ओळख मूलांकाची – मूलांक ६
Category:
लेखसंग्रह
March 8, 2026
Category:
लेखसंग्रह
March 8, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनभारताने जगाला दोन मोठ्या देणग्या दिल्या. एक आहे बुद्ध आणि दुसरा कृष्ण.
बुद्ध आत्मिक, अंतर्गत स्तरावर आहे तर कृष्ण बाहेरच्या स्तरावर आहे. बुद्ध एक उदाहरण देत असत. मनःशांती कशी असावी याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की मन हे रथाच्या चाकाच्या मधल्या दांड्यासारखं असावं. चाकाचा परीघ जोरजोरात फिरतो, धावत राहतो पण मधला दांडा फक्त स्वतःभोवती फिरतो. शांत असतो.
March 7, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकृष्ण चरित्रामधील एक प्रसंग आहे. इंद्र गोकुळावर कोपला. गोकुळावर त्याने विजांचा कडकडाट केला आणि मुसळधार पाऊस पाडून सगळ्या गावकऱ्यांना संकटात आणलं. घरे, शेती, गाई-गुरे बुडू लागली. गावकरी हतबल झाले. सगळे कृष्णाकडे गेले. कृष्ण अशावेळी घाबरायला हवा होता. पण कृष्णच तो…तो तर बासरी वाजवत बसला होता. त्याच्या आसपास गावकरी जमा झाले तेव्हा कृष्णाने बासरी खाली केली आणि ते काही बोलण्याआधीच कोसळणाऱ्या मुसळधार पावसावर मी उपाय सांगतो असे आश्वासन दिले. मी युक्ती करतो असा धीर दिला.
March 6, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ
March 5, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनजॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचं हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे भारतात होणारे बलात्कार. कोलकात्यात जो बलात्कार झाला त्यातील आरोपीने कबूल केले आहे की बलात्कार करण्याआधी त्याने पॉर्न क्लिप पाहिली होती. अशा क्लिप अगदी शाळकरी वयातील मुलेही फक्त एक क्लिक करून पाहू शकतात. सिनेमांना जसं सेन्सॉर बोर्ड असतं तसं पॉर्नला नसतं. अशा फिल्म्सवर भारत सरकारचं नियंत्रण नाही. कारण ह्यातील बहुतांश क्लिप विदेशात तयार होतात आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातात. ह्या फिल्म प्रौढ व्यक्तींपुरत्या मर्यादित नाही. त्या कोणीही पाहू शकते. अशा फिल्म पाहिल्याने शरीरात बदल होतात आणि तात्काळ लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. थोडक्यात, अशा क्लिप्स म्हणजे बलात्काऱ्यांची शाळा आहे.
लैंगिक शिक्षणाचा अभाव:
March 4, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यासाठी झगडावं लागलं नाही. मात्र, मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून आपण कायम प्रयत्न करतो. खासकरून सीमारेषेवर तैनात असलेले सैनिक भारताचं रक्षण करतात, स्वातंत्र्य जपतात. मग ह्या सैनिकांसाठी काय करता येईल हा विचार सुमेधाताई चिथडेंच्या मनात आला आणि त्यांनी सियाचीन ह्या जगातील सर्वात उंच रणभूमीवर सैनिकांसाठी ऑक्सीजन प्लँट उभा केला. कारण शत्रूपासून कायम धोका असलेल्या सियाचीनमध्ये ऑक्सीजन नाही. त्याची उंची इतकी जास्त आहे की तिथे सज्ज असलेल्या सैनिकांना प्राणवायू मिळत नाही. म्हणून सुमेधाताईंनी तिथे ऑक्सीजन प्लँट उभा करून दिला.
March 3, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआपण जीवनभर इतरांच्या उपयोगी पडत असतो. आपण मृत्यूनंतरही इतरांच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी उपाय आहे अवयवदान किंवा देहदान!
आपल्या मृत्यूनंतर आपले , चांगल्या स्थितीत असलेले अवयव , दुसऱ्याला दान करण्याची किंवा संपूर्ण मृतदेह दान करण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. त्याबद्दल सांगत आहेत निरेन आपटे.
March 2, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमी डबिंग स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होतो. सकाळचे सात वाजले होते आणि अंधेरीमधील एका स्टुडिओ बाहेर मी उभा होतो. स्टुडिओला बाहेरून कुलूप होते आणि तेवढ्यात स्टुडिओ बाहेर गर्दी जमा व्हायला लागली. कारण माझ्या बाजूला दस्तुरखुद्द अमिताभही स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होते.
अमिताभ नेहमीच सकाळी सात किंवा आठ वाजता डबिंग करतात. त्यांचा हा नियम गेले अनेक वर्षे ते पाळत आहेत. आजही ते सकाळी वेळेवर आले, पण स्टुडिओ बंद होता. सकाळची वेळ असल्यामुळे सोबत बॉडी गार्ड नव्हते. फक्त त्यांचा ड्रायव्हर थोड्या अंतरावर उभा होता आणि आम्ही दोघे स्टुडिओच्या कुलूपाकडे पाहण्यापेक्षा वेगळं काही करू शकत नव्हतो.
March 1, 2026
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह‘मार्च’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘प्रभावशाली, कल्पक, उत्साही, धाडसी’ असतात असे म्हटले जाते. चालू मार्च महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकणे नक्कीच रंजक ठरेल.
March 1, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकशास्त्र ही भविष्य कथनाची एक स्वतंत्र शाखा मानली जाते.ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या प्रमाणे राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव कळतो. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात.
February 28, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti