पुनर्बालपण
Category:
साहित्य - ललितमध्यंतरी आठ दहा दिवस माझ्याकडे रहायला आली होती. मी बाजारात निघालो तर म्हणाली , ” मी येते ” . म्हटलं, चल. कोथिंबिरीच्या एका चांगल्या जुडीसाठी तिन ठिकाणी मला फिरवत आणि तागडीतील प्रत्येक लहान वांगसुद्धा दाबून , गोल फिरवत पाहून तपासून घेणाऱ्या तिने बाजाराला दीडपट वेळ लावला . वर , घरी आल्यावर बायकोला ” अजितला अजूनही बाजारहाट काडीचा जमत नाही “, हेही सांगून टाकलं. मात्र ही आली की माझी खाण्याची चंगळ असते .