(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मल्लखांब दिन – १५ जून

    मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती.

      June 15, 2021


  • टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राची १८३ वर्षे

    स्वातंत्र्यपूर्व काळात हे वृत्तपत्र ‘बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ म्हणून सुरू झाले आणि १८६१ मध्ये याचे नामकरण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ असे करण्यात आले.

      November 3, 2021


  • आनंद’  चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन

    आनंद’ चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन

    एक संवादच संपूर्ण चित्रपटच आपल्यासमोर उभा करतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’.

    बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’

    राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.

    ऋषिकेश मुखर्जी यांचा "आनंद' चित्रपट लोकप्रिय झाला, तो दुर्धर कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णाने, "आनंद' ने जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितल्यानेच! त्या चित्रपटात आनंदची भूमिका राजेश खन्ना आणि डॉक्टरची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती. क्षणाक्षणने मृत्यू आपल्याला गाठत असल्याचे माहिती असूनही, आनंद मात्र व्यथा, वेदनांची पर्वा न करता सहवासातल्या साऱ्यांच भरभरून आनंद वाटतो. कुणालाही आपला त्रास होवू नये, याची काळजी घेतो. शेवटच्या श्वासापर्यंत आनंद द्या आणि आनंदी जगा, हे या चित्रपटाच्या कथेचे सूत्र होते. या चित्रपटातील भावणारी गोष्ट म्हणजे हृषिकेश मुखर्जी ह्यांनी दाखवलेलं साधसं घरगुती वातावरण; माणसासारखी साधी माणसं, चांगली माणसं, भावनिक मानसं आणि शेवटी सगळं ठाउक असूनही फक्त आपल्या माणसाच्या प्रेमापोटी अगतिक होत अतर्क्य गोष्टी करु पाहणारी माणसं हे सारं. हे सर्व वेगळच वातावरण. हृषिकेश मुखर्जींचा हाच साधेपण मनाचा ठाव घेउन जातो. फार मोठा कॅनव्हास, अतिप्रचंड दे दणादण असं काही नाही. चित्रपटात "भावनिक" प्रसंग असले तरी कंटाळ्वाणा "मेलोड्रामाटिक" पिक्चर आपण ह्यास म्हणू शकत नाही.

    आनंद ची भूमिका राजेश खन्ना यांनी ज्या पद्धतीनं सादर केली; तरी इतरही पात्रं अगदि व्यवस्थित लक्षात राहतात. म्हणजे ती लोकं येताहेत, नुसती दिलेले संवाद बोलताहेत असं होत नाही. अगदि पात्रं जिवंत होउन आल्यासारखी वाटतात. ललिता पवार ह्या एकाच वेळी कडक शिस्तीच्या पण प्रेमळ नर्स आहेत. "ए मुरारीलाल" ह्या बाष्कळ हाकेला विनाकरण "ओ" देणारा गमत्या पण "माणूसपण" जाणणारा जॉनी वॉकर आहेत. काहिसा व्यवहारी, थोडासा बनेल पण मित्रांची काळजी घेणारा डॉक्टर, डॉ. कुलकर्णी म्हणजेच रमेश देव, त्यांची डॉक्टरची पत्नीही म्हणजेच सीमा देव. रमेश देव यांचे मित्र हे तिचेही आप्त बनलेत.असा सारा मामला. बाबु मोशाय्,अजून एक भावनिक, जरा अव्यवहारी म्हणता यावा असा, मनाने सच्चा असा एक डॉक्टर, डॉ. बॅनर्जी आहे. अमिताभ बच्चन त्याकाळातील नवोदित कलाकार होते. ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर उत्तर 'आनंद' हे येऊ शकेल.

    या चित्रपटात भव्य दिव्य असे काहीच नाही. यातील गाणी तर लाजाब

    "मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..."

    “ना जिया लागे ना...”

    "जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....कभी ये रुलाये...."

    "कहीं दूर जब दिन ढल जाये..”

    चारही गाणी अप्रतिम

    या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, फिल्मफेअरचा सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार: राजेश खन्ना, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार: अमिताभ बच्चन, सर्वोत्तम संवाद पुरस्कार: गुलझार, सर्वोत्तम संपादन पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, सर्वोत्तम कथा पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी.

    आनंद चित्रपट पूर्वी कधी पाहिला नसेल तर आता पहा. खरं तर पाहू नकाच. "अनुभवा" आनंद. सोबत लिंक दिली आहे.

    https://www.youtube.com/shared?ci=GCgBGXC2yMU

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      March 12, 2022


  • २०१७ मधील विजयदुर्ग महोत्सव

    पर्यटकांप्रमाणे इतिहासप्रेमींना, अभ्यासकांना, संशोधकांना, जिज्ञासूना, कोकण प्रेमीचना आणि सौंदर्याच्या उपासकांना विनालंब आणि बिनाअडथळा आनंद लुटत असतात. विजयदुर्ग-देवगड ही विजयी देशभूमी आहे. परशुरामाने वसविलेली ही पावन भूमी आहे.विजयदुर्ग-देवगड नावातच सर्व काही आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला येथील सौंदर्य स्थळांचा, निसर्ग स्थळांचा ऐतिहासिक स्थळांचा, परिचय करून देऊन पर्यटक इकडे मोठया संख्येने आकृष्ट करण्यासाठी २०१७ मधील विजयदुर्ग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

    २९,३० व ३१ डिसेंबर २०१७ रोजी विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आणि विजयदुर्ग ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे... या महोत्सवला अवश्य भेट दया..

    देवगड तालुक्याला आध्यात्मिक, साहित्यीक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक वारसा आहे. याचे येथे पदोपदी प्रत्यंतर येते. या तालुक्यातील प्रत्येक गाव हे पर्यटन स्थळच आहे. येथील अनेक स्थळे अजूनही प्रसिध्दीपासून दूर आहेत. मात्र त्यांचे सौंदर्य, वैशिष्टये इतकी आगळी-वेगळी आहेत की, एकदा आलेला पर्यटक पुन्हा-पुन्हा येण्याचा निश्चय करूनच परतात.

    या महोत्सवला येण्याऱ्या पर्यटकांना विजयदुर्ग व आजुबाजूच्या पर्यटनाच्या ठिकाणांची माहिती.

    विजयदुर्ग बंदर
    विजयदुर्ग हे संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील एक महत्वपूर्ण आणि सुरक्षित बंदर आहे. विजयदुर्ग किल्ल्यानजीक हे बेदर आहे. ब्रिटीशांच्या आणि मराठयाच्या काध्हात या बंदरात फार मोठी वर्दळ होती. सुरक्षित आणि खोल वाघोटन खाडीमुळे गिर्ये गोदी आणि वाघोटण गोदी यांचा मालवाहतुकीचा उपयोग करून घेतला जात होता. पूर्वी या बंदरातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असे. पणजी-मुंबई प्रवासी देवगड प्रमाणेच विजयदुर्ग बंदरातही जाता येता थांबत असे. परंतु मागील २०, २५ वर्षापासून या बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक बंद आहे. मालवाहतुकीची इतर साधने उपलब्ध झाल्याने पूर्वीच्या मानाने मालवाहतूक बरीच कमी झाली आहे. सध्या या बंदरातून कोल्हापूर भागातील साखर कारखान्यातील लाखो टन ऊसाची मळी निर्यात होत आहे. शासनाच्या नवीन बंदर विकास धोरणानूसार हे बंदर आंरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने हिंदुस्थान इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अन्ड इंजिनियरिंग्ज प्र.लि. या कंपनीशी करार केला आहे. या बंदरासाठी हजारो कोटी हजारांची गुंतवणूक होणार असून हे बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर प्रतिवर्षी 75 मिलियन कार्गो हाताळला जाणार आहे.

    गिर्ये गोदी
    विजयदुर्ग-तळेरे मार्गावर विजयदुर्ग पासून 3 कि.मी. अंतरावर आणि देवगड-विजयदुर्ग मार्गावर देवगड पासून 27 कि.मी. अंतरावर गिर्ये गाव आहे देवगड तालुक्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणा-या वाडातर, मुंबरी खाडीप्रमाणेच वाघोटण खाडी आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर असून ही खाडी खोल पण सुरक्षित आहे. त्यामुळे येथे खडक खोदून आरमारी गोदी उभारण्यात आली आहे. ही गोदी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे. तेथे जहाज बांधणीचा मोठा कारखाना उभारला होता. त्याच ठिकाणी आरमारी जहाजे पावसाळयात सुरक्षित ठेवली जात होती. साधारणपणे मराठ्यांची जहाजे २० ते १५० टनी असत. मात्र ह्या गोदीची क्षमता ५०० टनी जहाजांची होती. सुमारे १०६ मी. लांब आणि ७० मी. रूंदीची ही गोदी उत्तराभिमुख आहे. ही गोदी म्हणजे मराठ्यांच्या विशेषत: छत्रपती शिवाजी महारांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच होय. वाघोटण खाडीतील हे नाविक केंद्र म्हणजे मराठ्यांच्या नौकानयनाच्या इतिहासातील अपूर्व कामगिरी होय. कित्येक इतिहासकार, संशोधक येथे भेट देत असतात. पर्यटकांनीही मनमुराद आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे.

    ब्रिटीशकालीन (मराठ्यांचा) बंगला, वाघोटन
    तळेरे विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून २४ कि.मी. अंतरावर वाघोटन गाव आहे. विजयदुर्ग-वाघोटन खाडी, वाघोटन गोदी, हिरव्यागार वनराईरने सजलेल्या आंब्यांच्या बाबा, कोकणातील सर्वात मोठया आणि दणकट चि-यांचा खाण व्यवसास या बरोबरच या गावाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे येथील ब्रिटीश कालीन (मराठ्यांचा बंगला) होय.

    सुमारे १६५ वर्षापूर्वी बांधलेल्या आणि स्थापत्य शास्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बंगल्याची निर्मिती ब्रिटीशांनी अटक केलेल्या थिबा राजाला सन्मानाने ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी केले होती. एकूण १३ गोल आणि चौकोनी आकाराचे अजस्र खांब, भव्य कमान्या यातून साकारलेल्या या बंगल्याला उत्कृष्ट सागवानी लाकूड वापरेलेले आहे. ब्रिटीशकालीन आठ हापूस आंब्यांची झाडे अद्यापही आहेत. येथे त्याकाळीतील विहीर, पडझड झालेला कैदखाना, घोडयांच्या पागा आहेत. हा ऐतिहासिक बंगला १९३२ साली होमोओपॅथिक डॉ. माधव कृष्णा मराठे यांनी लिलावात घेतला. या बंगल्यात आजही त्यांच्या औषधे बनविण्याच्या आणि साठवणीच्या वस्तू तसेच औषधोपचार व धार्मिक पुस्तकांचा संग्रह देखरेख करणा-यांनी सांभाळला आहे. याच बागेत माधव मराठे, कमलाबाई मराठे, अक्का मराठे, कृष्णा मराठे यांच्या समाधी आहेत.

    वाघोटन गोदी
    देवगड पासून सुमारे २९ कि.मी. अंतरावर तळेरे-विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून २४ कि.मी. अंतरावर ब्रिटिश कालीन सुप्रसिध्द वाघोटन गोदी आहे. गिर्ये गोदी प्रमाणे येथील रचना असून ही गोदी ब्रिटीश काळात फार उपयुक्त होती. ब्रिटिशनौदलाच्या यशस्वीतेत वाघोटन गोदीने भर घातली आहे. ही कोकणच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब आहे. डोंगरमाथ्यावरून वाघोटन गोदी, वाघोटन खाडी, हिरवेगार डोंगर पहाण्यासारखे आहेत.

    मणचे धबधबा
    देवगड समुद्राची भूमी जांभ्या दगडाची आणि लहान लहान डोंगर उताराची असली तरी येथे अतिशय विलोभनीय असे मणचे आणि सैतवडे असे दोन धबधबे आहेत.

    विजयदुर्ग-तळेर मार्गावर तरळयापासून २० कि.मी अंतरावर मणचे फाटा आहे. तेथून ५ कि.मी. अंतरावर मणचे धबधबा आहे. देवगड पासून ३५ कि.मी. अंतर आहे. हा एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणायला हरकत नाही.सुमारे ३०० फूट उंचीवरून बारमाही कोसळणारा हा धबधबा सौंदर्याने अतिशय नटलेला आहे. इतक्या उंचीवरून फेसाळत कोसळणा-या धबधब्याच्या प्रवाहाखाली स्नानाचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येतो. काळ्या कातळातून पाणी सतत वहात असल्याने नैसर्गिकरीत्याच येथे लहानमोठी जलकुंडे तयार झाली आहेत. या ठिकाणी पोहोण्याचा आनंद लुटता येतो. धबधब्यापर्यंत बरेचसे अंतर पायी-पायीच जावे लागते. ही पायवाटही म्हणावी तशी चांगली नाही, मात्र बाकीचा रस्ता ब-यापैकी आहे. या धबधब्याशेजारी श्री व्याघ्रेश्वर मंदिर आहे. हे येथील भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराकडे पाहिले जाजे. हा परिसर हिरव्यागार सृष्टीने नटलेला आहे.

    विजयदुर्ग किल्ला
    विजयदुर्ग किल्ल्यातील मराठय़ांच्या पराक्रमात अनेक गोष्टींबरोबर येथील दुर्गरचना, आरमारी गोदी आदींबरोबरच समुद्रांतर्गत तटबंदीचाही समावेश करता येईल. येथील बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. त्यासाठी काळोख्या रात्री अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर या युद्धनौका बुडाल्या. या भागात ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली उभारलेली आहे. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि बुडाल्या. प्रकाशचित्र तज्ज्ञांनी यासंदर्भात काही वर्षापूर्वी अभ्यास केला असता हे बांधकाम १७व्या शतकातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्या काळात शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली होती.

    मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील शान! इंग्रजांनाही या किल्ल्याची एवढी आस होती की, केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला जिंकल्यावर पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट जवळची दहा गावे द्यायला इंग्रज तयार झाले होते. असा हा नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग!…

    ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वली बेग याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावर कालांतराने देवगिरीची यादवसत्ता आली. पुढे विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाकडे हा किल्ला आला. इ.स. १६५३मध्ये विजय संवत्सर चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला.

    छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले. यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला हे दोन गोष्टीतून आपल्या लक्षात येतं. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारुतीचं मंदिर आणि गोमुख बांधणीचा दरवाजा! या दोन्हीही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. या किल्ल्यात प्रवेश करायचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा मार्ग असल्याने त्याला ‘पडकोट खुष्क’ असं नाव आहे. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे.

    दरवाजाच्या बाहेर पूर्वी मोठा खंदक होता. इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाजासमोर डावीकडे समुद्रकिना-यापर्यंत हा खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खंदकामुळे तटाला भिडणे शत्रूला कठीण जात होते. आज या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. मातीचा भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला. खुष्कीच्या मार्गातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर लागते. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिभीचा दरवाजा लागतो.

    १७व्या शतकात या परिसरास जिभी म्हणत. राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात याला जिभी असे म्हटले आहे. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाजापुढे बांधलेला चौबुरुजी! तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पेशव्यांविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या ४ पौंडी १६ तोफा या जिभीत रचून ठेवल्या होत्या. जिभीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पाय-या लागतात. हाच दिंडी दरवाजा!

    दिंडी दरवाजाची रचनाच अशी आहे की, किल्ल्यावर हल्ला करणा-या शत्रूच्या नजरेत हा दरवाजा येत नाही. त्यामुळे शत्रूंच्या महाभयंकर तोफांचा मारा इथपर्यंत पोहोचत नव्हता. शत्रूने केलेल्या तोफांच्या मा-याच्या निशाण्या आजही या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर हे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं जात असे. त्यानंतर आत येणा-या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाजातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचं बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. या दरवाजावर मोठमोठे खिळे आहेत.

    या दिंडी दरवाजावरील भाग म्हणजे नगारा! शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी नगारे वाजविले जात असत. वर जाण्यासाठी नगारखोलीच्या खाली डावीकडे जिना आहे. दरम्यान, ध्वजस्तंभाजवळ जाणा-या घाटीच्या पायथ्याशी एक वास्तू आहे. हा खलबतखाना!…

    शत्रूच्या हल्ल्याची चाहूल लागली किंवा महत्त्वाची बोलणी करायची असल्यास ती इथल्या खलबतखान्यात व्हायची. वास्तुशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून या खलबतखान्याची रचना करण्यात आली आहे. या वास्तूला पूर्वी दरवाजा होता. आता तो अस्तित्वात नाही. आत चाललेली गुप्त बोलणी बाहेरच्या व्यक्तीला अजिबात ऐकायला येत नसत. अचंबित करणा-या अशा अनेक वास्तू या किल्ल्यात पाहायला मिळतात.

    ज्या ठिकाणी दरबार भरला जात असे, त्याला ‘सदर’ असं नाव आहे. आयताकृती असणा-या या हॉलमध्ये अगदी शेवटच्या सैनिकालाही स्पष्ट आवाज ऐकू यायचा. याबरोबरच भुयारातून जाणारा ‘खूब लढा तोफा बारा’ बुरूज, पेशवेकालीन वाडय़ाकडे जाणारे भुयार, भवानी मातेचं मंदिर, सैनिकांची निवासस्थाने आदी अनेक वास्तूंमुळे विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या ऐतिहासिक आठवणी सांगत उभा आहे.
    या किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ गनिमी काव्याने मराठय़ांनी जेरीस आणले. पण फितुरीमुळे हा किल्ला इंग्रजांच्या आणि नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला. १७१८पासून झालेल्या पहिल्या परकीय शक्तीच्या हल्ल्यापासून ते किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत म्हणजे १७५६पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर आजही मराठय़ांच्या पराक्रमाने, किल्ल्याच्या रचनेमुळे आणि भक्कम बांधकामामुळे आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या काही कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यावर कान्होजी आंग्रे यांनी कोकणात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. इंग्रज आणि पोर्तुगीज यांचे आंग्रेंशी कधीच जुळले नाही. आंग्रेंच्या मराठा आरमारामध्ये रामेश्वर भागात असलेल्या गोदीवाडी येथील आरमारी गोदी कधीही दुर्लक्षित करता येणार नाही.
    साधारण ६० वर्षापूर्वी म्हणजेच १९५२ सालात आरमारी गोदीमध्ये चिखलात रुतलेला नांगर सापडला होता. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेल्या या नांगरावरून त्या वेळच्या जहाजांची कल्पना येते. याच आरमारी गोदीमध्ये शत्रूंच्या जहाजांच्या दुरुस्तीबरोबरच नवीन जहाजेही बनवली जात. गिर्ये गावाजवळ वाघोटन खाडीच्या काठावर खडक खोदून या गोदीची निर्मिती आंग्रेंनी केली. या गोदीची लांबी ३५५ फूट व रुंदी २२७ फूट इतकी होती. या गोदीमध्ये ५०० टनी जहाज सहज ये-जा करत.

    भरतीच्या वेळेमध्ये जहाजे गोदीत नेण्यात येत असत. ओहोटीला गोदीतील पाणी बाहेर गेल्यावर पूर्वेकडील ३७ फूट रुंदीचा दरवाजा बंद करून भरतीच्या पाण्यास अडविले जाई. त्या वेळी तीनशेहून अधिक कामगारांनी प्रचंड परिश्रम करून ही गोदी निर्माण केली. प्रसिद्ध फत्तेजंग पाल आणि समशेरजंग पाल या लढाऊ जहाजांची बांधणी याच गोदीमध्ये करण्यात आली. गोदीचं महत्त्व एवढं मोठं होतं की, या गोदीमध्ये बांधलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या जहाजांनी मराठय़ांच्या वीरश्री गाजवलेल्या आरमारात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे शत्रूपासून गोदीच्या संरक्षणासाठी मटाटिया बुरुजाची खास बांधणी करण्यात आली होती. त्यावर तोफाही ठेवण्यात आल्या होत्या.

    अर्थात, या बुरुजावर आणि गोदीजवळ सैनिकांचा जागता पहारा असे. या गोदीची पाहणी करत असताना १९५२ सालात कॅप्टन डेव्हिस यांना चिखलात रुतलेला नांगर सापडला. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेला हा नांगर १८व्या शतकातील पालवी गुराबाचा होता. मुंबईच्या नॉटिकल म्युझियममध्ये तो नांगर आजही जतन केलेला आहे. विजयदुर्गच्या शामराव परुळेकर यांनी हा नांगर संग्रहालयाकडे पाठविला अशी नोंद आढळते.

    विजयदुर्गचे बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळय़ात सतत खुपत असे. त्यासाठी काळोखी रात्र धरून अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन मजबूत युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर असताना त्या युद्धनौका बुडाल्या. याचा शोध घेताना त्या भागात समुद्राच्या ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली बांधलेली आढळली. प्रकाशचित्र तज्ज्ञांनी या संदर्भात काही वर्षापूर्वी अभ्यास केला असता हे बांधकाम १७ व्या शतकात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

    शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि त्या बुडाल्या असा निष्कर्ष काढता येतो. या संदर्भात काही तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. विजयदुर्गजवळच्या या भिंतीबाबत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेच्या डॉ. त्रिपाठी यांनी या बांधकामाचा अभ्यास केला होता. त्या वेळी त्या भागात जहाजांचे अवशेष व तोफगोळे मिळाले. याबाबत १९९८ मध्ये डॉ. त्रिपाठी यांनी ‘जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी’ मध्ये शोधप्रबंध सादर केला होता.
    त्यानंतर या संस्थेतील या प्रबंधाला समोर ठेवून मुंबईमध्ये भरलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजमध्ये संशोधक सहायक असलेल्या इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांनी ‘मिथ्स अँड रिअॅयलिटी-दी सबमज्र्ड स्टोन स्ट्रक्चर अॅ ट फोर्ट विजयदुर्ग’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये ते म्हणतात की, विजयदुर्ग किल्ल्याजवळची प्रसिद्ध असलेली समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे.

    कोकण किनारपट्टीवर आणखी काही ठिकाणे आढळणा-या ‘डाइक’ या प्रकारच्या रचनेचाच हा एक भाग असल्याचे ते म्हणतात. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणतात की, हे बांधकाम प्लॅटफॉर्मसारखे असल्याचे दिसते. यामध्ये वापरण्यात आलेल्या दगडांपैकी सर्वात मोठा दगड ३.५ बाय २.५ बाय २.५ मीटर इतक्या मोठय़ा आकाराचा आहे. एवढा मोठा दगड त्या जागी नेणे हे त्या काळी शक्य नव्हते. या भिंतीवर चार मीटरहून अधिक उंचीपर्यंत पाणी आहे. त्यामुळे तेव्हा आरमारासाठी वापरात असलेल्या बोटींना या भिंतीवरून ये-जा करणे शक्य होते.

    साधारण ८० ते ९० वर्षाच्या या इतिहासात किरकोळ घटना वगळता या भिंतीवर बोटी आदळून फुटल्याच्या नोंदी ब्रिटिश, पोर्तुगीज किंवा डचांच्या लिखाणात आढळत नाहीत. काही असलं तरी मराठय़ांच्या आरमारात पाण्याखालील ही भिंत आरमाराच्या विजयी गाथेची भागीदार आहे. कारण पूर्ण तयारीनिशी आणि गुप्तपणे उतरलेल्या इंग्रजांच्या ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ वेळी ही भिंत कामी आली नसती तर कदाचित विजयदुर्गला एका पराभवाचा ठपका बसला असता. पाण्याखालील भिंतीसोबत ‘आंग्रे बँक’ ही समुद्रातील जागाही मराठय़ांच्या पराक्रमात कामी आली आहे. हा भाग नैसर्गिक आहे. पण ही जागा आंग्रेंच्या नौदलाने शोधून काढली आणि त्याचा उपयोग शत्रूंचे हल्ले यशस्वीपणे परतविण्यासाठी अनेक वेळा केला.

    जमिनीवर जशा द-या-खो-या, उंचवटे, टेकडय़ा असतात, त्याचप्रमाणे समुद्रतळाशीही असा भाग असतो. समुद्रातील टेकडी म्हणजेच ‘आंग्रे बँक’! किनारपट्टीपासून आपण आत आत गेल्यावर पाण्याची खोली वाढत जाते. विजयदुर्ग समुद्रामध्ये मात्र निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो.

    विजयदुर्गपासून साधारण १०० किलोमीटरच्या अंतरात पाण्याची खोली ८० ते ९० मीटर वाढत जाते. पुढच्या ३ ते ४ किमीच्या अंतरात ही खोली तब्बल पावणेदोनशे मीटर एवढी जाते. पण त्यानंतरच्या काही अंतरामध्ये ही खोली अचानक कमी होऊन २० ते २५ मीटर एवढी होते. हीच ती आंग्रे बँक म्हणून ओळखली जाणारी समुद्रातील टेकडी! ही टेकडी तब्बल ३५ ते ४० किमी लांब व १५ ते २० किलोमीटर रुंद आहे. विजयदुर्गवर हल्ला करणा-या शत्रूंच्या जहाजांवरील तोफांची तोंडं विजयदुर्गकडेच असत. या तोफांना पश्चिमेकडून हल्ला झाला तर त्वरित पश्चिमेकडे वळणे अवघड होत असत. या गोष्टीचा फायदा मराठा आरमार घेत असे.

    आंग्रे बँक या ठिकाणी मराठा आरमार नांगर टाकून आरामात असे. शत्रू विजयदुर्गच्या दिशेने येताना दिसला की, मराठय़ांची जहाजं पश्चिमेकडून येऊन त्यांना अटकाव करत. बेसावध असलेल्या शत्रूचा फायदा घेऊन मराठा आरमार त्या जहाजांवरील माल ताब्यात घेत. पराक्रमी मराठा सरदार, त्यांचे मावळे यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला बांधलेली तिहेरी तटबंदी मराठय़ांच्या पराक्रमात महत्त्वपूर्ण ठरली. आणि याचबरोबर आरमारी गोदी, समुद्रातील छुपी तटबंदी, आंग्रे बँक या गोष्टीही विजयदुर्गवरील मराठय़ांच्या विजयगाथेत अतिशय मौल्यवान कामगिरी करणा-या ठरल्या.

    गाव: विजयदुर्ग
    ग्रामपंचायत: विजयदुर्ग
    अंतर. ८ किमी
    जवळचे बस स्थानक: विजयदुर्ग
    जवळचे रेल्वे स्टेशन: कणकवली
    जवळचे विमानतळ: गोवा

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / बाळा कदम.

      December 21, 2017


  • युरोपियन महासंघातील १२ देशांत युरो चलन सार्वत्रिक वापरण्यास सुरवात झाली

    युरोचा स्वीकार करण्याकडे जसा युरोपातील देशांचा कल वाढत जाईल तशी या चलनाचीही ताकद वाढत जाणार आहे. प्रामुख्याने ब्रिटनसारखा देश जर आपला अहंकार दूर सारून युरोत सहभागी झाला तर युरोची ताकद निश्चितच वाढेल. ब्रिटन सहभागी झाल्यास चित्र पालटू शकेल.

      January 1, 2022


  • मुंबई अग्निशमन दलाचा वाढदिवस

    हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.

      April 1, 2022


  • जीमेलचा वाढदिवस

    १ एप्रिल २००४ मध्ये पहिल्यांदा "गुगल‘ने जेव्हा ई-मेलच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले, तेव्हा हा "एप्रिल फूल‘चा प्रकार तर नाहीना, अशी शंकाही अनेकांच्या मनाला चाटून गेली. पण, तसे काही नव्हते. जीमेल ही सेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम पाठबळ तिच्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी खात्री मात्र अनेकांना होती. पण जीमेल वापरण्यासाठी सुरवातीच्या काळी निमंत्रण आवश्यक असे. प्रत्येक जीमेलधारकाला दोनच निमंत्रणे पाठवता येत, पुढे ती चार झाली. ब्लॉगर आदी अन्य साधनांच्या वापरकर्त्यांना जीमेल या सेवेनेच जीमेलचे हे एवढे अप्रूप अनेक कारणांसाठी होते. हॉटमेल वा याहू आदी सेवा फारतर २० मेगाबाइट साठवणक्षमताच देत असताना, जीमेलने थेट एक गिगाबाइट साठवणीचे भांडारच देऊ केले होते. जीमेलची ही क्षमता आता ३६ गिगाबाइटपर्यंत किंवा त्याहीपुढे आहे. खरोखरच जीमेल सेवा सुरू झाली आणि हा हा म्हणता जगभरातील लोकांना जी-मेलने आकृष्ट केले. व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग वगैरे गोष्टी आधीही होत्या. परंतु, त्यांची ऍप्लिकेशन्स डाऊनलोड करून घ्यावी लागत. "जी-मेल‘मध्ये एकाच ठिकाणी सर्व सुविधा हात जोडून उभ्या राहिल्या. कॅलेंडर, ऑनलाइन ड्राइव्ह, फोटो होस्टिंग, व्हिडिओसाठी यू-ट्यूब, ब्लॉग, बातम्या आणि "गुगल‘च्या सर्व सेवा वापरण्याची सोय झाली. जीमेल ही सेवा इतरांपेक्षा आगळीच हवी, यासाठी तिच्या दिसण्यापासून ते तांत्रिक क्षमतांपर्यंत किती तरी गोष्टी निराळ्या आणि त्या वेळी काळापुढल्या होत्या. उदाहरणार्थ, अगदी पहिल्या दिवसापासून मोबाइल फोनवरही जीमेल पाहता येईल, अशी तांत्रिक व्यवस्था होती; तेव्हा त्या क्षमतेचे मोबाइलच त्या काळी जास्त नव्हते. निळ्या-करडय़ा रंगाचे हॉटमेल पिवळ्या-जांभळ्या रंगाचे याहू यांच्यापेक्षा अगदी स्वच्छ दिसणारी, पांढऱ्यावर गुगलच्या चार रंगांचा अगदी माफकच वापर असणारी ही खिडकी, पुढल्या काळात इंटरनेटवर रंगरंगोटीपेक्षा वापरक्षमतेलाच महत्त्व येणार, अशा नव्या सौंदर्यशास्त्राची ग्वाही देणारी होती. अशी संपूर्ण रचना तयार करण्यामागे गुगल कंपनीतील अभियंता पॉल बुशैत याची धडपड होती. नवी सेवा मोफत द्यायची किंवा नाही, यासारख्या मुद्‌द्‌यांवर आधी कंपनीत वादही झाले होते. पण, या सगळ्यातून तावून-सुलाखून तयार झालेली "जी-मेल‘ सेवा पाहतापाहता इतकी लोकप्रिय झाली, की सध्या ती वापरणाऱ्यांची संख्या १२५ कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. गुगल व जीमेल सध्या ५७ भाषांत वापरता येते, त्यांपैकी निम्म्याहून अधिक भाषा आशियाई आहेत! जीमेलच्या वापरकर्त्यांपैकी निम्मे आशियातच आहेत. जी-मेल मुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर संगणकाच्या पडद्यावर उमटविलेली अक्षरे निमिषार्धात सातासमुद्रापार पोचण्याची सोय उपलब्ध झाली. या "डाकिया‘चे स्वरूपच आमूलाग्र पालटून गेले. मग "पांढऱ्यावर काळे‘ करण्याची आवश्ययकता उरली नाही.
    जीमेलचे अभिनंदन

    जी-मेलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी-मेलची अनोळखी फीचर्स.

    इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी गुगलच्या 'जीमेल'चा वापर केलेला असतो. अनेकांचे प्रायमरी इमेल आयडी तर 'जीमेल' वरच असतात. परंतु, आपल्यापैकी अनेकांना अजूनही 'जीमेल'ची सर्व पूर्णपणे माहिती नाहीत. या फिचर्सची माहिती झाली तर आपल्याला जीमेल वापरणे अधिक सोयीचे होईल.
    'स्पॅम' चा वापर
    आपल्या जीमेल अॅड्रेसमध्ये जो डॉट दिला जातो, त्याचा प्रत्यक्षात काहीही उपयोग नसतो. तुमचा जीमेल आयडी जर tyler.durden@gmail.com असा असेल तर tylerdurden@gmail.com किंवा t.ylerdurden@gmail.com किंवा t.y.l.e.r.d.u.r.d.e.n@gmail.com या नावाने येणारे मेल्ससुद्धा तुमच्या इनबॉक्समध्येच येतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. अशा प्रकारचे जीमेल अॅड्रेस आपण वन टाइम ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी किंवा इतर तात्पुरत्या इंटरनेट सेवांसाठी वापरता येतात. तात्पुरते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जर पुन्हा त्या साइटवरून मेल येऊ द्यायचे नसतील तर आपल्या जीमेल आयडीची अक्षरे बदलून इमेल फिल्टर तयार करता येते आणि या आयडीवर येणारे सर्व मेल डीलीट करता येतात.
    इमेल फिल्टर तयार करणे
    इमेल फिल्टर तयार करण्यासाठी जीमेलच्या इनबॉक्समध्ये जा. त्यानंतर गो टू सेटिंग्ज-फिल्टर टॅब-क्रीएट अ न्यू फिल्टर या क्रमाने जावे लागते. फिल्टर तयार झाल्यानंतर त्यात स्कीप इनबॉक्स, अप्लाय द लेबल, डीलीट आणि इतरही अनेक पर्याय असतात. फिल्टर अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तुमच्याकडे येणारे सर्व इमेल्स तुम्ही निवडलेल्या पर्यायांनी तपासल्यानंतरच इनबॉक्समध्ये येतील.
    इमेल सबस्क्रिप्शनचे वर्गीकरण
    वेगवेगळ्या इमेल सबस्क्रिप्शनचे इमेल फिल्टर तयार करण्यासाठी + या चिन्हाचा उपयोग करावा. The Onion या वेबसाइटवरुन इमेल सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर tyler.durden+theonion@gmail.com हा इमेल अॅड्रेस तुम्ही देऊ शकता. त्यामुळे theonion वरून सर्व इमेल्स तुमच्या इनबॉक्समध्ये येतील आणि आवश्यकता नसल्यास फिल्टर बसवून ते परस्पर डीलीट करता येतील.
    जीमेल कॉन्टॅक्ट्स
    आपल्या स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट्स ऑटोमॅटीकली आपल्या गुगल अकाऊंटशी जोडले जातात. यासाठी तुम्ही ज्या इमेल अॅड्रेसने स्मार्टफोनवर साइन इन केलेले असते त्यातील कॉन्टॅक्ट्स अपडेट केलेल असायला हवेत.
    गुगलशी कॉन्टॅक्ट्स जोडणे
    अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनवरून सेटींग्ज-अॅड अकाऊंट-गुगल या क्रमाने सर्व टप्पे पूर्ण केले की गुगल अकाऊंटशी कॉन्टॅक्ट्स जोडता येतात. अशा पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये जे फोन नंबर्स असतील ते सर्व गुगल अकाऊंटशी जोडले जातात आणि नंबर डीलीट होण्याचा धोका कमी होतो. गुगल आयडीवर नंबर सेव्ह झाला की तो तुमच्या जीमेल अॅड्रेस बुकमध्ये समाविष्ट होतो आणि तुम्ही त्या इमेल अॅड्रेस ज्या डीव्हाइसवरून उपयोग कराल त्यात तो दिसू शकतो. अॅण्ड्रॉइडशिवाय आयओएस, विन्डोज फोन आणि ब्लॅकबेरीवरूनसुद्धा कॉन्टॅक्ट्स गुगल अकाऊंटशी जोडता येतात.
    गुगल १८
    गुगलच्या मुख्य पानावरील डाव्या कोपऱ्यातील जीमेल-कॉन्टॅक्ट्स-मोअर-फाइंड अॅण्ड मर्ज कॉन्टॅक्ट्स या क्रमाने पुढे गेले की आपल्या अॅड्रेस बुकमधील कॉन्टॅक्ट्सच्या डबल एन्ट्रीज दिसून येतात. यातील आवश्यक त्या कॉन्टॅक्ट्सला क्लीक करा आणि मर्ज करा.
    कॉन्टॅक्ट्स परत मिळवणे
    आपल्या फोनमधून अॅड्रेस डीलीट केला की जीमेलवरूनही तो डीलीट होतो. पण तीस दिवसांच्या आत प्रयत्न केल्यास तो कॉन्टॅक्ट रिकव्हर होऊ शकतो. यासाठी जीमेलच्या कॉन्टॅक्ट्सवर गेल्यानंतर मोअर-रीस्टोअर हे ऑप्शन्स निवडावे लागतात.
    लॅब्ज
    जीमेलची उपयुक्तता अधिकाधिक वाढवण्यासाठी 'लॅब्ज'मध्ये आणखीही पर्याय उपलब्ध आहेत. डावीकडे असलेले चॅट ऑप्शन उजवीकडे नेणे, अनेक इनबॉक्स तयार करणे, आलेला इमेल क्लीक न करता पाहता येणे असे वेगवेगळे प्रयोग 'लॅब्ज'च्या माध्यमातून करता येतात.
    कॅलेंडर
    तुमच्या गुगल अकाऊंटवर स्वतःचे कॅलेंडर/प्लानर तयार करता येते. हे कॅलेंडर इमेलद्वारे इतरांना पाठवता येऊ शकते. त्यामुळे तुमचे त्यामुळे तुमच्या वेळापत्रकानुसार इतरांना त्यांची कामे प्लान करता येतात. लॅब्ज ऑप्शनमधून कॅलेंडर सेट अप करता येते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 1, 2019


  • कारगिल विजय दिवस

    हा विजय इतिहासात सोनेरी अक्षरात लिहण्यासारखा आहे. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले चौथे युद्ध मे ते जुलै असे तीन महिने चालले होते.

      July 26, 2021


  • जागतिक महासागर दिवस

    पृथ्वीच्या ७३ टक्के भागात पसरलेल्या महासागरांचे वैशिष्ट्य टिकवून ठेवावे, यासाठी काय-काय करता येईल, या दृष्टीने २००३ पासून जगभरात विचार सुरू झाला. ८ जुन रोजी ‘जागतिक महासागर दिन’ साजरा करण्याची कल्पना त्यातूनच जन्माला आली.

      June 8, 2021


  • मुंबईतील ग्रॅट मेडीकल कॉलेजचा वर्धापनदिन

    मेडिकल कॉलेज सर जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात भायखळा येथे आहे. रुग्णालयाची अंथरूण क्षमता २८४४ बेड आहे आणि महाराष्ट्र व मध्य भारतातील सर्व भागातून वार्षिक रूग्ण १,२००,००० रूग्ण इथे येतात.

      November 1, 2021