(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एका भारतीय सेल्समनची गोष्ट

    एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला. काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॅालमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली.

    दुसर्‍या दिवशी तो गृहस्थ कामावर आला. दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले.

    मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले. त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला.

    मालक चिडला व म्हणाला बाकीच्यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ! तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल. मालक चिडूनच पुढे म्हणाले किती डॅालरचा व्यवसाय केलास ? कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील असा विचार मालकाने केला.

    तो गृहस्थ म्हणाला दीड लाख डॉलर !

    क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच !

    बाकीचे सेल्समनही अचंबित झाले।

    मालक म्हणाले काय विकलेस तू त्याला ?

    तो म्हणाला एक मासे पकडायचा गळ विकला.

    पण त्याचे एवढे पैसे कसे? मालकाची शंका.

    मी त्याला फिशिंग रॅाडही विकला. मग गळाला लागणारे खाद्य विकले. मासे जास्त जिथे मिळतात त्या ठिकाणचे पाणी खोल आहे व तो भाग दुर्गम आहे, त्यायुळे बोटीने जावे लागेल, म्हणून आपल्या बेसमेन्टमधल्या गोडावूनमधून एक डबल इंजीनवाली मोटरबोट विकली. तिकडे आठवडाभर रहावं लागेल म्हणून पुरेल एवते खाद्य पदार्थ व दोन क्रेट बीयरही त्यालाच विकली सर !

    एव्हाना मालकाचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते, मालक म्हणाले कसला माणूस आहेस तू ? केवळ एक गळ विकत घ्यायला आलेल्या माणसाला तू हे विकून दाखवलेस!

    तो गृहस्थ म्हणाला, नाही सर, तो माणूस डोकेदुखीवरचे औषध व बाम मागत होता, मी त्याला पटवून सांगितले की, डोकेदुखी घालवायची असेल तर फिशींग करा, आणि हे सर्व घडून आले,

    मालक म्हणाले आजपास्नं तू माझ्या खुर्चीत बस बाबा! गुरु आहेस तू. कुठे काम करत होतास भारतात!

    तो म्हणाला सर, एल आय सी एजंट होतो !

  • प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू…..

    प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः ………….

  • मुंबईकर, पुणेकर आणि कोल्हापूरकर

    प्रिय पुणेकरांनो,
    एक गोष्ट लक्षात घ्या.... लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही.
    ..........एक मुंबईकर

    प्रिय मुंबईकरांनो ,
    आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची; Platform वर सारखं वाकून बघितल्याने Train लवकर येत नाही.
    .........एक पुणेकर.

    आणि प्रिय मुंबई आणि पुणेकरांनो एक लक्षात ठेवा.....

    "चितळे चे दुध आणि जंबो वङापाव' खाऊन बाँडी बनत नाही त्याच्यासाठी " मटण अन् ज्वारी ची भाकर " खावी लागते.

    एक कोल्हापुरकर

    हान लिंबू पिळून..!!

  • खरंच इतके महत्व द्यावे का?

    ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.
    इंग्रजी :-
    जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते? इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो ... अरेरे !!!
    गोरेपणा :-
    गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम तयार करुन दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात !
    रिअॅलिटी शो :
    यात तर सगळं ठरवुन केलं जातं आणि भारतीय मुर्खासारखे खरं समजुन बघत बसतात !? त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात हेच खुप मोठे दुर्दैव आहे !
    लग्नसमारंभ :
    बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग.. काही मुलींच्या बापांना तर 25 वर्षे जीव लावलेल्या मुलीच्या विरहा पेक्षा दिखावा महत्वाचा वाटतो !
    इंजीनियरिंगची पदवी :
    ७० % मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडु, देशभक्त बनन्यापेक्षा इंजीनियरिंग पदवी मिळवुन श्रीमंत बनावं असेच वाटते.
    बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का ??
    क्रिकेट :
    भारतात क्रिकेट हा खेळ नसुन धर्मच मानुन त्याची पुजा केली जाते ! लाखोंची सट्टेबाजी चालते ! भारतातील इतर अनेक खेळांना जगात डिमांड मिळते भारतात फक्त क्रिकेटच पाचवीला पुजलाय !
    सोने :
    जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवण्यासाठी भारतीय महिला जणु काय शपथच घेउन बैसल्यात ! त्याच सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते वा! काय छान दुर्दैव आहे !
    लोक काय म्हणतील ? :
    हे केले तर लोक काय म्हणतील... ते खाल्ले तर लोक काय म्हणतील... हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील.... अरे काय चाललय ?? लोकांच्या म्हणण्याने चालाल तर मुर्ख बनाल ! आत्महत्या करणारे पण हाच विचार करतात लोक काय म्हणतील ?? मी तर यांना अर्धवटच म्हणतो
    बोर्डाची परिक्षा :
    जगात कुठे इतके महत्व दिले जात नाही येवढे भारतात बोर्डाच्या परिक्षेला महत्व दिले जाते ! किती तरी मुलं तर बोर्डाची परिक्षा ऐकुनच येवढे घाबरतात की ते परिक्षेला सुद्धा जात नाहीत.
    परदेशी ब्रँड :
    ज्या वस्तु परदेशात कचर्यात टाकुन दिल्या जातात त्या गोष्टी भारतात लाखों रुपये मोजून खरेदी केल्या जातात ! जे पदार्थ परदेशात जनावरांना खायला देतात तेच पदार्थ भारतात कधी कधी माणसांच्या नावावर खपवले जातात...
    कसले हे दुर्दैव !
    भारतातील ज्या इतिहासाचा जगात आदर्श घेतला जातो तोच इतिहास भारतात चुकीचा आणि खोटा सिद्ध केला जातो !
    कमाल आहे राव ?

  • रुपयाची एकसष्ठी !!! (वास्तविका-मयुरटिका )

    रुपयाची एकसष्ठी !!! (वास्तविका-मयुरटिका )

  • कोकण विंशेष

    रतनागिरी कोकणचा एक चानगला शहर आहे.

    तरी सुददा बरेचशे लोग बेरोजगार आहेत.

  • एका मुंबईकराचं नानाला पत्र…

    प्रिय नाना पाटेकर,

    आपण एक उत्तम कलावंत आहात, महाराष्ट्रासाठी दुष्काळात देव बनून उभे राहिलात यात शंका नाही, आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही तुम्हाला एक कलाकार आणि आता एक समाजसेवक म्हणून डोक्यावर घेतलंय,आज तुम्ही एक वक्तव्य करू शकलात, ते प्रेक्षकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असल्यामुळेच, कारण तुमच्या जागी दुसऱ्या तिसऱ्या कलाकाराने असं वक्तव्य केलं असतं, तर त्याला फारशी किंमत मिळाली नसती किंवा त्यानं हिम्मत केली जरी असती तरी त्याला तुमच्या एवढं महत्व मिळालं नसतं,
    पण तुम्ही जे वक्तव्य केलंत त्याबद्दल थोडसं तुम्हाला थांबवावंसं वाटतं...

    29 सप्टेंबरला पोटभर भाकरीसाठीच अवघ्या 19 वर्षांचा मयुरेश घरातून बाहेर पडला होता, घरातला एकुलता एक आधार होता नाना..पण एल्फिस्टनच्या दुर्घटनेत गेला हो...काय दोष होता त्या मयुरेशचा पण गेला बिचारा,एकूण 23 निष्पाप बळी गेले या दुर्घटनेत !! पण नाना, या दुर्घटनेविषयी खंत व्यक्त करताना तुमचा जराही आवाज ऐकू आला नाही...नाना कुठे होतात तेव्हा? एकदातरी त्यांच्या कुटुंबियांना भेट द्या नाना..आजही मयुरेशच्या आई वडिलांच्या डोळ्यातल्या अश्रूची धार संपत नाहीय, ज्या वडीलांचा मयुरेश आधार होता, त्याच वडिलांना आपल्या मुलाच्या तिरडीला खांदा देण्याची वेळ आली, बघवलं नाही नाना...आजही ते चित्र डोळ्यासमोर ताजंय...

    काही दिवसांपूर्वी मुंबई तुंबली होती नाना,
    याची कल्पना असेल तुम्हाला,सगळेच मुंबईकर भाकरीसाठी बाहेर पडले होते, डॉक्टर अमरापूरकरसुद्धा..गेले ना, नाना ते.... कुठे होता तेव्हा?
    त्यादिवशीही भाकरी कमवण्यासाठी मुंबईकर बाहेर पडला होता, भाकरी तर नशीबी आली नाही पण छातीभर पाणी मात्र पियायला मिळालं होतं, त्या दिवशी भाकरी तर नशीबी आलीच नाही पण पावसाच्या पाण्यानं पोटाची भूक भागवली होती नाना... स्वतःच्या हाताने लोकं, लोकांना मदत करत होती. मुंबई जागच्या जागी थांबली होती, कोणाची आई, तर कोणाचे वडील तर कोन्ह्या कामावर जाणाऱ्या आईचं तान्हं बाळ घरी वाट बघत होतं, सर्व जण भाकरी कमावण्यासाठीच घराबाहेर पडले होते, नाना, मग मला सांगा दोष कोणाचा होता?,भाकरी कमवण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचा?, पावसाचा? का मुंबई महानगरपालिकेचा?

    स्पिरिट नावाची मजबुरी घेऊन मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगतोय...नाना या मुंबईकरांसाठी तुमचा ना मदतीचा हात मिळाला, ना तुमचा कधी आवाज ऐकू आला...कुठे होतात नाना?

    वाहतूक पोलिस कॉस्टेबल विलास शिंदे, नुसतं भाकरीसाठी नव्हे तर वर्षभरापूर्वी आपलं कर्तव्य बजावत होते, ड्युटीवर असताना हेल्मेट न घातलेल्या एका बाइक तरुणाला हटकले म्हणून त्या तरुणानं शिंदेंची डोक्यात बांबू घालून हत्या केली, सरकारचा दबाव असल्यामुळे खात्याकडून विषय दाबण्यात येत होता, पण माध्यमांनी तो पुढे आणला म्हणून कमीत कमी वाहतूक पोलिस कॉस्टेबल विलास शिंदे यांच्यावर हल्ला झाला ते तरी महाराष्ट्राच्या जनतेला कळालं.नाना काय चूक होती त्या कॉन्स्टेबलची...कर्त्यव बजावलं म्हणून विलास शिंदेही पोटभर भाकरी कमावण्यासाठीच बाहेर पडले होते ना? या घटनेनंतर तुमचा आवाज ऐकू आला नाही. महाराष्ट्रातला पोलीस एक दडपणाखाली जगतोय याची पुसटची कल्पना आहे का..?नाना, विलास शिंदेंची हत्या झाली कुठे होतात तेव्हा?

    घाटकोपर आणि पायधुनीची इमारत अचानक पत्यासारखी कोसळते, कोणाचं बाळ मरतं, कोणाची आई तर कोणाचे वडील या दोन्ही दुर्गघटनेत गेले. सगळेच तर भाकरीसाठी धपडतात ना नाना, कोणाला मरायची हौस आलीय..पण जेव्हा या दुर्घटना घडल्या तेव्हा पोटभर भाकरीसाठी कमावणारे हात दिसले नाही का? मुंबईत आज कसंबसं जगावं लागतंय, सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस घरी सुखरूप आला तर घरातल्यांचा जीव जीवात येतो,

    नवी मुंबईत सिडकोच्या खराब रस्त्यामुळे एक महिलेला आपला जीव गमवावा लागला, माहीत आहे का नाना आपल्याला? घरातून बाईक घेऊन निघालेला पोरगा रस्त्यावरच्या खड्यानं बळी पडतो, ही सर्व लेकरं भाकरी कमवण्यासाठीच बाहेर पडतात ना?मग त्यांच्यासाठी कधी बोलला नाहीत? तुम्ही फेरीवाल्यांच्या बाजूनं बोलू नका असं तुम्हाला कोण कधी बोलणार नाही पण मुंबईत काय घडतंय याची किमान माहिती तरी घ्या...

    नाना, पोटभर भाकरी मिळावी यासाठी तर तुम्ही आम्ही सर्वजण काम करतो, तुम्ही सिनेमात काम करता पोटभर भाकरीसाठीच, आम्ही कामाला जातो पोटभर भाकरीसाठी, फेरीवालेही काम करतात तेही पोटभर भाकरीसाठीच...पण एक लक्षात घ्या तुमच्या आमच्या भाकरीसाठी झगडण्यात आणि फेरीवाल्यांनी भाकरीसाठी झगडण्यात यात फरक आहे, जमिन आस्मानचा फरक आहे. तुम्ही शासनाच्या नियमाने काम करतात आणि फेरीवाले शासनाचे नियम पायाखाली चिरडून, चिंचोळ्या रस्त्यावरून जाताना दुतर्फा फेरीवाले असतात, कसातरी रस्ता काढावा लागतो, महिलावर्ग मोठ्यासंख्येने असतो एकदा कोणीतरी गर्दीचा फायदा घेत आपल्या आई-बहिणीला स्पर्श करायचा फायदा उचलतो, तर एकदा मुद्दाम धक्का मारतो, सॉरी बोलतो आणि पुढे जाऊन दात काढतो, कधीतरी अशा महिलांशी बोला त्यांच्या समस्या समजून घ्या मगच बोला...

    तुम्ही चित्रपट आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करताय आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण राजकारणातली वक्तव्य तुम्हाला शोभत नाही, तुम्ही आणि तुमचं कार्य खुप काही बोलून जातं पण शक्यतो अशी वक्तव्य करणं, मागे तुम्ही उद्धव-राज यांच्या एकत्र येण्यावर तुम्ही बोलला होतात, काय झालं? आले का?आता फेरीवाल्यांच्या मुद्दा तापला आहे, यामध्ये मराठी, अमराठी सर्वच फेरीवाले होरपळले आहेत, योग्य निर्णय देण्यासाठी शासन आहेच, आम्हाला तुम्हाला एक कलाकार आणि शेतकऱ्यांसाठी झटणारा नाना बघायची सवय झालीय, मकरंद अनासपुरे तुमच्याच सोबत काम करतात, पण त्यांना अशी वक्तव्यं करताना आम्ही कधी पाहिलं नाही, त्यामुळे राजकीय गरमा गर्मी सुरू असताना नको ती वक्तव्यं करणं टाळा, आणि जर वक्तव्य करायची ठरवली तरी सर्वच विषयांवर बोला आणि तोलून मापून बोला, नाहीतर ज्या चाहत्यांनी तुम्हाला डोक्यावर उचललं आहे ती जनता जमिनीवर आपटल्याशिवाय राहणार नाही...
    - वैभव परब
    9870993080

  • जानवे म्हणजे नेमके काय ?…

    जानवे म्हणजे नेमके काय ?...

    ◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो
    ◆दुसर्‍यावर अग्नी असतो
    ◆तिसर्‍यावर नवनाग असतो
    ◆चौथ्यावर सोम
    ◆पाचव्यावर पितर
    ◆सहाव्यावर प्रजापती
    ◆सातव्यावर वायू
    ◆आठव्यावर सुर्यनारायण
    ◆नवव्यावर विश्वदेव

    त्याचे तिन दोर्याचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात
    असे नऊ सुत्रिचे तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून 96 आन्गुळे दोरा लाबं असतो.

    नंतर त्याची ●ब्रह्मगाठ● दिलेली असती हि अद्वैताची गाठ म्हणजे जिव व ब्रम्हा एकच आहे.

    म्हणून जानवे घालणे हे शास्त्रीय प्रतिक आहे.

    ● 4 वेद
    ● 6 शास्र
    ● अठरा पुराणे जिवो ब्रम्हैव ना पर हिच शिकवण देतात
    ● 15 कला
    ● 12 मास
    ● 7 वार
    ● 27 नक्षत्र

    ● प्रकृती
    ● पुरुष
    ● महतत्व
    ● अंहकार
    ● पंच महाभुते
    ● पंच विषय
    ● पंच ज्ञानेद्रिय
    ● पचं कर्मेद्रिय
    ● व मन

    एकूण 25 आणि 4 वेद 3 काळ ( उन्हाळा हिवाळा व पावसाळा ) व रज सत्व तम हे तिन गुण मिळवून 96 होतात म्हणून जानव्याला 96 बोटे लाबं दोरा असतो
    माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात...

    तो गुण नवरत्नाकारू !
    यया नवरत्नाचा हारू !
    न फेङितले दिनकरू !
    प्रकाश जैसा !

    ○||●|| શુભં ભવતુ ||●||○

    आपल्या समाजसाठी उपयोगी येणारी आणि पुढच्या पिढीला माहिती देणारी पोस्ट आहे.

  • आयुष्यातले डिलीट

    संध्याकाळची साडेसात, आठ ची वेळ. आज शाळेत एकही ऑफ पीरियड नव्हता. त्यामुळे घरी आल्यावर खरतर, डोकं जाम कलकलत होतं. पण सासर्‍यांना रोज रात्री चारी ठाव स्वयंपाक लागत असल्याने, भराभर पोळ्या करत होते, आणि फोन वाजला. पोळी भाजणे सुरू ठेवून, डोकावून फोन मध्ये पाहिले, तर नीता फोन करत होती. मनात आले, "आता ही का फोन करत असेल?" पण मग ठरवले, जेवणे झाल्यावर निवांतपणे बोलूया. म्हणून नऊ नंतर फोन केला, तर म्हणाली, "अगं! आपल्या बहिणींचं गेट टुगेदर येत्या रविवारी दुपारी, शुभदा कडे करायचे ठरले आहे, तेव्हा तू यायचे आहेस." खूप आनंदाने तिला येते म्हटले आणि कधी एकदा रविवार येतो, असे झाले.

    घरातील सगळ्यांची जेवण्या खाण्याची सोय करून अकरा वाजता, शुभदा कडे पोहोचले. आम्ही मावस, मामे अशा आठ बहिणी जमलो होतो. हास्याचे गडगडाट, आणि संवादाच्या फैरी झडत होत्या. त्यात शुभाच्या हातची कडक कॉफी, गप्पांना रंगत आणत होती. लहानपणीचे किस्से, कुणा कुणाची फजिती आठवून, पुनः पुनः हसत होतो. त्याच नादात, खेळी मेळीत जेवणे झाली. आणि शुभा मला म्हणाली, "विभाताई तुला मी गॅलरीत फुलवलेली बाग दाखवते". म्हणून आम्ही दोघी बेडरूमच्या गॅलरीत आलो. शुभाने खूप मेहेनत घेऊन त्या येवढ्याशा जागेत सुद्धा अनंत, पारिजातक यांची छान निगा घेतली होती. फुलांनी डवरलेली ती गॅलरी बघून आणि अनंताच्या सुवासाने मन प्रसन्न झाले.

    तेवढयात हॉल मधून भांडणाचे आवाज येऊ लागले, म्हणून आम्ही दोघी पटकन तिथे आलो, आणि बघतो तर काय? नीता आणि वीणाची खडाजंगी जुंपली होती, आणि बाकीच्या त्यांना आवरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या. झाले होते असे की, बेताची बुद्धिमत्ता असलेल्या नीताची, वीणाकडून विनाकारण मस्करी केली गेली आणि त्याची कुस्करी झाली. ते शब्द तिच्या मनाला झोंबल्याने, वाद सुरू होऊन, भांडण विकोपास गेले. आता वीणाने कितीही वेळा क्षमा मागितली, तरी नीताने सर्व विसरून तिला माफ केले, तरच त्यांच्यातले संबंध सुधारले असते. झाल्या प्रकारामुळे, एक चांगले जमून आलेले गेट टुगेदर फिसकटले.

    घरी परतताना मनात आले, खरंच! आयुष्यात झालेल्या अशा अपमान, अवहेलना, दुःखद घटनांना, जोपर्यंत आपण जाणीवपूर्वक डिलीट करत नाही, तोवर आपले पुढचे आयुष्य आपल्याला सुखाने जगता येत नाही. कुठली गोष्ट किती धरून ठेवायची? हे शेवटी आपल्या हातात असते. नीता आणि वीणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, दोघींनीही झाली गोष्ट डिलीट करून, एकमेकींना आणि स्वतःला सुद्धा, माफ केले पाहिजे. कारण कधी कधी, आपण केलेल्या शाब्दिक, कायिक, मानसिक चुकांचा आपण फक्त पश्चात्ताप करत बसलो, तर त्याची बोच आयुष्यभर मनाला वेदना देत रहाते. अशा वेळी मोठ्या माणसांचे धीर देणारे शब्द आठवायचे, "चुका माणसांच्या हातूनच होतात". तेव्हा लवकर त्यांचा सल मनातून डिलीट करून, पुढे मार्गक्रमणा करायची. त्रास देणारे असे प्रसंग, इतकेच काय! तर अशा काही व्यक्तींना सुद्धा, आयुष्यातून डिलीट करून अदृश्य केले, की पुढचा प्रवास सुखाचा होतो.

    आजकालच्या नवीन तंत्रज्ञानात, व्हॉट्स ॲप ने सुद्धा, आपली ही सोय पाहिली आहे ☺️ चॅट करताना उगाच किंवा चुकून नको ते टाईप झाले आणि असे वाटले की डिलीट करावे, तर छानपैकी "डिलीट फॉर ऑल" चा पर्याय देऊन ठेवलेला आहे. तेव्हा कुणालाही न दुखवता तो वापरायचा आणि
    शांताबाई शेळके यांचे गाणे गुणगुणायचे,
    "जीवनगाणे गातच रहावे
    झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे...
    जीवनगाणे गातच रहावे !"

    सौ. अमृता विजय शेंडे.
    amu.shende4@gmail.com

    - सौ. अमृता विजय शेंडे.

  • कास्प आणि सी. एफ.आय. (C.A.S.P & C.F.I.)

    सर्वप्रथम या संस्थेला मी मनापासुन मानाचा मुजरा आणि लाख-लाख धन्यवाद देतो कारण;’कास्प’ ही एक अमेरिकान संस्था आहे आणि भारतातील गरीब गरजु मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत करते.