ आहे.

    दिवसाला ४२ किलोमीटर धावायचं, स्वतःचं सामान स्वतः धावताना वाहून न्यायचं, सलग ५ दिवस धावायचं! तेही डेझर्टमधून!!
    डेझर्ट म्हणजे नो मॅन्स लँड!!!

    भयानक थंडी, सोलून काढणारं ऊन, बोचरे वारे, सपासप बसणारे पावसाचे फटकारे!!!
    ही डेझर्ट्स कोणती? ती किती आहेत, त्यांना पार करताना काय स्थिती होते,

    जगात हाताच्या बोटावर मोजता येणारे डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅम करणारे आहेत आणि त्यात आहे एक मराठी माणूस!
    मुलुंडमध्ये लहानाचा मोठा झालेले आणि आता अमेरिकेत राहणारे अतुल पत्की!!
    एक थरारक भेट, एक थरारक अनुभव, एक अविस्मरणीय माणूस!


    संवादिका : धनश्री प्रधान दामले

    संकल्पना : निनाद प्रधान
    निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
    विशेष आभार : नितीन आरेकर

    Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
    www.marathisrushti.com/mstv
    www.oeostudios.com
    Music: https://www.bensound.com


    Desert - Conventionally it is known as the No Man's Land. There are few such deserts in the world that pose a great challenge to mankind. And there are a few of them where a unique sports event takes place every year.

    This event is, the Desert Marathon. And there is a Grand Slam of these Desert Marathons!

    And there is Only Indian who has won the title of Desert Marathon Grand Slam Winner. He is a Maharashtrian, having roots in Mulund, a suburb of Mumbai and now staying in Mumbai.

    "Atul Patki" is interviewed by Anchor Dhanashree in this 3 part series.


    संवादिका : धनश्री प्रधान दामले

    संकल्पना : निनाद प्रधान
    निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
    विशेष आभार :

    Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
    www.marathisrushti.com/mstv
    www.oeostudios.com
    Music: https://www.bensound.com

    भाग पहिला

    भाग दुसरा

      March 12, 2026


  • दिग्दर्शक आदित्य सरपोतदार – भाग २

    दिग्दर्शक आदित्य सरपोतदार – भाग २

    फास्टर फेणे, क्लासमेट्स, नारबाची वाडी, उलाढाल, माऊली, रायकर केस ( वेबसिरीज ) यांसारख्या प्रसिध्द चित्रपटांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्याशी संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. आदित्यचा दिग्दर्शक म्हणून घडलेला प्रवास कसा होता आणि तो आता प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येत आहे हे जाणून घेऊया त्याच्याकडूनच… पाहात राहा मराठीसृष्टी टॉक्स…

      June 8, 2020


  • बालरोगचिकित्सक डॉ. सुहास कुलकर्णी

    बालरोगचिकित्सक डॉ. सुहास कुलकर्णी

    ठाण्यातील प्रसिध्द बालरोगचिकित्सक (Pediatrician) डॉ. सुहास कुलकर्णी यांनी मराठीसृष्टीशी संवाद साधताना COVID च्या परिस्थितीत आपण आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यायची आहे आणि दवाखान्यांमध्ये तसेच हॉस्पिटल्स मध्ये लहान मुलांची काळजी कशी घेतली जात आहे यावर उत्तम मार्गदर्शन केले आहे…

      May 27, 2020


  • शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमंत अभ्यंकर – भाग २

    विस्ताराच्या निमित्ताने बघतोच आहोत. मात्र सगळेच शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात न जाता प्रयोगशाळेत प्रयोग कसे करणार वगैरेसारखे अनेक प्रश्न पुढे येतील.

    अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवसंपन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT चे माजी प्राचार्य आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी या विषयावर संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री यांच्याशी.

      June 20, 2020


  • “संवाद” – “घातसूत्र”कार दीपक करंजीकर

    “संवाद” – “घातसूत्र”कार दीपक करंजीकर

    ही मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा...


    “घातसूत्र ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय-राजकीय ग्रंथ नाही. निबंध नाही. प्रबंध नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन नाही. तत्त्वज्ञान नाही. आध्यात्मिक प्रवचन नाही वा क्लिष्ट चिंतनाचे तथाकथित निरूपण नाही.

    दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलिकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वंकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन करणारा, पण एक उत्कंठावर्धक, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. सध्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या, आर्थिक अरिष्टाच्या, संभाव्य प्रलयसमान भासणार््या आंतरराष्ट्रीय प्रवाहांचा घेतलेला हा वेधक शोध आहे.

    अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांचे मन खिळवून ठेवतानाच, त्याला प्रस्थापित जगाचे भान यावे म्हणून दिशादर्शन करणारे हे लेखन कोणत्याही विशिष्ट ग्रंथशाखेत मोडत असले तरी त्यात इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान हे सर्व रहस्यमयतेने येते. वैचारिक आत्मविश्वासही देते.”

    “संवाद“ या “मराठीसृष्टी डॉट कॉम” वेब पोर्टल आणि “वाचता वाचता” या व्हॉटसअॅप ग्रुपच्या उपक्रमाअंतर्गत फेसबुकवर लाईव्ह झालेला कार्यक्रम.
    रेकॉर्डिंग : ५ जुलै २०२०

    संवादिका : धनश्री प्रधान दामले
    संकल्पना : नितीन आरेकर, निनाद प्रधान, सतिश नाईक
    निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ, मराठीसृष्टी टिम

    Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
    www.marathisrushti.com/mstv
    www.oeostudios.com


    संवादिका : धनश्री प्रधान दामले

    संकल्पना : निनाद प्रधान
    निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

    Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
    www.marathisrushti.com/mstv
    www.oeostudios.com

      March 12, 2026


  • ध्रुव आणि क्रीती  देशपांडे

    ध्रुव आणि क्रीती देशपांडे

    ही गोष्ट आहे एका नवविवाहित जोडप्याची. पंधरा-वीस दिवसासाठी पेरू या देशात हनीमूनला गेलेलं हे जोडपं. तिथे फिरायचं, वेगवेगळी ठिकाणं बघायची, मस्तपैकी खायचं प्यायचं…. ही स्वप्न!

    पण तिथे पोहोचताच पाच-सहा दिवसात लॉकडाऊन सुरू होतो. फिरणं नाही, हॉटेलिंग नाही.. भारतात परत यायचीही सोय नाही.

    आणि मग पंधरा दिवसांची ही हनिमून ट्रीप तब्बल ७० दिवस चालते…. काय काय अनुभव घेतले असतील त्या परक्या देशात, आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी पासून दूर… आणि एका अनामीक भीतीच्या छायेत….

    ही गोष्ट आहे सुप्रसिद्ध स्टॅन्ड-अप कॉमेडियन ध्रुव देशपांडे आणि क्रीती देशपांडे यांची…. त्यांच्याच शब्दात… आपली संवादिका धनश्री प्रधान दामले बरोबर गप्पा मारताना सांगितलेली….

      June 14, 2020


  • ट्रॅव्हल ब्लॉगर कौशल कारखानीस

    ट्रॅव्हल ब्लॉगर कौशल कारखानीस

    Exotic Gringo या नावाने वाचकांना जगभराची सफर घडवणार्‍या सुप्रसिध्द Travel Blogger आणि Brand Consultant कौशल कारखानीस यांच्याशी आपली संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा….

      July 12, 2020


  • सर्जनशील कलावंत खासदार डॉ. अमोल कोल्हे – भाग ३

    सर्जनशील कलावंत खासदार डॉ. अमोल कोल्हे – भाग ३

    प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांनी रंगवलेल्या गप्पा…

      July 10, 2020


  • संगीत सम्राज्ञी पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांच्याबरोबर दिलखुलास संवाद

    संगीत सम्राज्ञी पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांच्याबरोबर दिलखुलास संवाद

    भारतीय शास्त्रीय कंठ्य संगीताची निःसंशयरित्या अनभिषिक्त सम्राज्ञी असणाऱ्या बेगम परवीनजींची संगीत विषयक भूमिका, त्यांचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास, त्यांनी आजचे शिखरस्थ स्थान प्राप्त करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत हे सारं त्यांच्याच कडून समजून घेऊ या.

      July 4, 2025