अवर्गिकृत

उतारवयांत जगतांना !

Category:

 

द्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते. 

  August 10, 2012


व्यक्ती-परिचय

रूपाली शिरोडे

Category:

 

मनात जिद्दीचा अंकुर जपून ठेवून त्याला सातत्यपूर्ण मेहनतीची जोड दिली तर अडीअडचणींच्या वादळवार्‍यांतही यशाचा वटवृक्ष बहरू शकतो, हे धुळ्याच्या रूपाली शिरोडेने दाखवून दिले आहे. एमपीएससीने २०११ मध्ये घेतलेल्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत रूपालीने राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

  August 9, 2012


अवर्गिकृत

श्रीकृष्ण जयंती

Category:

 

श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. त्यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे.

  August 8, 2012


अवर्गिकृत

गोपाळ काला

Category:

 

श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोर्‍या एकत्र करुन खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले.

  August 8, 2012


लेखसंग्रह

पाण्याचे संकट होत चालले बिकट !

Category:

 

पृथ्वीतलावर तीन रत्ने आहेत जल, अन्न आणि सुभाषित. परंतू मुर्ख माणसे दगडांच्या तुकड्यांना रत्नांची संज्ञा देतात. असे प्राचीन ग्रंथामध्ये, सुभाषितकारांनी यथायोग्य वर्णन केले आहे. रत्नतुल्य किंबहुना त्यापेक्षा मौल्यवान असलेले पाणी हे सजीवांचे प्राण होय.

  August 7, 2012


लेखसंग्रह

दुष्काळ खालपासून वरपर्यंत पसरलेला !

Category:

 

आमच्या गुणवत्तेवर नव्हे, तर आमच्या जातीचा गौरव करण्यासाठी आम्हाला मंत्रिपद मिळाले, यात धन्यता मानणारे मंत्री या देशात असतील, तर सगळ्याच प्रकारच्या दुष्काळांचा आपल्याला सामना करावा लागेल. ज्या दिवशी या देशाचे सरकार, या देशाची प्रशासकीय व्यवस्था सांभाळणारे लोक आणि या देशातील लोकप्रतिनिधी केवळ गुणवत्तेवर, नैतिक आचरणावर निवडले जातील त्याच दिवशी या देशाचा दुष्काळ खंडीत होईल!

  August 6, 2012


अवर्गिकृत

श्रीकृष्ण जन्मकथा

Category:

 

श्रीकृष्ण जन्मकथा श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो ऐका विनवितो श्री विष्णु अवतार घेतो ह्या सृष्टीवर १ दुष्टांचा होई अनाचार पृथ्वीते होई पापभार त्यांचा करण्या संहार परमेश्र्वर अवतरती २ कंस राजा दुष्ट स्वतःस समजे श्रेष्ठ प्रजेला देई कष्ट स्वार्थापोटी ३ छळ करु लागला जनांचा लुटमार अत्याचार छंद त्याचा खूनही करी साधूसंतांचा दुष्टपणे ४

  August 5, 2012


अवर्गिकृत

पुण्यातील स्फोटमालिका – आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा एक भाग ..!

Category:

 

पुण्यात घडविण्यात आलेल्या स्फोट मालिकांनी, आम्हाला नव्याने नव्या संदर्भासह विचार करण्यास भाग पाडले आहे. स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी मात्र त्या स्फोटांची परिणामकारकता निश्चितच मोठी आहे. कमी तीव्रतेचे म्हणून त्याकडे दुर्लक्ष वा कमी लक्ष देणे आमच्यासाठी आत्मघात ठरेल हे निश्चित !

  August 4, 2012


साहित्य - ललित

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

Category:

 

मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत. ‘ मनोरुग्ण ‘ हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो.

  August 2, 2012


अवर्गिकृत

व्याघ्र प्रकल्पांच्या बफरझोनमध्ये पर्यटक बंदी आणि समस्यांचे वास्तव सत्य …!

Category:

 

सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पांच्या केंद्रास्थानाच्या परिसरात (कोअर झोन) पर्यटक बंदी लागू करीत वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, यामुळे तमाम वन्यजीव प्रेमींना आनंद झाला. पर्यटक बंदीमुळे पर्यटकांची अनौपचारिक देखरेख संपृष्टात आल्याने वनअधिकारी निर्ढावल्यासारखे वागायला लागतील, याचा वारंवार प्रत्यय येतही आहे. बंदी असलेल्या जंगलात वनअधिकारी फिरतात की नाही हे पाहतो कोण ? वाघांच्या शिकारी झाल्यावर त्या इतरांना कळणार नाही, याची काळजी घेण्यात हा विभाग मोठा पटाईत आहे. आणि ते कळल्यास, कश्या प्रकारे नैसर्गिक मृत्यु झाला आहे हे सिद्ध करण्याची किमया हाच विभाग करू शकते. बफर झोन / कोअर झोन हा या वनविभागासाठी कम्फर्टेबल झोन ठरणार आहे.

  July 31, 2012