वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

मी, प्रिया उपासनी, एक भारतीय नागरिक. भारत एक विकसनशील देश आहे. भारतात सद्ध्या खूप बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. रोज आपण पुढे पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. पण खरच आपण प्रगती करत आहोत का? आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि त्यापासून आपण दूर जात आहोत असे चित्र दिसत आहे. प्रगती, विकास जरूर व्हावा पण प्रकृतीकडे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहीजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बरोबर विरुद्ध दिसत आहे.
सुपिक शेतजमिनी विकल्या जात आहेत. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्त्यांची, विजेची व्यवस्था या संबधीत कोणताही विचार केला जात नाही. हे शहरी भागांपूरते मर्यादित नसून गावागावात सुद्धा हे चित्र दिसायला लागले आहे.
July 3, 2025
मुंबईची महालक्ष्मी. प्रमाणभाषेत तिला ‘महालक्ष्मी’ म्हणत असले तरी, बोलीभाषेत मात्र ती ‘महालक्षुमी’. मी या लेखात तिचा उल्लेख तसाच करणार आहे. मी मालवणी असल्याने मला ‘आई’पेक्षा ‘आवस’ हा शब्द अधिक जवळचा वाटतो, तसंच महालक्षुमी हे तिचं नांव मला अधिक भावतं.
October 31, 2018
मला बीयश्टीच्या बसचा प्रवास खुप आवडतो. बसचे डयव्हर-कंडक्टर तर मनुष्य स्वभावाचे नमुने असतातच, पण प्रवासीही काही कमी नसतात. कंडक्टर-प्रवाशांचे होणारे वाद-संवाद तर माणूस किती प्रकारे विचार करु शकतो याचा उत्तम नमुना असतो. मला बसचा प्रवास, त्याच्या गुण-दोषांसकट, समृद्ध करणारा वाटतो. प्रवास कितीही लांबचा असो, वेळ असेल तर मी बसचाच उपयोग करतो.
July 15, 2018
बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.
कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.
अमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशियामध्येकरतात. भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो. मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायो डिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे.
बायो डिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडी संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 10, 2021
आजच्या आधुनिक युगात मनुष्य health concious झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती calaries, calcium, vitamin मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. तो पदार्थ मशीनने बनला असेल तर निश्चिन्त होऊन विकत घेतला जातो. आपण खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून जागृत राहणे आवश्यक आहे.
October 13, 2021
एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं.
April 12, 2024
साध्या-सोप्या आयुर्वेदिक उपायांनी बरंच काही साधता येतं हे डॉ संतोष जळूकरांच्या `वजन कमी करण्यासाठी मोलाचे आयुर्वेदिक उपाय’ या लेखाने दाखवून दिलंय. या पोर्टलवरच्या अत्यंत लोकप्रिय लेखांपैकी तो एक लेख आहे. घामाच्या दुर्गंधीवरील हा लेखसुद्धा लोकप्रिय होईल यात शंकाच नाही.
October 22, 2010
आजकाल अनेकांना भारतीय मसाले आणि त्यांचे औषधी गुणधर्म याची महती पटू लागली आहे. चेहऱ्यावरची मुरुम त्वचेवरची बंद छिद्र यावर त्याचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. याबद्दल काही खास टिप्स.
दालचिनी : दालचिनीमध्ये अत्यंत उपयोगी असे जीवाणूनाशक घटक असतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारत दालचिनीचा चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांवर चांगला उपयोग होऊं शकतो. याची पेस्ट तयार करून ती पुटकुळ्यांवर लावता येते.
हळद : हळदीमध्ये प्रतिजैविकं आणि जंतुनाशकांचे गुणधर्म आहेत. याचा उपयोग उत्तम अँटी एजिंग घटक म्हणूनही होऊ शकतो. त्वचेवर लावण्यासाठीच्या अनेक मलमांमध्ये हळदीचा आवर्जून वापर केलेला असतो. यामुळे त्वचा उजळतेही. जर फेसपॅकमध्ये हळद आणि मधाचा वापर केला तर त्वचेला एक निराळीच झळाळी मिळते.
धने : चवीला छान असणारे धने हा अतिशय थंड पदार्थ आहे. रात्रभर धने पाण्यात भिजवून ठेऊन ते पाणी तुम्ही सकाळी डोळ्यांत ड्रॉप्स म्हणून टाकू शकता. या उपायामुळे डोळे स्वच्छ होतील शिवाय डोळ्यांना थंडावाही मिळेल. यामुळे डोळ्यांना छान चमक येईल.
काळी मिरी : काळ्या मिरीची पूड करून ती पुटकुळ्यांच्या किंवा मुरुमांच्या जागी लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. थोड्याशा दह्यात काळी मिरी पूड घालून ते मिश्रण लावल्यास मुरुमांवर त्याचा चांगला वापर होऊ शकतो.
आले : कायाकल्पामध्ये आल्याचा उपयोगी मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो. आल्याची पेस्ट थोडा वेळ त्वचेवर लावल्यास त्वचेचा पोत छान होतो. तसंच त्वचेवरील डागांवरही याचा चांगला उपयोग होतो.
लाल मसूर डाळ : जरी हा मसाल्याचा पदार्थ नसला तरीही ते एक उत्तम सौंदर्यप्रसाधन होऊ शकतं. यामध्ये अँटी टॅनिग गुणधर्म असतात. त्यामुळे या डाळीचा उपयोग फेसपॅकमध्ये करता येतो. बॉडी स्क्रब म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो. या डाळीची पूड, चंदन आशि हळद याचा लेप लावल्यास त्वचा छान राहते.
या मसाल्यांचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
चेहऱ्यावर कोणतीही पेस्ट लावताना ती योग्य प्रमाणात घ्या. तसंच ती डोळ्यांत जाणार नाही, याची काळजी घ्या.
काही मसाले केसांसाठी योग्य नसतात. त्यामुळे ही सौंदर्यप्रसाधनं केसांवर जाणार नाहीत, याचीही खात्री करा.
सौंदर्य प्रसाधन बाजारातील असो वा घरगुती आधी ते कोपराच्या आतल्या बाजूस थोडंसं लावून पाहा. त्याचा त्रास झाला नाही तर ते वापरायला हरकत नाही.
स्वयंपाकघरात तर मसाले जेवणात लज्जत आणतातच. पण हेच मसाले आपलं सौंदर्यही वाढवू शकतात.....
November 6, 2017
ज्या लोकांची पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होत नाही, त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीतच मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे पोट साफ नियमित कशी करावी.
सकाळी उठताच सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू आणि शेंदी मीठ मिसळून प्यावे. त्यामुळे बाउल मुव्हमेंट नियमित ठेवण्यास मदत होईल.
तज्ज्ञांच्या मते, फळांच्या ज्यूसमध्ये दूध मिसळून प्यायला हवे. तसेच ज्या फळांमध्ये गर असतो, त्यांचे थेट सेवन करा.
भोजनानंतर दालचिनी पावडरचे सेवन करा.
१०० मि.लि. पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे थोडा वेळ उकळा आणि भोजन करण्याच्या एक तास आधी ते पाणी प्या. तसेच भोजनानंतर ते मेथीचे दाणे चावून खा.
भोजनानंतर गूळही खा. त्यामुळेही पचन व्यवस्थित होते.
दररोज सॅलडचे सेवन करायला हवे. त्यात पालक, टोमॅटो, मुळा आणि काकडीचा समावेश असावा. तसेच सर्व प्रकारच्या फळांपासून बनलेल्या सॅलडचेही सेवन करायला हवे.
दिवसभर भरपूर पाणी आणि ताक प्यायला हवे; जेणेकरून कडक शौचास होणार नाही. तसेच भाज्यांपासून बनलेले सूप व वरण यासारख्या द्रवपदार्थांच्या सेवनाचेही प्रमाण वाढवा.
तंतूमय फळे व भाज्यांचे सेवन केल्यासदेखील शौचास कडक होत नाही आणि पचन व्यवस्थित होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
December 23, 2016
उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात.
December 29, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti