(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निसर्गाची नवलाई

    निसर्गाची नवलाई अनेक अंगाने मनुष्याला खुणावत असते. भूकंप, ज्वालामुखी, आदी या नवलाईची काही रूपे रहस्यमयी, विस्मयकारी आहेत तर धबधबे, सरोवर, गरम पाण्याचे झरे ही रूपे मनोहारी, आल्हाददायी आहेत. अशा विविध 25 नवलाईंमागील रहस्य, विज्ञान, कारणमीमांसा यांचा उलगडा अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेत प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी निसर्गाची नवलाई मध्ये केला आहे. कोणत्याही वयोगटाच्या वाचकांना हे लिखाण आवडावे व त्यांच्या ज्ञानात भर पडावी. लेखक : प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे डॉ. मधुकर आपटे ,नागपूर प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर वर्धा रोड, नागपूर-15 पाने: ९२,किंमत : रू ९०/-

      September 29, 2012


  • कविता (3) आजचा कवी

    कविता लिहिण्यामागचा हेतु सत्य सांगणे की पैसा…

      September 29, 2010


  • मनी स्वप्न कल्लोळ (सुमंत उवाच – २०)

    सुमंत जयंत परचुरे. 

    असंख्य विचार मनात भरलेले असले की नक्की कशावर कृती करावी आणि कोणत्या गोष्टींना आहुती द्यावी हे सहसा कळत नाही.

      September 11, 2021


  • ६०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने

    ऑल इंडिया रेडिओसाठी माझी रेकॉर्डिंग सुरू होतीच. २२ डिसेंबर २००२ रोजी रेडिओसाठी माझे २००वे गाणे रेकॉर्ड झाले. माझ्या गाण्याच्या करिअरच्या सुरवातीपासून रेडिओ माझ्या पाठिशी उभा राहिला. या २०० गाण्यांनी मला प्रचंड आत्मविश्वास दिला. माननीय प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगन या रेडिओच्या संगीतकारांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही.

    ठाण्याच्या सरस्वती मराठी हायस्कूलच्या सुवर्णजयंतीननिमित्त आयोजित गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मी सुरेश बापट आणि मुकुंद मराठे यांच्याबरोबर गायलो.

    २००३ च्या कार्यक्रमांची सुरुवात ११ जानेवारी रोजी झाली. 'गोल्डन स्वान कन्ट्री क्लब'साठी मी गझलचा कार्यक्रम सादर केला. २००३ सालचा हा पहिला कार्यक्रम होता पण माझा हा ६००वा जाहीर कार्यक्रम होता. एक पुढचा मोठा मैलाचा दगड मी पार केला होता. पण अजून बरीच वाटचाल करायची होती. ही वाटचाल आधीपेक्षा सोपी वाटत होती. कारण गायनाच्या क्षेत्रात थोडे नाव झाल्यामुळे कार्यक्रम समोरून येत होते. कार्यक्रम मिळवण्यासाठीचे कष्ट आता कमी झाले होते.

    आर.सी.एफ. आयोजित नाट्यसंगीत आणि गझल यांची मैफल मी प्रल्हाद अडफळकर यांच्याबरोबर गायलो. युनायटेड जैन या संस्थेसाठी संदीप कर्नावट यांनी माझा कार्यक्रम क्रूझवर आयोजित केला. पाण्यावर तरंगत गाण्याची माझी पहिलीच वेळ होती. माझी मुलगी शर्वरी माझ्याकडे गाणे शिकत होतीच. या कार्यक्रमात तीही माझ्याबरोबर गायली. माझ्यापेक्षा शर्वरीने हा कार्यक्रम एन्जॉय केला. आता कार्यक्रमांची भौगोलिक कक्षा रुंदावली होती. दिल्ली, कलकत्ता, इंदौर अशा अनेक ठिकाणी प्रवास होत होता. सुप्रसिद्ध विको लॅबोरेटरीजच्या सुवर्ण जयंतीनिमित्त गोव्याच्या सिदादे दे गोवा या पंचतारांकित हॉटेलमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत मी गाणे सादर केले. ख्यातनाम गझलकार सुरेश भट यांना आदरांजली वाहणारा गझलचा कार्यक्रम संगीतकार अनिल मोहिले यांच्या समवेत ठाणे येथे आणि गोरेगाव पत्रकार संघासाठी मी गायलो. मुंबईच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते. ते सुरेश भटांचे जवळचे मित्र आणि गझलचे चाहते असल्याने सुरेश भटांच्या अनेक गझल त्यांनी तोंडपाठ पेश केल्या. मित्रावर आणि गझलवर प्रेम करणारी एक व्यक्ती म्हणून विलासरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू पहायला मिळाला.

    ‘शेजारी-शेजारी' चित्रपटाचे माझे आवडते संगीतकार विश्वासजी पाटणकर यांनी 'रामगाथा' हा रामायणावरील संपूर्ण नवीन गीतांचा कार्यक्रम बसवला. ही गीते अरविंद आगाशे यांची होती. या कार्यक्रमात माझ्याबरोबर दाढे-जोशी, श्रुतकिर्ती मराठे-बने, राजेश पंड्या हे गायक कलाकार होते. या मृदुला कार्यक्रमाचे प्रयोग आम्ही मुंबई, पुणे, नागपूर अशा अनेक ठिकाणी केले.

    -अनिरुद्ध जोशी

      July 26, 2022


  • माणसांना उभे करणारे शब्द !

    ” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी ! अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी –

      March 3, 2022


  • रुद्रा – कादंबरी – भाग २०

    न्यायमूर्ती श्री हरिप्रसाद यांचे कोर्ट, खचाखच भरलेले होते. त्याला तसेच कारणही होते. कोट्याधीश संतुकराव सहदेव यांच्या खुनाची केस त्या दिवशी सुनावणीस असणार होती. न्याय निष्टुर जजेस मध्ये हरिप्रसादांचे नाव बरेच वरच्या बाजूस होते.

      April 12, 2019


  • नानाऽ करते

    विजया मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या व्यावसायिक नाटकात त्याने सत्तारची भूमिका साकारली तर ‘पुरुष’ या नाटकात, गुलाबराव साकारला.. ‘पुरुष’ नाटक सादर करताना काही अतिउत्साही प्रेक्षक नानाचेच संवाद ऐकण्यासाठी इतर कलाकारांच्या सादरीकरणाचे वेळी थिएटरमध्ये गोंधळ घालायचे, अशावेळी तो व्यथित होत असे.

      January 19, 2022


  • हिमशिखरांच्या सहवासात – मनोगत

    हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, आध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील पर्वतशिखरे, नद्या, सरोवरे, मंदिरे, निरनिराळी स्थाने यांच्याशी जोडलेल्या कथा, मिथकं ऐकताना मन मंत्रमुग्ध होते. प्रत्येक भागातील चालीरिती, रिवाज, सण, उत्सव, श्रद्धास्थाने, देव-देवतासुद्धा वेगळ्या आणि त्यांना जोडले आहेत पुराणकथांचे, निरनिराळ्या घटनांचे संदर्भ! हे सर्व अनुभवायचे असेल तर अनवट वाटांवर केलेल्या पदभ्रमंतीसारखा दुसरा पर्याय नाही.

      June 27, 2022


  • मेरी

    मला मुलगी असती तर तिने असेच केले असते ! माझ्या मनात विचार चमकून गेला. या चार दिवसातल्या दवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण ! कारण माझ्या नजरेतला ‘बाप ‘ खोटा नव्हता ,आणि तिचे ते स्माईल ’कॉर्पोरेट‘ नव्हते .

      May 25, 2018


  • सचिन तेंडुलकर …सिर्फ नाम काफी है

    आज सचिन तेंडुलकर खूप भारी गाड्या वापरतो , भारी भारी वस्तू वापरतो परंतु तो कधीही गुर्मीने कुणाशी बोलत नाही . नाहीतर जरा पैसे आले अनेक माणसे गुर्मीत रहातात.

      December 10, 2021