व्यक्ती-परिचय

भारतीय नृत्यांगना  रुक्मिणीदेवी अरुंडेल

Category:

 

भारतात भरतनाट्यम ह्या शास्त्रीय नृत्याला त्याच्या मूळ ‘साधीर’ शैलीतून त्यांनीच पुनरुज्जीवित केले. पूर्वी भरतनाट्यम हे नृत्य देवदासी करत असल्यामुळे ह्या नृत्याला प्रतिष्ठा नव्हती. ह्या नृत्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी ह्यांनी केले. शिवाय त्या एक थीयोसोफिस्ट सुद्धा होत्या. त्या काळी भरतनाट्यमला समाजात अत्यंत खालच्या दर्जाचे व अश्लील असे समजत असत.

व्यक्ती-परिचय

भारूडरत्न निरंजन भाकरे

Category:

 

मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळा सह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती.

व्यक्ती-परिचय

भालचंद्र नीळकंठ पुरंदरे

Category:

 

डॉ. पुरंदरेंनी कुटुंबनियोजनासाठी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या ‘शांतिलाल शाह समिती’चे ते सभासद होते. डॉ.पुरंदरेंच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यात आला.

व्यक्ती-परिचय

भारतीय जादूगार पी सी सरकार

Category:

 

पी. सी. सरकार यांचे पूर्ण नाव प्रतुलचंद्र सरकार. त्यांचा जन्म तत्कालीन बंगाल प्रांतातील (विद्यमान बांगला देश) तंगईल जिल्ह्यातील आशीकपूर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. गावातीलच शिवनाथ हायस्कूलमध्ये शिकत असतानाच जादूबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि त्यांनी गणपती चक्रवर्ती यांच्याकडून जादूविदयेचे धडे घेण्यास प्रारंभ केला; तथापि शालेय अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही.

व्यक्ती-परिचय

भारतातील सर्वश्रेष्ठ वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया

Category:

 

वास्तुकलेतील आगा खान पुरस्कार तसेच प्रीमियम इम्पेरियल ऑफ जपान आणि रॉयल गोल्ड मेडल ऑफ दी रॉयल इन्स्ट‌ट्यिूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (रिबा) या प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते मानकरी होते. जपान तसेच इंग्लंडनेही त्यांचा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान केला.

व्यक्ती-परिचय

भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य

Category:

 

चिंतामण विनायक वैद्य हे इतिहासाचे व्यासंगी व साक्षेपी संशोधक म्हणून ओळखले जात. ते ज्ञानमार्गी प्रज्ञावंत, ललित लेखकही होते. त्यांनी केलेले महाभारताचे भाषांतर हे त्यांचे प्रचंड वाङ्मयीन कर्तृत्व म्हणून ओळखले जाते. म्हणूनच त्यांना भारताचार्य अशी पदवी मिळाली. लोकमान्य टिळक यांनी त्यांना भारताचार्य या मानाच्या पदवीने गौरवले. वैद्य हे ‘दुर्दैवी रंगू’ ह्या त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीमुळे गाजले.

व्यक्ती-परिचय

भारतीय जॅझ संगीताचे पितामह लुईस बँक्स

Category:

 

`मिले सूर मेरा तुम्हारा…’ या साडेतीन मिनिटांच्या जिंगलचे सूर निनादू लागले दूरदर्शनवरुन १९८८ साली. सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला या गाण्याने. ही जिंगल जेव्हा सुरू होते तो प्रारंभीचा वाद्यमेळ, प्रत्येक भाषेतील कडव्यामध्ये येणारा तसेच हे गाणे जेव्हा अंतिम चरणापर्यंत येते तेव्हा कानावर पडणारा वाद्यसाज ही म्युझिक ॲ‍रेंजमेंटची सगळी किमया होती लुईस बँक्स यांची.