वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला.
सन 1905 मध्ये फ्रिट्झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला.
1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये सुमारे आठ लाख लोकांचा बळी घेतला. युद्ध संपल्यावर मग पिकाची वाढ करण्यासाठी तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात झाली. नंतर पुन्हा आय. जी. फ्राबेन या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाची निर्मिती केली.
महायुद्धाच्या शेवटी या वायूची निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचा हा अमोनिया, तसेच युद्धभूमीवर डास, माश्या, चिलटे मारण्यासाठी तयार केलेली डी.डी.टी. शेतीकडेच वळविण्यात आली. रासायनिक खतांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या पिकांवर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरडेन, डेल्ड्रीन, एन्ड्रीन, पॅराथिऑन, मॅलेथिऑन यांसारख्या कीडनाशकांची निर्मिती झाली.
खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती. ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले. सुरवातीला या तंत्राचे परिणामही तसेच होते. त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले. त्यासाठी शेतकरी बॅंका व या तंत्रांचे उत्पादक यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले.
अनुदान, कर्जामध्ये गुंतली शेती
आधुनिक तंत्रे, अनुदान, कर्ज यांनी अमेरिकन शेतकरी, सरकार यांच्यावर जणू ताबा मिळविला. त्यानंतर कंपन्यांची दृष्टी अधिक फायद्यासाठी तिसऱ्या जगाकडे वळली. जागतिक बॅंक व अमेरिकी सरकारने ही तंत्रे स्वीकारण्यासाठी भारतावर दडपण आणले. त्यासाठी प्रचंड पैसा पुरविण्यात आला. त्याच सुमारास भारतात दुष्काळाने थैमान घातल्याने भारत सरकारने जनतेचे पोट भरण्यासाठी या सर्वांचा स्वीकार केला.
1) अनुदान, कर्ज या आकर्षक वेष्टनांतून आलेल्या कीडनाशकांचा भारतातील वापर झपाट्याने वाढू लागला. 1966 पासून 1978 पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षांत रासायनिक खतांचा वापर एक दशलक्ष टनांपासून 50 दशलक्ष टनांपर्यंत वाढला.
2) हेक्टरी खतांचे प्रमाण 3.5 किलोपासून 50 किलोपर्यंत वाढले. नंतर 1950 पासून 2001-02 मध्ये हे प्रमाण 170 पटींनी वाढले.
3) रासायनिक कीडनाशकांच्या वापराचे प्रमाण 1971 ते 1994-95 पर्यंत 100 टक्क्यांनी वाढले. या वाढत्या खर्चाबरोबर दुर्दैवाने शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये तेवढी वाढ झाली नाही. अतिप्रमाणात वापरलेली रासायनिक खते, कीडनाशकांनी नापीक झालेली जमी न आणि शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा ही मुख्य कारणे यामागे आहेत.
4) 1977 मध्ये कर्नाटकमधील मालनाड येथे घडलेली घटना "हंडी सिंड्रोम' या नावाने प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात भातासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशके वापरली जात. पिकावर फवारलेली कीडनाशके पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती. या शेतांमधील खेकडे खाल्ल्याने सुमारे 200 मजुरांना पॅरालिसीस दिसून आला. खेकड्यांच्या शरीरात भातासाठी वापरलेल्या कीडनाशकांचे अंश सापडले. असे खेकडे या मजुरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला होता.
5) जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त 1.25 पीपीएम एवढ्या प्रमाणात डी.डी.टी.चे अंश सापडले, तर फारसा त्रास होत नाही. पण दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत या शहरातील नागरिकांच्या चरबीमध्ये सुमारे 20 पीपीएम एवढे डी.डी.टी.चे अंश सापडल्याचा अहवाल "डाऊन टू अर्थ' या मासिकात प्रसिद्ध झाला.
6) पंजाबमध्ये हरितक्रांतीचा उच्चांक साधला गेला. आज पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातून गंगानगर येथील कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कर्करोगाने आजारी रुग्ण रोज एक रेल्वेगाडी भरून जातात. दुर्दैवी गाडीचे नाव "कॅन्सर एक्स्प्रेस' असे लोकांनी ठेवले आहे.
त्यामुळे आज आपणा सर्वाना गरज आहे जैविक शेती व जैविक खतांची....
August 31, 2016
आज कालच्या आया मुलांच्याबद्दल अतीदक्ष असतात, त्यामुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यासही असमर्थ ठरत आहेत. उदाहरण द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांना सुद्धा आया आज हात धरून रास्ता ओलांडून देतात, त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे, किव्वा अती वर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यावर सुद्धा हीच स्थिती दिसते. हि स्थिती साधारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, व श्रीमंत घरात प्रामुख्याने दिसत आहे.
मी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला तिचे नाव स्वराली ठेऊ, तिच्या घरी सोडण्यासाठी गेलो, गाडी घराच्या विरुद्ध बाजूला उभी केली असता, गाडीतून उतरून रस्ता ओलांडणे तिला जमत न्हवते. रस्ता ओलांडण्यासाठी तिला जवळपास 5-7 मिनिटे लागली. निरीक्षण करताना असे दिसले कि येणाऱ्या दोन चाकी व चार चाकी गाडीचा तिला अंदाज येत न्हवता. दूरवर गाडी असतानाही केवळ येणारी गाडी किती सेकंदात इथे पोहोचेल हा अंदाज न ठरवता आल्यामुळे ती बावचळून आहे त्याच जागी उभी राहिली.
एकुलती एक असल्यामुळे तिची आई तिला खूप जपते, इतके कि, सायकल सुद्धा बिल्डिंग च्या आवारात फिरवायची, तसेच स्वरालीला साधे खरचटलेले सुद्धा आईला चालत नाही, लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते, या मुळे स्वराली सायकलवरून पडली, किव्वा घरात तिला थोडे हि लागले तरी, जोरजोरात रडते, कारण सहनशीलतेचा अभाव उत्पन्न झाला आहे. पायात काटा गेला, बोटात सुई, किव्वा टाचणी टोचली, हातापायाला खरचटले आणि जरासे रक्त दिसले तरी घरचे वातावरण गंभीर होते. आपण हि पिढी पंगू तर करत नाही ना? याचा विचार करा.
लहानपणी मुले खेळताना पडली पाहिजेत, त्यातून त्यांना सहनशीलता येते, वेदनेचा दाह शमवण्याची सवय होते तसेच संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. नाजूक मुले भविष्यात नाऊमेद , किव्वा अपयशी होण्याची शक्यता अधिक. संघर्ष शक्ती कमी राहिल्यास भित्रेपणा वाढतो, याचे पर्यावसन म्हणजे पराधीन, परावलंबी जीवन जगण्याची वेळ येते, तसेच धाडसी निर्णय घेताना मन कचरते.
आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तू सुद्धा काढायला घाबरतात, उंच जागी चढताना आईच्या कडून धीर मिळत नाही तर पडशील, घसरशील, तुला जमणार नाही, उतर कुणालातरी बोलावून करूया, असे शब्द ऐकायला मिळतात. या मुलांच्या आया, आणि बाप मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किव्वा वॅन मध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची कीव येते. आज सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत याचे नवल वाटते.
पाश्चिमात्य देशात मुले आपल्या सायकल पंक्चर स्वतः दुरुस्त करतात, त्यांच्याकडे त्याचे किट असते, यात सर्व हत्यारे असतात, ज्याचा वापर करून मुले आपली सायकल स्वतः दुरुस्त करतात.
नवीन पिढीतील मुलांना स्वावलंबी करणे हेच खरे पालकत्व आहे. त्यांना शर्टाचे किव्वा ड्रेस चे बटन लावणे, इस्त्री करणे, आपापले कपडे धुणे, सकाळी उठल्यावर स्वतःची चादर घडी करून योग्य ठिकाणी ठेवणे, पुस्तकांना कव्हर लावणे, बूट पॉलिश करणे, सर्व चप्पल-बूट जोड नीट एक रेषेत ठेवणे, वेळ प्रसंगी भांडी धुणे, कचरा साफ करणे हे आलेच पाहिजे. लाड खाण्यापिण्याचे करा, कामात लाड वर्ज्य आहेत.
हे सर्व शिकवले नाही तर, नवीन पिढी कमजोर, कर्तृत्वहीन होईल. पालकांनो तुमचे विचार बदला, आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहेमी सांगितले आहे,
पडे-झडे माल वाढे, हे खरोखरीच सत्य आहे.
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
June 8, 2017
‘गिरिजाकाकू! शरदची बिल्कुल चिंता करू नका! धन, कनक, सुलक्षणी कांता नि अखंड लक्ष्मी भरभरून वाहणारी शुभयोगाची पत्रिका आहे त्याची…’ भविष्यवेत्ते दामले गुरूजी आईला सांगत होते…
May 6, 2023
अहंकार म्हणजे गर्व, गर्विष्ठपणा, स्वतःच्या श्रेष्ठत्वावर वाटणारा एक उन्मत भाव, एक वाईट स्वभाव, इतरांना कमी लेखणारे विचित्र वागणे. अहंकारामुळे आपण फक्त नातेसंबंध नाही तर आपल्यातली माणुसकी सुद्धा संपवतो. ही कथा आपल्याला शिकविते की कधीही गर्व करू नये. अहंकार बाळगू नये.
June 19, 2020
आपल्याला लहानपणी खारुताईचं चित्र असलेलं एक वॅफल पॅकेट मिळायचं. बऱ्याच जणांना ते आवडत होतं. पण वेळ जसा पुढे सरकत गेला तसं ते पॅकेटही कालबाह्य होत गेलं. बऱ्याच लोकांना ते अजून डोळ्यांसमोर येत असेल पण काय करणार ते पॅकेट आता मिळत नाही. अशांना मी आज वॅफल कसं बनवतात ते सांगणार आहे.
August 24, 2020
साधारण पणे वाटाण्याच्या आकाराची हि फळे असतात आणि त्या फळांच्या आत काळी चमकदार बी असते.ह्याचे काटेरी झाड असते.
ह्यांना एक विशिष्ट असा उग्र वास येतो.ब-याच
जणांना कदाचित हे फळ माहित नसेल तसा ह्याचा आपल्या स्वयंपाकामध्ये फार वापर होतो असे देखील नाही पण गोवा कोकण प्रांतामधील लोक ह्याचा थोडाफार वापर आपल्या काही विशिष्ट खास व्यंजनांमध्ये आवर्जुन करतात.
प्रामुख्याने ह्याचा उपयोग माशाच्या जेवणामध्ये केला जातो.कर्ली,बांगडे ह्या माशांची आमटी करताना अथवा शाकाहारी पदार्थ म्हणजे गोव्यात बनविले जाणारे भाज्यांचे खतखते ह्यामध्ये तिरफळे वापरली जातात.कारण माशांच्या आमटी मध्ये वापरण्याने मासे पंचायला सुलभ होतात.आणि त्या पासून अजीर्ण होत नाही.तसेच ह्याच्या विशिष्ट वासाने माशांचा विशिष्ट गंध कमी होतो(मी दुर्गंध म्हणणार नाही कारण आमचे शरीर ह्या माशांवरच पोसलेले आहे.
तिरफळे चवीला तिखट,कडू असतात आणी ती ब-यापैकी उष्ण असतात.त्यामुळे ती शरीरातला वात व कफ दोष कमी करतात व पित्तदोष वाढवतात.
जसे ह्याचा उपयोग भोजनात होतो तसाच ह्याचा उपयोग काही घरगुती उपचारांमध्ये देखील केला जातो बरे का!
चला मग पाहूयात तिरफळाचे औषधी उपयोग:
१)वातामुळे अंगात कळा येत असतील तर १/४ चमचा तिरफळ चुर्ण मधातून घ्यावे.
२)अजीर्ण झाले असल्यास तिरफळ चुर्ण गूळामध्ये मिसळून त्याच्या गोळ्या कराव्यात व त्या तूपासोबत घ्याव्यात.
३)पोटात गॅस झाला असल्यास १/४ तिरफळ चूर्ण+२ चिमूट हिंग+१ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण घ्यावे गॅस कमी होतो.
४)जुन्या आमवाता मध्ये १/४ चमचा तिरफळ + १चमचा एरंडेल हे मिश्रण रात्री झोपताना ४२ दिवस घ्यावे ह्याने पुष्कळ फरक पडतो.
५)पोटात दुखून उचक्या येत असल्यास १/२ चमचा तिरफळ चुर्ण+२ चमचे मध+१ चमचा साजुक तूप हे मिश्रण वारंवार चाटावे.पण एॅसीडीटी असणा-यांनी हा उपाय करू नये.
अतिप्रमाणात ह्याचे सेवन केल्याने एॅसीडीटी,व तोंडात उष्णतेचे फोड येणे ह्या तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 9, 2016
कन्नुदादा गेला, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. आईचं सगळं क्रियाकर्म आटपून कन्नुदादा घरी परतला तोच तापाने फणफणत. ताप, खोकला आणि उपाशी पोट. दुसऱ्या दिवशी म्यूनसिपालिटीच्या दवाखान्यात नेलं त्याला. टेस्ट केली आणि ती positive आली.
August 28, 2022
जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं.
December 23, 2021
सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत.
माझा जन्म.....
माझा जन्म हा ….
माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
या पृथ्वीवर ….
जन्म घेण्याशिवाय
मला
दुसरा पर्यायच नव्हता ....
प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. नराचा शुक्राणू आणि मादीचं पक्व बीजांड यांचं संयोग झाला म्हणजे अपत्य पिढीच्या सजीवाचा गर्भपिंड निर्माण होतो, मादीच्या गर्भाशयात त्याची वाढ होते आणि प्रजातीनुसार, ठरलेल्या काळानंतर, अपत्य पिढीचा अेक सजीव, मादीच्या शरीराबाहेर येअून, या पृथ्वीवर स्वतंत्रपणं जगू लागतो. यात, अपत्य पिढीच्या सजीवाला काहीही पर्याय नसतो. निसर्गनियमानुसार त्याचा जन्म होतो.
वनस्पतींच्या बाबतीतही हे खरं आहे. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संयोग होअून, फुलातून, त्या प्रजातीचं फळ निर्माण होत.
जनक पिढीचा जन्मही याच प्रकारानं झालेला असतो. त्यांना तरी कोणता पर्याय होता? त्यांच्या आअीबाबांनी त्यांना जन्माला घालून या पृथ्वीवर आणलं होतं. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म ……
ही साखळी अशीच चालू होती.
मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे.
आता कवितेचं दुसरं कडवं वाचा.
बाबांचा शुक्राणू...
त्यांच्या मातापित्यांच्या ....
अनेक पूर्वपिढ्यांतील ....
आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आला ...
आअीचं बीजांड ...
तिच्या मातापित्यांच्या .....
अनेक पूर्वपिढ्यांतील ....
आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आलं ...
बाबांचा शुक्राणू ... आअीचं बीजांड
....माझा जन्म
आणि …
आअीबाबांच्या आनुवंशिक तत्वाचा ....
पुनर्जन्म..
मागच्या अनेक पिढ्यातून माझ्या पिढीपर्यंत अेक चेतना संक्रमीत होत आली हे ही विज्ञानीय सत्य आहे.
सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.
गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग - 2
शनिवार 3 डिसेंबर 2016
December 3, 2016
लेखिका ह्या काव्यलेखन व ललितलेखनाबरोबरच डिझायनिंगबाबत सल्लागार म्हणूनही कार्यरत असून त्यांचा इंटिरिअर डिझाईनिंगचा ‘वास्तुआर्ट’ नामक व्यवसाय आहे.
July 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti