एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
शारीरिक आणि मानिसक समस्यांपासून दिलासा देण्यात ॲक्युप्रेशर थेरेपीही खूप फायद्याची आहे. मात्र, शरीराच्या योग्य सांध्यावर ॲक्युप्रेशर केले तरच लाभ मिळते.
January 3, 2022
आई व बाळाची काळजी घेणारी सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते.
May 5, 2022
आय आय टी पवई ही संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.
March 10, 2022
आज दिनांक १९ ऑगस्ट. जगभरातल्या छायाचित्रं काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा हा अत्यंत लाडका दिवस. आज ‘ जागतिक छायाचित्रण दिवस ‘ आहे. आजच्या दिवसाला सगळे छायाचित्र काढणारे कलाकार , घराबाहेर पडून आपली हौस भागवून घेतात. छायाचित्रणाचा इतिहास काय आहे व छायाचित्रणाचा किती प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊ.
August 19, 2020
१९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. १९७६ साली जगदीश खेबुडकरांचे संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.
June 27, 2022
रजोनिवृत्ती दरम्यान आणि त्यानंतर स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल जागृती करण्यासाठी १८ ऑक्टोबर हा ‘जागतिक रजोनिवृत्ती दिन’ म्हणून पाळला जातो. रजोनिवृत्ती म्हणजे जीवनातून निवृत्ती नव्हे; ती केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे हे समजून घेतले पाहिजे.
October 18, 2021
अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याचबरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात पहिले राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स (State Food Safety Index-SFSI) विकसित केले आहेत.
June 7, 2022
मरिन ड्राइव्ह म्हणजे ‘क्वीन्स नेकलेस’ इतकीच बहुसंख्य मुंबईकरांना त्याची ओळख आहे. मात्र हा नेकलेस तयार होण्याच्या काही वर्ष आधी नेकलेससमोरच्या अरबी समुद्रात भराव टाकून समुद्र मागे हटवण्यात आला होता. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून सध्या जिथं प्रेमीयुगुलं जिने-मरने की कसम खातात, तो समुद्रासमोरचा कठडा आणि पाथ-वे बांधण्यात आला, त्या घटनेला १८ डिसेंबरला तब्बल १०२ वर्षे पूर्ण झाली. ‘युनेस्को’ने वर्ल्ड हेरिटेज प्रथम श्रेणीचा मान या पाथ-वे आणि कठड्याला दिला आहे.
ब्रिटिशांच्या आमदानीत मुंबई हे दुसरं लंडन शहर वसविण्याचे स्वप्न पाहिलं जात होतं. त्यानुसार व्हिक्टोरिया टर्मिनस, जनरल पोस्ट ऑफिस, पश्चिम रेल्वे मुख्यालय, मुंबई महापालिका मुख्यालय अशा कलात्मक वास्तूशैलीचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू उभारण्यात आल्या. ब्रिटिशांची कलासक्त दृष्टी लंडनमधील वास्तूंसारखं बांधकाम मुंबईत व्हावं अशी होती. मरिन ड्राइव्ह पाहाण्याचा दृष्टिकोन तसाच होता. इंग्लंडमधून मुंबईत स्थलांतर केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुंबईची दमट हवा सहन होईना. त्यांनी समुद्राच्या ताज्या हवेत फेरफटका मारण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटपर्यंतचा अरबी समुद्राचा शेकडो एकर भूभाग मागे हटवून पाथ-वे बांधण्याचा प्रस्ताव मांडला व तो मंजूर झाला.
सरकारने मागणी मंजूर केली, तरी समुद्र मागे हटविणे वाटतं तितकं सोपे नव्हतं. मरिन ड्राइव्ह ते नरिमन पॉइंट अशा मोठ्या पट्ट्यात भराव टाकण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यावेळेस अरबी समुद्राची हद्द गिरगावच्या सध्याच्या केळेवाडी, चंदनवाडी स्मशानभूमीपर्यंत होती. तिथपर्यंतच्या चौपाटीवर भराव टाकण्यासाठी मुंबईच्या आसपासच्या भागातून माती आणून टाकण्यात आली. भराव टाकण्याच्या कामासाठी स्थानिक मजुरांचा वापर करण्यात आला. मुंबईच्या नैसर्गिक कलात्मक सौंदर्यांत भर टाकणाऱ्या या पाथ-वेचे बांधकाम डिसेंबर, १९१५ मध्ये सुरू झाले आणि पाच वर्षांत म्हणजे १९२० मध्ये पूर्ण करण्यात आले. समुद्रात एकूण १६०० एकर भूभागावर भराव टाकण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र फसलेले नियोजन, दलदलीचा कमी झालेला उपसा आणि कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप यांमुळे प्रत्यक्षात फक्त ४४० एकर भूभागावर भराव टाकण्यात ब्रिटिश सरकार यशस्वी ठरले. गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटच्या किनाऱ्यालगत असलेला उलट्या ‘सी’ आद्याक्षरासारखा किंवा चंद्रकोर आकाराचा हा पाथ-वे ४.३ किमी इतका विस्तारला आहे.
ब्रिटिश बांधकाम शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुंबईतील अशा अनेक वास्तूंची बांधकामं क्रिसेन्ट (चंद्रकोर) पद्धतीने केली आहेत. या पाथ-वेचे बांधकाम सुरू झाल्याचे आणि कधी संपल्याची साक्ष देणारा फाऊंडेशन स्टोन आजही चौपाटीजवळच्या मफतलाल तरणतलावच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. मरिन ड्राइव्ह भागात ब्रिटिशांची मरिन बटालियन लाइन्स होती. त्या नावावरून मरिन लाइन्स तसेच बटालियन्सच्या परेडमुळे मरिन ड्राइव्ह हे नाव पडलं असल्याचं सांगितलं जातं. पुढे या बटालियन्सच्या जागी एअरफोर्स कर्मचारी वसाहती आल्या. ब्रिटिश राजवटीत केनेडी सी-फेस नावाने ओळखला जाणारा हा परिसर स्वातंत्र्योत्तर काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग नावाने ओळखला जाऊ लागला. मुंबईतील बेफाम आणि बेभान पाऊस पाहण्यासाठी मुंबईकरांसह परदेशी पर्यंटकांची पावलेही मरिन ड्राइव्हकडे वळतात. पहिल्याच पावसात पाणी तुंबून मुंबईकरांची दैना उडते. तसाच काहीसा प्रकार प्रकार मरिन ड्राइव्हबाबत पाथ-वे आणि कठडा बांधल्यानंतर झाला. पाथ-वेच्या भुपृष्ठातून अनेक ठिकाणी समुद्राचे पाणी शिरकाव करू लागले. त्यामुळे हे बांधकाम केल्यानंतर अवघ्या सहा वर्षांतच १९१६मध्ये पुन्हा पाथ-वेची डागडुजी ब्रिटिशांना करावी लागली. त्यानंतर तब्बल ८६ वर्षांनंतर पुन्हा पाथ-वेवर समुद्रातून पाणी शिरू लागल्याने २००६ मध्ये राज्य सरकारमार्फत दुरूस्ती करण्यात आली.
अलीकडे म्हणजे १९८० पर्यंत चर्नी रोडवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून उसळता अरबी समुद्र सहज दिसत असे. मात्र समुद्रासमोरच्या वास्तूंच्या वाढत्या आकारामुळे मुंबईकरांना समुद्र आणि दिसणं बंद झालं आहे. मुंबईत जागेला आलेल्या सोन्याचा भाव दक्षिण मुंबईसाठी फलदायी ठरला आहे. ब्रिटिश राजवटीत एक रुपयाच्या भाडेपट्टयावर घेतलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या इमारतीतील घरे चार-पाच कोटीपर्यंत सहज विकली जातात. मरिन ड्राइव्ह ते कफ परेडचा घरांचा दर तब्बल एक लाख रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. म्हणजे जमीनमालकांच्या सात पिढ्या बसून खातील इतकं मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं आहे. अर्थात हा चमत्कार समोरच्या अरबी समुद्राच्या बे-व्ह्यूमुळे झाला आहे.
क्वीन्स नेकलेसचा उल्लेख केला नाही, तर मरिन ड्राइव्हच्या इतिहासावर अन्याय केल्यासारखे होईल. मरिन ड्राइव्हसमोर असलेला इंग्रजी अक्षर ‘सी’सारख्या रचनेचा रस्ता रात्रीच्या वेळी पिवळ्या दिव्यांनी उजळला की त्याला पाहून राणीच्या गळ्यातला रत्नहारासारखा दिसतो, त्यामुळेच क्वीन्स नेकलेस म्हणून तो देश-परदेशातही प्रसिद्ध पावला. दुसर्या महायुद्धापूर्वी म्हणजे १९३५च्या सुमारास मरिन ड्राइव्हच्या पाथ-वेला जोडून असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९४० मध्ये हे काम पूर्ण झाले. रस्त्याच्या पलिकडे पश्चिम रेल्वेचे चर्नी रोड, मरिन लाइन्स स्टेशन आणि आताचा महर्षी कर्वे रोड बांधण्यात आला. त्यानंतर या भागात निवासी इमारतींच्या बांधकामांच्या हालचाली सुरू झाल्या. १९३० साली जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मरिन ड्राइव्ह रोडसमोरच्या भागात कलात्मक रचना असलेल्या घरांचे डिझाइन तत्कालीन जमीन मालकांना करून दिली. समुद्रासमोर असलेल्या या घरांचे दर त्यावेळेसही प्रचंड महाग होते. पारसी आणि इंग्रज वगळता मुंबईतील सामान्य वर्गाला ही घरे परवडणारी नव्हती. त्यावेळी बर्यापैकी गर्दी आटोक्यात असतानाही मुंबईत घरे भाड्याने घेणं लोक पसंत करीत. दरम्यान १९४५च्या सुमारास भारत-पाकिस्तान फाळणीच्या चर्चा होऊ लागल्या. त्याचा लाभ जमीनमालकांनी उठवला. फाळणीनंतर हजारो श्रीमंत हिंदू कुटुंबीयांनी मुंबईत मरिन ड्राइव्हला स्थलांतर केले.
या कुटुंबीयांचे नातलग आजही या भागात वास्तव्यास आहेत. मरिन ड्राइव्हच्या जुन्या इमारती जवळपास दादरच्या शिवाजी पार्क किंवा हिंदू कॉलनीतील इमारतींसारख्या दुमजली ठेंगण्या-ठुसक्या आहेत. कमी मजल्यांमुळे इमारतींना कलात्मक टच देणे शक्य झाले आहे. या बांधकामांचे वैशिष्ट्य म्हणजे मरिन ड्राइव्ह सी-फेस मोकळा सोडून गिरगाव चौपाटीसमोरच्या भागात या इमारती बांधण्यात आल्या आहेत. सी-व्ह्यू स्पष्ट दिसावा असा यामागचा उद्देश असावा. काही वषानंतर चर्नी रोड आणि मरिन ड्राइव्ह समुद्राच्या भागात क्लब, जिमखाने उभे राहिले आहेत. योग शिक्षण देणारी कैवल्यधाम ही वास्तू मरिन ड्राइव्हच्या समुद्रासमोर १९३९ला बांधण्यात आल्याचा उल्लेख संस्थेत पाहायला मिळाला. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारी मुद्रणालय, मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, तारापोरवाला मत्स्यालय, जवाहर बालभवन या वास्तू उभ्या राहिल्या. पुढे नरिमन पॉइंट ते कफ परेडपर्यंत हजारो इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्यातील बहुसंख्य बांधकामे ७० नंतर उभी राहिली आहेत.
समुद्राकडून येणाऱ्या भन्नाट वारा आणि मरिन ड्राइव्हचा कठडा प्रेमीयुगलं आणि मुंबईत येणाऱ्या हौशा-गवशांचे आकर्षण आहे. पावसाळ्यातली मुंबई पाहणं एक नेत्रसुखद अनुभव आहे. तो घेण्यासाठी परदेशी पर्यटक पावसाळ्यात मरिन ड्राइव्हला हटकून भेट देतात. तसेच मुंबईकरांची पावलं या दिवसांत कठड्याकडे वळलेली असतात.
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 18, 2017
या आत्मचरित्रात एकामागून एक प्रसंगांच्या लडी उलगडत जातात. कौटुंबिक कापडखरेदी, सूट शिवणं, मुलांची शालेय प्रगती, सहकुटुंब नाटकाला जाणं, मावशीच्या पार्ल्यातल्या बिऱ्हाडाचा शोध, विडीचा ज्वलंत प्रश्न, खिसा कापला जाणं, ज्योतिष आणि अध्यात्मिक अनुभव, सारं कांही मध्यमवर्गी कारकुनी जीवनाचं सार!
February 17, 2022
कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही!
April 9, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti