शेअर्स मार्केट एक चांगली गुंतवणूक
कालचीच गोष्ट सकाळी-सकाळी अंगणातल्या झेंडूंच्या फुलांना पाहत होतो. एक मधुमाशी चेहऱ्याजवळ घोंघावत आली चक्क मानवी आवाजात म्हणाली, 'ए थेरड्या' बघतोस काय, समोरची बादली उचल आणि फुलांवर पाणी घाल. क्षणभर मी गोंधळलोच, काय करावे सुचेनासे झाले. ती पुन्हा ओरडली 'मुकाट्याने पाणी फुलांवर टाकतो, कि दाखवू इंगा'. बालपणीची आठवण जागी झाली. दचकून म्हणालो, घालतो बाबा, पण एक सांग फुलांवर पाणी कशाला घालायचे. मुर्खा एवढे कळत नाही, फुल पाण्यात भिजले कि त्यातले परागकण हि भिजतील. भिजलेले पराग पियुन मला 'पातळ आणि भरपूर मधु' बनविता येईल. स्वस्त असे पातळ मधु विकून आमचा मालक हि चांगली कमाई करेल.
काही इलाज नव्हता, मुकाट्याने फुलांवर पाणी घालू लागलो. अचानक दुसर्या दिशेने दुसरी मधुमाशी वेगाने येताना दिसली. जवळ येऊन तीही ओरडली, पांढरेकेस वाल्या, ते पाणी घालणे थांबव आधी. मला काही समजेनासे झाले, पहिल्या मधुमाशी कडे बघितले, दुसरी जोरात ओरडली, 'कळत नाही का, फेक ती बादली. मी चुपचाप पाण्याची बादली खाली ठेवली. हिम्मत करून तिला विचरले, ती फुलांवर पाणी घालायला सांगते आणि तू पाणी घालू नको म्हणते, का? हा काय प्रकार आहे. दुसरी मधुमाशी म्हणाली, वाळक्या फुलांच्या पराग पिऊन मी चांगले घट्ट असे मध बनविते. हिच्या सारखे, मधात पाण्याची भेसळ नाही करीत. आमचा मलिक दर्जेदार घट्ट मध विकतो. मी फुलांना पाणी घालणे थांबविले आहे, हे पाहून पहिल्या मधुमाशीला राग आला, ती माझ्यावर जोरात डाफरली, फुलांच्या वर पाणी घालतो कि नाही थेरड्या कि तुला शिकवू धडा? दुसरी तेवढ्याच त्वेषाने ओरडली, तिचे ऐकू नको, माझ्या दंश तिच्यापेक्षा जालीम आहे. काय करावे मला सुचले नाही, शेवटचा मार्ग पाण्याची बादली खाली ठेऊन खोलीच्या दिशेने धूम ठोकली. कानावर फक्त ऐकू आले, पळतो आहे हरामखोर, सोडणार नाही तुला.
आई...ई, करत जोरात ओरडलो. डोळे चोळीत उठलो. सौ. पण दचकून जागी झाली. काय झाले? मी म्हणालो, बहुतेक मधुमाशी डसली वाटते. सौ.ने काही नाराजगीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, इथे बंद खोलीत कुठून मधुमाशी येणार, डास चावले असतील. काहीच्याबाही विचार करत राहतात आणि असले भुक्कड स्वप्न तुम्हाला पडतात. माझी हि झोपमोड होते. बाय द वे चावली कुठे? मी म्हणालो, चावली नाही ग. गालाचे चुंबन घेतले. सौ. पुढे काही बोलली, नाही चुपचाप अंगावर पांघरून घेऊन, पाठ फिरवून झोपून गेली. स्वत:ला मनोमन दाद दिली, बायकांची बोलती बंद करायचा चांगलाच अनुभव आहे, अस्मादिकांना.
सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे फिरायला गेलो. येताना ओळखीच्या किरणाच्या दुकानासमोर थांबलो. समोर रेकवर मधाच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत होत्या, चाचपत-चाचपत हळूच त्याला विचारले, हे मध पातळ वाले आहे, कि घट्टवाले? त्याने विचित्र नजरेने मजकडे पाहिले आणि तेवढ्याच हळू आवाजात विचारले, अंकल, आज सुबह सुबह ही....डोक्यावर हात मारला..च्यायला मधुमाशींच्या चक्करमध्ये येऊन मद्य.ssपी ठरलो (काका, मद्याला शिवत सुद्धा नाही, हे आता कुणाला खरे वाटेल).
डिस्क्लेमर: या कथेचा विज्ञापनांशी काही एक संबंध नाही.
-- विवेक पटाईत

एस.टी.चं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेचं अनोखं नातं आहे. तसंच एस.टी. स्टॅन्डलाही अनेकांच्या जीवनात महत्वाचं स्थान आहे.
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्याचं हे स्टॅन्ङ….राज्यात जर बसस्थानकांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली तर परीक्षकांना पहिला नंबर काढताना फार विचार करावा लागणार नाही….
छायाचित्र - सतिश लळीत
तन-मन हलकं होऊन नवनविन अचाट कल्पना सुचायची जगभरात दोनच ठिकाणं. 'पायखाना' आणि 'मयखाना'..!
दोन्ही ठिकाणी 'बसायला' लागतं..
आणि गम्मत म्हणजे कल्पनांचं जन्मस्थान असणाऱ्या या दोन्ही ठिकाणांचा आपल्या समाजात सभ्य ठिकाणी उच्चार करण असभ्यपणाचं मानलं जातं..!
(टीप - पायखानाचा अर्थ स्वत: शोधणे.)
उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात हवेत अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता.
निशा-रात्र
सर्वात खालच्या 50 गुंठ्याच्या जाड काळ्या मातीच्या तुकड्यात व गोविंदा बाबाच्या वाट्याने केलेल्या 15 गुंठे पट्टीत असा एकूण सात ट्रक ऊस म्हणजेच 84 टन उस संगमनेर कारखान्याला गेला होता. नानांनी त्यांची पूर्ण ताकद उसाला लावलेली होती . गावातील व आजूबाजूची सर्व शेतकरी मंडळी नानांच्या या पीक उत्पादन पद्धतीचे जिकडे तिकडे नवल करत होती.
काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल?
जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला चित्रकार मार्क खैसमन याने एक वेगळीच कला विकसित केली आहे. हा चित्रकार जे माध्यम वापरतो ते ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. आपण पॅकिंगसाठी जी दोन इंच रुंदीची, खाकी रंगाची टेप वापरतो, तीच टेप म्हणजेच या मार्क खैसमनचं कलाकृती सदर करण्याचं मुख्य माध्यम. या टेपचेच लहान-मोठे तुकडे करुन, ते एकावर एक चिकटवून त्याने काही अफलातून पेंटिंग्ज तयार केली आहेत. ज्याप्रमाणे स्टेन्ड ग्लासमधून प्रकाश आरपार जातो आणि त्यातून त्रिमितीसारका इफेक्ट मिळतो तसाच इफेक्ट या चित्रांमधूनही मिळतो.
सोबतच्या चित्रातील ही खुर्ची पहा. ही कलाकृती स्पेनमधल्या एका चित्र संग्राहकाने तब्बल ८६,९८० डॉलर्स मोजून विकत घेतली.
या कलाप्रकाराला म्हणतात “पार्सल टेप आर्ट” या कलाप्रकाराविषयी अधिक जाणून घ्या http://www.khaismanstudio.com या वेबसाईटवर. इथे तुम्हाला पहायला मिळतील एकापेक्षा एक कलाकृती.
या मार्क खैसमनच्या कलाकृती दाखवणारा हा एक व्हिडिओसुद्धा बघा.
https://www.youtube.com/watch?v=LSvZE8gZAyM
-- निनाद अरविंद प्रधान
Copyright © 2025 | Marathisrushti