वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….
September 15, 2025
श्रीदत्तगुरूंचे अखंड निवास स्थान असलेल्या गिरनार पर्वताचा भौगोलिक आढावा, जुनागढ संस्थान काळातील गिरनार, राजकीय संदर्भ, पुराणातील मान्यता, गिरनार पवर्तावरील मंदिरांची माहिती व त्याविषयीच्या कथा, दंतकथा, आध्यात्मिक संदर्भ अशी विस्तारीत माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रथमच येत आहे.
ह्या पुस्तकाचे मूळ लेखक जुनागढचे स्थानिक इतिहासकार प्रो. डॉ. प्रद्युम्न भ. खाचर हे आहेत. याचे मराठी भाषांतर सौ. वैजयंती गिरीश गुप्ते आणि श्री. गिरीश म. गुप्ते यांनी केले आहे.
August 23, 2025
August 7, 2025


प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणी, अनेक व्यथा, व्याधी असतात. त्यासकट आनंदी कसे रहायचे, स्वतःशी मैत्र कसे जोडायचे आणि परस्परांशी संवाद साधून या मैत्राला विश्वरुप कसे द्यायचे याच्या ५२ कथा या संग्रहात आहेत.
नीला सत्यनारायण यांचे हे २६ वे पुस्तक. प्रशासकीय सेवेत त्या जेवढ्या रमल्या तेवढ्याच साहित्याच्या प्रत्येक प्रांतात त्यांनी रसिकतेने पाऊल ठेवले. त्यांची पुस्तके विविध विषयांवरची असून कवितेपासून सुरुवात होऊन कथा, कादंबरी, ललित लेखन सर्व विषयांत त्यांनी लिखाण केले आहे. साहित्यकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.
August 30, 2025
August 28, 2025


August 23, 2025
December 15, 2025
December 15, 2025
January 10, 2025

कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ मंगलमूर्तीच्या नामोच्चाराशिवाय होतच नाही. श्री गणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचे असेल तर दोन पुराणांचा आधार घेता येतो. त्यापैकी त्यांच्या सगुण साकार स्वरूपाला आपल्यासमोर ठेवणारा ग्रंथ म्हणजे श्री गणेश पुराण.
माघ शुद्ध चतुर्थी भगवान श्री गणेशांच्या विनायक अवताराचा जन्मोत्सव. यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसाठी तयार करण्यात आलेल्या विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांच्या मधुर वाणीतील ‘श्री गणेश पुराण’ या प्रवचन मालिकेचे ‘मराठीसृष्टी’ निर्मित हे व्हिडिओ पुस्तक.
August 28, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti