महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ढगांनी वेढलेल्या हिरव्या टेकड्यांवर सूर्याची पहिली किरणं स्पर्शून जातात आणि मनात एक अनामिक शांतता संचारते. काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नसतात; ती अनुभवण्यासाठी, आतून जाणण्यासाठी असतात. भारताच्या ईशान्य हिमालयात वसलेले, सिक्किम ही अशीच जादुई भूमी. निसर्ग, अध्यात्म, साहस, शांतता आणि सौंदर्य या सर्वांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.
November 14, 2025
रत्नागिरीची लोकसंस्कृती स्वभावतः कोंकणी असून जिल्ह्याचा अभिमानास्पद इतिहासाचे प्रतिबिंब येथील संस्कृतीत दिसून येते. अनेक शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे माहेरघर असलेले रत्नागिरी, व्यापार आणि निवासासाठी सोयीचे ठिकाण मानले जाते.
June 23, 2015
वाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुलगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषींच्या नावावरून हे नाव पडले असे मानतात. वत्सगुल्म, वंशगुल्म, वासिम वगैरे नावांचाही उल्लेख इतिहासात सापडतो.
June 26, 2015
सतत ओला व कोरडा ॠतू आलटून पालटून असणा-या व २००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. ही मृदा दक्षिण महाराष्ट्रातील कोकण परिसरात, कोल्हापूरचा प. भाग, सह्याद्रीचा घाटमाथा, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात आढळते. ही मृदा फळबागांसाठी उपयुक्त आहे.
लोह, जस्त व अॅल्युमिनीअमचे प्रमाण अधिक असल्याने या मृदेचा रंग लाल असतो.
December 7, 2016
एके काळी पुण्याचे उपनगर मानले जाणारे पिंपरी-चिंचवडची ओळख आता पुण्याचे जुळे शहर अशी करुन दिली जाते. या शहरात फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. टेल्को, बजाज, फिलिप्स यासारख्या मोठमोठ्या उद्योग समूहांचे येथे कारखाने आहेत.
June 29, 2015
यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे
June 26, 2015
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा गणपती. हे स्वयंभू स्थान आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंहासनारूढ आहे.
April 9, 2016
लक्झेंबर्गची शाही राजसत्ता हा पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या लक्झेंबर्गची लोकसंख्या २०११ साली ५,१२,३५३ इतकी होती. लक्झेंबर्ग ह्याचा नावाचे शहर ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 14, 2019
नागपूर स्थानकाच्या बाहेर एका लहानसा टेकडीवर हे श्री गणेश मंदिर आहे. टेकडी गणेश म्हणून ते प्रसिद्ध आहे. हे एक नागपुरातील प्रेक्षणीय स्थळ आहे. हा गणपती नवसाला पावतो असा अनेकांचा अनुभव आहे.
October 14, 2018
कापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
March 9, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti