लेखसंग्रह

श्वेतप्रदर

Category:

 

योनीमार्गे होणारा अतिरिक्त पांढरा स्त्राव हा अनेकदा स्त्रियांना त्रासदायक वाटतो. सतत योनीमार्गे होणारा हा स्राव नेहमीच्या नैसर्गिक | स्त्रावापेक्षा अधिक प्रमाणात होतो. अशा निरुपद्रवी स्त्रावाबद्दल अधिक माहिती घेऊ.. अशा वेळी जननेंद्रियाच्या ‘भग’ (व्हलवा) भागात सतत ओलावा राहणे व कपड्यांवर पांढरट पिवळसर डाग पडणे ही प्रमुख लक्षणे असतात.

  April 22, 2023


लेखसंग्रह

उपलब्ध पाणी हे कोकण विकासाला सहाय्यक ठरू शकेल काय?

Category:

 

आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो.

  April 21, 2023


लेखसंग्रह

स्तनपान – भाग ४

Category:

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार स्त्रियांना आता स्तनपानाचे महत्त्व पटू लागले आहे. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली आहे; पण अंगावर पाजणाच्या कालावधीत वाढ झालेली नाही. त्या पाजणे लवकर बंद करतात.

  April 21, 2023


लेखसंग्रह

ये रे ये रे पैसा

Category:

 

एका ब्रँचला एक पेन्शनर आजोबांचा एवढा विश्वास की, एकदा मी रजेवर होते, तर FD करायला आणलेली एक लाख वीस हजाराची रक्कम परत घरी घेऊन गेले, दुसऱ्या दिवशी मी म्हणाले, ‘काका पैसे नेण्याआणण्याची इतकी जोखीम का घेतली.’ तर म्हणाले, ‘तू नव्हतीस ना, मग मी आपला परत गेलो.’

  April 20, 2023


लेखसंग्रह

क्रुझचा अनोखा अनुभव

Category:

 

हल्ली सर्वजण खूप प्रवास करतात. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही. पुर्वीसारखे परदेशवारीचे अप्रूप आता राहिले नाही. मोठ्या संख्येने मुले-मुली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जायला लागले. मग त्यांचे आई-वडील मुलीच्या -सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिका युरोपला जायला लागले.

  April 20, 2023


लेखसंग्रह

चलो, बुलावा आया है…

Category:

 

माणसाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. कोण एका वर्षांत करोडपती होतो, तर कधी कुणाच्या धंद्याचं दिवाळं निघतं. शोमन राज कपूरचं तसंच घडलं होतं. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने तो खचून गेला होता.

  April 20, 2023


लेखसंग्रह

स्तनपान – भाग ३

Category:

 

अंगावरच्या दुधातील सुरुवातीचे दूध बाळाची तहान भागवते तर नंतर येणारे दूध भूक भागवते. सुरुवातीच्या ८ ते १० मिनिटांत येणाऱ्या दुधांत मेद कमी असते व पाणी जास्त असते. त्यात दुग्धशर्करा, प्रथिने जीवनसत्त्वे व खनिजे जास्त प्रमाणात असतात. नंतरच्या दुधात चरबीचे प्रमाण वाढते बाळाची भूक भागते. बाळाला ऊर्जा मिळते. यामुळे सर्व घटक मिळण्यासाठी एका बाजूचे स्तन पूर्णपणे रिक्त होईपर्यंत पाजून मगच दुसऱ्या स्तनाला घ्यावे.

  April 20, 2023


लेखसंग्रह

रंजोगम’ – खय्याम साहेब !

Category:

 

खय्याम साहेब तसे एस-जे, एस.डी, एल-पी किंवा आर.डी. यांच्यासारखे खूप फॕन फाॕलोईंग असणारे संगीतकार नव्हते. तसे त्यांचे नावही फक्त दर्दी कान-सेनांनाच ठाउक आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चटका लागलाच पण त्याचवेळी त्यांच्याविषयी त्यांच्या संगीताविषयी एवढं भरभरुन दाखवले गेले व लिहीले गेले हे पाहून मनाला खरंच समाधान वाटलं त्यांच्या निधनानंतर मी जे काही थोडे कार्यक्रम पाहिले व लेख वाचले त्यात खय्याम साहेबांची बरीच गाणी उल्लेखली गेली.

  April 19, 2023