नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
ही कथा आहे एका अभ्यासू व संस्कारक्षम मुलाच्या धडपडीची . जिद्दीची आणि परिश्रमपूर्वक यश मिळवणाऱ्या बालकाची . एका छोटया गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या गुरुजींची . ज्यांनी नवी पिढी घडविण्याचा वसा घेतला आहे.
January 15, 2019
सकाळी सव्वा सात वाजता एजंट सैफुल हॉटेलच्या लॉबी मध्ये येऊन थांबला होता. अर्ध्या तासात हॉस्पिटल असलेल्या भागात पोचलो, पण माझे मेडिकल चेक अप नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये नसल्याने सैफुल ला थोडं शोधावं लागलं. जकार्ता मधील लिप्पो व्हिलेज या पॉश एरिया मध्ये सिलोम हॉस्पिटल ची मोठी शाखा होती.
August 10, 2021
सदोबांच प्रामाणिक मत होते – रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वत जुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. ????
May 10, 2011

ते रोज एकमेकांना लांबूनच पाहायचे. पण.. बोलणं कधी झालं नाही. कधी कधी ते एकाच तलावात पोहायला जायचे. पण.. त्यावेळी इतकी गर्दी असायची की त्यांना काही बोलता यायचं नाही. कधी ते फिरायला गेले तर लांबूनच चालाचये. त्यामुळे.. बोलणं नाही तर फक्त बघणं व्हायचं. गेलं वर्षभर तो तिच्याशी बोलण्याची वाट पाहात होता.
आज तो हात ताणून आरामात निवांत पडला होता इतक्यात त्याच्या बाजूला ती येऊन बसली. वाऱ्यावर हात हलवत तो म्हणाला,“व्वा! खूप दिवसांनी भेट झाली.” ती इतकी भिजली होती की तिला पटकन काही बोलताच आलं नाही. त्याचवेळी बाजूला लोंबकळणारा रुमाल म्हणाला,“फारच आवडली वाटतं ही साडी तुला? ही तुझ्यासारखी प्युअर कॉटन नाही बरं…”
August 29, 2015

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती ?
May 1, 2018
पहाट….कसली मध्यरात्रच ती… तीन सव्वा तीन वाजले होते, ब्रेक चां कर्ण कर्कश आवाज करून बस एका ढाब्यावर थांबली, महत्प्रयासाने सुमारे तासा भरा पूर्वी लागलेली झोप मोडल्या मुळे चरफडत ‘ मानसी ‘ उठली आणि डोळे किलकिले करून तिने खिडकी बाहेर पाहिले, कुठला तरी ‘ दिलखुश इन’ नावाचा पंजाबी ढाबा ‘ दिसत होता. “
November 14, 2024
साल आपल्याच खोबडीत दोष आहे भलतेच उदात्त वगैरे विचार करतो…. जग हे अनेक पायांवर चालते … आपल्यासारखे दोन पायावर नाही….
June 8, 2021

गिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय.
June 30, 2022
त्यांनी आपल्या शाळेतून ‘वंदे मातरम्’ चे गायन सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. लॉर्ड कर्झन ह्यांच्या विचारांची पोल सगळ्यांसमोर उघडी केली, ते नेहमी पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करत आणि पूर्वेकडील संस्कृती ला कमीपणा देत. भगिनी निवेदित्यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड कर्झन ला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. भारतीय लोकांमध्ये स्वदेशीचा प्रचार, प्रसार केला.
August 21, 2022
संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर डॉक्टर देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ चमत्कार होता. डॉक्टर देशमुख शासनाचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच प्रशासकीय अधिकार प्राप्त. ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते.
मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानसरोवर “ ही यात्रा केवळ भारतीय शासन आयोजित असे. वर्षातून फक्त तीन महिने ती यात्रा चाले. ३० दिवसाची यात्रा. वर्तमानपत्रे, दूरदर्शन ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात. यात्रेला जाण्यासाठी थोड्याच लोकांना प्रवेश मिळे. किचकट नियमातून प्रवेश मिळणे अत्यंत अवघड होते. मी पण अर्ज केला होता. नशिब चांगले म्हणून नंबर लागला. तार मिळाली ” कैलास मानसरोवर यात्रेसाठी तुमचा अर्ज मंजूर केला गेला. १५ दिवसात फार्म भरून अनामत रक्कम पाठविणे.” धावपळ सुरु झाली. यात्रा दोन महिन्या नंतर सुरु होणार होती. संबंधित बाबींची पूर्तता करण्याची गरज होती. शासकीय नोकरी. तेंव्हा ३० दिवसाची रजा मंजूर करून घेणे महत्वाचे होते.
डॉक्टर देशमुख त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना भेटलो व परिस्थिती समजावून सांगितली. रजेचा अर्ज दिला. माझ्यासाठी नशिबाने ही एक मिळालेली संधी असल्याचे सांगितले. त्यांनी क्षणभर विचार केला. प्रशासकीय कारण देत अर्ज नामंजूर केला. मी खूप निराश झालो. विनंत्या केल्या. वेळ पडल्यास बिनपगारी राजा द्यावी, हे ही मागितले. परंतु डॉक्टर देशमुख यांनी निर्णय बदलला नाही. माझा अर्ज फेटाळून लावला. मिळालेली संधी वरिष्ठांच्या हट्टापाई गमावून बसलो.
१२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग, मी केंव्हाच विसरलो होतो. आणि आज अचानक ज्याचा विचार केव्हाच मनांत येणार नाही ते घडले होते. डॉक्टर देशमुख माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचे मी स्वागत केले. खूप आनंद व समाधान व्यक्त केले. मी देखील निवृत झालो होतो.
डॉक्टर देशमुख सांगू लागले. ” मी खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. माझ्या जीवनात मी अनेक वरिष्ठ जागा भुषविल्या. अनेक निर्णय घेतले. शकतो नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न केला. नियम हे फक्त मार्ग दर्शक असतात.
निर्णय मात्र तुम्हाला सारासार विचार करून, परिस्थितीचा अभ्यास करून, त्याच्या परिणामाचा विचार करून, घ्यावा लागतो. त्यात असते तुमचे ज्ञान, अनुभव, कार्याची क्षमता, आणि तुमचा स्वत:चा स्वभाव गुणधर्म. निर्णयात स्वभावाचा सहभाग अल्पसा असला तरी अनेक निकालांची तो उलट सुलट करु शकतो. तुमचे राग लोभ अहंकार, कुणाबद्दलचे समाज, गैरसमज ह्या बाबी तुमच्या स्वभावाला बंदिस्त चाकोरीत टाकतात. अजाणतेपणाने तुमच्या निर्णयामध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होऊन जातो. अशाच कांही मी घेतलेल्या निर्णयाचे आज मी विश्लेषण करीत आहे. कांही निर्णया बाबतीत, मला खंत वाटते. तो भूत काळ होता. मी आता कांहीच करु शकत नाही.
पश्चात्ताप होणे हेच एक प्रायश्चित असते. चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट चक्रातून केलेले बचवात्मक समाधान. ज्या ज्या निर्णयामध्ये जर कुणाची हानी झाली असेल तर आणि त्यांत मला स्वत: ची चूक उमगली असेल, तर त्याची क्षमा मागण्यासाठी मी आलो आहे. वेळ गेली, काळ गेला. भोगनाऱ्याने जे भोगले, त्यांच्या दु:ख निर्मितीत माझा अप्रत्यक्ष सहभाग होता. क्षमा व्यक्त करून मी मनाचे सांत्वन इच्छितो.”
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
August 24, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti