कथा

गोमु पैज घेतो (गोमुच्या गोष्टी – भाग ११)

Category:

 

विजापूरच्या बादशहाने शिवाजी राजांना धरण्याचा/मारण्याचा पैजेचा विडा दरबारांत ठेवला होता. तो अफजलखानाने उचलला. त्याचे पुढे काय झाले ते आपल्याला माहित आहेच. तेव्हां कुठलीही पैज घेणं ही गोष्ट सोपी नाही. मला वाटते पैज घेणे किंवा कठीण गोष्ट करायचे आव्हान देणे हे पुराणकालापासून चालत आलेलं असावं. महाभारतात असे बरेच प्रसंग आहेत. प्रतिज्ञा आणि पैज यांत अर्थातच फरक आहे. प्रतिज्ञा करणाऱ्याला कुणी आव्हानही देत नसत आणि नंतर बक्षिसही देत नाही. पैज घेतांना एक आव्हान देणारा असतो आणि दुसरा ते स्वीकारणारा असतो. पैज जिंकला तर जिंकणाराला काय मिळणार आणि तो हरला तर काय द्यावं लागणारं हे पैज घेतानाच ठरतं. त्यादृष्टीने महाभारतांतला द्यूत खेळण्याचा प्रसंग पैज ह्या सदरांत मोडतो.

  March 19, 2022


कथा

यशाचा मार्ग (कथा)

Category:

 

सौरभ शाळेतून घरी आला तोचमुळी आनंदात आणि का येऊ नये? गायन स्पर्धेत पहिला आला होता तो. सौरभ गिरकी घेत घरात शिरला. शाळेचे दप्तर कोचावर धाडकन फेकले. अंगातला युनिफॉर्म तसाच भिरकावला आणि तो मोठ्याने गाणे बडबडू लागला. “सौरभ, अरे काय चालले आहे?” आईने विचारले. “तू काय आता लहान आहेस? काय हा पसारा मांडून ठेवला आहेस. अरे, नववीत आहेस. जरा नीट वाग.” सौरभ म्हणाला, “अगं आई, मी आज शाळेत गायन परीक्षेत पहिला आलो.” ‘अरे वा! उत्तम! अभिनंदन! म्हणून तुला कसंही वागायला परवानगी नाही मिळाली.” आई म्हणाली. ‘आधी बूट जाग्यावर ठेव, दप्तर कपाटात जाऊ दे आणि युनिफॉर्म धुवायला जाऊ देत. आधी हातपाय धुवून घे. आधी खाऊन घे आणि खाऊन झाल्यावर खेळायला जा.’ “हो. तु टीचरसारखी छडी घेऊन मागे लाग माझ्या. नाहीतरी तु टीचर आहेसच.” “हो. आहेच मी शिक्षिका.” आई म्हणाली. “आणि मी जे काही सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच सांगते आहे.” “हो कळलं.’ सौरभ म्हणाला, “सारखे लेक्चर नकोय मला. मी गायनाच्या परीक्षेत पहिला आलो त्याचे कौतुक राहिले दूर.” “तसं नाही रे राजा,” आई म्हणाली, “कौतुक तर आहेच पण तू चांगलं वागावंस हीच माझी इच्छा आहे रे. मी कोणी तुझी शत्रू का आहे?” हे चालू असताना सौरभची आजी बेडरूममधून बाहेर आली. ती सगळे “आत ऐकत होती. ती म्हणाली, “अगं, राहू देत. आज तो इतक्या खुशीत आहे तर त्याच्या आनंदात विरजण घालू नकोस.’ अलका म्हणाली, “अहो आई, पण म्हणून त्याने बेशिस्तीने वागावे असे नव्हे ना. मी काय त्याची वैरीण आहे का? त्याने स्वत:चे स्वत: आवरावे, खाऊन घ्यावे आणि खेळायला जावे यात कसले आले विरजण! अहो, आजकालची मुले मैदानी खेळ खेळत नाहीत त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होत नाही. शारीरिक हालचालींमुळे त्यांचे शरीर सुदृढ राहते मानसिक विकास होतो आणि मुख्य म्हणजे सांघिक खेळामुळे हार पचविण्याची मानसिक ताकद मिळते. मी सुद्धा शाळेत खेळाची शिक्षिका असल्यामुळे मला हे जास्त ठाऊक आहे.” आजी म्हणाली, “असू दे. आजचा दिवस त्याला जास्त काही बोलू नकोस. एवढा आनंदात आहे तर आजच्या दिवस नाही खेळायला गेला तर काही बिघडत नाही.’

