औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.
गुरुर्र रमः गुरुर्र व्हिस्की, गुरुर्र वाईन जिनेश्वरः
मद्य साक्षात परब्रह्म, तस्मै श्री बियरे नमः
येत्या काही वर्षात चिमणी सारखा पक्षी जो आपल्या अवतीभवती सतत दिसायचा तो आजकाल माणसानी लावलेल्या नवीन शोधांमूळे दिसेनासा झालाय. यासारखी अनेक पाखरं जी आपल्याला माहीती ही नाहीत. यांच्या जाती नष्ट झाल्या तरी समजलेही नसेल किंवा समजणार ही नाही. मग अशावेळी आपण मानव जातीने यांचे संवर्धन करणे खरचं खूप गरजेचे आहे. नाहीतर निसर्गाचा ड़ोलारा कोलमड़तोच आहे. तो संपायला वेळ ही नाही लागणार .
माणसातल्या मर्यादा संपवण्यासाठी आणि त्याला एक परिपूर्ण बनवण्याचा घाट एक शास्त्रज्ञ सुरु करतात निसर्गाच्या विरुद्ध जावून निसर्गाला आव्हान करण्याचा प्रयोग ते मांडतात त्यात ते यशस्वी होतात का? कृत्रिमरीत्या उत्क्रांती शक्य आहे का आणि तिचे परिणाम काय असतील? माणूस खरच निसर्गाला आव्हान देवू शकेल का? मी प्रेषित कुलकर्णी सादर करत आहे उत्क्रांती !!!!
पाचवीपर्यंत असलेला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम आता बारावीपर्यंत बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयीन जीवनापर्यंत क्रीडानैपुण्य व शारीरिक शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. महाराष्ट्रासहित …..
वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची... कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त!
आणि हा माणूस कोर्टात म्हणतो: Are you sure that British will rule India upto 1960?
कसं काय माणूस म्हणायचं ह्याला...
तिकडे फ्रांस सरकार हैराण, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेला ते प्रकरण निस्तरताना...
सगळ्यांनी "असं कसं झालं? आपल्या जमिनीवरून इंग्रजांनी माणूस नेलाच कसा?" असं विचारून बेजार केलेलं...
फ्रांस सरकारने ते प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेलं. तिथल्या निर्णयानुसार सगळ्यांसमोर, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी, जाहीररीत्या, उभं राहून माफी मागितली.
बरं माफी ठीक आहे, पण प्रकरण पूर्ण मिटवण्यासाठी फ्रांस ने विचार केला, कदाचित हा माणूस, काळ्या पाण्याची शिक्षा झालेला, परत समुद्रात उडी मारेल आणि आपण त्याला वाचवू. म्हणून स्वखर्चाने, आपल्या Defense Ministry मधली एक पाणबुडी, भारतापासून पार अंदमान पर्यंत या कैद्यांच्या बोटीमागून नेली.
पण तसं काही झालं नाही. कैदी अंदमानला पोचले. शिक्षा सुरु झाली.
नारळाच्या काथ्या कुटायच्या, दोर वळायचा. नंतर ८ तास लोखंडाचा "कोलू" फिरवायचा.
हा माणूस, हे सगळं झाल्यावर, संध्याकाळी कैद्यांचे साक्षरता वर्ग घ्यायचा.
नंतर तुरुंगात परत गेल्यावर भिंतींवर कविता लिहून काढायच्या. "मर्मबंधातली ठेव हि" हे नाट्यगीत तुरुंगात सुचले त्यांना. तुरुंगातल्या आठवणी म्हणजे ह्यांच्यासाठी मर्मबंधातली ठेव! काय पण माणूस...
कैद्यांना घरातून मिठाई ऐवजी पुस्तके आणायला सांगितली आणि Library सुरु केली, तुरुंगात.
मुसलमान कैदी हिंदूंना बाटवायचे, तो प्रकार त्यांनी बंद केला. (म्हणून पुढे अंदमानहि पुढे पाकिस्तान व्ह्यायचा वाचला, कदाचित!)
या सगळ्या प्रकारांनी जेलर जाम वैतागला. कोणीही नियमाविरुद्ध वागत नाही म्हणून कारवाईही करता येत नव्हती. मग त्याने एक माणूस बोलावला, डांबर घेऊन. तुरुंगातल्या कविता लिहिलेल्या भिंती डांबराने रंगवून टाकल्या.
आता हा माणूस कविता पुसल्या म्हणून आपल्यावर हात उगारेल आणि मग आपण त्याला ठोकून काढू अश्या आनंदात जेलर होता. तर आमचे कवी, "Thank You" म्हणत Shake-hand करायला पुढे!
"अहो, त्या भिंतीवर लिहिलेल्या कविता पाठ झाल्या होत्या, दुस-या लिहायला जागा शिल्लक नव्हती. तुम्ही भिंती रंगवून भरपूर जागा केली."
असो... तर तिकडे मनासारखं काम झाल्यावर सरकारला पत्र लिहिलं "मी काही राजकारणात पडणार नाही. मला माफ करा. पण इथून सुटका करा."
सरकारने ह्यावर विश्वास ठेवला. कैद्याला भारतात परत आणला, पण स्थानबद्धतेत ठेवलं, रत्नागिरीत!
रत्नागिरीत जातीभेद निर्मुलनासारखी राजकारणाशी (Directly) संबंधित नसलेली, समाजोपयोगी कामं, विरोध पत्करून करून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर सक्रीय राजकारणात पडून सरकारचा विश्वासघात केला.
(जातीभेद कमी करण्यासाठी पतितपावन मंदिर उभारलं, तिथली पहिली पूजा, भंग्याच्या हातून करवली, गाभा-यात जाऊन!)
सरळ-सरळ विश्वासघात.. पर्याय नव्हता, Plan पूर्वीच ठरला होता... माफीपत्र काय उगीच दिलं नव्हतं...
हा माणूस हे सगळं करत असताना त्यांचे कुटुंबीय काय करत होते? लपून होते? शोक करत होते? अजिब्बात नाही...
इंग्लंड मधून स्वयंपाकाच्या सामानाच्या नावाखाली निघालेले बाँब नाशकात आले आणि अचानक, हो अचानकच, त्यांची वाहिनी आणि बायको यांना दिवस गेले, खोटं नाही, नाशिक पोलिसांचा Report आहे तसा.
हं, मग ह्या दोघी delivery साठी सुरत, गुजरात ला निघाल्या... आगगाडीने. गुजरात मध्ये बंगालच्या कोणीतरी दोघी आल्या होत्या. ह्या दोघींनी, त्या दोघींना, आपले दिवस deliver केले आणि नाशकात परत आल्या. नाशिक पोलिसांचा report आहे, बाँब कसे transfer झाले यावरच्या सफाईचा. त्यांनी स्पष्ट म्हटले आहे, "देवकीची मुलं यशोदेकडे जातात". बरं, गरोदर बाईची झडती घ्यायची परवानगी नाही, पोलीस काय करणार...
वाचताना गम्मत वाटेल पण त्या दोघींनी आपापल्या पोटावर, साडीच्या आतून, बाँब बांधून नेले होते, आगगाडीतून, चेष्टा नव्हे!!! आपण फक्त कल्पना करायची...
हे अख्ख कुटुंबच वेगळं होतं.
ह्या कुटुंबाला सरकारने काय दिलं? मोठ्या भावाला २५ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा दिली, लहान भावाला अटक केली, ह्यांना अटकेचे वॉरंट (ते कान्हेरेनी पिस्तुल वापरलं, हां, ते.). सगळं घर, जमीन, शेती, भांडी सुद्धा जप्त केली. सगळी bank accounts seal केली आणि वर वाहिनी आणि बायको ह्यांना कुणीही घरात घ्यायचे नाही, घेतल्यास घरावरून गाढवाचा नांगर फिरवू, घर पाडू अशी ऑर्डर...
५-६ वर्ष ह्या दोघी, माहेरी, गुरांच्या गोठ्यात राहत होत्या.
हे सरकार भारताविरुद्धच होतं, पण गम्मत ऐकून ठेवा...
आपल्या सरकारने, भारत सरकारने, आजतागायत ती property त्यांच्या वंशजांच्या ताब्यात दिलेली नाही...
त्यांचं नशीबच वेगळं होतं. इंग्रज सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन तुरुंगात टाकलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा, भारत सरकारने, कोंग्रेस सरकारने, गांधी-वधाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं...
(रत्नागिरीत तुरुंगात ठेवले असताना त्यांना ज्या हातकड्या घातल्या होत्या त्या अक्षरशः आपण उचलूही शकत नाही... )
पुराव्या अभावी निर्दोष सुटले ते, सुटणारच होते. नथुरामला ह्यांनी कटात मदत करण्याची काय गरज होती? तो नथुरामच्या बुद्धीचा अपमान आहे.
तर, स्वातंत्र्यानंतरही, स्वातंत्र्यासाठी लढणा-या, आयुष्य वेचणा-या या मनुष्याला तुरुंगवास भोगावा लागला...
देशाचे दुर्दैव, दुसरे काय?
अखंड भारत अंगण व्हावे !
राष्ट्र ध्व्जासह निशाण भगवे!
हिंदुत्वा तू अमर करावे !
हेच मागणे आता....
विनायका घे पुनर्जन्म आता !!!!
कुशाग्र बुद्धिमत्ता, इतिहास, राजकारणाचा गाढा अभ्यास-व्यासंग, द्रष्ठेपणा, मुत्साद्दिपणा, तेजस्विता, अचाट असा बौद्दिक व शारीरिक पराक्रम, अजोड असे प्रभावी वक्तृत्व, अभ्यासू संभाषण कुशलता, व्यासंगी लेखकत्व, असीम त्याग, अतुलनीय धैर्य, निष्काम स्थितप्रज्ञता, तत्वचिंतक कर्मयोगी, महाकवी, आत्मविश्वासुवृत्ती यांचा सुरेख संगम म्हणजे तात्याराव विनायक दामोदर सावरकर.....!!!
बऱ्याचवेळा मित्रांकडून ऐकलेले हे एका जागृत देवाचे मंदिर पाहण्याचा मला योग आला. हे देऊळ वेंगुर्ल्यामधील शिरोडा येथे आहे. वि. स.खांडेकर शिरोड्याचे तर क्रिकेट विक्रमादित्य सुनील गावस्कर, साहित्यिक जयवंत दळवी, लालजी देसाई हे अरवलीचे आहेत.
सर्व वाईट शक्तींवर वचक ठेवणारा शक्तिवान देव म्हणजे वेतोबा ! प्रशस्त मंदिर आणि गंभीर पण तितकेच देखणे असे देवाचे रूप ! हा देव त्याच्या मुलुखात रात्री गस्त घालतो. त्याची पावले खूप मोठी. त्यामुळे भक्तगण त्याला सुमारे २।।- २।। फुटांच्या चामड्याच्या चपलांचे जोड अर्पण करतात.केळ्याचा पूर्ण घडच देवाला अर्पण केला जातो.तुम्ही आज चपला अर्पण केल्यात तर उद्या सकाळी त्या चपलांवर , देवाने वापरलेल्याच्या खुणा दिसतात, अशी तेथे भक्तांची श्रद्धा आहे.
--मकरंद करंदीकर
प्रथम त्यांनी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपटांचे खेळ (मॉर्निंग शो) लावायला सुरुवात केली. नंतर पुण्यातील दैनिकांत चित्रपटाच्या जाहिराती देण्यासाठी स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. त्याचबरोबर ‘अजय फिल्म डिस्ट्रिब्युटर’ ही वितरण संस्था काढून मराठी चित्रपटांचे वितरण सुरु केले.
माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची .
इंजिन आणि डबे रोज बदलली जायची, पण, एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा...
आज न राहवून मी थांबून त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले , "बाळ तू रोज गार्ड होतोस ,तुला कधी इंजिन कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला , "बाबूजी मला घालावयास सदरा नाही मग माझ्या मागे कोण येणार ?"म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो..
"हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले.. त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला.
आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काहि ना काहि कमतरता असणारच .तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.
त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई बापावर रागावून रुसून रडत बसता आले असते, पण, तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला व जीवनाच्या खेळाचा अंग बनून राहिला.
मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचा अंग व्हायचे आहे .सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...
*Be positive and be happy*
एकाद्या परक्या देशात जर आजारी पडलात तर त्यांच्याच भाषेत बोला. नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायचा !!
अमेरिकेत एका भारतीयाला रस्त्यातच असतांना हृदयविकाराचा झटका आला. कोणीतरी त्याला अँब्युलन्समध्ये उचलून घेतले. तो भाविक गृहस्थ देवाची प्रार्थना करण्यासाठी सतत त्याच्या नावाचा जप करत होता.
“हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् …..”
त्याला घेऊन अँब्युलन्स त्याच्या घरी गेली.
त्याच्या पत्नीने विचारले, “याला तुम्ही थेट हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला नाहीत?”
समोरुन उत्तर आले, “काय करणार? त्याने हट्टच धरला होता हरी होम, हरी होम, हरी होम, हरी होम, हरी होम… ” (लवकर घरी न्या, लवकर घरी न्या, लवकर घरी न्या, )
तेव्हा सावध असा !!!!
Copyright © 2025 | Marathisrushti