वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज मी तुम्हाला अशा एका कलाकाराबद्धल माहिती सांगणार आहे की ज्याच्या नावापासूनंच नशिबाने त्याची थट्टा मांडली , पण जो पुढे जाऊन एक असा अद्वितीय कलाकार बनला की ज्याच्या नावाशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उभा रहाण्याची कल्पनाच करवत नाहि! चला तर मग या हकीकतीकडे…..
June 6, 2024
पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी किंवा गुलाबी असतात.मुळ मोठे बळकट,पांढरे व वाळल्यावर त्याला पीळ पडतो.
ह्याचे उपयुक्तांग बी,पाने व पंचांग अाहे.
आता आपण हिचे गुणधर्म पाहूयात:
पांढरी पुनर्नवा चवीला तिखट,गोड,कडू,तुरट असते.हि उष्ण असून हल्की व रूक्ष असते.
तांबडी पुनर्नवा चवीला कडू व थंड गुणाची व हल्की असते.
पांढरी पुनर्नवा त्रिदोषशामक असून लाल पुनर्नवा वात वाढविणारी व पित्तशामक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जखमेवर पुनर्नवाचा लेप लावतात.
२)सुज आली असता पुनर्नवाच्या पानाने शेकतात.
३)हि लघ्वी साफ व्हायला मदत करते त्यामुळे शरीरातील क्लेद बाहेर टाकला जातो.
४)पुनर्नवा शरीरातील सर्व धातूंचे पोषण करून रसायन कार्य करते.
५)शरीरात रक्त कमी असल्यास पुनर्नवा यकृताचे कार्य सुधारून रक्त वाढिला सहाय्य करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 22, 2017
शिरो दृष्टि हृद्रोग शूल प्रमेहज्वरार्शो जरायक्ष्महिक्काविषार्तान् |
त्वमाद्यो भिषग्भेषजं भस्म शंभो
त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय ‖ १५ ‖
जगद्गुरूंच्या अफाट संदर्भ विश्वाची चुणूक दाखवणारा हा श्लोक. आरंभीच्या दोन चरणात त्यांनी विविध रोगांची सूची सादर केली आहे.
शिरो - डोक्याशी संबंधित रोग,
दृष्टि- दृष्टीशी संबंधित रोग,
हृद्रोग- हृदयाशी संबंधित रोग,
शूल - आयुर्वेदात वर्णिलेले वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, आमज, वातश्लैष्मिक, पित्तश्लैष्मिक तथा वातपैत्तिक हे आठ प्रकारचे शूल म्हणजे आतून काटा टोचल्याप्रमाणे वेदना देणारे रोग,
प्रमेह- यौवनांगाशी संबंधित रोग, प्रदर रोग,
ज्वर- आयुर्वेदात वर्णिलेले वातजन्य, पित्तजन्य किंवा रसगत, रक्तगत, मांसगत, मज्जागत इ. सर्व प्रकारचे ताप,
अर्श- मूळव्याध, गुदद्वाराशी संबंधित रोग,
जरा- म्हातारपण, त्यामुळे येणारे रोग,
यक्ष्म- फुफ्फुसे तथा श्वास यंत्रणेत होणारे क्षयरोग,
हिक्का- पोटात समान आणि कंठात उदान वायु च्या प्रकोपाने निर्माण होणारे उचकी, ठसका इत्यादी रोग,
विषार्तान् - विषाच्या परिणामाने होणारे रोग,
अशा प्रकारच्या अनेक रोगाने माणूस ग्रस्त होतो. अशा सर्व रोगांनी त्रस्त असणाऱ्या जीवांसाठी,
त्वमाद्यो भिषग्- आपणच आद्य म्हणजे श्रेष्ठ भिषग् म्हणजे वैद्य आहात.
भेषजं भस्म शंभो- हे शंभो ! या सर्व रोगांवर आपल्या दृष्टीने भस्म हेच औषध आहे.
अर्थात आपल्या चरणकमलांवरील भस्मानेच हे सर्व रोग दूर होतात.
त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय - हे भगवंता माझे शरीर हलके करण्यासाठी मला या रोगां मधून दूर कर.
रोग झाले की शरीर जड होते. त्यामुळे शरीर हलके कर अर्थात मला निरोगी कर. तसेच शेवटी या जड शरीरापासून मोकळे करून मुक्ती प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 24, 2020
मूळ महिकावती म्हणजे आजचे केळवे माहीम – जिल्हा पालघर. अनेक राजवंशांनी महिकावतीवर राज्य केले. व्यापारसमृद्ध शूर्पारक (म्हणजे नालासोपारा) आणि महिकावती संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्ध होते. रोम राज्याशी इथला वाणिज्यसंपर्क भरपूर होता.
October 9, 2025
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दि. 28 एप्रिल 2016 रोजी 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम' (आयआरएनएसएस - IRNSS) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) पूर्णत्वास गेली आहे. या यंत्रणेचे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी 'नाविक' असे केले आहे.
इस्रोने आयआरएनएसएस 1जी (IRNSS-1G) या उपग्रहाचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक 'पीएसएलव्ही सी-33' (PSLV-C33) द्वारे दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी उपग्रह त्याच्या कक्षेत स्थिर करण्यात आला. सात उपग्रहांच्या मालिकेतील हा शेवटचा उपग्रह होता. हा उपग्रह साधारणतः महिनाभराच्या कालावधीत पूर्णपणे कार्यान्वित होईल. सात उपग्रहांच्या मालिकेतील पहिला उपग्रह जुलै 2013 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. 'नाविक'च्या पूर्णत्वामुळे जगभरात स्वतःची 'जीपीएस' यंत्रणा विकसित करणारा भारत हा तिसरा देश ठरला. अमेरिकेशिवाय रशियाची ग्लोनास ही यंत्रणा कार्यान्वित आहे, तर युरोपियन महासंघही गेल्या तीन वर्षांपासून जीपीएस यंत्रणेसाठी प्रयत्नशील आहे. मात्र अद्याप युरोपियन महासंघाची यंत्रणा पूर्णत्वास गेलेली नाही. चीन व जपान या देशांच्या प्रादेशिक पातळीवरील स्थितिदर्शक प्रणाली कार्यान्वित आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करणारा भारत हा जगभरातील तिसरा देश ठरला आहे.
अशी आहे यंत्रणा
या यंत्रणेत पृथ्वीभोवती 36 हजार किमी उंचीवरून भ्रमण करणारे सात उपग्रह, भूभागावरील देखरेख आणि नियंत्रण करणारे नेटवर्क आणि लाभार्थींचा प्रत्येकी एक छोटा रिसिव्हर यांचा समावेश होतो. प्रत्येक उपग्रहाचे वजन सुमारे 1,400 किलो असून त्यावरचे सौर पॅनल 1400 वॅट ऊर्जा पुरवतील. यातील प्रत्येक उपग्रहासाठी 1,500 कोटी, प्रक्षेपकासाठी प्रत्येकी 130 कोटी आणि भूभागावरील यंत्रणेसाठी एकूण 300 कोटी रुपये खर्च आला आहे.
अशी काम करते यंत्रणा
'जीपीएस'द्वारे आपल्या ठिकाणांची माहिती अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची या तीन मितीमध्ये समजते. उपग्रहाकडून आलेल्या रेडिओ संदेशांचे रिसिव्हरद्वारे विश्लेषण केले जाते आणि त्यानुसार ती व्यक्ती जमिनीपासून किती उंचीवर कोणत्या अक्षांश, रेखांशावर आहे हे ठरविले जाते. यासाठी किमान तीन उपग्रहांचे संदेश आवश्यक असतात. अवकाशातील उपग्रहांच्या कक्षांची मांडणी अशी असते की पृथ्वीवरील यंत्रणाव्याप्त प्रदेशाच्या कोणत्याही ठिकाणापासून कोणत्याही क्षणाला या प्रणालीतील चार उपग्रह दिसू शकतात. त्या ठिकाणच्या जीपीएस रिसिव्हरपासून त्या चार उपग्रहांचे अंतर वेगवेगळे असते. उपग्रहांचे स्वतःचे ठिकाण आणि अचूक वेळ ही माहिती आणि प्रकाशाचा वेग यांच्या योगे पृथ्वीवरील रिसिव्हर उपग्रहापासूनचे स्वतःचे अंतर याची गणना करतो. त्या अंतरातल्या फरकाचा उपयोग करून त्याच्यामध्ये असलेल्या संगणकाच्या साह्याने स्वतःच्या स्थानाबद्दल अचूक माहिती आणि वेळ प्राप्त होते.
यंत्रणेची वैशिष्ट्ये
एकूण सात उपग्रह कार्यान्वित. या उपग्रहांकडून मिळणारी माहिती स्मार्टफोनवर थेटपणे वापरता येणार 20 मीटर अंतरापर्यंतची अचूक माहिती मिळू शकणार व्याप्ती - भारताचा संपूर्ण भूभाग तसेच बाहेरील 15 किलोमीटरचा पल्ला अचूक वेळेसाठी प्रत्येक उपग्रहात आण्विक घड्याळ 12 महिने 24 तास अखंड सेवा मिळणार. उपयुक्त आयुष्य 12 वर्षे असणार शेजारी देशांनाही सेवा देणार
मिळणाऱ्या सेवा
स्थितीदर्शन मार्गनिरीक्षण मानचित्रण, नकाशे तयार करणे दळणवळण सर्वेक्षण विमाने, नौका यांना दिशादर्शनासाठी हायकर किंवा पर्यटकांना दिशा दर्शनासाठी लष्करी उपयोगासाठीच्या इक्रिप्टेड विशेष सेवा आपत्ती व्यवस्थापनासाठी
September 16, 2017
महाराज बलीने तीन पाऊले भूमीचे दान दिल्यानंतर वामन रूपधारी भगवान विष्णूंनी त्याला दिव्य दृष्टी दिली. एका पावलाने संपूर्ण स्वर्ग तर दुसऱ्या पावलाने संपूर्ण पृथ्वी आच्छादित केली. त्या प्रसंगाचे वर्णन करीत आचार्य श्री भगवान विष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
December 15, 2020
प्रभो नाम तुझे । विंझाई । सगुण रूप तव आई ।
भत्त* कैवारी । महिमा हा । गाती सर्व ही आई ।।धृ0।।
प्रभो नाम तुझे ।
निर्गुण परब्रह्य । अनाद्य । अनामवासी आद्य ।
विंद्यवासिनी । अवतीर्ण । परब्रह्याते स्फुरण ।।
ऋृषी माकर्ंडेय । अत्रेय । ब्रह्यानन्दी दंग ।।1।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पुर्ण चैतन्य । प्रेमळे । शशि सूर्याहून आगळे ।
कोटी रविचे । तेजासी । न लागे तुलनेसी ।।
देव नारदा । सदानन्द । चित्ती ब्रम्हानन्द ।।2।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
वाघावर बैसे । अष्टभुजा । स्वरूप सुन्दर अनुजा।
विंध्यवासिनी । विझाई । ताह्मिणीची आई ।।
गणेश सुताला । आनन्द देई नित्यानन्द ।। 3।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
गायीका - वृषाली घाणेकर
October 15, 2015
सध्या आपण बघतो आपल्या राज्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे झाली आणि हाताशी आलेलं पिक भिजून वाया गेलं. अजून हवामान चांगले नाही. सध्या चांगले उन पडतांना दिसत नाही आकाशात ढग दिसतात आणि वातावरण मळबी होतं
April 14, 2015
आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-
अग्निदीपक - भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
अपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
अवलेह - साखरेचा गुळाचा पातळ पाक.
कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
काढा - काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.
कुपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
केश्य - केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.
चूर्ण - सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.
ज्वरघ्न - तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.
दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ.
पथ्य - शरीरास/आरोग्यास हितकारक
प्राणिज - प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.
पित्तशामक - वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
पित्तहारक - शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
फांट - घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.
भस्म - एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.
मारण - धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.
मूत्रल - शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.
रेचक - ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.
वटिका - गोळ्या
वांतिकारक - सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.
वायुकारक - वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
शोधन - शुद्ध करणे
स्नेहन - वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.
स्वरस - अंगरस. ओल्या वनस्पतीस कुटून व फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.
स्वेदन - घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.
हिम/शीतकषाय - घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.
हीनवीर्य - ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध..
संकलन :- श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच
-- WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार
October 21, 2016
२५ फेब्रुवारी १९३८ रोजी तत्कालिन बॉम्बेत फारुख मानेकशा इंजिनिअरचा जन्म झाला. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टिंमुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिला.
February 25, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti