(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक परीस स्पर्श (भाग – ५४)

    विजय त्याच्या कार्यालयात बसलेला होता त्याच्या कार्यालयाच्या बाहेर दोन म्हाताऱ्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. लोकांच्यात चाललेला संवाद हे विजयच्या साहित्यिक भुकेसाठी नेहमीच खाद्य ठरत असते त्यामुळे तो त्या म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये चाललेला संवाद कान लावून ऐकत होता. त्यातील एक म्हातारी फक्त दुसरी म्हातारी जे काही बोलत होती ते कान देऊन ऐकण्याचे काम करीत होती. ती बडबडी म्हातारी त्या दुसऱ्या म्हातारीला सांगत होती…” मला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे मोट्या मुलाला दोन मुलगे आहेत आणि मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे लहान मुलाला अजून काही नाही… त्याचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे..

      September 1, 2022


  • मी का लिहितो..

    ‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे.

      August 16, 2018


  • ९५० पूर्ण

    पुढील कार्यक्रम आयोजक अशोक शेवडे यांच्यासाठी दिवाळी पाडव्याला डोंबिवली येथे झाला. ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्याबरोबर मी गायलो कार्यक्रमाचे निवेदन प्राची देवस्थळी आणि अशोक शेवडे यांनी केले. रोटरी क्लब आयोजित अंध विद्यार्थ्यांसाठीच्या शिबिरात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या सोबत माझी प्रकट मुलाखत घेण्यात आली. या विद्यार्थ्यांनी गाण्यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. त्यांचा गाण्याबद्दलचा इतका अभ्यास पाहून मला आश्चर्य वाटले. परमेश्वर जेव्हा एका शक्तीपासून वंचित ठेवतो, तेव्हा दुसऱ्या क्षमता वाढवून देतो. ही मंडळी अतिशय बारकाईने गाणे ऐकतात हे माझ्या ध्यानात आले. त्या दिवसापासून मी डोळे बंद करून गाणे ऐकायला लागलो.

    २०१३ या वर्षाची सुरुवात एका सुगम संगीत स्पर्धेने झाली. जोशी-बेडेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे मी परीक्षण आणि गायन केले. या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग या स्वतः उत्तम गायिका असल्याने त्यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी मी अहमदाबाद, औरंगाबाद, इंदूर आणि बडोदे येथे जाऊन आलो. ठाण्याला परतल्यावर एका मोठ्या कार्यक्रमाची तयारी आम्ही सुरू केली. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी माघी गणेश चतुर्थीनिमित्त कळवा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    माझी विद्यार्थिनी नेहा नामजोशी या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायली. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर पाच हजार लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. माझ्यासाठीही हा कार्यक्रम फारच विशेष होता. कार्यक्रमानंतर सर्व वादकांनी माझे अभिनंदन केले. आयोजकांतर्फेही माझा सत्कार करण्यात आला. कारण माघी गणेश चतुर्थीच्या रात्री त्या वक्रतुंड महाकाय श्रीगजाननाच्या कृपेमुळे मी ९५०वा जाहीर कार्यक्रम पूर्ण केला होता.

    घरी प्रियांका, मुली आणि आई माझी वाटच पहात होत्या. आईने माझी दृष्ट काढली. गाणे माझ्याकडे आईकडूनच आले होते. माझी पहिली गुरुदेखील आईच होती. प्रत्येक कठीण प्रयोगाच्या वेळी आई भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. प्रियांका आणि मुलींनी माझे अभिनंदन केले. “अरे हो हो! इतके माझे कौतुक का करताय? मी अजूनही माझ्या ध्येयाच्या ५० कार्यक्रम मागे आहे." मी म्हणालो.

    “असा विचार करू नका. इतके कार्यक्रम करणेदेखील खूप कठीण गोष्ट आहे.” प्रियांकाने पत्नीच्या अधिकारात मला समजावले. एक हजार कार्यक्रमाचे माझे ध्येय गाठण्याच्या नादात मी ९५० कार्यक्रम पूर्ण केल्याच्या या क्षणाचा आनंद घेऊ शकत नव्हतो. आत्तापर्यंत कधी असे घडले नव्हते. मग आत्ताच असे काय होत होते? मला एकदम जाणवले की आता मी माझ्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. एक हजार कार्यक्रम पूर्ण करण्याची मला घाई झाली होती. मी मोठी चूक करत होतो. मी धीराने घ्यायचे ठरवले. असेही ठरवले की, आता समोरून येणारे सगळेच कार्यक्रम करायचे नाही, तर काही निवडक कार्यक्रमच हाती घ्यायचे. आता मी दुसरी मोठी चूक करत होतो. माझ्या या निर्णयामुळे माझ्याच कार्यक्रमांचा वेग मंदावणार होता. पण त्यावेळी मला हे समजत नव्हते. पन्नास कार्यक्रम करणे हे देखील किती कठीण काम असू शकते याचा प्रत्यय मला पुढील काळात आला.

    -अनिरुद्ध जोशी

      August 18, 2022


  • हेच खरे प्रेम! हाच खरा विश्वास (कथा)

    संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते.

      May 1, 2022


  • एका पुतळ्याची व्यथा कथा

    एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकता-ऐकता मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, ……

      May 25, 2014


  • न्हाऊ घाल, माझ्या मना

    न्हाऊ घालणे म्हणजे स्नान घालणे, आंघोळ घालणे, उद्देश : स्वच्छ करणे. देवाला ( धना म्हणजे देव ) आर्त हांक घालुन विनवणी कोणची, तर ” मनाला न्हाऊ घाल” म्हणजे मनाला स्वच्छ कर, पण त्यासाठी मनाला शरीरापासुन वेगळे कसे करता येईल ?

      November 24, 2020


  • लग्न आणि मध्यमवर्ग

    मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची आणि स्मरणात ठेवण्याजोगी कोणती घटना असील तर ती घटना म्ह्णजे लग्न ! मध्यमवर्गीय माणसाच संपूर्ण जीवनच म्ह्णा ना ! लग्न या संकल्पनेच्या आवती – भोवतीच गुंफलेलं असतं. मध्यमवर्गीय माणसाची लग्न या विषयापर्यत पोहचल्यावर सर्वसाधारणतः विचार करण्याची क्षमताच नष्ट होते. त्याची बुध्दी निषक्रीय होते. मध्यमवर्गीय माणसांनीच आजकाल लग्नाचा बाजार मांडलाय आणि त्या बाजाराला काही जोडधंदयांचा आधार ही दिलेला आहे.

      January 8, 2016


  • प्रोजेक्ट – ‘मय्यत’ !

    हि माझी कथा -विदूषक १९९९च्या दिवाळी अंकात सु र आळंदकर या नावाने ‘भोवनीच मयत ‘ या शीर्षका खाली लिहली होती.

      August 27, 2018


  • पश्चाताप – एक जाणीव

    संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर डॉक्टर देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ चमत्कार होता. डॉक्टर देशमुख शासनाचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच प्रशासकीय अधिकार प्राप्त. ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते.

    मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानसरोवर “ ही यात्रा केवळ भारतीय शासन आयोजित असे. वर्षातून फक्त तीन महिने ती यात्रा चाले. ३० दिवसाची यात्रा. वर्तमानपत्रे, दूरदर्शन ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात. यात्रेला जाण्यासाठी थोड्याच लोकांना प्रवेश मिळे. किचकट नियमातून प्रवेश मिळणे अत्यंत अवघड होते. मी पण अर्ज केला होता. नशिब चांगले म्हणून नंबर लागला. तार मिळाली ” कैलास मानसरोवर यात्रेसाठी तुमचा अर्ज मंजूर केला गेला. १५ दिवसात फार्म भरून अनामत रक्कम पाठविणे.” धावपळ सुरु झाली. यात्रा दोन महिन्या नंतर सुरु होणार होती. संबंधित बाबींची पूर्तता करण्याची गरज होती. शासकीय नोकरी. तेंव्हा ३० दिवसाची रजा मंजूर करून घेणे महत्वाचे होते.

    डॉक्टर देशमुख त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना भेटलो व परिस्थिती समजावून सांगितली. रजेचा अर्ज दिला. माझ्यासाठी नशिबाने ही एक मिळालेली संधी असल्याचे सांगितले. त्यांनी क्षणभर विचार केला. प्रशासकीय कारण देत अर्ज नामंजूर केला. मी खूप निराश झालो. विनंत्या केल्या. वेळ पडल्यास बिनपगारी राजा द्यावी, हे ही मागितले. परंतु डॉक्टर देशमुख यांनी निर्णय बदलला नाही. माझा अर्ज फेटाळून लावला. मिळालेली संधी वरिष्ठांच्या हट्टापाई गमावून बसलो.

    १२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग, मी केंव्हाच विसरलो होतो. आणि आज अचानक ज्याचा विचार केव्हाच मनांत येणार नाही ते घडले होते. डॉक्टर देशमुख माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचे मी स्वागत केले. खूप आनंद व समाधान व्यक्त केले. मी देखील निवृत झालो होतो.

    डॉक्टर देशमुख सांगू लागले. ” मी खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. माझ्या जीवनात मी अनेक वरिष्ठ जागा भुषविल्या. अनेक निर्णय घेतले. शकतो नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न केला. नियम हे फक्त मार्ग दर्शक असतात.

    निर्णय मात्र तुम्हाला सारासार विचार करून, परिस्थितीचा अभ्यास करून, त्याच्या परिणामाचा विचार करून, घ्यावा लागतो. त्यात असते तुमचे ज्ञान, अनुभव, कार्याची क्षमता, आणि तुमचा स्वत:चा स्वभाव गुणधर्म. निर्णयात स्वभावाचा सहभाग अल्पसा असला तरी अनेक निकालांची तो उलट सुलट करु शकतो. तुमचे राग लोभ अहंकार, कुणाबद्दलचे समाज, गैरसमज ह्या बाबी तुमच्या स्वभावाला बंदिस्त चाकोरीत टाकतात. अजाणतेपणाने तुमच्या निर्णयामध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होऊन जातो. अशाच कांही मी घेतलेल्या निर्णयाचे आज मी विश्लेषण करीत आहे. कांही निर्णया बाबतीत, मला खंत वाटते. तो भूत काळ होता. मी आता कांहीच करु शकत नाही.

    पश्चात्ताप होणे हेच एक प्रायश्चित असते. चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट चक्रातून केलेले बचवात्मक समाधान. ज्या ज्या निर्णयामध्ये जर कुणाची हानी झाली असेल तर आणि त्यांत मला स्वत: ची चूक उमगली असेल, तर त्याची क्षमा मागण्यासाठी मी आलो आहे. वेळ गेली, काळ गेला. भोगनाऱ्याने जे भोगले, त्यांच्या दु:ख निर्मितीत माझा अप्रत्यक्ष सहभाग होता. क्षमा व्यक्त करून मी मनाचे सांत्वन इच्छितो.”

    डॉक्टर देशमुख भावनीक झालेले दिसले. चुका सुधारण्यासाठी आता वेळ नसली, तरीं अंत:करणातून निर्माण झालेल्या प्रायश्चिताची जाणीव, हीच खरी शांतता. हाच निसर्ग व ईश्वरी संदेश नव्हे काय ?डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

      August 24, 2015


  • सर्प आणि उंदीर यांचे द्वंद

    हैदराबाद येथे एक सर्पालय बघण्यास गेलो होतो. अनेक जातींचे सर्प कांच- घरात ठेवलेले होते. त्यांना खेकडे, बेडूक, उंदीर, वा छोटे जिवंत प्राणी खाण्यासाठी सापाच्या दालनात सोडले जात होते. फक्त भुकेला सर्प हा आपल्या भक्षावर तुटून पडतो. नसता तो भक्ष जीवना मारत नसतो. एक सर्प दालनात एका उंदराला सोडले होते. सर्प बराच मोठा होता. सापाचे हालके हालकेपुढे जाणे, उंदराच्या दिशेने झेप घेणे, उंदराला दंश करणे, त्याला जायबंद करणे, त्याच्यावर वेटोळे घालून त्याला खीळ खिळा करणे, व मग गिळणे ह्या क्रिया तो करतो. असाच प्रयत्न हा सर्प करीत होता. त्याच वेळी उंदीर जीव वाचवण्यासाठी चपळाईने पळणे, सापाची पकड चुकवणे, त्याचा नजरेच्या टापूतून हालने, ह्या प्रयत्नात होता.

    एक जीवन मरण्याचा संघर्ष चालू असलेला दिसत होता. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वत: चे रक्षण करण्याची कला दिलेली असते. तो एक दिलासा असतो. जो जगण्यासाठी धडपडेल तोच जगेल. Survival of the fittest म्हणतात ते हेच. निसर्ग तुमच्या प्रयत्नांना सतत सकारात्मक साथ देतो. कित्येकदा वाघ सिंह यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणांनी आपली सुटका करून घातलेली आम्ही Discovery वा Animal Plannet ह्या दूरदर्शन चांनेलवर बघितले. पाण्यामध्ये प्रचंड मगरीने पकडलेला झेब्रा देखील आपल्या तडफदार धडपडीने ती मगरमिठी सोडू शकला हे पण बघितले. चंचलता, चपळाई, शिकारी प्राण्याचा लक्षवेध चुकवण्याची कला, प्रासंगिक आक्रमकता, धैर्य, चातुर्य हे सारे सुप्त रूपाने प्रत्येक प्राण्यात असतात. हे गुणधर्म संकट काळी जागृत होतात. नेहमीच्या अंग शक्ती पेक्षा कितीतरी पटीने त्याची शक्ती उत्येजीत होती. शरीराच्या प्रत्येक नस नसामधून त्याचा ओघ निर्माण होतो. हा परिणाम इच्छित ( Volentary action ) नसून आंतरिक चेतना अर्थात Instinct Relex Action असते. अपोआप उद्दुक्त होते. ही सारी निसर्गाची बचावात्मक योजना होय. कोंडून ठेवलेली भित्री वा पळपुटी मांजर तिच्यावर जीवघेणा हल्ला होत आहे हे समजताच तिच्यामध्ये विलक्षण शक्तीचा ओघ निर्माण होतो. ती झेप घेऊन त्या व्यक्तीचा गळा पकडून त्याचाच जीव घेण्यास सक्षम होते. ही स्व रक्षणाची किमया.

    शिकारी साप आणि शिकार उंदीर ह्यांचे द्वंद्द चालले. चुरस अत्यंत रोमांचकारी व उत्च्सुक्ता वाढवणारी होती. एक बलाढ्य मारक आणि समोर अशक्त अश्या दोन प्राण्याची लढत. उंदरासाठी जीवन मरणाचा संघर्ष. तो सापाच्या प्रत्येक सूक्ष्म हालचालीचा वेध घेत होता. सापाने दंश करण्यासाठी मारलेला टोला चपळाईने चुकवत होता त्याच वेळी सापाचे तोंड आपटून दुखवले जाई कांही वेळाने ते रक्त बमबाळ झाले. एक विस्मयकारक प्रकार घडला. उंदरावर सापांनी आपला जबडा उघडा करून एक दंश टोला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी उंदराने उलटवार केला. सापाचा उघडलेला खालचा जबडा झटकन आपल्या दातांनी गच्च पकडला. उंदराला छोटे छोटे दात असतात. त्याचा उपयोग पकडी मध्ये झाला.

    उलट सापाला तसे चावण्याचे दात नसतात. तो फक्त भाक्षाला गिळतो. येथे खालचाच जबडा उंदराच्या पकडीमध्ये गेल्यामुळे साप एकदम निष्क्रिय झाला.सापाची ह्या अनपेक्षित पकडीतून सुटका करून घेण्याची धडपड चालली , पण जमले नाही. उंदराने त्याची पकड ढिली केली नाही. बराच वेळाने तो साप हतबल होऊन मान टाकू लागला. त्याचा हालचाली थंडावल्या उंदराने शत्रूची पकड दिली करीत लगेच चेहऱ्याचा दुसरा भाग पकडला. जागा बदलणे, पुन्हा दात रोवणे, कुड्तरणे हे चालू ठेवले. सापाचे तोंड छीलुन काढले. घायाळ केले. शेवटी सपालाच मृतुच्या स्वाधीन व्हावे लागले.

    आम्ही जी घटना बघितली ती केवळ अतिशय आश्चर्यकारक घडलेली अशी. निसर्गाचा तो एक चमत्कार. कुणास विश्वास वाटणार नाही अशी. मलासुद्धा आपण हे सत्य बघतो आहोत कां ? का हा दृष्टीचा भ्रम आहे हे एका क्षणी वाटले पण आम्ही video चित्रण ही केले होते. अशा घटना निसर्गाच्या चक्रात अनेक वेळा घडत असतात. आम्हास ती बघण्यास मिळणे हे आमचे नशीब नव्हे काय?

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 14, 2015