लेखसंग्रह

सप्टेंबर २५ – ‘हॅन्सी’ क्रोनिए आणि मॅडम क्लेअर

Category:

 

२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्‍या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता.

२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला. आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार्‍या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.

  September 24, 2010


साहित्य - ललित

सू-सुटका!

Category:

 

ती अनोळखी आई सुध्दा प्रेमळ होती.आपल्या मुलासारखंच तिने मला जवळ घेतलं होतं.पण त्या दिवशी मला एक गोष्ट समजली,

‘सर्व-सर्व आयांचं,सर्व-सर्व मुलांवर खूप-खूप प्रेम असतं पण तरीही सर्व-सर्व मुलांना आपलीच आई हवी असते!!’ हो किनई?

  September 24, 2010


लेखसंग्रह

सप्टेंबर २६ – विजय मांजरेकर आणि इअन ‘चॅपेली’

Category:

 

२६ सप्टेंबर १९३१ रोजी तेव्हाच्या बॉम्बेत विजय लक्ष्मण मांजरेकरांचा जन्म झाला. वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे जवळजवळ नसण्याच्या काळात त्यांनी वेगवान गोलंदाजी खेळण्याचे दंडक घालून देण्याजोगी फलंदाजी केली. २६ सप्टेंबर १९४३ रोजी इअन मायकल चॅपेलचा जन्म झाला. ‘चॅपेली’ या नावाने तो ‘लाडका’ आहे. अनेक लेखक-विश्लेषकांच्या मते इअन चॅपेल हा क्रिकेटच्या सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे.

  September 24, 2010


लेखसंग्रह

सप्टेंबर २७ – ‘झडप्या’ ब्रेन्डन मॅक्कलम आणि हेमिंग्जचे ‘दाही’ बळी

Category:

 

इंडीयन प्रिमिअर लीगचा पहिलाच सामना आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीने गाजविणार्‍या ब्रेन्डन बॅरी मॅक्कलमचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ रोजी ओटागोत झाला. अत्यंत स्फोटक फळकूटवीर असण्याबरोबरच तो एक चपळ यष्टीरक्षकही आहे.

ब्रेन्डन मॅक्कलमच्या जन्मानंतर बरोबर एका वर्षाने कॅरिबिअन बेटांवरील जमैकातील किंग्स्टन शहरातील सबिना पार्क मैदानावर एडी हेमिंग्जने एकाच प्रथमश्रेणी डावात दाहीच्या दाही गडी बाद करण्याचा पराक्रम केला.

  September 24, 2010


साहित्य - ललित

मोरू.

Category:

 

आधी पहाट झाली मग सकाळ झाली.

रात्रभर गार वार्‍याने शहारलेली झाडं, सकाळी फ्रेश झाली.

जंगल जागं होऊ लागलं. झाडं डोलू लागली. पानं सळसळू लागली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला.

तर, पिल्लांनी खाऊसाठी किरकिर सुरू केली.

इकडे तिकडे लोळत पडलेले प्राणी उभे झाले.

  September 24, 2010


लेखसंग्रह

ट्रिमेंडस्! फफफफफफफफंटास्टिक! मूर्तिकार मार्व्हलस मूर्तिकार

Category:

 

या मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्‍या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्‍या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् !

  September 23, 2010


लेखसंग्रह

सप्टेंबर २२ : कसोटी = बरोबरी

Category:

 

तोवरच्या १,०५२ कसोट्यांच्या इतिहासातील केवळ दुसरी बरोबरीत संपलेली कसोटी २२ सप्टेंबर १९८६ रोजी ‘संपली’. प्रतिस्पर्धी होते भारत-ऑस्ट्रेलिया.

  September 23, 2010