लेखसंग्रह

सांगावसं वाटलं म्हणून , त्या भाजीविक्रेत्या

Category:

 

मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात.

  June 19, 2022


साहित्य - ललित

दान आणि मान

Category:

 

वटसावित्री पौर्णिमा.. आम्हा बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा दिवस असतो वडाच्या पुजेची तयारी पारंपरिक पोषाख आणि श्रद्धेने भक्तीने अखंड सौ भाग्याचे लेण मिळावे म्हणून वडाला दान मागायचे असते गावी असतांना वडाच्या पुजेला जात होते पण नंतर मात्र घरीच वटवृक्षाच्या पुजेचे चित्र मिळायचे ते आणून एका खपटावर डकवून पुजा करते आहे आजही फक्त दोरा घेऊन फेरी मारता येत नाही म्हणून त्याचे सातपदरी फोटोतल्या वडाला चिटकवते पूर्वी सात प्रदक्षिणा घालायची आता नाही.

  June 19, 2022


साहित्य - ललित

पैली ते सात्वी

Category:

 

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली.

  June 19, 2022


साहित्य - ललित

बूमरॅंग

Category:

 

काही वर्षांनी दिपक इतका आळशी झाला की, त्याचे सहीपासूनचे सर्व व्यवहार संतोषच सांभाळू लागला. संतोषला काही वेळा, एक विचार सतावत रहायचा की उद्या दिपकनं आपल्याशी भांडून हाकलून दिलं तर आपली अवस्था अतिशय वाईट होईल.. त्यासाठी एकदा त्यानं दिपकला विनंती केली की, माझ्या नावावर ठेवायला काही पैसे देतोस का? त्यावर दिपक म्हणाला अरे, सर्व पैसे तुझ्याच खात्यावर असताना अजून तुला काय हवं? संतोष हे ऐकून, गप्प रहायचा..

  June 19, 2022


दिनविशेष

वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकाचा पहिला प्रयोग

Category:

 

अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात दोन हजाराच्या वर प्रयोग केले होते.

  June 19, 2022


दिनविशेष

पितृदिन

Category:

 

पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रासारखे विशाल, अथांग आहे. साऱ्यांना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसऱ्याच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा!’ बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आईसारखे घाय मोकलून रडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नाही. कारण, सर्वांचं सांत्वन त्यालाच करायचं असतं.

  June 19, 2022


कथा

समृध्द प्रेमाची भेट (संक्षिप्त रुपांतरीत कथा २६)

Category:

 

ह्या कथेवर १८ चित्रपट झाले. शिवाय लहान पडद्यावर अनेक कथा, मालिकांत ही गोष्ट घेण्यांत आली. शाळा/महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांत आली. कथा इतकी लोकप्रिय आहे की ती छोट्या रूपात लेखकाचे नाव न देता सामाजिक माध्यमांवरही फिरते. खूप लोकप्रिय हळवी कथा.

  June 19, 2022