  March 18, 2022


नॉस्टॅल्जिया

अंबाड्याची दोरी ना दोरखंड..!

Category:

 

आज सर्वत्र कृत्रिम धागे आणि दो-या यांचाच काळ आहे. सर्व कामासाठी नायलॉनच्या दो-यांचा वापर होत आहे,पण एक काळ होता जेंव्हा शेतातील कामासाठी नैसर्गिक धाग्यापासून बनलेल्या दोरीचा वापर व्हायचा.अंबाड्याच्या बट्ट्यापासून दोर वळायचे….गावोगावी वट्यावर म्हातारी माणसे दो-या वळत बसलेले दिसायचे.

  March 18, 2022


साहित्य - ललित

संधीचं सोन! – Part 3

Category:

 

‘अहो, असं काय करताय? दोघी सकाळीच नाही का गेल्या फेशियलसाठी ब्यूटिपार्लरमधे? आपण खूप साधेपणाने करायचं ठरवलं पण पोरींना वाटतं थोडी हौसमौज करावी.’ तेवढ्यात एक माणूस दोन मोठे डबे, पेपर डिशेस, ग्लास, अर्धा डझन बिसलेरीच्या बाटल्या घेऊन येतो. म्हणतो, ‘बाळाभाऊंनी पाठवलंय. जेवण करून घ्या. मी उद्या सकाळी येऊन डबे घेऊन जाईन.’ एवढे म्हणून तो गेला सुद्धा. डबे आल्याचे पहाताच राधाक्कांची खात्री पटली. मग त्यांनी भजनी मंडळाच्या बायांना फोन करून निरोप दिले. शेजारच्यांनाही निरोप गेले, तेवढ्यात तायडी आणि बबडी आल्याच.

  March 18, 2022


लेखसंग्रह

पन्नास वर्षांची मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखनाचे प्रवाह

Category:

 

मराठी रंगभूमीवरील नाट्यलेखनाचा गेल्या पन्नास वर्षांचा हा धावता आढावा. हा प्रवास सत्तरच्या दशकानंतर विविध माध्यमांच्या आक्रमणाने खडतर होत गेला आणि मराठी प्रेक्षकांच्या पारंपरिक सवयीही बदलल्यामुळे तो अधिकच दुष्कर झाला. पण गुणात्मकदृष्ट्या मराठी नाटक मागे पडत चाललं आहे हा ओरडा खोटा आहे.

  March 18, 2022


साहित्य - ललित

सामंजस्य

Category:

 

क्लास च्या आवारात राहणाऱ्या watchman च्या घरातून आवाज येत होता. त्याची बायको गरम गरम पोळ्या लाटत मुलांना जेवू घालत होती. महिला दिनाचं औचित्य आणि हे दृश्य , मगाशी जे अपुरं वाटलं ते इथे पूर्ण झालं..या सगळ्या सुद्धा कर्तबगार महिला नाहीत का? फक्त आता महिलांच्या या बाजूला कर्तबगारी म्हणून बघणं आपण सोडून दिलंय.

  March 18, 2022


लेखसंग्रह

लहानपणातलं बालपण

Category:

 

अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं.

  March 18, 2022


लेखसंग्रह

दि कश्मीर फाईल्स’ – सत्य ‘खरं’ असतं !

Category:

 

“इंफोटेंमेंट” सदरातील चित्रकृतीने त्या चौकटीबाहेर जाऊन समोर धरलेला आरसा विद्रुप आणि असह्य होता. मल्टिप्लेक्सच्या थंडगार अंधारात हे साधं बघणंही अस्वस्थ करणारं होतं आणि बजाज स्कुटर /गॅस सिलेंडर मुळे वैतागणाऱ्या मला त्या मंडळींच्या जागी स्वतःला इमॅजिन करणेही अशक्य होतं.

  March 18, 2022