पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील विजेता महिला बचत गटाने नावाप्रमाणे विजयी घोडदौड सुरु केली आहे. लेडीज पर्स व प्रवासी बॅगा बनविण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे.
गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.
१) महादेवाच्या पिंडीसमोर
उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ =
लांबी x रूंदी.
२) हिमालयातील काश्मिर
म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
बाजूंचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू
खणानारळाची,
ञिकोणाचे क्षेञफळ =
१/२xपायाxउंची.
४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
१९४२ ची चळवळ,
(सहा बाजू) वर्ग.....
हे घनाचे पृष्ठफळ
५) तीन पानांचा बेल त्याला
येते बेलफळ
लांबीxरूंदीxउंची..... हे
इष्टिकाचीतीचे घनफळ.
६) जुन्या हजार पाचशेच्या
बंद झाल्या नोटा,
खरेदी वजा विक्री
बरोबर होईल तोटा
७) मी आणि माझे विद्यार्थी
दररोज खातो काजू ...
चौरसाची परिमिती =
4 × बाजु.
८) खोप्यात खोपा
सुगरणीचा खोपा
विक्री वजा खरेदी
बरोबर होईल नफा
९) दहा किलो म्हणजे
एक मण...!!
घनाचे घनफळ
बाजूचा घन....!!
१०) जीवाला जीव देतो तोच खरा मित्र
गणित सोडवायला माहिती हवीत सुत्र
११) सम आणि व्यस्त हे
चलनाचे प्रकार
पहिल्यात असते गुणोत्तर
तर दुसर्यात गुणाकार
१२) "गोड" म्हणजे "स्वीट"..
"कडू" म्हणजे "बीटर"..!!
एक घनमीटर म्हणजे..
एक हजार लीटर....!!!!
१३) रविवार नंतर सोमवार
येतो,
रविवार नंतर सोमवार
येतो.....
प्रत्येक ऋण संख्येचा
वर्ग ...
नेहमीच धन होतो.
१४)महादेवाला आवडते
बेलाचे पान...
कोणत्याही ञिकोणात
एक बाजू...
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा
लहान....!!
१५) दोनचा वर्ग चार.... !!
चार चा वर्ग सोळा.... !!!!
गणिताचे उखाणे
घ्यायला,
सुवासिनी झाल्या गोळा..!!!
-- WhatsApp वरुन आलेला मेसेज
१९४२ सालचे चले जावं आंदोलन असो वा सविनय अवज्ञा अभियान अन्नपूर्णा महाराणांची कामगिरी वाखाणण्या सारखीच होती. ह्या सगळ्या काळात त्यांना अनेकदा जेल यात्रा करावी लागली. प्रत्येकवेळी कारावसातून मुक्त झाल्यावर त्यांचा इंग्रजद्वेष आणि देशप्रेम दुपटीने वाढत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. वेग-वेगळ्या कॉन्ग्रेसच्या सभांना त्या आवर्जून उपस्थित राहत.
नुकतीच एका ऑफिसमध्ये गेले होते. एरवी दुसऱ्या मजल्यावरच्या या ऑफिसमध्ये जाताना नेहमी जाणवायचं, जिन्यातले कोपरे लोकांनी पान खाऊन थुंकून घाण करून टाकलेत.
नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील एक पुतळा. जिवंत असताना या देशातील जनतेच्या म्हणण्यानुसार मी खरंच महापुरुष होतो की नाही हे मला माहित नाही, पण आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दीनदुबळ्यांना त्यांच्या अमानवीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. या कामाचा अवाका इतका मोठा होता की, मी जिवंत असेपर्यंत हे काम संपू शकण्यासारखं नव्हतं. माझ्या मृत्यूनंतर अनेकांना 'महापुरुष' होण्याची घाई झाल्यामुळे माझ्या जिवंत विचारांऐवजी माझे निश्चल पुतळे जागोजागी उभारणेच त्यांना जास्त सोईस्कर वाटले. माझ्या विचारांशी असलेल्या तथाकथित बांधिलकीची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या नावांनी राजकारणाची दुकानं थाटली. अनेक दुकानं म्हणजे जीवघेणी स्पर्धा आलीच व जीवघेणी स्पर्धा म्हणजे एकमेकाचे गळे कापणं हेही ओघाने आलंच!
माझ्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अनेक वर्षांमध्ये इकडे एकदाही फिरकण्याची इच्छा न झालेले एक नेताजी अपरात्री माझ्या दिशेने येताना दिसले आणि त्यांची माझ्यावरील निष्ठा बघून मला अक्षरश: गहिवरून आले. पण ते माझ्याजवळ पोहोचताच ती 'निष्ठा' नसून 'विष्ठा' आहे हे बघून मी हादरून गेलो. माझ्या काही लक्षात येण्याच्या आतच नेताजींनी त्यांच्या हातातील विष्ठेने माझा चेहरा माखून टाकला व क्षणार्धात ते अंधारात दिसेनासे झाले. पहाटे तरतरीत चेहऱ्याने मॉर्निंग वॉकला निघालेले 'तेच' नेताजी माझ्या पुतळ्याची अवस्था बघून प्रचंड संतापले आणि बघता बघता त्यांच्या कार्यकर्त्यांचा जमाव माझ्याभोवती जमला. माझ्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या दुसऱ्या एका नेत्याचे हे दुष्कृत्य आहे अशी बातमी अगदी सुनियोजितपणे पूर्ण शहरात पसरविण्यात आली व अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणारी दंगल पद्धतशीरपणे भडकवून मला विष्ठा फासणारे नेताजी अतीव समाधानाने त्यांच्या आलिशान बंगल्याच्या हिरवळीवर महागड्या व्हिस्कीचे घुटके घेत पुढील राजकीय डावपेचांची आखणी करण्यात गर्क झाले!
माझ्या पुतळ्यावरून झालेली पहिलीच दंगल ही परकीयांसाठी एक सुवर्णसंधी ठरली. अनेकांचे नाहक जीव घेणारी व असंख्यांचे संसार एका दिवसात उद्ध्वस्त करणारी ती दंगल शांत झाल्यानंतर एक दिवस माझी नजर माझ्या चौथऱ्याकडे गेली तर मध्यरात्री तिथे दोन परदेशी नागरिक गंभीर चर्चा करीत बसले होते. त्यांच्या हातात आपल्या देशातील पुतळ्यांच्या लांबलचक याद्या होत्या. पुतळ्यांच्या नावांसमोर त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचा तपशील लिहिला होता. कोणत्या पुतळ्याला केव्हा मानवीय विष्ठा, शेण किवा डांबर फासायचे, कोणत्या पुतळ्यांच्या गळ्यात चपला व जोड्यांचे हार घालायचे याची योजना तयार करण्यात ते गर्क झाले होते. चर्चेच्या शेवटी एक दुसऱ्याला अत्यानंदाने म्हणाला, ''या पुतळ्यांमुळे आपलं काम किती सोपं झालं. स्वार्थाच्या पोळ्या शेकण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचा वापर अत्यंत निर्लज्जपणे जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या देशात मनसोत्त* धुमाकूळ घालण्यास आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहे!''
परकीयांनी आमच्या वागण्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे म्हणूनच अगदी क्षुल्लक कारणावरून ते आमच्या देशात मोठ्या दंगली भडकवू शकतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ न निष्पाप नागरिकांना भडकवणारे स्थानिक नेते हे तर त्यांचे बिनीचे सरदारच! मी अंतर्मुख झालो असतानाच जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा पळणाऱ्यांना बघून आश्चर्यचकित झालो. एका नेत्याचे पोस्टर दुसऱ्या नेत्याने फ ाडल्यामुळे शहरात प्रचंड दंगल उसळली होती. त्या गदारोळात ते दोन परकीय नागरिक अचानक माझ्या दृष्टीस पडले. विलक्षण आनंदाने एक दुसऱ्याला टाळी देत म्हणाला, ''काल पुतळा, तर आज पोस्टर, तर उद्या आणखी काही. या देशात वर्षानुवर्षे हे असंच चालत राहणार!''
-- श्रीकांत पोहनकर, पुणे
98226 98100
जीवनकलेची साधना या स्वधर्म ग्रंथाचे महात्म्य
त्याचं बोलणं अगदी ओघवतं, आवाजात मृदुता, अॅक्टींग तसंच मॉडेलिंगसाठी अगदी परफेक्ट यष्टी, अगदी एखाद्या कलाकाराला पाहिजे तशी. मनोरंजन क्षेत्राच्या कोणत्याही प्रांगणात सहज वावरेल असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आत्तापर्यंत जाहिराती, चित्रपट आणि संगीतविश्वातही आपला अनोखा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कलेच्या विविध क्षेत्राचा अनुभव घेतलेल्या अंकुश पाटील सोबत खास गप्पा फक्त मराठीसृष्टी.कॉम वर…
सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान/राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं आणि त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला.
बडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती शुभ्र पाषाणाची संगमरवरी असून पुरुषभर उंचीची बसलेली आहे. मूर्ती शुभ्र संगमरवरी पाषाणाची आहे. कानाजवळ मदस्रावाचे चिन्ह म्हणून काळ्या रेघा दिसतात.
हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्पाने सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा यशस्वी प्रयोग करुन वीजेच्या भारनियमनावर मात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti