एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून बाहुली-बाहुला खेळला जातोय. त्याचे दाखले आपल्या पाणिनी, ज्ञानेश्वरी आणि दासबोधात वाचायला मिळतात.
March 21, 2022
ज्या गोष्टीमुळे आपला भारत देश जगाला भुरळ घालत असेल तर ती बाब म्हणजे लोकशाही. या लोकशाहीला बळकट करणारी प्रणाली म्हणजे मतदान. प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.
January 25, 2022
२४ जुलै हा दिवस औष्णिक तंत्रज्ञांसाठी खूप खास आहे , कारण हा दिवस जगभरात औष्णिक तंत्रज्ञ दिन (National Thermal Engineer Day) साजरा केला जातो.
July 24, 2020
इंग्लंडमध्ये १९२५ साली भरलेल्या वेम्बले येथील चित्रपट-प्रदर्शनात बाबूराव पेंटर दिग्दर्शित कल्याण खजिना व सती पद्मिनी हे दोन भारताचे प्रातिनिधिक चित्रपट म्हणून दाखविण्यात आले होते आणि त्यांबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र आणि पदकही मिळाले होते.
December 1, 2021
शीतयुद्धाच्या काळात खतपाणी घातलेला, अफगाणिस्तानच्या भूमीत रुजवलेला दहशतवाद नावाचा भस्मासुर या महासत्तेवरच उलटला. अमेरिकेचे फासे अमेरिकेवरच उलटले.
September 11, 2021
मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो.
July 11, 2021
पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. मुघल गार्डन आज पासून, म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
February 5, 2022
इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते.
November 15, 2021
सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे ०४ ते ०६ या ब्रम्हमुहूर्तात उठून स्नान करून देवाची पूजाअर्चा, आराधना, भजन अशी आपापल्या परीने भक्ती करतात. या मासात विशेषकरून भगवान विष्णूची व श्रीकृष्णाची आराधना करतात. तसेच वसुंधरेला व चराचराला जीवन व आरोग्य प्रदान करणारी प्रत्यक्ष देवता सूर्याची आराधना केली जाते. या आरतीला काकड आरती असे म्हणतात.
December 20, 2021
पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात.
March 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti