एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
२०१७ वर्षाच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा पाच स्थानांची झेप घेतली आहे. आता रिलायन्सच्या पुढे रशियाची गॅस कंपनी गेजप्रॉम आणि जर्मनीची ई. ऑन या दोन कंपन्या आहेत.
December 23, 2021
४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.
May 5, 2021
१९४९ ते ६०च्या कालखंडात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी सिनेमागीतांना बंदी असताना रेडिओ सिलोनने ती सारी गाणी घराघरात पोहोचवली. आशिया खंडातल्या विविध भाषांमधल्या ३५ हजार ओरिजनल रेकॉर्डस सिलोनच्या संग्रही असून, विविध भारतीकडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्सचा त्यात समावेश आहे.
March 30, 2022
‘फिल्म सोसायटी’ ही संकल्पना मराठी रसिकांना १९६८ साली पूर्णत: नवी होती. आम्ही ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापण्याचा बेत आखला, पण आम्हाला तरी त्यामागील मूळ विचार कोठे स्पष्ट होता? तो जसजसा उलगडत गेला तेव्हा लाभलेली जाणीवसमृद्धी हा मात्र आयुष्यभराचा ठेवा झाला आहे.
July 5, 2022
पाय’ या आकड्यासाठीचे सांकेतिक चिन्ह म्हणून ग्रीक वर्णमालेतील २४ अक्षरांपैकी १६ वे अक्षर हे ‘पाय’ आणि ते आता ३.१४ किंवा २२/७ या संख्येसाठी जगन्मान्य झालेले आहे. त्यामुळे हा दिवस ‘पाय डे’ म्हणून साजरा केला जातो.
March 14, 2022
हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.
April 1, 2022
आकर्षक मथळा, चटपटीत मजकूर, खुलवून लिहिलेली बातमी हे प्रभातचे वैशिष्टय होते.
November 21, 2021
वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने ३ मार्चला जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. १९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.
March 4, 2025
ऋषिपंचमीला विशिष्ट पद्धतीने आहार सेवनाविषयी काही नियम आहेत. या दिवशी नांगरणी न झालेल्या शेतातून सहज उगवून येणाऱ्या रानभाज्यांचे व धान्यांचे सेवन केले जाते.
September 11, 2021
चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दा दा विंची याने वापरला, हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत.
August 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti