दिनविशेष

जागतिक महिला दिन

Category:

 

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

  March 8, 2022


कथा

गोमुची उधारी (गोमुच्या गोष्टी – भाग ६)

Category:

 

सर्वांची उधार देण्याची मर्यादा संपली की गोमु एखादी तात्पुरती नोकरी शोधी. पैसे हातात आले की बरीचशी उधारी फेडून टाकी आणि परत उधार घ्यायला मोकळा होई. उधारी करणे हे आपण मराठी माणसे कमीपणाच कां मानतो कुणास ठाऊक! तसं तर म्हणतात की मानव अथवा त्याचा आत्मा हे शरीर निसर्गाकडून उधारच घेतो आणि जातांना परत निसर्गांतच सोडून जातो.

  March 8, 2022


साहित्य - ललित

रेशीमगाठी – भाग १

Category:

 

काय रे केदार, असा का बसला आहेस डोक्याला हात लावून? बरं वाटत नाही का? आणि इतका उशीर?” प्रदीपने-केदारच्या मित्राने-विचारलं. केदार म्हणजे एक उमदा, सतत हसतमुख असणारा. वेळेच्या बाबतीत काटेकोर, कामात चोख.

  March 7, 2022


लेखसंग्रह

शिवरायांनी केलेली जगातील सर्वोतम गुंतवणूक

Category:

 

आपण असं शिकायला हवं जणू आपण नेहमीसाठी जगणार आहोत आणि असं जगायला हवं जणू उद्याच मरणार आहोत. विद्येसारखा बंधू नाही. विद्येसारखा मित्र नाही. विद्येसारखे धन नाही, आणि विद्येसारखे सुखही नाही.

  March 7, 2022


लेखसंग्रह

दवोत्सव

Category:

 

सोसायटीच्या गेटवरचा नवा वॉचमन हसून स्वागत करता झाला आणि त्याने अदबीने बॅरिकेड वर केलं. मीही त्याला ” काय म्हणतंय धुकं आणि थंडीची रात्र कशी गेली ? ” असं विचारलं. त्याने होकारात मान हलवली.

  March 7, 2022


साहित्य - ललित

सावंत ‘विकी’

Category:

 

विकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’!

  March 7, 2022


दिनविशेष

दैनिक नवाकाळचा स्थापना दिवस

Category:

 

नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक ‘नवाकाळ’ ची स्थापना केली. त्यांनी ‘नवाकाळ’ धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ९ फेब्रुवारी १९२९ रोजी भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले.

  March 7, 2022