एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
व्होडका हे मूळचे रशियन मद्य. व्होडकाला स्वत:ची अशी चव नाही. तो ज्या पेयात मिसळाल त्यात बुडून जातो आणि ती त्याची चव बनून जाते.
October 4, 2021
यश चोप्रा यांचा ‘कभी कभी’हा अविस्मरणीय चित्रपट २७ फेब्रुवारी १९७६ रोजी प्रदर्शित झाला होता.अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटात राखी, शशी कपूर, ऋषी कपूर,वहिदा रहमान,नीतू सिंग यांच्या भूमिका होत्या.
February 27, 2024
परप्रांतीय व परदेशी विद्यार्थी असोत, रोजगार शोधणारे तरुण असोत व सुखाचा विसावा शोधणारे जागोजागचे पेन्शनर असोत, सर्वाना हि पुण्यनगरी आकर्षित करत आहे. तिचे रंगरूप झपाट्याने पालटत आहे; पण बदल कितीही झाले तरी ‘पुणे शहर अमोलिक, रचना अशी दुसरी नाही’, हे शाहीर राम जोशींचे उद्गार सदैव खरे ठरतील, यात शंका नाही!
February 15, 2022
फाळके ह्यांनी इंग्रजांनी बनवलेला एक चित्रपट पहिला आणि त्याच क्षणी भारतीय भाषेंत चित्रपट करण्याचा निश्चय केला. भांडवल उभे करण्यापासून विदेशांत जावून तांत्रिक शिक्षण घेण्यापर्यंत ह्या वेड्या माणसाने ज्या खस्ता खाल्या त्या विनोदी स्वरूपांत हा चित्रपट मांडतो.
January 29, 2022
हिंदुस्थानी संगीत, संगीतातील घराणी, घराण्यांचा अभिनिवेश आणि दोन भिन्न घराण्यांच्या गायकांमधील संघर्ष हा ‘कट्यार’चा विषय. या नाटकाला काहीजणांनी आदर्श संगीत नाटक म्हटलं. काहींनी परंपरेला सोडून असलेलं नाटक म्हटलं. याच्यासारखं नाटक पूर्वी झालं नाही असंही काहीजणांनी म्हटलं.
December 24, 2021
मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती.
June 15, 2021
१९४३ साली दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान-निकोबार द्विप समुह त्यांनी जिंकला.
December 30, 2021
आचार्य अत्रे हे तर संस्थेचे सदैव हितैषी राहिले. संस्थेबद्दल त्यांनी ८ जानेवारी १९६७ रोजी ‘‘ह्य़ाच संस्थेने माझ्या साहित्यिक जीवनाचा पाया घातला. संस्थेचे उपकार मानण्यास मजजवळ शब्द नाहींत. पुण्यातील वाङ्मयप्रेमी तरुणांना स्फूर्ति नि प्रेरणा देण्याचे महान कार्य ह्य़ा संस्थेकडून होवो ही इच्छा!’’ असा अभिप्राय लिहिला आहे.
February 7, 2022
अरे किती रंग बदलशील? एखादा सरडा पण तुझ्यापेक्षा कमी रंग बदलत असेल , असं बोलून आपण सरड्याला बदनाम करतो. वास्तविक पाहता सरडा आपला रंग वेगवेगळ्या कारणांसाठी बदलतो. त्याला अनेक नैसर्गिक व विज्ञानातील कारणं आहेत.
August 14, 2020
हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता.
June 18, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti