(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ९/११

    संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान :

    शेषराव मोरे यांच्या लेखाचें हेंच शीर्षक आहे, त्याअर्थी, तसें योगदान वास्तवात आहे, असें त्यांचें मत असल्याचें स्पष्ट आहे. मी या बाबतीत मोरे यांच्याशी सहमत आहे.

    • गेल्या कांहीं सहस्त्रकांचा भारताचा इतिहास पाहिला तर, भारताच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या काळात भिन्नभिन्न राजवटी होत्या. इ.स च्या आधीची कांहीं व इ.स.च्या सुरुवातीची कांहीं शतकें भारताच्या कांहीं भागात (महाराष्ट्राचाही कांहीं भाग) शक, कुषाण, हूण वगैरेंची सत्ता होती. मध्य युगात आसामातील कांहीं भागात ब्रह्मदेशाच्या सीमेवरून आलेल्या अहोम यांची राजवट होती. गेली जवळजवळ १००० वर्षें पाहिली तर, इ.स ११९२ (महंमद घोरी) ते १७५७-१८५७ पर्यंत (म्हणजे, पलाशीची, प्लासीची, लढाई ; गदर / स्वातंत्र्ययुद्ध) , या ५५०-६५० वर्षांतील बराच काळ, बर्‍याच भागात मुस्लिमांची राजवट होती (विजयनगर, राणाप्रताप, शिवराय, छत्रसाल, मराठे, हे कांहीं अपवाद) . १९४७ पर्यंत, म्हणजे शेदोनशे वर्षें परदेशी इंग्रजांची (जे प्रोटेस्टंट आहेत) राजवट होती. चारसाडेचारशे वर्षें गोव्यावर पोर्तुगीझांची सत्ता होती (जे रोमन कॅथॉलिक आहेत) , व कांहीं थोड्या भागावर फ्रेंचांची सत्ता होती. या भूभागात वेवगेगळ्या काळीं भिन्नभिन्न प्रादेशिक भाषा उदयाला आल्या व लोपल्या. एवढें सगळें होऊनही भारतातील भावनिक ऐक्य अढळ राहिलें. याचें कारण म्हणजे संस्कृतच्या साह्यानें भारतभर आधीच्या काळात (व नंतरच्याही काळात ) पसरलेली व स्थिरावलेली ‘कॉमन’ संस्कृती. एवढेंच नव्हे, तर, ही संस्कृती अनेक शतकें ‘Far East आशिया’मधील देशांमध्येही पसरली . इथें अभिप्रेत आहे ती, राजकीय-सत्ता नव्हे , धार्मिक-अधिसत्ता नव्हे ; तर भौगोलिक संदर्भात सांस्कृतिक-ऐक्य, हें आहे.
    • भारतीय परंपरा पाहिल्यास, आपल्या येथील बहुतांश लोक व विद्वज्जन, अन्य धर्मांप्रमाणें ‘एकाच पुस्तकाला’ (जसें, बायबल किंवा कुराण ) बांधील नव्हते. भारतात वेदप्रामाण्यही चाले व अवैदिक दर्शनेंही आहेत. एकेश्वरवार-अद्वैतवाद-द्वैतवाद-विशिष्टाद्वैतवाद-इहवाद-निरीश्वरवाद, अनेक विचारधारा नांदल्या आहेत. (इथें ‘वाद’ म्हणजे विचारधारा, असें अभिप्रेत आहे). अनेक पंथ आहेत. येथें वैविध्य हें natural समजलें जातें. भारतात वादसंवादाची परंपरा आहे. ( इथें ‘वाद’ म्हणजे मुद्देसूद , point-by-point डिस्कशन , पॉइंट-काउंटरपॉइंट , मुद्दा आणि त्याचें उत्तर, प्रश्न-प्रतिप्रश्न, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, अशा प्रकारची जी बौद्धिक चर्चा चाले, ती अभिप्रेत आहे. याचें एक उदाहरण म्हणजे, आद्य शंकराचार्य व पंडित मंडनमिश्र यांच्यात झालेला बौद्धिक ‘वाद’). इथें विद्वत्सभा होत, राजेही आपल्या पुढाकारानें अशा सभा भरवत. तिथें अनेक विषयांची गंभीर चर्चा चाले, विचार-वैविध्य स्वीकारलें जाई, फ्रीडम-ऑफ-एक्सप्रेशन, फ्रीडम-ऑफ-थॉट यांना मान होता. रामायण-महाभारत-भगवद्गीता-हरिवंश-भागवत, वगैरे ग्रंथांनीही भारतभर पसरून, या भूभागात संस्कृतिक एकात्म्य साधायला मोठी मदत केलेली आहे. अन्य विषयांच्या ग्रंर्थांनीही तेंच केलें, उदा. चरक-सुश्रुत-वाग्भट यांच्या ग्रंथांनी आयुर्वेद भारतभर पसरवला.
    • विविध विषयांचे ग्रंथ लिहितांनाही, ग्रंथकर्ता पूर्वसूरींचा सन्मानपूर्वक उल्लेख करून व त्यांची मतें मांडून, नंतर आपलें स्वत:चें भिन्न मत मांडत असे.भारतात, ‘यूनिटी इन् डायव्हर्सिटी’ खरोखरच होती, आणि ही ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यात संस्कृत भाषेचा मोठाच सहभाग होता / आहे.
    • या संदर्भात लोकमान्य टिळकांच्या, केसरीमधील अग्रलेखाचा कांहीं भाग पहा ( संदर्भ : ‘महाभारत : संघर्ष आणि समन्वय’ , लेखक – रवीन्द्र गोडबोले ) -

    ‘….लोकांच्या.आचारात किंवा विचारात जें कांहीं साम्य आहे तें महाभारत किंवा रामायण या आर्ष महाकव्यांमुळेच उत्पन्न झालें आहे ; व आजमितीस जागृत आहे. बंगाल्यात जा, काश्मिरात जा, किंवा मद्रासेत जा, रामायण-महाभारतातील कथा, उपकथा किंवा आख्यानें ही लोकांस सारखीच आवडतात, व त्यांच्या श्रवणानें एकसारखेच विचार त्यांच्या मनांत उत्पन्न होऊन भरतभूमीच्या राष्ट्रीय ऐक्याची साक्ष देतात… ’ .

    लोकमान्य टिळक हे थोर राजकीय नेते तर होतेच, पण ते संस्कृतचे आणि संस्कृती या विषयांचे मोठे विद्वान होते. ‘गीता रहस्य’, यासारखे तत्वज्ञानाधिष्ठित व ‘Orion’, ‘Artic Home In the Vedas’ यासारखे संशोधनाधारित ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. तेव्हां त्याचे एकात्मकेबद्दलचें मत ग्राह्य धरायलाच हवें.

    • राजोपाध्ये यांच्या एका ऑब्झर्वेशनबद्दल : मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद :

    ‘... मराठी अभ्यासविश्वात सांगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती ’ ( इति राजोपाध्ये ) :

    हा मुद्दा महत्वाचा आहे जरूर, पण तो मूळ विषयाशी डायरेक्टली संबंधित नाहीं, म्हणून, त्याचा परामर्श, मुद्दाम शेवटी, ‘ परिशिष्ट – (२) ’ मध्ये घेतला आहे.

    मात्र, मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद बर्‍यापैकी-व्यवस्थित मिळाला आहे , असें मला वाटतें.

    (पुढे चालू )

    -- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      October 12, 2016


  • कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!

    कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!

    संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणे ही बाब मानवी इतिहासात नवीन नाही. याआधीही अनेक साथीच्या रोगाचा सामना आपण केला आहे. आणि प्रत्येक वेळी आशा संकटांचा सामना करतांना माणसाची संयमी आणि संतुलित भूमिका कामी आल्याचे दिसून येते. मात्र दुर्दैवाने आपण इतिहासापासून बोध घेत नाही. सद्याच्या काळात तर माणसाची अवस्था कळतं पण वळत नाही, अशीच झाली आहे.

      March 20, 2020


  • तुझं-माझं नाही; तर आपलं महत्वाचं

    “मी आणि माझं” ह्या भावविश्वात अडकलेल्या व्यक्ती सहजीवानांत सकारात्मकता आणू शकतातच असं नाही. केवळ स्वतःपेक्षा दुसऱ्याचा, इतरांचा विचार करणारी व्यक्ती नकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत नाही. “अनेकदा मला खूप काही करायचं असतं, पण सहकार्यच मिळत नाही”, असे सूर अनेकांच्या तोंडून निघत असतात.

      March 3, 2022


  • किंकर्तव्यमूढम् !

    मुंबईत तरी रस्त्यातून चालताना फुटपाथ शोधणे हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. फेरीवाले व दुकानदारांचा असा समाज आहे की फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी नसून आपल्यासाठीच बांधण्यात आले आहेत. सर्व भारतीय नागरीकांस व्यवसाय करण्याचा हक्क आहे पण रस्त्यावर व फुटपाथ व्यापून किंवा त्यावर बसून नाही कारण तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही.

      December 24, 2011


  • डॉक्टर एम .एन .पटेल.. माझे गॉडफादर

    आज मी सतीश चाफेकर आहे…..त्याचे श्रेय मिशिगन इंजिनिर्सचे डॉक्टर पटेल याना द्यावे लागेल.

      May 2, 2021


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेबेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

    बाबा सांगतात...

    सांगेन गोष्टी हिताच्याच चार....

    निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत. केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे.
    तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला "जीवन" असा आणखी एक पर्यायवाची शब्द सांगितलेला आहे. जीवन सुखी होण्यासाठी सावध तो सुखी. नाहीतर सुखाच राहाणार. समुद्री चहुकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. अशी अवस्था होऊ नये, याकरता आधीच विचार करावा, असे आयुर्वेद सांगतो.

    याचा अर्थ असा नव्हे की, भविष्यात हाताच्या एखाद्या बोटाला चुकुन, अपघाताने, जखम झाली तर, "या जखमेचे रूपांतर पुढे कर्करोगात होऊ नये, म्हणून आत्ताच हे चांगले बोट आपण ऑपरेशन करून काढून टाकूया" असे म्हणण्यासारखे आहे. नाही का ? याला "प्रिकाॅशन" असे म्हणता येईल का ? आज व्यवहारात याला "प्रिकाॅशन" असे गोंडस असे नाव दिले जात आहे, आणि भीती उत्पन्न करून नको ती शस्त्रकर्मे जसे गर्भाशय निर्हरण, सिझेरीयन, अपेंडिक्स, थायराॅईड, पित्तखडे, मूतखडे आणि अगदी ह्रदयातील ब्लाॅकदेखील, लगेच इमर्जन्सीच्या नावाखाली, ही शस्त्रकर्मे केली जात आहेत. हे मी नव्हे तर अमीरखान सारखा सत्यशोधक सत्यमेव जयते मधून सांगतोय. पद्मभूषण डाॅ. बी एम हेगडे देखील आपल्या युट्युब मधील अनेक व्हिडिओ मधून सांगताहेत. हे व्हिडिओ शांतपणे यु ट्युबवर जरूर पहावेत.

    मनात भीती कधी उत्पन्न होते ? जर अभ्यास नसेल तर. जर एखाद्या विषयाचा अभ्यास झालेला असेल तर परीक्षेत नापास होऊ अशी भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अमुक गोष्ट केल्यावर, ती जाणून घेतल्यावर, तुला भीती वाटण्याचे काही कारणच नाही, याची खात्री पटली की, भीती उत्पन्न होतच नाही, असे विवेकानंद म्हणतात. म्हणजेच अज्ञान हीच सर्वात मोठी भीती आहे. ही अंधश्रद्धा नाही. मी जर आरोग्याच्या नियमांचे योग्य रितीने पालन करत असेन, तर मला भविष्यात काही रोग होईल, अशी भीती वाटण्याचे काही कारणच नाही.

    रोग झाल्यावर काय करावे, हे अभ्यासण्यापेक्षा रोग होऊ नयेत, म्हणून काय काय करावे, हे आयुर्वेदात खूप सखोल सांगितलेले आहे.

    रोग होऊ नये, यासाठी शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक या चारही गोष्टींचा साकल्याने विचार करावा. केवळ दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार विहार पथ्यापथ्य पालन करणे म्हणजे स्वस्थवृत्त नव्हे, हा शारीरिक अंतर्गत एक भाग झाला. इतर गोष्टी दुर्लक्षून कश्या चालतील ? आपल्याला जर पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करायलाच हवा. म्हणून हा आयुर्वेदीय हितोपदेश.

    काही जणांच्या मनात अज्ञानामुळे, अजूनही शंका आहेत, की " आई बाबा सांगतात" हे आयुर्वेदाच्या कोणत्या पुस्तकात सांगितले आहे ?
    कृपया आपली जातीयवादी विकृत दृष्टी, निदान आरोग्याच्या क्षेत्रात तरी, जरा बाजुला ठेवावी.

    जसे अग्निवेश, चरक, सुश्रुत होऊन गेले, तसे त्यानंतरच्या काळात 'वाग्भट' हे ग्रंथकार होऊन गेले. नागार्जुन, शारंगधर, काश्यप इ. अनेक ऋषी, आणि त्यांचे शिष्योत्तम, ही आरोग्य रहस्ये काळानुरूप त्यात योग्य ते बदल करीत, पुढील पिढीला देत गेले.

    गुरूशिष्य संवाद रुपात हे ज्ञानदान करण्याची भारतीय परंपरा जशी भगवद्गीता सांगितली, तशीच गुरूशिष्य संवादरुपी विवेचन या आयुर्वेदीय ग्रंथामधे देखील दिसते. शिष्य प्रश्न विचारतात, आणि गुरू त्या शंकेचे समाधान करतात. अशी ही परंपरा. पण दुर्दैवाने ही गुरुकुल शिक्षण परंपरा बंद पडली आणि महाविद्यालयीन चाकोरीबद्ध शिक्षण सुरू झाले....

    आई आणि बाबा हेच मोठे गुरू आहेत. जीवनाचे सार, चार हिताच्या गोष्टी, तेच अधिकाराने सांगत असतात. गुरुशिष्य परंपरा आई बाबा सांगतात, या नावाखाली सांगण्याचा हा प्रयत्न "वाग्भट" या ग्रंथाधाराने सुरू आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

      August 31, 2017


  • मानवतेचे दूत

    कोरोना नावाच्या दहशतीने आपले २०२० हे वर्ष गिळंकृत केलेले आहेच पण आता २०२१ ही त्याच्या कचाट्यातून सुटताना दिसत नाही. शतकातून एखाद्या येणाऱ्या या महामारीने आपल्या जगाला तीन प्रकारे उध्वस्त करण्याचे आरंभले आहे.

      June 14, 2021


  • अन्यथा असतो दंभी मेलो!

    कुठलाही संघर्ष किंवा कुठलेही भांडण घ्या, थोडे खोलात गेले तर लक्षात येते की ही केवळ अहंकाराची, श्रेष्ठत्वाची लढाई आहे. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर शिवसेना आणि मनसेतील संघर्षाचे घ्यावे लागेल. या संघर्षाकडे पाहणारा कोणताही त्रयस्थ माणूस हेच म्हणेल की ही सगळी मारामारी राज आणि उद्धव यांच्यातील अहंकाराची आहे.

      May 31, 2009


  • कोरोना ‘चक्रव्यूह’

    कोरोना ‘चक्रव्यूह’

    कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं ‘संयमा’स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय.

      April 16, 2020


  • त्या चौघीजणी

    चार वर्षांपूर्वी एक इमेल आली . IIM अहमदाबाद येथील प्रोफेसर पद्मश्री अनिल गुप्ता यांनी स्थापन केलेल्या Gujarat Grassroots Innovation Augmentation Network संस्थेच्या समर स्कुल ची. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पॉलिटेक्निक मध्ये इलेक्ट्रॉनिक्स च्या चौथ्या वर्षात जाणाऱ्या चार मुलींना त्यांच्या departmental mentor नी थोडे समजावून त्यात भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले.

      October 18, 2021