एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
देशामध्ये स्त्री-भ्रृण हत्या ही समस्या रोखण्यासाठी तसेच मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क मिळायला हवे यासाठी हा दिवस आज साजरा केला जातो.
या कार्यक्रमामुळे देशात १०४ जिल्ह्यांमध्ये स्त्री-भ्रृण हत्या करण्याचा दर कमी झाला आहे.
October 11, 2021
पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आहे. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे.
वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे. नव्या-जुन्या पिढीतील वाचकांचे "सकाळ'ला भरभरून प्रेम मिळत आहे. दैनिक किंवा साप्ताहिकच नव्हे, तर "साम वाहिनी', "ई-सकाळ' आणि इतर "सोशल मीडिया'च्या माध्यमातूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाचक "सकाळ'शी जोडला गेलेला आहे. वाचकांच्या प्रतिसादामुळेच "सकाळ' ही वाटचाल करत आहे.
January 1, 2019
स्थापना : १ फेब्रुवारी १९६४
या ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालय’त भारतीय सिनेमाचा ऐतिहासिक खजिना आहे. खरं तर आजच्या ‘डिजिटल’ युगात कोणीही टेक्नोसॅव्ही चित्रपट चाहता म्हणतो, ‘माझ्याकडील हार्ड डिस्कमध्ये दोन हजार फिल्म्स आहेत.’ आज असा व्यक्तिगत संग्रह सहज शक्य आहे. पण गेल्या शतकात याचा मागमूसही नव्हता, त्या काळात ‘चित्रपट संग्रहालय’ ही कल्पना उदयास आली.
खरं तर सिनेमा जन्माला आला तोच ‘नायट्रेट’ फिल्मवर. चांदीची जर आणि नायट्रेटचा अंश यांच्या संयोगातून निर्माण केल्या जाणाऱ्या या कच्च्या व पक्क्य़ा फिल्मची जातकुळी ज्वालाग्राही. नायट्रेट फिल्मचे आयुष्य मानवाइतकेच. मुळातच नष्ट होण्याची असोशी असलेल्या या सिनेमाचे मूळ स्वरूपात जतन हा एक मोठय़ा जिकिरीचा विषय होता व आहे. तशात सिनेमा ही इतर कलाप्रकारांसारखी फार गांभीर्याने घेण्याची कला म्हणून बघण्यासच अर्धशतक लागलं. ‘दोन घडीची करमणूक’ म्हणून सिनेमाला इतर कलांच्या तुलनेत हिणवलं गेलं. या पाश्र्वभूमीवर चित्रपटकलेच्या या ‘बहिष्कृत’ जगाला जतन-संवर्धनाचं कोंदण मिळण्यास उशीर लागणं ओघानंच आलं.
१९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाने भारतीय सिनेमाचा प्रारंभ झाला. तेव्हापासून १९५२ पर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या प्रती ‘नायट्रेट’वरच होत्या. ‘नायट्रेट’ जमान्यात चित्रपटांचे जतन, संग्रह या कल्पनांचा मागमूसही नव्हता. चित्रपट यशस्वीपणे चालावा, ही अटकळ बांधूनच निर्माण केला जायचा. तो यशस्वी ठरला तर काही काळ त्याच्या मूळ फिल्मचा, प्रिंटचा मुक्काम सिनेलॅबमध्ये असायचा. अन्यथा या चित्रपटांच्या मूळ प्रती बांगडय़ा वा पिशव्या तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून विकल्या जायच्या. चित्रपटाचे जतन हा विषय स्टुडिओ सिस्टीमबरोबर अस्तित्वात आला. ‘प्रभात’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘न्यू थिएटर्स’ या बॅनरचे स्वत:चे स्टुडिओ होते. लॅब होत्या. आणि स्टुडिओ निर्मित चित्रपटांचे जतन करणारी नायट्रेट गोदामं होती. या स्टुडिओंनी काही प्रमाणात स्वनिर्मित चित्रपटांचे जतन-संवर्धन केले. काही ‘लॅब’ वा ‘थिएटर्स’मध्ये ‘निर्वासित’ चित्रपटांचे आपोआप जतन झाले, तर काही चित्रवेडय़ा संग्राहकांनी प्रेमानं काही दुर्मीळ प्रिंट्सचा सांभाळ केला. खरं तर त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपणास काही अभिजात चित्रपट बघावयास मिळत आहेत.
‘चित्रपट संग्रहालय’ ही संकल्पना आपल्या देशात सिनेमाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला तरी अस्तित्वात आली नव्हती. १९५१ च्या पाटील कमिटीच्या शिफारसीनंतर, चित्रपटाच्या आगमनाच्या ६०-६५ वर्षांनंतर- म्हणजे फेब्रुवारी १९६४ मध्ये भारतात राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचे कार्य पुण्यात सुरू झाले. प्रथम फिल्म इन्स्टिटय़ूटच्या आवारात ‘फिल्म लायब्ररी’ म्हणून तिचे अस्तित्व होते. संस्थेचे संचालक जगत मुरारी आणि प्रा. सतीश बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या २५ हजारांचे अल्प बजेट व १२३ चित्रपटांच्या संग्रहाने ही लायब्ररी सुरू झाली. बालपणापासून चित्रवेडे असलेल्या, चित्रपट दिग्दर्शक होण्याचं स्वप्न बाळगून मुंबईत आलेल्या आणि सिनेमावर निस्सीम प्रेम करणाऱ्या पी. के. नायर या तरुणाची सहायक म्हणून निवड करण्यात आली. पॅशनचं मिशनमध्ये रूपांतर झालं आणि संग्रहालयाच्या कल्पनेनं भरारी घेतली. पुढे नायर संग्रहालयाचे सर्वेसर्वा संचालक बनले. अल्पावधीतच संग्रहालयाचा मुक्काम जयकर बंगल्याच्या स्वतंत्र, देखण्या वास्तूत करण्यात आला. नायर रुजू झाले तोपर्यंत ‘नायट्रेट’ जमान्यातील ९० टक्के चित्रखनिजा केव्हाच नामशेष झाला होता.
मूकपट जमान्यात हजारो चित्रपटांची निर्मिती झाली होती. (किमान १७००!) पण शिलकीत काय उरले आहे याचा थांगपत्ता नव्हता. नायरांनी प्रथम या मूकपटांचा शोध घेतला. सात-आठ मूकपटांची काही रिळं व ‘राजा हरिश्चंद्र’ची काही रिळं त्यांनी महत्प्रयासाने मिळवली. आज संग्रहालयातील हा मानाचा तुरा आहे!
‘सावकारी पाश’ हा मूकपट व ‘आलमआरा’ या पहिल्या बोलपटासह अनेक ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे चित्रपट उपलब्ध होऊ शकले नाहीत, याची खंत बाळगत नायरांनी दिवसाचे चोवीस तास जमेल तसे, जमेल तेथून प्रयत्नांची पराकाष्ठा करत जुन्या, जीर्ण चित्रपटांचा शोध घेतला. बंद स्टुडिओच्या लॅब, गोदामं, चोरबाजार, रेल्वे-कस्टमची गोदामं, थिएटर्स व वितरण कार्यालयं आणि खासगी चित्रपट संग्राहकांशी सलगी करत अपूर्व असा चित्रखजिना अपार मेहनतीनं जमा केला व या संग्रहालयाला आकार दिला.
२५-३० वर्षे त्यांनी हे ‘सरकारी’ कार्यालय एखाद्या निष्ठावान संस्थाचालकाप्रमाणे चालविले. देशी-विदेशी अभिजात चित्रपट जमविले, जतन केले. ते फिल्म सोसायटीमार्फत देशभर पसरलेल्या चित्रप्रेमींना उपलब्ध केले. त्यातूनच जपानचा अकिरा कुरोसोवा, स्वीडनचा इंगमार बर्गमन, इटलीचा व्हिक्टोरिया डिसीक्का आणि भारताचे सत्यजित रे यांसारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांशी देशाच्या कानाकोपऱ्यातील रसिकांची गाठ पडली. देशभर अभिजात चित्रपट संस्कृती बहरली. फिल्म इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ांना या अभिजात चित्रपटांची पाणपोई मुक्त हस्ते उपलब्ध केली. ‘चित्रपट रसास्वादा’चा एकमेव उपक्रम सतीश बहादूर यांच्या सहकार्याने देशभर राबविला. सिनेमावरील ग्रंथांचे संदर्भ ग्रंथालय उभे केले. सिनेमावर अभ्यास-संशोधन करणाऱ्यांसाठी ‘नायर’ (पीकेएन) हा परवलीचा शब्द बनला.
सिनेमाचा चालता-बोलता कोश म्हणून त्यांचा इतका बोलबाला झाला, की संग्रहालयाला लोक ‘नायर फिल्म अर्काइव्ह’ म्हणू लागले!
संग्रहालयाच्या सुसज्ज अशा दोन इमारती असून, दोन अत्याधुनिक थिएटर्स, प्रीव्ह्य़ू थिएटर, कोल्ड स्टोअरेज, संदर्भ ग्रंथालय अशा सर्व सोयी आहेत. संग्रहालयात देशी-विदेशी १८,८०० चित्रपट जतन केलेले आहेत. दोन हजार डीव्हीडी व तितक्याच व्हिडिओ कॅसेट्स, तीस हजारांहून अधिक पुस्तके, ३५,००० पटकथा, २२,००० पोस्टर्स, १३,००० साँग बुकलेट्स, रेकॉर्ड्स, दीड लाखांहून अधिक छायाचित्रे व दोन लाखांहून अधिक वृत्तपत्र कात्रणे एवढा ऐवज आहे. यातील बऱ्याच गोष्टींचे डिजिटायजेशन केले गेले आहे. पन्नास हजारांहून अधिक चित्रपट-लघुपटांची माहिती, छायाचित्रे, पोस्टर्स एका सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे.
नायर यांच्या काळात जतन-संवर्धन झालेला संग्रह अधिक समृद्ध व अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न त्यांच्यानंतर आलेल्या संचालकांनीही केला. चित्रपट विशेषज्ज्ञ असलेल्या संचालक सुरेश छाब्रिया यांनी संग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केलं. तर संचालक शशिधरन यांनी संग्रहालयाची गुंतागुंतीची रचना अधिक सुविहित करण्याचा प्रयत्न केला. अकाली निधन पावलेल्या संचालक विजय जाधव यांच्या कारकीर्दीत ‘डिजिटायजेशन’चा प्रकल्प सुरू करण्यात आला. सध्याचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी या प्रकल्पाखाली ५५० जुन्या, दुर्मीळ चित्रपटांचे डिजिटायजेशन पूर्ण केले आहे. जनसामान्यांसाठी ‘डिजिटल लायब्ररी’ सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
‘नॅशनल फिल्म हॅरिटेज मिशन’ दृष्टिक्षेपात असून, त्यायोगे संग्रहालयाला नवसंजीवनी मिळणार आहे. केवळ हजारोंच्या संख्येने चित्रपटांचा संग्रह हाच या संस्थेचा उद्देश नाही. तर हा सारा संग्रह सर्वसामान्यांच्या आणि अभ्यासकांच्या उपयोगी यावा या दृष्टीने संग्रहालय अनेक उपक्रम राबवित असते. दरवर्षी एफटीआयआयच्या बरोबर फिल्म अॅचप्रिसिएशनचा एक महिन्याचा निवासी अभ्यासक्रम आयोजित केला जातो. तर फिल्म सोसायटीच्या सहकार्याने एक आठवडय़ाचे रसास्वाद शिबीर मराठीतून आयोजित केले जाते. त्याचबरोबर दर वर्षी चित्रपटाशी निगडित विषयांवर अभ्यासासाठी तीन वेगवेगळ्या पाठय़वृत्ती दिल्या जातात. फिल्म सर्कलच्या माध्यमातून अनेकांना संग्रहालयामार्फत वर्षभर वैविध्यपूर्ण चित्रपट पाहायला मिळतात. संग्रहालयाचे फेसबुक पेजवरून प्रत्येक दिवसाचं चित्रपटाच्या अनुषंगाने दिनविशेष प्रकाशित होत असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 1, 2019
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत ‘किशोर’ची निर्मिती झाली, ती मूळ संकल्पना होती, तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची.
November 14, 2021
संयुक्त राष्ट्र महासभाने २००२ साली संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून घोषित केले आणि ११ डिसेंबर २००३ पासुन ‘इंटरनॅशनल माउंटन डे हा साजरा करण्यात येतो. दरवर्षी तो एका खास थीमसह साजरा केला जातो.
December 11, 2021
स्वामी विवेकानंद म्हणतात- प्रार्थनेपेक्षा खेळ तुम्हाला देवाच्या जास्त जवळ घेऊन जाऊ शकतो. कारण प्रार्थनेमध्ये तुमचा संपूर्ण सहभाग असेलच असे नाही परंतु खेळात तो असतोच. वरील संदर्भ लक्षात घेता येथे नमूद करू वाटते की व्यक्तिमत्व विकासामध्ये बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता बुद्धिबळ हा खेळ आत्मसात करावा, जोपासावा, व्यासंग धरावा व त्याचे अनुसरण करावे.
April 4, 2022
या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, आज कुणीतरी यावे, कारे दुरावा कारे अबोला, कशी करु स्वागता अशी या चित्रपटात गाणी आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण गिरगावातील खोताची वाडीतील खंडेराव ब्लॉक येथे झाले होते.
March 25, 2022
जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
Error, group does not exist! Check your syntax! (ID: 3)सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्राम ची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्की लाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत.
जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.
मॅकडोवेल नं १ (McDowell’s No.1)
हा देशातील सर्वात जास्त विकला जाणार व्हिस्की ब्रँड आहे. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडचा हा ब्रँड असे ही कंपनी UB ग्रुप चालवते. 1968 मध्ये हा ब्रँड बाजारात उतरवला होता.
मॅकडोवेल नं १ चे बाजारात विविध प्रकार उपलब्ध आहे.
मॅकडोवेल नं १ रिझर्व
मॅकडोवेल नं १ रिझर्व डायेट मेट
मॅकडोवेल नं १ प्लॅटीनम
ऑफिसर्स चॉइस (Officer’s Choice)
'ऑफिसर्स चॉइस' हा देशातील दुसर्यार क्रमांकाचा व्हिस्की ब्रँड आहे. या ब्रँडचा मालकी हक्क किशोर छाबरिया यांच्या अलाइड ब्लेंडर्स अॅण्ड डिस्टिलर ग्रुपकडे आहे.
बॅगपाइपर (Bagpiper)
'बॅगपाइपर व्हिस्की' हा ‘यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड'चा ब्रँड आहे. 'बॅगपाइपर व्हिस्की'चा जगातील टॉप 100 ब्रँड्स्मध्ये समावेश आहे.
रॉयल स्टॅग (Royal Stag)
'रॉयल स्टॅग' या ब्रँडचा मालकीहक्क फ्रेंच कंपनी 'पेर्नोड रिकार्ड'कडे आहे. 1995 मध्ये सीग्राम कंपनीने हा व्हिस्की ब्रँड बाजारात उतरवला होता. 'रॉयल स्टॅग'मध्ये कोणतेच आर्टिफीसियल फ्लेवर नाही आहे.
ओरिजिनल चॉइस (Original Choice)
'ओरिजिनल चॉइस'हा गोव्यातील 'जॉन डिस्टिलरीज'चा एक लोकप्रिय ब्रँड आहे. जॉन डिस्टिलरीजचा हा ब्रँड वादाच्या भोवर्याोत सापडला होता.
ओल्ड टेवर्न (Old Tavern)
टॉप इंडियन व्हिस्की ब्रँडमध्ये 'ओल्ड टेवर्न’सहव्या क्रमांकावर आहे. ओल्ड टेवर्न व्हिस्की देशातील बिहार व उत्तरप्रदेशातील सर्वात पॉप्युलर ब्रँड आहे. काही आफ्रिकन देशांमध्येही हा ब्रँड फेमस आहे.
इम्पीरियल ब्लू (Imperial Blue)
'इम्पीरियल ब्लू'ला 'सीग्राम्स इम्पीरियल ब्लू' असेही म्हटले जाते. इंडियन व्हिस्की मार्किटमध्ये हे नाव खूप प्रतिष्ठित आहे.
ह्यावर्ड्स फाइन (Haywards Fine)
'ह्यावर्ड्स फाइन' हा देखील विजय माल्या यांची कंपनी UB Group चा एक पॉप्युलर ब्रँंड आहे. इकॉनॉमी व्हिस्की कॅटेगरीमधील सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आहे.
8 PM
8 PM हा प्रसिद्ध कंपनी Radico Khaitan चा एक फेमस इंडियन ब्रँड आहे. Radico Khaitan आधी 'रामपूर डिस्टिलरी अॅण्ड केमिकल कंपनी या नावाने ओळखली जात होती.
डायरेक्टर्स स्पेशल (Director’s Special)
'डायरेक्टर्स स्पेशल' हा युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचा ब्रँड आहे. ही कंपनी युनाइटेड ब्रेव्हरीज ग्रुपचा (UB) एक पार्ट आहे. जागतिक क्रमवारीत 'डायरेक्टर्स स्पेशल'चा ४४ वा क्रमांक लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 20, 2017
२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. जगभरात `जागतिक रंगभूमी दिन’ साजरा व्हावा यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर जागतिक रंगभूमी दिन २७ मार्च १९६२ पासून जगभरात साजरा होऊ लागला. कलेचा सामुदायिक आविष्कार अभिव्यक्त होण्याची पद्धत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आजतागायत बदलत गेली आहे. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ हा शब्द आणि मराठीत आपण रंगभूमी हा समानार्थी शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाटय़संहिता, नाटय़दिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सार्या गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. ग्रीक, रोमन, ब्रिटीश, जर्मन, रशियन, पोलिश, अमेरिकन, चिनी, जपानी आणि भारतीय रंगभूमी यांचे एकमेकांशी आदानप्रदान झालेले नाही. रंगभूमीतील कलाविष्काराचे जागतिकीकरण व्हावे यासाठी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. भारतात तर संस्कृतमध्ये कालिदास, भास, भवभूती असे एकापेक्षा एक मोठे दिग्गज नाटककार होऊन गेले. भारतात बहुभाषिक रंगभूमी आणि तिचा आविष्कार वेगवेगळ्या कलेच्या प्रांतात प्रकटलेला आहे. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तनपरंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके, लळित, तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाटय़कला जन्मास आली. रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६ व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे `हॅम्लेट’, `मॅक्बेथ’, `ऑथेल्लो’, `किंगलियर’ या शोकांतिका किंवा `एज यू लाइक इट’, `ट्वेल्थ नाईट’ अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर डय़ुमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली. त्यात मराठीत किर्लेस्कर देवल यांच्या काळापासून ते तेंडुलकर, शिरवाडकर, गिरीश कर्नाड ते आजच्या एलकुंचवार, आळेकरांपर्यंत रंगभूमीवर झालेल्या उल्लेखनीय बदलाची रंगभूमीला नोंद ही घ्यावीच लागते. पूर्वी राजे, राणी, विद्वान आणि धनिक यांचा आश्रय रंगभूमीला मिळत असे. आजही विद्वान आणि धनिक रसिकांचा विविध माध्यमातून नाटय़कलेला लोकाश्रय लाभत आहे. महाराष्ट्रातील संगीत नाटक रंगभूमी हा देखील एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार मानला जातो. प्रतिभावंत नाटककार व दिग्दर्शक, कल्पक तंत्रज्ञ, आधुनिक तांत्रिक-यांत्रिक सुविधा, सुजाण अभिरुचिसंपन्न रंगभूमीवरील वरील वेगवेगळे प्रकार वा रूपे उदयास आली, असे म्हणता येईल. नाटय़प्रयोग व त्याचा प्रेक्षक यांच्या परस्पर संबंधांविषयीच्या वैशिष्टय़पूर्ण संकल्पनाही प्रयोगशील रंगकलेमागे दिसून येतात. अलीकडे तर पथनाटय़े होऊ लागली आहेत आणि त्यांच्या रूपाने रंगकला जशी बंदिस्त रंगमंदिरातून बाहेर पडली, तशीच ती विशिष्ट प्रकारच्या प्रेक्षकविषयक कल्पनांतूनही बाहेर पडली आहे. रंगभूमीचे हे प्रकार किंवा प्रयोग हे अखंडपणे होत राहतील. रंगभूमीवरील नाटकांमधून कला आणि सांस्कृतिक आविष्कार जो होत आहे त्याच्या स्पंदनांचा आणि संस्कृतीच्या स्पंदनांशी किंवा आंदोलनाशी तिचा अतूट संबंध आहे. नागर रंगभूमी व लोकरंगभूमी (फोक थिएटर) यांच्यातील सीमारेषाही पुसट होऊ लागल्या आहेत. तेंडुलकरांचे `घाशीराम कोतवाल’सारखे नाटक किंवा गिरीश कर्नाड यांची नाटके या दृष्टीने आधुनिक रंगभूमी आणि लोकरंगभूमी यांच्या विधायक समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमी ही केवळ कला नव्हे, तर समाजातील ती एक कलात्मक व विकसनशील संस्था आहे हे लक्षात ठेवले, तर रंगभूमीच्या अभ्यासाच्या अनेक बाजू लक्षात येऊ शकतात आणि विश्वरंगभूमीच्या दृष्टीनेही भर पडू शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 27, 2017
आकर्षक मथळा, चटपटीत मजकूर, खुलवून लिहिलेली बातमी हे प्रभातचे वैशिष्टय होते.
November 21, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti