एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
बाहुबली’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाने ॲनिमेशन तंत्रज्ञानाचाच एक भाग असलेले व्हीज्युअल इफेक्ट्स चे अनेक पैलू भारतीय प्रेक्षकांसमोर नव्याने आले आहेत.
October 28, 2021
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या५साठी साप्ताहिक ‘नवयुग’ कमी पडू लागले म्हणून शिवाजी पार्कच्या सभेत मे १९५६ मध्ये सेनापती बापट यांनी आचार्य अत्रे यांना सुचवले की, लढा यशस्वी करायचा असेल तर एक दैनिक सुरू करा. आचार्य अत्रे यांनी घोषणा केली, ‘१५ नोव्हेंबरपासून ‘मराठा’ नावाचे दैनिक सुरू करेन.’
November 15, 2021
साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो.
December 27, 2018
कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच… पण तो चित्रकारही होता…एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता….
June 30, 2022
इंग्रजांनी मुंबई-पुण्यात पाय रोवल्यावर १८३० मध्ये बोरघाटातून खोपोली आणि खंडाळा यांना जोडणारा रस्ता काढला. त्यावेळी स्थानिक धनगर शिंगरोबाच्या मदतीने नागफणी समोरच्या पर्वतरांगेतून खिंड काढण्यात आली. एकावेळी जेमतेम एक वाहन जाऊ शकेल, एवढी अरुंद अशी ही खिंड होती. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची केंद्रे जोडणाऱ्या या रस्त्याने १८३०पासून वाहतूक सुरू झाली, तेव्हा इंग्रजांनी या खिंडीत एक कोनशिला बसवली.
April 5, 2022
जावा समजण्यासाठी सी शिकण्याची काहीच गरज नाहि. जावामध्ये इतर भाषांपेक्षा एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे जावा मध्ये एक विशिष्ट प्रोग्राम लिहिता येतो त्याला आपण अप्लेट (APPLET) असे म्हणतो. Applet ला इंटरनेट वरून डाऊनालोड केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या वेब ब्राउजर मध्ये सुरक्षित रन करता येतं. पारंपारिक कॉम्पुटर मध्ये सुरक्षिततेविषयी समस्या होती. इंटरनेट वरील साईट आपल्या कॉम्पुटर ला जास्त एक्सेस करू शकत होती. परंतु जावाने या समस्येचे निवारण केले. जावा Applet च्या क्षमतेवर निर्बंध घालते. या मार्गाने जावा समस्येचे निवारण करते. एक जावा एप्लेट युजरच्या मदतीशिवाय हार्ड डिस्क मध्ये काहीही लिहू शकत नाहि. हे एप्लेट अनियंत्रितपणे कॉम्पुटर च्या मेमरी मध्ये काहीही लिहू शकत नाही आणि त्यामुळे कॉम्पुटर सुरक्षित राहतो.जावा मध्ये एप्लेट प्रमानेच अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे JVM
May 23, 2022
ब्रेड हा आज अनेकांच्या रोजच्या आहारातील पदार्थ झाला आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘रिअल ब्रेड वीक’ म्हणजेच भेसळमुक्त पाव आठवडा म्हणून साजरा केला जातो. या वर्षी २० फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१ रिअल ब्रेड वीक साजरा केला जात आहे.
जे नैसर्गिक पद्धतीने ब्रेड बनवतात, अशांसाठी हा आठवडा खास साजरा केला जातो.
नैसर्गिक पद्धतीने ब्रेड म्हणजे ज्या ब्रेडसाठी खाण्याचा सोडा, ॲकस्कॉर्बिक ॲसिड, चव वाढवणारी द्रव्ये यांपकी काहीही वापरलं जात नाही तो
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 24, 2022
१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांच्या विमानाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल उड्डाण केले.
एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने झाली होती, भारतीय व्यावसायिक जे आर डी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटा यांनी इंपिरियल एअरवेज साठी मेल घेऊन जाण्याचा करार मिळवला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.
१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Neville Vincent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला.
टाटा एअर सर्व्हिसेसने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.
भारत सरकारने १९५३ मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास करून आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली.कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. जे आर डी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले.
२१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. या विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी मुंबई न्यूयॉर्क सेवा सुरू केली. ८ जून १९६२ मध्ये एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली.
२३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली. नुकतीच एअर इंडिया परत टाटांच्या कडे आली आहे.
October 15, 2021
सूर्य पूर्वेला उगवून पश्चिटमेला मावळतो. कारण, पृथ्वी पश्चिलमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे कालनिश्चि्तीसाठी पृथ्वीचे २४ उभे भाग करण्यात आले. त्याला आपण रेखांश असे म्हणतो. १३ ऑक्टोबर १८८४ रोजी लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
October 13, 2021
६ ऑगस्ट १९४५ ची सकाळ ही जगाला हादरून टाकणारी सकाळ ठरली होती. या दिवशी अमेरिकेने जपानचे शहर अणुबॉम्बचा वापर करून उध्वस्त केले. याला आज ७४ वर्षे पुर्ण झाली.
उद्धवस्त झालेले हिरोशिमा शहराने राखेतून निर्माण होणा-या फिनिक्स पक्षासारखी पुन्हा झेप घेतली. आज संपूर्ण हिरोशिमा शहर एक नवं रूप घेऊन उभे आहे. आज कुणालाचा वाटणार नाही या शहरात, कधीकाळी अणुबॉम्ब फुटला होता आणि हे शहर बेचिराख झाले होते. हिरोशिमाही आज जपानमधील इतर शहरांसारखे विकसित झाले आहे. आपला भुतकाळ विसरून हे शहर प्रगती करत आहे. झपाट्याने या शहराचा विकास होत आहे. चोहीकडे मोठमोठ्या इमारती पाहायला मिळत आहेत. या शहराचा भुतकाळ विसरता येत नसला तरी वर्तमानामध्ये हे शहर आनंद आहे. उद्धवस्तो झालेल्या या शहरात आज दोन लाख नागरिक राहात आहेत. अणुबॉम्बने बेचिराख झालेले हिरोशिमा पुन्हा उभे राहिले आहे. विध्वंसाच्या पाऊलखुणा मात्र आज कुठेच दिसत नाहीत.
जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. त्यानंतर आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती. महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची आज्ञा जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाली.
दुसऱ्याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला.
हिरोशिमानंतर तीनच दिवसांत नागासाकीवर अमेरिकेने असाच आणखी एक अणुबॉम्ब टाकला. पुन्हा तसाच नरसंहार झाला. काही दिवसांतच जपानने शरणागतीचे पांढरे निशाण फडकवले. दुसरे महायुद्ध संपले; ते अमेरिका व दोस्त राष्ट्रांनी जिंकले पण माणुसकी मात्र पराभूत झाली. आजच्या दिवशी मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti