एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
आचार्य अत्रे हे तर संस्थेचे सदैव हितैषी राहिले. संस्थेबद्दल त्यांनी ८ जानेवारी १९६७ रोजी ‘‘ह्य़ाच संस्थेने माझ्या साहित्यिक जीवनाचा पाया घातला. संस्थेचे उपकार मानण्यास मजजवळ शब्द नाहींत. पुण्यातील वाङ्मयप्रेमी तरुणांना स्फूर्ति नि प्रेरणा देण्याचे महान कार्य ह्य़ा संस्थेकडून होवो ही इच्छा!’’ असा अभिप्राय लिहिला आहे.
February 7, 2022
माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माणूस निसर्गात केवळ एक ग्राहक आहे, उत्पादक नाही. अन्नासाठी, प्राणवायूसाठी तो निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे.
October 1, 2021
पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. मुघल गार्डन आज पासून, म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
February 5, 2022
असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने सिबलिंग डे साजरा करण्याची कल्पना दिली. यासाठी त्यांनी सिबलिंग फाऊंडेशनची स्थापना केली, ज्याला अमेरिकन कॉंग्रेसने एकमताने मान्य दिली. यानंतर दरवर्षी १० एप्रिल रोजी सिबलिंग डे साजरा करण्यास सुरुवात झाली.असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली.
May 31, 2022
महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी २ जुलै १९१६ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. भारतातीलच नव्हे तर मध्य पूर्व आशियातील केवळ महिलांसाठी असलेले हे पहिले विद्यापीठ आहे.
July 2, 2021
निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता !
March 29, 2022
पहिला चेंडू टाकणारे होते इंग्लंडचे आल्फ्रेड शॉ. त्यांच्यासमोर होते ऑस्ट्रेलियन फलंदाज चार्ल्स बॅनरमन. त्यांनी त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसोटी क्रिकेटमधली पहिली धाव घेतली. त्यांनीच दुसऱ्या दिवशी पहिले शतक पूर्ण करताना १६५ धावा केल्या. या सामन्याला कसोटी दर्जा नंतर बहाल करण्यात आला. सुरुवातीला या सामन्याचे स्वरूप ऑल इंग्लंड वि. कम्बाइन्ड न्यू साउथ वेल्स अँड व्हिक्टोरिया इलेव्हन असे होते.
March 15, 2022
चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली.
July 5, 2021
सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी ‘ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. या मल्टी स्टार कास्ट चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, सई ताह्मणकर, उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
July 19, 2021
भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे पूर्वी फक्त एखाद्या प्रदेशाची खासियत होते. परंतु कालांतराने ते संपूर्ण राज्याची ओळख बनून गेले. उंधियो पदार्थ याच पठडीतला. उंधियोला सुरती उंधियो म्हणूनही ओळखलं जातं.
January 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti