देवाला अनेक ठिकाणी जायला जमत नाही म्हणून काही चांगली माणसे पृथ्वीतलावर कदाचित पाठवले असावीत.काही माणसांचे निष्पाप कर्म पाहून हाच विचार मनात येतो. प्रेरणेची पायवाट अजून काय असते?
June 7, 2026
संस्कारात वाढलेली पिढी आज निर्वात पोकळीत वाढत आहे.आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे. अशी गाणी आता इतिहासजमा झाली की काय?
फ्लॅट संस्कृतीत कोणी येतच नाही. टपाल किंवा खाद्यपदार्थ घेऊन येणारी माणसे, तीही ठरवून येतात. बोलावल्याशिवाय माणसाने येऊच नये अशी तजवीज माणसानी करून ठेवली आहे.नाच रे मोरा आंब्याच्या वनात ही गाणी मुलांनी कुठे अनुभवायची. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.पण दादाला आता सांगायची गरजच पडत नाही. दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ म्हणण्यासाठी दादी कुठे आहे?
June 16, 2026

वानरवर्गीय प्राण्यांनी आपली शेपटी गमावणं, हा उत्क्रांतीतला महत्त्वाचा टप्पा आहे. माणसाला असणारं माकड हाड हे त्या शेपटीचेच अवशेष आहेत. बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हे वानरवर्गीय प्राणी आणि आजचा माणूस यांच्यातला संबंध स्पष्ट करतं.
January 16, 2022
४ जुलै ही तारीख विशेषत अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनामुळे जगभर प्रसिद्ध असली, तरी विज्ञान, साहित्य, युद्ध, राजकारण आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटना देखील ४ जुलै रोजी घडल्या आहेत.
July 4, 2026

शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत.
May 31, 2023

पेंग्विन हे अंटार्क्टिकावरील जीवसृष्टीतलं एक वैशिष्ट्य आहे. मात्र या न उडणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य फक्त अंटार्क्टिकापुरतं मर्यादित नाही. पेंग्विनच्या काही जाती अगदी विषुववृत्ताजवळच्या प्रदेशांतही आढळतात. पेंग्विनच्या आज अठरा जाती अस्तित्वात असून, त्यांतील अंटार्क्टिकावर आढळणारी एम्परर पेंग्विन ही जाती आकारानं सर्वांत मोठी आहे.
March 3, 2023
ऋग्वेदात एकीकडे वस्तू निर्माण करणारा तक्षा, कर्मार वगैरे कारागीर आहेत, तर दुसरीकडे विश्व निर्माण करणारा विश्वकर्मा आहे. (ऋ. १०.८१-८२) तत्कालीन विद्वान ऋषींना विश्वाचे शिल्प घडविणाऱ्या शिल्पकाराला विश्वकर्मा म्हणण्याची कल्पना समाजातील शिल्पकाराला पाहूनच सुचली आणि परवर्ती (वेदोत्तर) साहित्यानी प्रासाद, लेणी, मंदिर, मूर्ती, चित्र, अलंकार अशा कला कौशल्याच्या अनेक वस्तू, वास्तू निर्माण करणाऱ्या शिल्पकराला विश्वकर्मा हे नामाभिधान दिले आणि ते रुढही झाले. म्हणून विश्वकर्माच्या नावाने कला-शिल्पकारागिरांचा समाज नाव लौकिकास आला. विश्वकर्मा समाज म्हणजे कला-कारागिरांचा समाज हे समीकरण वेदोत्तर प्राचीन ग्रंथानीच रुढ केले.
January 23, 2026

शनीला घन स्वरूपाचा पृष्ठभाग नाही. तरीही या संशोधनामुळे, त्याच्या गाभ्याच्या रचनेची माहिती करून घेणं, हे शक्य झालं. कारण क्रिस्टोफर मँकोविच आणि जीम फ्यूलर यांनी शनीच्या कड्यांनाच प्रचंड ‘भूलहरीमापक यंत्रा’चं स्वरूप दिलं आहे. या संशोधनातून शनीचा गाभा आगळा-वेगळा असल्याचं दिसून आलं.
December 16, 2021

श्वास रोखून बराच काळ पाण्याखाली खोलवर राहणाऱ्याच्या शारीरिक क्रियांत नक्की किती प्रमाणात बदल होतो! कारण मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा फारच कमी झाला तर, बेशुद्धावस्थेची आणि इतर गुंतागुतीची शक्यता असते.
February 5, 2022

ए२बी ही खूण आढळणारे हे सर्व कुत्रे, सायबेरिआतील कुत्र्यांच्या पूर्वजांपासून सुमारे तेवीस हजार वर्षांपूर्वी निर्माण झाले असल्याची शक्यता या संशोधकांना दिसून आली.
April 3, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti