नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
शाळेजवळच्या एका कोपर्यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे देताना नेहमीच फसवणूक करीत असे. छोटे माप पूर्ण भरल्यासारखे तो दाखवायचा, मात्र देताना त्या मापातील बरेचसे चणे-फुटाणे आपल्या टोपलीत पुन्हा सांडायचा. त्यामुळे पैसे देऊनही कमीत कमी चणे-फुटाणे मुलांच्या वाट्याला यायचे. कोण्या मुलाने तक्रार केली की तो त्याला म्हणायचा,'अरे, तुझा हात लहान आहे. मग त्या हातात मावतील एवढेच चणे-फुटाणे घेतलेले बरे. नाही तर खाली रस्त्यावर सांडून ते वाया जाणार नाहीत का?'
त्याच्या या युक्तिवादावर मुले फारशी बोलत नसत. छोट्या गोपाळला त्या विक्रेत्याची ही लबाडी लक्षात आली होती. त्याने एकदा त्याची खोड जिरवायची ठरविले. एक त्याने दहा-दहा पैशाची सुटी नाणी कोठून तरी गोळा केली व मधल्या सुटीत त्या विक्रेत्याकडे जाऊन दोन रुपयाचे चणे-
फुटाणे मागितले. विक्रेत्याने नेहमीप्रमाणे त्याला कमीत कमी चणे-फुटाणे दिले. गोपाळने दोन रुपयाचे एवढेच चणे-फुटाणे कसे? असे विचारल्यावर त्याने नेहमीप्रमाणेच, ' तुझ्या छोट्या हातात जास्त मावणार नाहीत ', असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला पैसे देताना गोपाळने दोन रुपयाऐवजी एका रुपयाचीच दहा पैशाची सर्व सुटी नाणी त्याच्या हातावर ठेवली. विक्रेता ते मोजेपर्यंत गोपाळ शाळेकडे निघाला होता.
ती दहा पैशाची सुटी नाणी म्हणजे एकच रुपया आहे असे विक्रेत्याच्या लक्षात आल्यावर तो गोपाळकडे पाहून ओरडला, ' अरे तू मला पैसे कमी दिले आहेस. ' त्यावर गोपाळ ओरडूनच त्याला म्हणाला ' अरे, तुला पैसे मोजायला अधिक त्रास नको म्हणूनच तुला मी कमी पैसे दिले.
गोपाळचे हे 'जशास तसे' उत्तर ऐकून विक्रेता गप्प बसला. त्याची खोड जिरली होती.
July 23, 2016
एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या देशाच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड गोंधळ , गुंता करून ठेवा . देश केव्हा उद्ध्वस्त होईल हे कुणाला कळणारही नाही . हे कुणी म्हटलं होतं कुणास ठाऊक , पण ते सत्य होतं . अगदी पूर्वनियोजित कारस्थान असावं तसंच चाललं होतं . विद्यार्थी केंद्रीभूत शिक्षणव्यवस्था , बक्कळ पैसा देणारी इंडस्ट्री केव्हा झाली , हे धुरीणांच्या लक्षात सुद्धा आले नाही . त्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे स्थान केवळ कच्चा माल या स्वरूपाचे झाले आणि त्यांचे पालक कच्च्या मालाचे वाहक झाले .
त्यात विद्यार्थी कुठं होता ?
त्याच्या मनाचा , बुद्धीच्या स्तराचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार कुठं होता ?
त्याच्या अंगभूत गुणांचा विचार कुणी , कधी केला होता ?
शारीरिक विकासासाठी मोकळी मैदाने लागतात , त्याचा विचार कुठं होता ?
चार भिंतींची शाळा आणि एकत्रित शालेय सहजीवन खूप काही शिकवत असते , याचा विचार कुठं होता ?
January 20, 2026
इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते.
February 4, 2026
एस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू लागलो. भर उन्हातही अंगाला गार गार स्पर्श करणारी हवा तिथे सुटली होती. त्या गार गार हवेचा आनंद घेत उल्हसित होत चालता – चालता आम्ही ज्या तरुणींचा पाठलाग करण्याचे ठरविले होते त्यांच्यापासून कधी दुरावलो ते कळलेच नाही.
June 16, 2021

July 3, 2022

साधू त्यांना एक जादुई घोडा, काटी आणि झोळी देतो आणि त्यांच्या कानात एक मंत्र सांगतो. हा घोडा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल..ही झोळी तुम्हाला हव्या त्या वस्तू देईल…आणि ही काटी तुमच्या शत्रूंचा नाश करेल…आणि ते साधू स्वर्गात प्रयाण करतात. ते दोघे बहीण भाऊ घोड्यावर बसतात आणि मंत्र म्हणून घोड्याला आदेश देतात आमचे आईवडील ज्या राज्यात असतील तेथे आम्हाला घेऊन चल…क्षणात ते घोड्यासह आटपाट नगरात पोहचतात…तेथे पोहचल्यावर ते झोळीतून मंत्राच्या साह्याने मोहरा निर्माण करतात आणि एक वाडा विकत घेतात…आपल्या राज्यात कोणी श्रीमंत बहीण भाऊ राहायला आल्याची बातमी राजदरबारात पोहचते… दृष्ट राणीला त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होते…
July 18, 2022
दुपारचे भगभगीत उन… वैशाख महिना… जणू सारा आसमंतच पेटला आहे अस जाणवणारी धग, सर्वांगाला होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या झळा, अंगातून झिरपणाऱ्या घामाच्या धारा, त्यातून ज्या कामासाठी निघाले होते ते काम तर झालेच नव्हते. त्यामुळे उद्या परत ह्या रखरखीत उन्हात तडफडत यावे लागणार ह्या विचाराने रस्त्यावर भराभर चालत रिक्षा पकडण्याची माझी धडपड चालू होती.
November 25, 2025

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.
October 24, 2021
पंतांच्या निग्रही चालण्याकडे पाहणारे इन्स्पेक्टर शर्मा एकदम दचकले . त्यांना पंतांचे शब्द आठवले . ” ब्रेन रॉटची शिकार …”
December 21, 2025

मला आता ‘ स्पेस ‘ ची गरज आहे. घंटा…स्पेस मी तिला म्हणालो . अरे स्पेस म्हणजे काय खरा अर्थ कळतो काय ? मी डाफरलो .
June 3, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti