बाल लेखिकांची भरारी

पुण्यात काही दिवसापूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवाद तर्फे आयोजित केले होते.आराध्या नंदकर, साक्षी भांड व पालवी मालुंजकर या तीन मुलींनी त्याचे उद्घाटन केले होते. राजीव तांबे यांनी या तीनही मुलींची साहित्यिक म्हणून मुलाखत घेतली. अनेक बाल साहित्य संमेलनातूनही मुलांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.असे प्रेरणादायक उपक्रम वारंवार घडायला हवेत. पुस्तक प्रदर्शनातही त्यांची पुस्तकें स्टाॅल वर ठेवली जातात.मुले लिहीत आहेत ती केवळ प्रेरणेमुळेच. समृद्ध माणसांचा राबता घरात असण्याबरोबरच पुस्तकांचाही राबता घरात असेल तर मुले वाचू लागतात, लिहू लागतात.



पुण्यात काही दिवसापूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवाद तर्फे आयोजित केले होते.आराध्या नंदकर, साक्षी भांड व पालवी मालुंजकर या तीन मुलींनी त्याचे उद्घाटन केले होते. राजीव तांबे यांनी या तीनही मुलींची साहित्यिक म्हणून मुलाखत घेतली. अनेक बाल साहित्य संमेलनातूनही मुलांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.असे प्रेरणादायक उपक्रम वारंवार घडायला हवेत. पुस्तक प्रदर्शनातही त्यांची पुस्तकें स्टाॅल वर ठेवली जातात.मुले लिहीत आहेत ती केवळ प्रेरणेमुळेच. समृद्ध माणसांचा राबता घरात असण्याबरोबरच पुस्तकांचाही राबता घरात असेल तर मुले वाचू लागतात, लिहू लागतात.

सृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी,तसेच साकेत प्रकाशन व इतर प्रकाशकांनी सुद्धा लहान मुलांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. लहान मुले कोणाची ना कोणाची तरी प्रेरणा घेऊन स्वतः पायवाट निर्माण करतात. अशीच कहाणी आहे आराध्या राजीव नंदकर जिने अकराव्या वर्षी १४० पानाचे पुस्तक लिहून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. या छोट्या लेखिकेच्या ‘सारा पार्कर अँड द मॅजिकल ओरब’या पुस्तकाने पुणे येथील पुस्तक महोत्सवात वाचकांचे लक्ष वेधले आहे. एकाच दिवशी तिच्या पुस्तकाच्या शंभर प्रति हातोहात खपल्या.

आराध्या व इतर बाल साहित्यिक हे वाचन संस्कृती लोप पावत असलेल्या सोशल मीडियाच्या जगात जणू. आशेचा किरण आहेत. अनेक लहान मुले तिचे पुस्तक उपलब्ध असलेल्या स्टॉलला भेट देत असून तिच्याशी संवाद साधून प्रेरणा घेतांना आढळून आलें.मुलांची मोबाईल पासून सुटका करून घ्यायची असेल तर मुलांच्या हातात पालकांनी मोबाईलऐवजी आता पुस्तक दिले पाहिजे. पालकांच्या हातातही पुस्तकं हवीत. एका जाहिरातीमध्ये आई, वडील मुलगा एकत्र सर्वजण मोबाईल मध्ये पहात असतात हळूहळू वडील मोबाईल सोडून पुस्तक हातात धरतात नंतर आई पण मोबाईल सोडून पुस्तक हातात धरते त्यांचे पाहून मुलगा देखील मोबाईल सोडून पुस्तक हातात धरतो. ही जाहिरात वास्तवात यायला हवी. मुले ही आपल्या देशाचे भवितव्य असून पुस्तकें ही त्यांच्यावर मूल्यसंस्कार रूजवण्याची मोठी माध्यमें आहेत. आराध्या नंदकर ही पुस्तक वाचन सोबतच पेंटिंग आणि ट्रेकिंग करते. तसेच ती कराटे मध्येही ब्लॅक बेल्ट आहे. भविष्यात तिला लेखिका व्हायचे आहे. अशीच कामगिरी साची साकेत भांड हिनेही केली आहे. तिचे आई-वडील प्रतिमा व साकेत हे प्रकाशक आहेत. ‘साचीच्या गोष्टी’ हे तिचे पुस्तक प्रकाशित झाले. इयत्ता तिसरीत असताना तिने या गोष्टी रचण्यास सुरुवात केली.या गोष्टी नीतिकथा आहेत हे तिचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य.ग्रंथांशी मैत्री अन् वाचन-लेखन संस्कारांचा वारसा लाभलेल्या साचीच्या गोष्टींतून एक प्रकारच्या नीतिकथाच पुढं आल्यात. लेखन संस्कारांचे स्वप्न पाहिलेल्या तिसऱ्या पिढीतील या निरागस लेखिकेची ही सुरुवात आहे.

या अगोदर साचीने गोष्टींचे व्हिडिओ केले आहेत. आकाशवाणी केंद्रात काही गोष्टी सांगत धीटपणे मुलाखतही दिली होती. ग्रंथप्रेमातून ज्ञान- विज्ञानाची पताका खांद्यावर घेऊ पाहणारी ही बाललेखिका !
बालकांवर वाचन-लेखनाचे संस्कार करणे, ही आजची गरज आहे. पालकांनी सर्जनशीलतेचे हे कर्तव्य सांभाळले, तर घरोघरी साचीसारखे बाललेखक वाचन-लेखनाची सुरुवात करू शकतील. ‘साचीच्या गोष्टी’ ही त्याची सुरुवात आहे.”

आराध्याचे वडील राजीव नंदकर व तिची आई यांच्या प्रोत्साहनामुळे ती लिहिती झाली कोविड काळात इयत्ता सातवीतील पालवी मालुंजकरने विविध विषयांवर ब्लॉग लेखनास सुरुवात केली. तिच्या लेखनाचे संपादन दिनेश पाटील यांनी सर्जक पालवी या पुस्तकात केले आहे. त्यात तिची पत्रे आहेत, निबंध आहेत, रोजनिशीची पानं आहेत आणि ब्लॉगवरचं लेखनही आहे. अभिप्राय, प्रतिक्रिया, मनोगतं, संवाद यांनी हे संपादन साकारले आहे. मराठी शिवाय हिंदी व इंग्रजी भाषेत तिचे हे सर्व लेखन प्रकाशित होत आहे. पालवीच्या पुस्तकाप्रमाणेच अनेक मुलांच्या पुस्तकांची दखल प्रकाशक घेत आहेत. या सर्व बाल साहित्यिकांच्या पाऊल खुणा पुढे दुसऱ्यांसाठी पायवाट म्हणूनच राहणार आहेत.

सोनाली गावडे हिने दैनंदिनी लिहायला सुरुवात केली ते शिक्षकाच्या प्रोत्साहनामुळे. घरात मेंढी पालनाचा व्यवसाय व कोणातीही साहित्यिक पार्श्वभूमी जरी नसली व आईवडीलांचा लिहण्यासाठी विरोध असतांनाही शिक्षकांच्या प्रयत्नां मुळे ती लिहती झाली.कधी वारसा तर कधी जिद्द व चिकाटी कामाला येते. माझी दैनंदिनी या नावाने तिथे ते लेखन प्रकाशित झाले आणि त्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्ग्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तिचं पुस्तक प्रकाशित झालें तेव्हा ती सातवीत होती. मुलें वाचत नाहीत कसे म्हणता येईल? मुलें वाचत आहेत व लिहीतही आहेत. पुण्यात भरलेल्या नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तक प्रदर्शनात रोज असंख्य शाळेची मुले घेऊन प्रदर्शनाला भेट देत आहेत एका दिवसात जवळजवळ पाच लाख पुस्तकांची विक्री होत आहे मुलांना बोलते,लिहिते करणारे अध्यापन हवे..केवळ पुस्तकं वाचून लिहितं होता‌ येणार नाही तर पुस्तकांच्या पलीकडे जे जे आहे ते टिपता यायलां हवं. प्रोत्साहनाच्या जेवढ्या पायवाटा निर्माण करता येतील तेवढ्या आई-वडिलांनी, आजी आजोबांनी, पालकांनी व समाजातील घटकांनी निर्माण करायला हव्यात.

Author